All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Wednesday, December 28, 2011

मी कवी असलो तरी



मी कवी असलो तरी 

कवी ही जात माझी ...
शब्दांचा खेळ मी करतो,
फिक्या बेरंगी भावनेत 
साजेसे रंग भरतो.

कुणाच्या बोलाचे घाव... 
खोलवर मनात रुततात,   
शब्दातला त्याच्या भाव... 
मलाही रडवतात. 

शरीरावरील माराचे घाव
काही काळ टिकतात,
पण शब्दांनी छळणी झालेलं 
                     मन ते आयुष्यभर पोसतात    - हर्षद कुंभार   


Sunday, December 11, 2011

हो मी ठरवलंय...


हो मी ठरवलंय... 
रोज काहीतरी लिहायचं,
सकाळी दुपारी नाहीतर,
संध्याकाळी तरी लिहायचं...

हो मी ठरवलंय... 
प्रत्येक क्षण जगायचं,
हा क्षण गेला तरी...
पुढचा नक्कीच जगायचं.

हो मी ठरवलंय... 
भावनेत थोडस गुंतायचं,
वाट कुणाची तरी पहायची
                        आयुष्यात एकदा तरी गुंतायचं. - हर्षद कुंभार   
 
       

Saturday, December 3, 2011

" जॉबवाल्यांच आयुष्य "

ही कविता सुचली त्याला कारण बनला माझा जॉब , दिवाळीपासूनच्या या १ महिन्यात इतके काम केले ही काही विचारू नका. पूर्ण १२ -१२ तास काम करून करून जॉब या संकल्पणे बद्दल आलेला हा विचार कदाचित तुमचा ही असेल. मी अशा करतो ही कविता तुम्हाला उमगेल नीट कळेल. 

मी - 3 Dec 1985


मी 

२६ वर्षापूर्वी या जगात आलो,
पृथ्वीतलावरच्या जनमाणसातला 
मी पण एक झालो...

इवल्याश्या डोळ्यांनी फक्त रंगाचे 
धावणे हेरायचो तेव्हा...
त्या रंगातले मन आणि तन 
आता कळतंय मोठा झालो जेव्हा...

सगळ्यांसाठी मी एक होतो 
इवलासा असताना...
आता माझ्यासाठी ते सर्व 
सगळंकाही आहेत... 

गेल्या २६ वर्षात 
सगळे जीवन जगलो,
कधी हरलो तर कधी जिंकलो,
कधी शहाण्यासारखा राहिलो 
तर कधी वेड्यासारखा...

कधी कुणाचं मन दुखावून
गेलो असेल नकळतपणे...
कधी कुणाचा आधार बनलो 
                                असेल अजाणतेपणे...          - हर्षद कुंभार 


  

       



  
  

Sunday, September 25, 2011

आयुष्य

सगळ्यांचीच कहाणी , बांधली शब्दांनी ....
जे जगलो तेच खूप आहे चांगल्या आयुष्यासाठी 
आणि तुम्हीपण निरर्थक हट्टापायी आयुष्य वाया घालवू नये असे वाटते 



हर्षद कुंभार 

Sunday, September 11, 2011

रिझल्ट के बाद

नमस्कार मित्रांनो,
नेहमी प्रमाणे एक नवीन कल्पना घेवून आलो आहे 
विडंबन प्रकारात मोडणारी कविता. 
तुम्हा सर्वाना " ब्रेक अप के बाद"  हे गाणे माहित असेल जे सर्वज्ञात आहे सध्या 
मध्यंतरी हे गाणे ऐकताना कसे कुणास ठावूक मला हि कविता विडंबनात्मक सुचली 

-  हर्षद कुंभार 

Friday, September 2, 2011

शेवटचे तो झगडतोय

शेवटचे तो झगडतोय 

अखेरचा श्वास त्याचा निघत चालला 
अजून पण दगडा तुला पाझर का नाही फुटला ......


आयुष्यातले प्रेम मी कधी जगलोच नाही.....


