All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Monday, July 4, 2016

परिस्थिती माहीत नसताना एखाद्याला नावं ठेवणं

परिस्थिती माहीत नसताना एखाद्याला नावं ठेवणं काय असतं ते आज मला कळलं . त्याचे काय झालं ना गेले २ दिवस जो काही छान पाऊस पडत आहे. अश्या पावसात माझी बाईक मस्त भिजत होती, आता तिला थंडी भरली की कापरं कोण जाणे. पण आज ऑफिसला जाताना बाईक चालू केल्यापासून हेडलाईट जे चालू झाली सगळी बटणं बंद असताना देखील ते पूर्ण रस्ताभर. आता त्यामुळे काय झालं की लोकांना वाटत होत मी लाईट बंद करायचो विसरलो आहे, म्हणून बहुतेक जण मला खुणावत होते की लाईट चालू आहे करून. पण त्यांना काय सांगू माझा प्रॉब्लेम काय होता ते त्यांच्या दृष्टीने मी विसरभोळा नाहीतर वेंधळा तरी असेल म्हणून लाईट चालू राहून गेली आहे.

एरवी मी अश्या लोकांना नावं ठेवत असतो की काय विसरभोळी/वेंधळी लोक असतात लाईट चालूच ठेवली आहे बंद करायचं कसं कळत नाही यांना.  हां आता यात काही लोक असतात जी खरंच विसरतात आणि मला आधी हे  एकच कारण असावे असे वाटत होते . पण परिस्थिती अशी पण असू शकते हे आज कळलं.    - हर्षद कुंभार (०४-०७-२०१६ ०२:१२)

   

Tuesday, March 29, 2016

वेड! ते भावनांचे...

वेड! ते भावनांचे...
स्वस्त बसुन देत नाही,
बरसल्याशिवाय मग...
मन ही रित होत नाही.

शब्दरचना अन भाव...
वैरी वागतात काही ,
अर्धवट सोडून डाव...
निरभ्र आकाश मी होई.  - हर्षद कुंभार... 29/03/2016 4.15 PM 

Sunday, October 25, 2015

तुम्ही एलियन आहात कोणाच्या तरी नजरेत

असचं टाईमपास म्हणून थोडंसं..... पण मजेशीर आहे.
गावाकडे किव्वा शहरात एक प्राणी असा आहे जो आपल्याला परग्रहवासी समजत असेल बहुदा. कारण त्यांच आपल्याकडे पाहत राहन असे असते की, आपल्याला संभ्रमात टाकत की आपण जणु काही त्यांच्या ग्रहावर आलोय. 
तुम्हाला अंदाज लावणं शक्यच नाही की मी कोणत्या प्राण्यांबद्दल बोलतोय. चला सांगतोच जास्त ताणत नाही उगाच. 
.
.
.
.
.
.
.
.
.

तो प्राणी म्हणजे खरंतर म्हणता येणार नाही कारण ती स्त्रीलिंगी आहे म्हणजेच " शेळी/बकरी ".

हो खरंच तुम्ही कधीपण पहा शेळीची आपल्याकडे पाहण्याची अदाकारी तशीच असते. एकदा निरीक्षण नक्की करुन पहा तुम्हाला एलियन होयच असेल तर.  - हर्षद कुंभार...

Friday, October 2, 2015

मार्ग नवा...

मनात खुप काही असतं,
पण सगळं अस्ताव्यस्त...
लिहायचं खुप असतं,
पण जुळलेलं काही नसतं...

वाट बदललेली जाणवते,
कारण पावलं मोजकीच पडतात...
स्वच्छंदी मन स्वैर,
पण मार्ग काही अडतात ...  - हर्षद कुंभार....

Saturday, August 15, 2015

पगारी शेतकरी एक संकल्पना ….

 पगारी शेतकरी एक संकल्पना ….


आज केंद्र आणि राज्य स्तरावर शेतकर्यांबद्दल फक्त सहानभूती दिसते . 
आपला देश हा शेतीप्रधान आहे. तरतूद म्हणून सरकार काय करते आपल्याला सगळ्यांना माहित अहे. फक्त Packege जाहीर केले की झाले, पण किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो हेपण  सर्वांना माहित आहे . हे सगळ असूनही गेली कित्येक वर्ष आपण ऐकतो आहे शेतकरी आत्महत्या करतातच .
भौगोलिक स्तिथी आणि  पावसावर अवलंबून असलेली शेती बेभरवशी आहे . शेती ही उत्पन्न आले तर आले नाहीतर पुढच्या वर्षी तरी नीट होईल या आशेवर चालू असते .

