All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Monday, February 20, 2012

सत्यात उतरलेले राशी भविष्य

                                                                सत्यात उतरलेले राशी भविष्य 
                    नोट : ही कथा पूर्णतः सत्य घटनेवर आधारित आहे , या घटनेतली पात्र खरी आहे त्यांचा जीवित व्यक्तींशी थेट संबंध आहे,  काही साधर्म्य आढळल्यास तो योगायोगच समजावा. 

             ही कहाणी सुरु होते ती आपल्या हिरोचे ऑफिस सुटल्यानंतर, हिरो रोजच्याप्रमाणे आपल्या ऑफिसच्या मित्रांसोबत घरी जाण्यासाठी निघाला होता, साधारण वेळ असेल ७.१५ ते ७.३७ . हिरो मित्रांसोबत गोरेगाव स्टेशनला येतो. स्टेशनला पूर्वेकडून हिरो आणि त्याचे मित्र स्टेशन मध्ये प्रवेश करण्यासाठी नेहमी वापरत असलेल्या ब्रिजचा वापर करत असतात. हीरोचे मित्र पुढे ब्रिज चढत होते आणि आपला हिरो पाठीच होता. 
         हिरोच्या पाठीवर Sack होती. चढत असताना sack ला कुणी छेडत असल्याचे त्याला जाणवले, म्हणून हिरोने पाठी पाहिलं. हिरोने मागील व्यक्तींकडे लक्ष दिले तर जे होते ते आपल्याच नादात असल्याचे जाणवले जसे काही घडलेच नाही. त्याने Sack पहिले तर सर्वात बाहेरचा कप्पा होता, त्याची चैन ओपन होती. हिरोच्या चांगल्या लक्षात होते की त्याने ऑफिसचे ओळखपत्र त्या कप्प्यात ठेवून नीट चैन लावून बंद केले होते. 
        चोरी करण्याचा प्रयत्न हिरोच्या लक्षात आल्यावर त्याने पुन्हा त्या गर्दीत पहिले तिथे संशय घेण्यासारखे कुणी दिसत नव्हते. कप्प्यात ओळखपत्र तसेच होते ते खात्री करून त्याने पुन्हा चैन लावली, तोपर्यंत त्याचा मित्रांना सगळा प्रकार कळला होता. पण ७.३७ ची ट्रेन असल्याने तिथे जास्त वेळ न थांबता ते निघाले गाडीसाठी. 
        हिरो काहीतरी आठवल्यासारखे झाले आणि त्याचा लक्षात आले की रविवारी आईने राशी भविष्याबाबत वाचून सांगितले होते की या सप्ताहात पाकीट चोरीपासून सावधान राहा म्हणून. हिरोला तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच भविष्या खरे झाल्याची अनुभूती आली होती. 
                                                                          -- समाप्त --

स्थळ  : गोरेगाव स्टेशन 
कलाकार  : हिरो (मी स्वतः म्हणजे हर्षद कुंभार) , विलन : जो कुणी चोरी करण्याचा प्रयत्न करत होता तो , इतर : माझे मित्र आणि आजूबाजूची लोक 
दिग्दर्शन : बहुतेक देवाने केले असावे. तो करता करविता नाही का.  
संकल्पना : सकाळ पेपर राशीभविष्या 
कथा ,पटकथा   : हर्षद कुंभार 
वितरक : फेसबुक , ब्लॉग  

         

Sunday, February 19, 2012

घ्या साहेब थोडी चिरी - मिरी / Corruption

घ्या साहेब थोडी चिरी - मिरी / Corruption 
                                                                                                                                                 - हर्षद कुंभार

Saturday, February 18, 2012

मी एकटाच धावतोय

मी एकटाच धावतोय 
                                                                                                                                          हर्षद कुंभार 