आयुष्यातले प्रेम मी कधी जगलोच नाही.....  

सगळ्यांची हीच कहाणी असते, सगळ्यांनाच आयुष्यात प्रेम मिळतेच असे नाही , आपल्या कवितेतला हिरो पण तसाच आहे , एकटा खऱ्या प्रेमाच्या शोधात अजूनही 

Saturday, August 20, 2011

सांगा दोष देवू कुणाला ....


गेल्या २ महिन्यामध्ये मी ऑफिस आणि घर असा रोजचा प्रवास करून अक्षरशा वैतागलो आहे. 
आणि काहीच करू शकत नाही म्हणून माझा राग ज्या गोष्टी बद्दलचा आहे तो सगळा या कवितेमध्ये मी मांडला आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की काय माझी अवस्ता झाली असेल.  



Sunday, June 26, 2011

Mumbai Chi Life Line / मुंबईची जीवन वाहिनी


मी रोज ST ने प्रवास करणारा ट्रेन विषयी कसा काय कविता करू शकतो या बद्दल मला सांगावेसे वाटते, तर या कवितेच्या जन्मकथेविषयी सांगयचे तर 
जानेवारी २०११ हा महिना मी कल्याण ते कुर्ला असा प्रवास केला आहे माझ्या जॉबच्या संदर्भात, 
माझ्या जॉब विषयीच्या कारकिर्दीत हा माझा पहिलाच ट्रेन चा अनुभव. तेव्हा मी त्या एक महिन्यात जे काही मुंबईच्या लोकल ट्रेन बद्दल फक्त ऐकले होते ते अनुभवले.
ती गर्दी, सीट पकडायची चढाओढ, ट्रेन मध्ये चालणारी भजन कीर्तने, आदि सगळ्या गोष्टी मी पहिल्या. तेव्हा शब्द जुळले आणि ही कविता जन्माला आली पण पब्लिश करायला मला उशीर झाला.  तेव्हा मुंबईकरांनो तुमच्या लाडक्या ट्रेनची कविता सादर  करत आहे.          


  





  

Saturday, June 18, 2011

आई

मध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून
ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत नाही.
म्हणून म्हणालो तिकडे रहा मस्त बिंदास कसला विचार करू नकोस. जसे आई तिकडे गेली काही दिवस असेच गेले घरी हळू हळू एकटेपणा जाणवू लागला. कारण ती रोज डोळ्या समोर असते. त्यामुळे तिची इतकी सवय झाली की जरा कुठे नजरे आड झाली की आपसूक नजर तिला शोधते. म्हणून काही दिवसांनी मला तिची उणीव जाणवू लागली. 
एक दिवस तर खूप गहिवरून आले, मग आईला फोन केला थोडा वेळ बोललो तेव्हा हायसे वाटले. पण मनात तिचा विरह तसाच होता .
मग काय शब्द आणि भावना यांचा मिलाप झाला मनातील हितगुज शब्दात बांधून कवितेवाटे बाहेर आले. 

आई बद्दलच्या सगळ्यांच्या भावना सारख्या असतात म्हणून तुम्हाला ही कविता नक्कीच जवळची वाटेल                 





Saturday, May 28, 2011

" ती " मैत्री विसरत चालली आहे.

" ती " मैत्री विसरत चालली आहे.

ही कविता करण्या मागचाउद्देश असा की आपण जी मैत्री करतो त्यातले बरेचसे मित्र हे फेसबुक नाहीतर ओर्कुट मध्ये बनलेले आहे..
 इथे फक्त नेटवर बनलेले मित्र नाही तर काही शाळा , कॉलेज मधील मित्र असू शकतात. काही खूप चांगले मित्र मिळतात. काहीजण काही दिवस मस्त मित्रासारखे राहतात आणि काही काही दिवसांनी हळू हळू सगळे कमी कमी होत जाते आणि एक मित्र होता असा एक भूतकाळ जवळ ठेवून जातो. मला इथे कुणाला व्यक्तिगत संबोधायचे नाही. पण माझा असा अनुभव आहे गेले ३  वर्षापासूनचा  बऱ्याच दिवसापासून मनात ही गोष्ट रेंगाळत होती.  आता कुठे ती शब्दात बांधली आहे. मला वाटते तुमचा पण काहीसा असा अनुभव असेल.       