 मी खूप विचार केला आणि परिणामी एका उपायावर येवून विचार थांबला आणि तो  सर्वांपर्यंत पोचलाच पाहिजे असे मला वाटते निदान सरकार पर्यंत पोचून असे काही अमलात आणावे . भारतात प्रत्येक शेतकऱ्याला कमी-अधिक प्रमाणात शेती आहे.  कोणाला एकरी आहे कोणाला गुंठ्यावारी . सरकार ने त्याचे मापन करून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या सरासरी उत्पन्ना वरून एक पगार निश्चित करायला पाहिजे . म्हणजेच दरमह एक नियोजित पगार मिळत असल्याने त्यांचा  उदरनिर्वाह होईल आणि शेतीमधून उत्पन्न आहे त्यावर कर आकारून सरकारला ते  पैसे मिळतीलच जे की शेतकर्यांनाच पुन्हा  पगार स्वरुपात देता येईल . अर्थात कर हा उत्पन्नावर  असला तरी तो सक्तीचा नसावा कारण पावसाअभावी उत्पन्न आलेच नाही तर कर कसा भरणार . तसाही package स्वरुपात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून जो पैसा निर्धारित होतो  तो या संकल्पनेसाठी वापरता येईल . शेतकऱ्यांचा पगार बँकेत प्रत्यक्ष सरकारी खात्यातून जमा होयला पाहिजे . म्हणजे भ्रष्टाचाराचा  दंश या प्रणालीला होणार नाही . अर्थात हे सर्व किती प्रमाणात प्रत्यक्ष शक्य होईल काय माहीत . तुम्हाला हे कितपत योग्य वाटत  आणि जर चांगलं अजून काही यात जोडण्यासारख असेल तर नक्की सांगा .  - हर्षद कुंभार

Tuesday, August 11, 2015

जगण्याची क्रमवारी

कधी कधी काही दिवस
खुप अटीतटीचे असतात...
त्यामुळे जगण्याच्या क्रमवारीत
गोष्टींच प्राधान्य बदलावं लागतं.  - हर्षद कुंभार... 

Thursday, August 6, 2015

शिक्षण आणि आपण

आपली शिक्षण संस्था इतकी गोंधळात टाकणारी आहे की.... आपण शिक्षित होत असतो की अशिक्षित तेच कळत नाही....
म्हणजे बघा हां आपण एखादी पदवी संपादन केली तरी नोकरी मिळेल असे नाही काहीतरी वेगळे शिक्षण घ्यावेच लागते.  त्यापेक्षा जे चलनात आहे तेच का नाही शिकवत, वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. सरासरी वयाच्या २५  वर्षी कामाला लागतो आपण, पण मोजकेच आणि प्रमाणित शिक्षण घेतले तर किमान काही वर्षं आधी तरी कामाला सुरुवात होईल. त्यामुळे जीवनमानात कीती बदल होईल हे कळलं असेल तुम्हाला.  - हर्षद कुंभार... 

Tuesday, August 4, 2015

लोकशाहीचे धोरण

नमस्कार, 
आज मी एका धोरणाबद्दल बोलणार आहे.  संघटितपणे सामान्य माणूस काय बदल करू शकतो ते. अर्थात यात काय नविन आम्हाला पण माहीत आहे असं तुम्हाला वाटलं असेल. पण दोस्तहो मित्रांशी गप्पांच्या ओघात हे मला लक्षात आले. आपण फक्त सरकार किव्वा पुढारी या लोकांवर अवलंबून न बसता लोकशाही या संज्ञेचा योग्य रीतीने वापर करू शकतो. आपल्या सोयीचे असे आपल्या सभोवताली खुप काही बदलता येईल आपल्याला .  म्हणजेच लोकांना लोकांसाठी घडविलेल्या गोष्टी. 

