All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Thursday, January 25, 2018

मी भारतीय आहे का ? सारे भारतीय माझे बांधव आहेत का ?



मी भारतीय आहे का? सारे भारतीय माझे बांधव आहेत का?

हाच प्रश्न आता उरला आहे विचारायचा. लोकांमध्ये देशप्रेम कमी होत चालले आहे ते कळते आहे याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. कारण देशात राहून इतकी अशांतता आणि आराजकता माजवणारे लोक भारतीय कसे असू शकतील. गेली २० वर्षे आपण भारत विकसनशील देश आहे म्हणून ऐकत आहोत हे सध्याच्या परिस्थितीवरून पाहता कधीच विकसित म्हणून नावारूपाला येणार नाही हीच वस्तूस्थिती आहे. या वर्षी आपल्या देशात फक्त आंदोलन आणि मोर्चा हेच पाहायला मिळणार आहे. याला कारण आताच्या सरकारला अपयश आले असे दाखवून पुढच्या वर्षी येणाऱ्या निवडणुकीत अडचण यावी. या सगळ्यासाठी हा उपद्व्याप चालला आहे त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की का करतोय हे सगळे सरकारला अपयशी करण्याच्या नादात आपण आपल्या देशाला मागे पाडतो आहे.

सीमेवर रक्षण केले तरच देशभक्ती होते हे विधानच मुळी चुकीचे आहे. देशातील नागरिक म्हणून आपली काहीच जबाबदारी नाही का फक्त सीमेवरील सैनिकांनीच देशभक्ती दाखवावी आपले काहीच कर्तव्य नाही आहे का. इतके कसे स्वार्थी झालो आहोत आपण. आपल्या देशात लोकांना फक्त स्वतःची काळजी लागली आहे नाहीतर स्वतः च्या जातीची. हो म्हणुन तर आंदोलन, मोर्चे इत्यादी गोष्टींचा आधार घेऊन किती नुकसान, वेळेचा अपव्यय करत असतात हे लोक. एखाद्याने मेहनीतीने घेतलेली त्याच्या स्वप्नातली गाडी किती सहज जाळून टाकतात कसलाही विचार न करता.

पण काय आहे ना या सगळ्यात आपण काय करतो आहे स्वतः चा आणि जातीचा विचार. हिंसाचार वाढवून ठेवला आहे देशात इतका की पद्मावत सिनेमाच्या विरोधी गोष्टींत काल एक बसवर दगडफेक केली आहे ते पण लहान मुले गाडीत असताना. किती निर्दयपणे हे सर्व केले जाते कोणाचा जीव महत्त्वाचा वाटत नाही यांना हे कोरगाव भीमा प्रकरणात हकनाक गेलेला एक जीव त्याचेच उदाहरण आहे. म्हणजे बघा स्वतः ची माणुसकीच्या नात्याने काडीची लायकी नसताना सरकारकडे विविध मागण्यांसाठी मागे लागतात हे लोक कोणत्या तोंडाने. फक्त स्वतःच अस्त्तित्व निर्माण करण्यासाठी म्हणून जाळ पोळ करून जबरदस्तीने बंद पाळायला लाऊन भव्य स्वरूपात हे मुद्दाम करण्यात येते.

२६ जानेवारी आपला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इतिहासात पहिल्यांदाच १० देशाचे राष्ट्रप्रमुख येणार आहेत आणि त्या निमित्ताने देशांमध्ये व्यवहारीक आणि मैत्रीचे नाते घट्ट होण्यास मदत होईल. या देशात थायलंँड, विएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाऊस आणि ब्रुनीई आहेत. या देशातील करार होऊन व्यापारात एकमेकांना मदत केली जाणार आहे. आशियाई देशात चिनी व्यापार जवळपास २४ टक्के आणि आपला फक्त २.६ टक्के. आपल्या देशातील लोक उद्योगात उतरत नाहीत (उतरेल कसा त्याला वेळ तर मिळाला पाहिजे ना आंदोलन आणि मोर्चांमधुन ) म्हणून मेक इन इंडिया अंतर्गत सरकार बाहेरच्या देशातील उद्योगपतींना भारतात उद्योग सुरू करायला आवाहन करत आहे. भारत येत्या काही वर्षांत आपला हाच व्यवहार २०० हजार कोटी वर घेऊन जायचा विचार करत आहे. पण अश्या घटनांमुळे परकीय गुंतवणूक येईल का आपल्याकडे,रोजगार निर्मिती तरी कशी होणार. हा पण सरकारला मात्र नंतर जाब विचारला जातो काही करत नाही सरकार आपल्यासाठी.

मागे एकदा अमीर खान यांच्या पत्नी किरण राव यांनी एकदा विधान केले होते तेव्हा किती चवताळून , सडकून त्यांच्यावर टीका झाली होती पण आज त्यांचं मत खरं आहे असेच म्हणावे लागेल आता. शांतता प्रिय देश म्हणून इतर देश आपल्याकडे पाहतात पण सांगा काय त्या लायकीचे राहिलो आहोत का आपण. रोज काही ना काही कारणाने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चा करण्यात मग्न आहेत. या लोकांना काहीच काम नसते का हा मला पडलेला प्रश्न आहे. कोण आहेत हे लोक कोणत्या थोर व्यक्तींची नावे घेऊन हे सर्व करत असतात. त्या महान व्यक्ती तर कधी तश्या नव्हत्याच मग एकदम अंध बनुन एखाद्या संस्थेला, संघटनेला सामील होतात लोक. आपण अंतर्गत हिंसक गोष्टींत इतके अडकून पडलो की बाहेरून वेगळा दहशतवादी हवा कशाला ना. दहशतवादी दृष्टीने जे हवय ते भारत मातेचे पुत्र स्वतः करत आहेत.