 
 

Sunday, May 15, 2011

अनामिक, अनोळखी दिसलेली ती


नेहमी प्रमाणे मी स्टेशनला गाडीची वाट बघत होतो. आज थोडा लवकर स्टेशनला आल्यामुळे मला घाई नव्हती. त्यामुळे तिथे वाट बघणारी एक अशी मुलगी जिने १५-२० मिनिटे मला विचार करायला भाग पाडले. त्या १५-२० मिनिटात मनात आलेल्या भावना उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात हा प्रसंग घडला असेलच . स्टेशन नाहीतर बस ची वाट भगत असताना . कुणीतरी अशी एखादी अप्सरा नजरेस पडते की,
 उगाच गर्दीत एकटे करून जाते. असाच काही मिळता जुळता प्रसंग मी इथे मांडत आहे.  मुलांनी आपले अनुभव इथे सांगावे अशी अपेक्षा आहे. 

Sunday, May 8, 2011

आठवणीतले मे महिने


                                                                                                
                              आठवणीतले मे महिने 

मे महिना म्हंटले तर सगळ्यांना आठवते ते घाम,गरमी,उकाडा. जरा शाळेत असतानाचा मे महिना आठवून पहा बर,  वाटले ना सुखद. असणारच तो काळच मस्त होता. मी आता तुम्हाला माझ्या मे महिन्याबद्दल सांगणार आहे जो आम्ही शाळेत असताना अनुभवला आणि आठवणीत जपला आहे. सध्या मे महिना चालू आहे, त्यामुळे मला माझे जुने दिवस आठवले म्हणून लिहावेसे वाटले. तर ७ -१०  मे या तारखेत आम्ही ३ कुटुंब गावाला जायचो. त्यावेळेस गावाला जायच्या आधीच आमची गावाला काय काय करायचे याचे प्लानिंग आम्ही भांवडे करायचो. तुम्ही म्हणाल ३ कसे तर थोडे कुटुंबाबद्दल सांगतो म्हणजे अजून नीट कळेल तुम्हाला.माझ्या कुटुंबात आम्ही ३ भाऊ आई, बाबा मिळून  ५ . नंतर माझे २ काका आहेत त्याच्यात मोठे काका त्यांचा घरात ६ मेंबर ,२ नंबरचे काका त्यांच्या घरात ७ मेंबर, तर असे सगळे मिळून १८ जन आम्ही जायचो.माझे दोन्ही काका ST महामंडळाच्या सेवेत होते, म्हणून कसला त्रास नव्हता तसा 

त्याकाळी आम्ही सकाळी ६ ची बस ठरलेली असायची भिवंडी - इचलकरंजी. आता आम्ही १८ जन म्हणजे बसमध्ये जास्त आम्हीच, जसे काही family टूर वाटायची.
ह्या सगळ्या गोष्टी साल २००० पूर्वीच्या आहेत, त्यावेळी मुंबई - पुणे एक्प्रेस हाईवे नव्हता त्यामुळे सध्याच्या जुन्या हाईवेने आमचा प्रवास त्यामुळे साहजिक आम्हाला ७ तास लागायचे गावाला जायला. 
बसने जाताना मी आणि माझा २ नंबर काकांचा मुलगा आम्ही दोघे ड्राइवरच्या तिथे शेजारी केबिनमध्ये बसायचो. आम्हाला तिथे बसायला खूप आवडायचे.तेव्हा गाडी चालत असताना समोर बसून  पाहणे म्हणजे काय मज्जा असते जे पुढे बसतात त्यांना माहित असेल. ड्राइवर काकांना आम्ही उगाच रेसिंग लावायला सांगायचो. मग तेही दुसऱ्या गाडीला ओवरटेक करायचे.खूप मज्जा वाटायची तेव्हा लोणावळा ,खंडाळा जवळ आला की दर्या, खोऱ्या बघायला खूप गम्मत वाटायची, खंडाळ्याचा वळणदार घाट तुम्हाला माहित असेलच.

