परिस्थिती माहीत नसताना एखाद्याला नावं ठेवणं काय असतं ते आज मला कळलं . त्याचे काय झालं ना गेले २ दिवस जो काही छान पाऊस पडत आहे. अश्या पावसात माझी बाईक मस्त भिजत होती, आता तिला थंडी भरली की कापरं कोण जाणे. पण आज ऑफिसला जाताना बाईक चालू केल्यापासून हेडलाईट जे चालू झाली सगळी बटणं बंद असताना देखील ते पूर्ण रस्ताभर. आता त्यामुळे काय झालं की लोकांना वाटत होत मी लाईट बंद करायचो विसरलो आहे, म्हणून बहुतेक जण मला खुणावत होते की लाईट चालू आहे करून. पण त्यांना काय सांगू माझा प्रॉब्लेम काय होता ते त्यांच्या दृष्टीने मी विसरभोळा नाहीतर वेंधळा तरी असेल म्हणून लाईट चालू राहून गेली आहे.
एरवी मी अश्या लोकांना नावं ठेवत असतो की काय विसरभोळी/वेंधळी लोक असतात लाईट चालूच ठेवली आहे बंद करायचं कसं कळत नाही यांना. हां आता यात काही लोक असतात जी खरंच विसरतात आणि मला आधी हे एकच कारण असावे असे वाटत होते . पण परिस्थिती अशी पण असू शकते हे आज कळलं. - हर्षद कुंभार (०४-०७-२०१६ ०२:१२)
No comments:
Post a Comment