८०-९० च्या दशकातील दंगलीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत या आजच्या घटनांमुळे. कुठे न्हेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा किंवा देश माझा हा प्रश्न सरकार पेक्षा स्वतः ला विचारला पाहिजे आज ही परिस्थिती आणुन ठेवली आहे. शाळा कॉलेज मध्ये तर कधी आपण जाती-धर्म बघून मैत्री करत नाही. आणि कोणत्या शिक्षण पद्धतीत हे शिकवलं ही जात नाही मग का मोठे झाल्यावर लोक अश्या लोकांना साथ देतात. ही कोणती पिढी जन्मली आली आहे ज्यांच्या डोक्यात हे जातीचे भूत गेले आहे.

आता तरी जागे व्हा नका बळी पडू अश्या संघटना आणि संस्थांना ज्या जात, धर्म यावरून तुमची माथी भडकवत आहेत. जेव्हा गरज असते तेव्हा हे कोणी लोक तुमच्या व्यक्तिगत अडचणींना मदतीला येणार नाहीत . तुमचे वैयक्तिक प्रश्न तर तसेच राहणार आहेत कायम कारण स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावत अश्या लोकांच्या मागे धावता म्हणून. आशा करतो की ज्यांच्यासाठी हे लिहिले आहे त्यांच्यापर्यंत हे पोचावे.

शेवटी काय भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हेे प्रतिज्ञ मधील पहिलेच वाक्य किती खरे ठरेल आणि किती खोटे हे पुढील काळच दाखवेल. २६ जानेवारीला सगळ्यांचे एक दिवसाचे देश प्रेम उतू येईलच. काय सांगावे पुढच्या आठवड्यात एखादे आंदोलन मोर्चा असेल ….- हर्षद कुंभार (२५/०१/२०१८ ८.३० pm )
#KshanKahiWechlele #harshadkumbhar

Wednesday, January 3, 2018

काय घेऊन आलोय आपण या नवीन वर्षात.



काय घेऊन आलोय आपण या नवीन वर्षात. वर्षाची सुरुवात काय झाली आज सगळ्यांनी अनुभवले. आपण कधीच सुधारणार नाही का याबाबतीत. कोणालाच नाही कळत की ज्या समाजात आपण वावरत असतो त्याच तितकेच देणं लागतो जितके की आपण त्याचा उपभोग घेतो. सोयी सुविधा या फक्त सरकारने देण्याच्या गोष्टी आहेत असा समज असलेली लोक खूप आहेत पण ज्यांच्यासाठी त्या आहेत त्यांनाच त्याच महत्व लक्षात घेऊन आचरण, व्यवहार ठेवले नाही तर त्याचा बोजवारा तर उडणार हे साधं कळत नाही. माणसाने स्वतःचा वैयक्तिक विकास करण्याकडे लक्ष केंद्रित केले तरी देशाचा विकास सहज होईल अर्थात सरळ आणि प्रामाणिक मार्गाने ना की वाम मार्गाने.
गेली कित्येक वर्ष जे चालू होते ते तसेच पुढे आणतो आहोत आपण, कोणाला काय फायदा झाला यातून. शेवटी घरी आल्यावर काय यांना समाधान मिळत असेल अश्या लोकांना त्यांच्या परिस्तिथी मध्ये खूप काही सुधारणा होते असे पण नाही वैयत्तिक जे प्रश्न असतात ते तसेच असतात. विकास हवा म्हणून आपण सरकार ला दोष देतो पण स्वतःचा विकास कधी साधणार. हा विकास म्हणजे फक्त आर्थिक सुबत्ता नाही विचारांनी समृद्ध कधी होणार तो पण एक विकासाचं आहे की याकडे कधी आपण लक्ष देत नाही फक्त पैसे कमवयाच्या मागे लागलो आहे.
दरवर्षी नवीन संकल्प करणारे आपण किती जण पाळतात हे वेगळे सांगायला नको. अर्थात संकल्प पण कसले असतात की
१) मी जिम ला जाणार थोडं हेल्थ कडे लक्ष देणार (सर्वात जास्त मानला जाणारा
२) सिगरेट सोडणार
३) हे खाणार नाही ते खाणार नाही. जे काही असेल ते स्वतः पुरते पहायचे बस.

पण कधी असे संकल्प करतो का
१) सामाजिक भान ठेवून जबाबदारीने वागणार, बोलणार.
२) सोबतच्या प्रत्येक व्यक्तीला मी सुखी आणि समाधानी ठेवेन.
३) प्रामाणिक आणि सत्याने जगणार



मला माहित आहे हे सर्व वाचुन काही उपयोग होणार नाही. आपण वाचणार आणि विसरून जाणार उद्याचा दिवस आहे तसाच जाणार आपल्यात काही बदल होणार नाही. पूर्ण वर्ष असेच निघून जाते, बदलते पण आपली परिस्तिथी काही बदलत नाही. - हर्षद कुंभार (०३/०१/२०१८ ८.०० रात्रौ ).