तर असे बसमध्ये धमाल करत आम्ही सकाळी ६ ला  निघालेले गावाला दुपारी २ - २ .३० पर्यंत पोचायचो. आमचे गाव पुणे - सातारा हाईवेमध्ये पाचवड फाटा म्हणून आहे. त्या पाचवड स्टेण्डला दुपारी पोचायचो मग दरवेळेस ठरल्याप्रमाणे आमचे पाय त्या  रसाच्या गुऱ्हाळाकडे जायचे ते नित्य ठरलेले होते. तिथे मस्त २  ग्लास रस घेतल्यावर आमची पदयात्रा चालू होयची, आमची कुंभारांची वाडी आहे सातारा - वाई  रोडलगत पाचवड स्टेन्ड पासून १ - २ km वर आमची वाडी आहे. तिथे पायी चालत जाताना दुतर्फा आंब्याची झाडे आमचे मुख्य आकर्षण असायचे. कोणत्या झाडाला किती आंबे आहेत हे बघून ठेवत असू आम्ही, खाली रस्त्याला पडलेले आंबे चाचपून बघत आम्ही पुढे वाडीकडे वाटचाल करायचो.
आमची वाडी म्हणजे १० - १५  घरांची फक्त. सगळे भावकीतले. वाडीत आमची ४  घर सामोरा - समोर होती. तीन घर ३ चुलत आजोबा यांची आणि एक आमचे, तर वाडीत आलो की पहिले आम्ही भावंडे मागे सपरात जायचो, तिथे आमची जनावरे असायची आता जास्त नाहीत बैल तर एकही नाही फक्त म्हशी आहेत. बैल,गायी,म्हशी आणि नवीन वासरू वगैरे आहे की नाही. त्या वासराला चरायला नेहायला आम्हाला प्रचंड आवडायचे. मागे सपरात ना एक आंबाच्या झाड आणि जांभळाचे झाड त्या  जांभळाची जांभळे अशी टपोरी मोठी मोठी ना काय सांगू तुम्हाला,  एक डाळिंबाचे पण झाड होते. वाडीत एक पाण्याचा आड आहे १२ महिने त्या आडाला पाणी पावसाळ्यात तर पाणी इतके वरती असते की सहज हाताने घेवू शकतो. जवळच एक छोटासा पाट आहे मग आमची स्वारी पाटाला पाणी आहे की नाही पाहायला . वरती माळाला मोठा कॅनल आहे आम्ही त्यावेळेस  खूप घाबरायचो कॅनलमध्ये पोहायला, आम्ही आपले पाटात खुश. पाट बघून आलो की सकाळी पोहायचे प्लांनिंग सुरु होयाचे. 

