नमस्कार,
आज मी एका धोरणाबद्दल बोलणार आहे. संघटितपणे सामान्य माणूस काय बदल करू शकतो ते. अर्थात यात काय नविन आम्हाला पण माहीत आहे असं तुम्हाला वाटलं असेल. पण दोस्तहो मित्रांशी गप्पांच्या ओघात हे मला लक्षात आले. आपण फक्त सरकार किव्वा पुढारी या लोकांवर अवलंबून न बसता लोकशाही या संज्ञेचा योग्य रीतीने वापर करू शकतो. आपल्या सोयीचे असे आपल्या सभोवताली खुप काही बदलता येईल आपल्याला . म्हणजेच लोकांना लोकांसाठी घडविलेल्या गोष्टी.
एक उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील यशस्वीपणे राबविण्यात आलेला " पुणे बस डे ". त्या दिवशी आपल्या सारख्या सामान्य लोकांनीच उत्तम प्रतिसाद देऊन एक इतिहास घडविला. प्रायोगिक तत्त्वावर केलेला तो प्रयोग खुप काही बोलुन गेला. पण किती लोकांनी तो ऐकला आणि लक्षात ठेवला.
महिन्यात एखाद्या दिवशी असा प्रयोग करायला हवा. पुन्हा पुणे बस डे करायला काहीच हरकत नाही.
तसंच अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या या पद्धतीने आपण अमलात आणु शकतो.
उदाहरणार्थ
१ स्वच्छता अभियान
२ वृक्षारोपण
३ सार्वजनिक वाहतुकीचा वापर
इत्यादी...
एक दिवस ठरवून हे सगळे केले तर फायदा आपलाच आहे ना. प्रत्येक महिन्यात एक दिवस असे काही तरी नवीन करावे. बघुया कसं काय प्रत्यक्षात होईल हे. - हर्षद कुंभार...
No comments:
Post a Comment