Tuesday, February 14, 2012

शोध प्रेमाचा

शोध प्रेमाचा 
                १४ फेब , अगदी लहान थोरांपर्यंत सगळ्यांना ही तारीख फक्त valentine डे म्हणून परिचित आहे  .
प्रेम काय असते . नक्की कशाला तुम्ही प्रेम म्हणता , नाही नाही मी इथे तुम्हाला त्याची व्याख्या सांगायला आलो नाही. हा फक्त माझ्या मनात असलेली  प्रेमाबद्दलची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत आहे. नाही जमले ते तरी निदान त्याचे आजचे रूप मात्र तुम्हाला नक्कीच सांगीन.     
            आजचा तरुण वर्ग प्रेमाची ओळख त्यांनी भलतीच विचित्र तयार केली आहे. आजच्या या तरुण वर्गात प्रेमाला दिखावूपणाची  जोड देण्यात आली आहे. आजची पिढी प्रेम कशी करते माहितेय काही उदाहरणे देतो तुम्हाला .
१) एकाच  वर्गात शिकताना 
२) एकाच  ऑफिसमध्ये     
३) एकाच ठिकाणी राहत असलेली 
४ हल्लीच जन्माला आलेले इंटरनेट   
             आजची पिढी वरील एखाद्या माध्यमाशी जोडून असल्याने प्रेमात पडलेली आढळतील. आता मला सांगा दिवसातून खूप तास एखाद्या व्यक्ती सोबत राहिल्याने साहजिक त्याची सवय होते, त्याच्या हरेक गोष्टीची कल्पना येते, आवडी - निवडी कळतात. आणि आजच्या धावपळीच्या आयुष्यात चार हसरे क्षण घालवणारे कुणी असले की त्या व्यक्तीला आपण प्रेमात असल्याची अनुभती होते. म्हणजे बघा ना जी खर तर एक सवय असते त्याला ते प्रेम समजतो. 
           आता तुम्ही म्हणाल मग प्रेम म्हणायचे तरी कशाला. खर तर प्रेम ही एक कल्पना आहे जी विविध नात्यांमधून जन्माला येते. 
अर्थात हे कितपत योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. पण माझ्या मते आई - मुल यांचे खरे प्रेमाचे नाते असते. 
स्त्री ही एका जीवाला जन्म देते जी एक नैसर्गिक किमया आहे, त्यात खरे प्रेम असते. हा पण जो वर त्या मुलाला वं मुलीला अक्कल येत नाही तोवर ते प्रेम. कारण त्यांना अक्कल आली की ते दुसरे प्रेम शोधत असतात, काय बरोबर ना हसू नका खरच बोलत आहे मी.
 पण आईचे तुम्ही एकच असता आणि शेवटपर्यंत. जावूद्या हा आईच्या प्रेमाचा मुद्दा खूप गहन आणि मोठा आहे , त्यावर पुन्हा केव्हा लिहीन. 
        महत्वाचे असे आहे की प्रेम म्हणजे नक्की काय जे आजच्या तरुण वर्गात प्रचलित आहे. मुलांना - मुलीना उमलत्या काळात भासणारी परी किव्वा राजकुमार हा स्वप्नापुरता असतो ज्याला कोणताच चेहरा नसतो, आपण तो चेहराच जनमानसात शोधत असतो. जेव्हा तसे कुणी मिळते तेव्हा त्या स्वप्नातल्या व्यक्तीला चेहरा मिळतो नाही का, पण तेही प्रेम आहे का  
      बरेच जन असे बोलतात की आयुष्यात प्रेम एकदाच होते मुळात मला हे पटत नाही. कारण भावना तीच असते ती कोणा एका चेहेरयाशी निगडीत का असावी. प्रेमाला कोणते रंग रूप लागत नाही, किव्वा सवयीला पण प्रेम म्हणते येत नाही. मग आता मला सांगा प्रेम म्हणजे काय 
तुम्ही बोलाल एखाद्यावर जीव लावून प्रेम करणे, एकमेकांत एकरूप होणे याला प्रेम म्हणतात , खरच असे काही असते का. किती प्रेमीवीर जोडप्यांचे  लग्न होते मला सांगा, आणि किती त्यात पूर्णपणे सुखी असतात, नाही नाही तुम्ही पुन्हा चुकतंय इथे मी अरेंगे मेरेज किव्वा लव मेरेग तफावत सांगत नाहीये, दोन्ही गोष्टीत नफे तोटे आहेतच की. मुळात एकनिष्ठ असे कोण असते प्रेमात आजच्या जगात सांगा ना .       
             प्रेमात असलेल्या खूप मुलांना मी विचारले ते म्हणतात अरे GF म्हणजे नुसता त्रास आहे यार , बर झाले तू प्रेमात नाहीस ,  म्हणजे याला काय म्हणायचे मग, मुळात प्रेम ही कल्पना सगळ्यांना झेपते का , की उगाच सगळे करतात म्हणून मी पण केले असे आहे ते. 
        बघा मी कुणाच्या विरुध्द बोलत नाही किव्वा कुणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण जे प्रश्न पडले त्या बद्दल तुम्हाला सांगावे म्हणून हा सगळा खटाटोप. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात.         
                                                                                                                                              - हर्षद कुंभार 
                     
                     

Sunday, February 5, 2012

आजारपण


आजारपण , तुम्ही म्हणाल या या विषयावर कुणी कशी कविता करू शकतो , 
पण माझी झाली , म्हणजे मी आजारी होतो त्यावेळेसच्या भावना मी मांडल्या आहेत. 
अशा आहे तुम्हाला त्या भावतील  - हर्षद कुंभार 



Saturday, February 4, 2012

थंडीचा मौसम गायब ह्वावा.


सकाळ प्रहरीच्या वेळी .... 
असताना मस्त साखर झोपेच्या गळी ... 

अचानक कुणीतरी यावे ,
अंगावरचे मिठीतले पांघरून ...
झटकन ओढून काढावे ,

जणू कोणत्यातरी राक्षसाने 
प्राणवायू काढून घ्यावा ,
तशीच थंडीचा मौसम 
एकदम शहरातून गायब ह्वावा. - हर्षद कुंभार      

Friday, February 3, 2012

ये दुरी

दिल में हो तुम लेकीन 
प्यार से प्यार भी ... 
नही करने देती ये दुरी,

बातो में हो तुम लेकीन 
दो मीठे बोल...
नही बोलने देती ये दुरी,

आंखो में बसी हो तुम लेकीन 
जी भरके के ...
देखने भी नही देती ये दुरी.  - हर्षद कुंभार