संध्याकाळी  आम्ही अंगणात जेवायला बसायचो, मस्त ४ घरातला स्वयपाक एकत्र बाहेर यायचा. मग ज्याला जे आवडेल तसे तो घेयचा. जेवताना मग सगळ्यांच्या गप्पा कुणाचे काय चालले आहे वगैरे. जेवण आटोपले की जोपायाची तयारी  तुम्हाला माहित असेल गावाला किती लवकर जोपतात ते. मग अंगणातच सगळ्यांचे अंथरून असायचे  तेव्हा गावाला उश्या,पांघरून जास्त नसायच्या मग आमची भांडणे मला पाहिजे वगैरे.. घरातले मोठे कसेतरी समजूत काढायचे पण मग थोड्या वेळाने सगळे जोपले की ह्याची पांघरून खेच त्याची उशी खेच हा प्रकार होयचा सकाळी ज्याला त्याला कळायचे कुणाचे काय काय गेले ते. वाडीच्या आजूबाजूला सगळी शेती आमची त्यामुळे मेमध्ये पण रात्रीची थंडी लागायची तिकडे. सकाळी ६ -७  ला  जाग येतेच गावाला आणि इथे शहरात १०  वाजले  तरी उठायचे नाव नसायचे आता ही आणि तेव्हाही. मग  सकाळी ब्रश आणि  टॉवेल आदि वस्तू घेवून पाटाकडे निघायचो आम्ही,  ब्रश आणि नैसर्गिक विधी वगैरे आम्ही जाताना आवरून घेयचो मग पाटात सगळ्यांच्या उड्या असायच्या. १ तासभर खेळून झाले की सगळे घराकडे, त्यावेळेस  विहिरीत पोहायची खूप भीती वाटायची त्यामुळे तिथे कधीच गेलो नाही.  घरी आलो की मस्त भूक लागलेली असायची मग चहा चपाती वर सगळे. इथे घरी मी कधीच चहा चपाती खाल्ली नाही पण गावाला का कुणास ठावूक मी आवडीने खायचो. 
पेट पूजा झाली की आमचा मोर्चा असायचा रानात, तिथे करवंदाच्या जाळी शोधायचो कुठल्या जाळीला करवंदे जास्त आहेत बघायचो . करवंदे तेव्हा पिकलेली नसायची. कारण एक तरी पाऊस पडावा लागतो तेव्हा पिकतात ती आणि मेमध्ये गावाला पाऊस होतोच होतो कधी कधी गारांचा बर का, तुम्ही आताच बातम्यांमध्ये  पाहिलं असेल सातारा, कराड भागात गारांसह पाऊस. गारांचा पाऊस म्हंटले की आम्ही प्लेट घेवून पावसात त्या गारा झेलायला किव्वा जमा करायला.  त्या गारांची चव वेगळीच आणि मस्त असायची. मग काय पाऊस पडला की करवंदे पण पिकायची. वारा सुटला की आंबे पण पडायचे आम्ही मग रस्त्याला बघायला जायचो आंबे गोळा करायला. सपरातले  जांभळाचे  झाड राहिले की तिथे तर मेमध्ये हमखास जांभळे असायचीच,पण तिथे एक अडचण असायची त्या झाडाला नेहमी आमची मारकी गाय नाहीतर मारका बैल बांधलेला असायचा त्यामुळे आम्हाला ना थोडे कस्ट करायला लागायचे. आमच्यातला एक त्या जनावराला स्वताकडे खिळवत ठेवायचा आणि मग बाकीच्यांनी झाडावर जायचे. 

आमची वाडी डोंगराच्या पायथ्याला असल्याने जवळ डोंगरात जळण आणायला जायला खूप आवडायचे आता त्या डोंगराला दगड खाणीने सगळे खावून टाकले आहे वाईट अवस्ता आहे डोंगराची. डोंगराला शोभाच राहिली नाही आता पहिल्यासारखी. आमच्या वाडीला नैसर्गिक सौंदर्य जे काही लाभले आहे ना ते तोड नाही, डोंगरातून वाडीजवळ जे ओढे येयचे ना ते इतके मोठे आणि खोल दरी सारखे आहेत. काही ओढे तर इतके घनदाट आहेत की खाली तळला सूर्यप्रकाश पोचत पण नाही. आम्ही त्या ओढ्या - ओढ्यातून करवंदे आणायला जायचो. 

तिकडे शेतात खत टाकायची कामे आम्ही आवडीने केली आहेत आजही करतो.  खत बैल-गाडीत  भरताना ना त्या खताच्या उकिरड्यात एक मोठा अळीसारखा किडा सापडायचा "हुमणी" बोलतात त्याला गावाकडे आम्ही खूप घाबरायचो त्याला, आमचे काका मुद्दाम त्याला आमच्या शर्टमध्ये  टाकायचे, तेव्हा काय होत असेल आमचे विचार करा. खत टाकून झाले की मग अंघोळीला पुन्हा पाटावर. तिथे आमची २ - ३ वेळा अंघोळ होयची दिवसातून. 

