नमस्कार,
मी हर्षद कुंभार. कविता करणे हा छंद मला काही खूप आधी पासून नाही .
शिक्षण घेतल्यानंतर जॉबला लागण्याआधी सगळे आलबेल होत कारण बालपण आणि पौगंडवस्ता यात मन रमून गेले होते. नंतर मात्र प्रवास सुरु झाला तू स्वप्नांचा आवडींचा.
जॉबच्या दरमान्य प्रवास खूप होता त्यामुळे फावल्या वेळेत काय करावे म्हणून बहुतेक मनाला अनाहूत ओढ निर्माण झाली लिखाणाची. अगदी कागद वही घेऊन बसत होतो असे नाही पण जे काही थोडं थोडके जमत होते ते मोबाइल मध्ये लिहून ठेवायचो. माझ्यासाठी तेच माझे कागद होते . त्यात सारे लिहून ठेवत होतो आणि नंतर मग जीमेल मध्ये Draft करून ठेवत असे.
त्यावेळी ऑर्कुट चा जमाना होता म्हणून मी ऑर्कुट मध्ये मी माझं साहित्य पोस्ट करत गेलो. नंतर मग स्वतः असे काही असावे म्हणून मी गूगल ब्लॉग मध्ये सारा संच करून ठेवला आहे अगदी २०१० पासून सर्व काही यात आहे. आता ऑर्कुट नाही पण फेसबुक आहे आणि हा ब्लॉग यात सर्व मी पोस्ट करत असतो.
कविता आणि लेख असे दोन प्रकार यात तुम्हाला वाचायला मिळतील. कवितांमध्ये सर्व प्रकार आहे प्रेम, विरह, शृंगारिक , भावनाप्रधान , कविता इत्यादी.
माझ्याबद्दल अधिक जाणूनघेण्यासाठी किव्वा मला काही सूचना , प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता माझ्या जीमेल इथे
संपर्कासाठी लिंक