एक उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील यशस्वीपणे राबविण्यात आलेला " पुणे बस डे ".  त्या दिवशी आपल्या सारख्या सामान्य लोकांनीच उत्तम प्रतिसाद देऊन एक इतिहास घडविला.  प्रायोगिक तत्त्वावर केलेला तो प्रयोग खुप काही बोलुन गेला. पण किती लोकांनी तो ऐकला आणि लक्षात ठेवला.  
महिन्यात एखाद्या दिवशी असा प्रयोग करायला हवा.  पुन्हा पुणे बस डे करायला काहीच हरकत नाही.  
तसंच अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या या पद्धतीने आपण अमलात आणु शकतो. 

उदाहरणार्थ 
१ स्वच्छता अभियान 
२ वृक्षारोपण 
३ सार्वजनिक वाहतुकीचा वापर

इत्यादी...

एक दिवस ठरवून हे सगळे केले तर फायदा आपलाच आहे ना. प्रत्येक महिन्यात एक दिवस असे काही तरी नवीन करावे. बघुया कसं काय प्रत्यक्षात होईल हे.  - हर्षद कुंभार...  

Saturday, June 20, 2015

भुत्याबाबा आणि धरीबाबा...

भुत्याबाबा आणि धरीबाबा...

आज एक जुनीच गोष्ट पण नव्याने सांगणार आहे. नावावरुन कोणाला कळलं असेल कोणाला नाही. लहान मुलांची खुप कुतुहल निर्माण करणारी गोष्ट आहे. 
माझे लहाण दोन पुतने एक ३ वर्षाची आणि एक २ वर्षाचा. आमची वहिनी त्यांना घाबरवण्यासाठी दोन काल्पनिक माणसांना वापरते म्हणजेच धरीबाबा आणि भुत्याबाबा. 
आता तरी तुम्हाला कळलं असेलच. आपलं लहाणपण पण असचं कोणत्यातरी काल्पनिक माणसाच्या भितीच्या छायेत गेले असेल. माझ्या लहाणपणचं इतकं काही आठवत नाही पण आई पण मला " तो बाबा घेऊन जाईल हां खा बघु पटकन " असं म्हणायची.
  प्रत्येकाला अस कोणत्या तरी बाबा ने शहाणं केलं असेलच नाही का. त्या काल्पनिक माणसाने लहाणपणी आपल्यावर चांगल्या- वाईटाचे संस्कार केलेले असतील. 
आजही ही एक पध्दत बर्‍यापैकी प्रचलित आहे, जेणेकरून लहान मुले संस्कारांचा बाळकडू पितात. बहुतांशी यात मुलांना खाण्या-पिण्याबाबत, खोटे बोलू नये, लवकर झोपण्याबाबत इत्यादी गोष्टींची भिती दाखवली जाते. 

लहानपणी तुम्हाला लाभलेले असेच बाबा आठवुन पहा किव्वा आईला विचारून पहा गंमत वाटेल.  - हर्षद कुंभार.... 

बाह्यरुप आणि आपण

आपण आपल्या बाह्य रुपाची किती काळजी घेतो ना...  म्हणजे कसं असतं ना नानाप्रकारच्या क्रिम, फेस पॅक, फेस वॉश, वेषभूषा वापरून आपण कितीही खर्च करायला तयार असतो. हे सगळ काही फक्त छान दिसायला पुरते.. 
पण छान वागायला आणि बोलायला इतकी मेहनत कोण घेतं का.... म्हणजे कोणी इतकं करत का की मी इथे असे वागले पाहिजे असे बोलले पाहिजे...  
कसं आहे ना छान दिसण्याने लोकांना काही क्षणासाठी भुरळ घालु शकता... पण आचार-विचार यांनी त्यांच्या मनात घर करून शकता. 
दिसण्यासाठी मेहनत घेतली तरी लोकांना प्रभावित करायला पण मेहनत करावी लागते, कारण जे काही केलय ते दाखवले तर पाहिजे ना म्हणून. त्याउलट वागण्या-बोलण्याने लोक आपोआप प्रभावित आणि आकर्षित होतील.  चांगले दिसणं म्हणजे नीटनेटके आणि स्वच्छ इतकंच महत्वाचे नाही का. 

असो आजवर हा विषय तुम्ही अनेक वेळा वाचला असेल पण माझ्या स्टाईल ने लिहिले आहे तेव्हा थोडं तरी वेगळं वाटलं असणार.  आणि तसंही बदल घडविण्यासाठी चांगल्या गोष्टींचा मारा करत राहिले पाहिजे ना.  - हर्षद कुंभार....