गावाकडे एकाच घरात TV तो पण फक्त शुक्रवारी हिंदी पिक्चर आणि रविवारी मराठी पिक्चर तेव्हडेच बघायचो. गावाकडे TV चे जास्त आकर्षण नव्हते. दिवसभर भटकायचे.  असं सगळे करता करता जून कधी येयचा कळायचे नाही मग शाळा सुरु होयच्या आधी २ - ३ दिवस पुन्हा घरी भिवंडीला . अश्या सगळ्या मे महिन्याच्या आठवणी जमा करून आम्ही ठेवल्या आहेत. आज सगळी भावंडे जॉबला  आहेत त्यामुळे आधीसारखे एकत्र जाने होत नाही. कधी लग्नाला जमली तर ते पूर्वीचे दिवस आठवतो ती धमाल आठवतो. बरे वाटते नाही ! 
                                                                                                                                           - हर्षद कुंभार 

Sunday, May 1, 2011

१ मे २०११ - सेवा निवृत्ती

                                                              १ मे २०११ - सेवा निवृत्ती 

खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे बंद झाल्यावर कसे एकदम आयुष्य थांबल्यागत वाटते ना. खडकाला त्या प्रहावाची झालेली सवय , आसपासच्या वेलींना, झाडांना आणि धबधब्याच्या डोहात राहणाऱ्या जलचर प्राण्यांवर किती परिणाम होतो हे सांगणे कठीण आहे. 
हे सगळे सांगण्याचा संदर्भ असा की सेवा निवृत्त झालेल्या व्यक्तीचे आयुष्य काहीसे असेच होते. रोज सकाळी उठून चाललेली धावपळ, ऑफिसला वेळेवर पोचायची पळापळ अचानक मधेच सगळे थांबणार असते.
तुम्हाला वाटत असेल हा लेख लिहिण्यामागचा  उद्देश काय तर माझे बाबा येत्या १ मे २०११ ला सेवा निवृत्त होत आहेत, आणि योगायोग पहा १ मे कामगार दिनादिवाशीच सेवा निवृत्ती.  
हा महिना मी त्यांना थोडे अपसेट पहिले आहे. अपसेट तर होणारच ना इतकी वर्ष त्यांनी नोकरी केली आणि अचानक एके दिवसी सगळे बंद. खूप वेळ चाललेला गोंगाट एकदम बंद झाल्यावर कान कसे सुन्न होतात ना तसेच काहीतरी आयुष्य होत असेल. त्यांना कदाचित चिंता असेल की पुढे काय करायचे फक्त शांत बसून आयुष्य काढणारे माझे बाबा नाहीत. त्यांना हीपण काळजी असेल की घराचे कसे होणार सगळे नीट सांभाळतील ना आपली मुले. काहीना या गोष्टीचे इतके गांभीर्य वाटत नसेल पण जवळून पाहिल्यावर थोडे जाणवते की निवृत्त होवून घरी असलेल्यांची अवस्ता काय असते ती. मी काही दिवसात बाबांना इतरांशी या बद्दल बोलताना पहिले आहे त्यांना खरच १ मे नंतरचे आयुष्य कसे असेल या बद्दल त्यांना चिंता आहे , या नवीन बदलात आपण  कधी आणि कसे  ढळू याचे याचा ते विचार करत होते . एक दिवसाची सुट्टी आपल्याला हवी-हवीशी वाटते पण कायमची सुट्टी हे ऐकूनच कसेतरी होते ना.  १९७७ पासून माझे बाबा सर्विस करत होते, इतके दिवस  मी त्यांना पाहत आहे मला आणि घरातल्यांना त्यांना रोज ऑफिसला जाताना बघायची सवय झाली आहे. त्यामुळे १ मे पासून आम्हाला थोडे गणित चुकल्यासारखे वाटणार आहे. मला अशा आहे माझे बाबा
हा नवीन बदल लवकरच स्वीकारतील. त्यांना या सगळ्याची सवय होयला थोडा वेळ जाईल.  सध्यातरी इतकेच 
जमले मला सांगायला, यापेक्षा जास्त बोलायला तेवढी समाज नाही किव्वा कदाचित मी लहान आहे तेव्हडे बोलण्यासाठी.     
  

Saturday, April 23, 2011

ती नेहमीच म्हणायची "माझ्यावर कविता कर ना", 
मला तेव्हा कळायचे नाही नक्की काय आणि कशी कविता करू ते.कारण आमची मैत्री ही फेसबुक मधली त्यामुळे फक्त सेलवर जे बोलणे होयचे तेव्हडेच मी तिला ओळखत होतो. 
तिला सारखा मी सांगायचो " कविता करू कशी, अशी होत नाही कविता त्यासाठी तुला पूर्ण जाणून घेयला हवे".
ती म्हणायची "माझा फोटो पाहून कर ना तेव्हा तर जमेल ना" 
मी म्हणायचो " कशी होणार ग फोटोत तुझा नेहमी एकाच भाव असतो प्रसन्न, त्याशिवाय दुसरा काही अर्थ लागत नाही फोटो पाहून "
मी म्हणालो "एकदा भेट आपण खूप गप्पा मारू मग नक्कीच होईल कविता ".
मग ठरल्या प्रमाणे आम्ही एके दिवशी भेटलो चांगल्या २-१ तास गप्पा मारल्या.
तेव्हा तिचे निरीक्षण केले तिला काय आवडते, काय नाही, तिचे बोलणे, तिचे हसणे, तिच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी, तिचे ध्येय सगळे सगळे.
तिचा निरोप घेतल्यानंतर काही क्षणात सगळे शब्द जुळून आले आणि ही कविता जन्माला आली.
या कवितेला नाव काय द्यावे हे मात्र अजून कळले नाही 
    
 
   

Sunday, March 20, 2011

E - Love (Click to See Full view)

E - Love 


न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan (Advertise With Shah Rukh Khan)

                      "न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan "

लेखाचे नाव बघून तुम्ही चकित झाला असाल पण हे सत्य आहे. तर या घटनेला आता ३ वर्ष झाली .त्यावेळेस मी पुणेला होतो माझ्या शिक्षणासाठी 
माझे एम. सी. एम. चे (Master in Computer Management)   दुसरे वर्ष चालू होते. तर ही तिसऱ्या टर्म ची गोष्ट आहे. आम्ही कॉलेजचे खास ५ मित्र समीर , सागर, तुषार, हरिष  आणि मी आणि हो माझा मावस भाऊ निलेश.
       तर नेहमी प्रमाणे आम्ही कॉलेज मधून ५-६ पर्यंत घरी आलो होतो. आप आपल्या घरी पोचल्यावर , इतरांसारखा मला पण सम्याचा (सम्या म्हणजे समीर हे तुमच्ता लक्षात आले असेल) फोन आला की 
"अरे Shah Rukh Khan चे शुटींग आहे त्यात त्याचा सोबत मुलांची गरज आहे". 
ती हुंदाई कंपनीच्या i10  ची जाहिरात होती. मला थोडे रोमांचक वाटले  अर्थातच कुणालाही वाटेल Shah Rukh Khan  सोबत जाहिरात करणार आपण टीवी मध्ये दिसणार , हे आणि अनेक स्वप्न डोळ्यासमोर जमा झाली. माझ्यासारखे इतर मित्रांचे पण तसेच हाल होते. मग काय आम्ही तयार झालो. आणि हो तिकडे संध्याकाळचे जेवण होते येयला आणि जायला गाडी होती (खर तर त्या adervertise पेक्षा आमचा Timepass होणार हे आम्हाला जास्त मजेशीर वाटले ). त्यामुळे वाटले एवढे सगळे जुळून आले आहे, पण आम्ही घरी होतो आणि हे घरी सांगितले असते तर जावू दिले नसते. मग मित्राच्या घरी पूजा घडवली आम्ही त्यादिवशी आणि निघालो. bollywood च्या सुपरस्टार ला प्रत्यक्ष पाहायला.   
बहाणा करून आम्ही निघालो आणि ठरलेल्या ठिकाणी भेटलो . तासभर वाट बघत एकदाची गाडी आली, आधीच खूप मुले मुली त्या गाडीत होते. मग गाडीत बसलो तेव्हा नुकताच Shah Rukh Khan चा ओम शांती ओम येवून गेला होता म्हणून गाडीत "दर्द ए डिस्कोचे" गाणे  आणि इतर गाणी वाजत होती. गाडीत सगळे धमाल मस्ती चालू होती, सगळ्याच्या डोळ्यात एकच स्वप्न दिसत होते Shah Rukh Khan ला पाहण्याचे. 
तर आमची गाडी जाणार होती बालेवाडी स्टेडीयम ला जिथे कॉमन वेल्थचे गेम्स होणार होते,त्यासाठी contruction चे तिथे बरेचसे काम चालू होते. आम्ही तिथे पोचलो तेव्हा खूप गाड्यांचा ताफा आधीच हजर होता. फक्त ३-४ मी. च्या जाहिरातीसाठी पण बराच लवाजमा लागतो  हे तेव्हा कळले. बर तर आम्ही गाडीतून उतरलो नाही स्टेडीयम चे दिशेने निघालो.          
               आत गेलो तेव्हा एक स्टेज दिसले स्टेडीयम अजून पूर्ण झालेले नव्हते त्यामुळे काही भागच त्याचा advertise साठी वापरणार होते, त्या स्टेज नंतर आम्ही सगळ्यांनी थोडी नजर फिरवली तेव्हा कळले आधीच उर्वरित स्टेडीयम भरगच्च प्रेक्षकांनी भरले होते. आमच्या मनात पाल चुकचुकली आम्ही त्या मित्राला बोललो अरे हे काय आहे . तेव्हा त्या महाभागाने पूर्ण खुलासा केला मी Shah Rukh Khan च्या Advertise साठी मॉब हवा होता, सो तुम्हाला शुटींग पण बघायला मिळेल म्हणून तुम्हाला बोललो चला. आम्हाला थोडे थोंडत मारल्यासारखे झाले, नंतर भानावर आलो तेव्हा आम्हाला पण त्या प्रेक्षात बसायला सांगितले. "आलीय भोगासी असावे सादर "  ही म्हण आठवून आम्ही आहेत त्यात मज्जा मस्ती करू ठरवले. स्टेडीयम वर हिरवळ चांगली होती तेव्हा म्हंटले चला इतकेपण बोर तरी होणार नाही. 
 इतके  स्टेडीयमच्या तिथे कसले तरी शुटींग चालू होते थोडे तिकडे पण लक्ष गेले. तिथे काही फिरंगी मोडेल्स नाचत होत्या . काही वेळ ते पाहिल्यावर कंटाळा आला मग म्हंटले थोडे जवळ जावून पाहावे म्हणून त्या दिशेने गेलो तर काय ४-५ पैलवान समोर उभे , थोडे इकडे तिकडे पहिले तर त्या स्टेडीयमच्या चहुबाजूला असेच पैलवान उभे होते कुणी आमच्या सारखे तिथे जावू नये म्हणून
मग काय मोर्चा माघारी वळला, तिथे खाण्यासाठी नास्टा आला कालाल्य्वर थोडे हायसे वाटले 
काय आहे ते पाहायला गेलो तर लग्नात जसा उपीट , उपमा नाहीतर कांदेपोहे अगदी तसेच होते ते 
आणि अश्या लग्नातल्या नास्त्याचा आणि आमचा आधीपासून ३६ चा आकडा.
      नास्टा आणि ते उरकल्यावर तिथे काही लोक ते bannar आणि काही झेंडे घेवून आले. काही वेळाने एक कॅमेरावाला तिथे आला आणि काही सेकंद त्याने काय शूट केले ते तो स्वतः आणि देवच जाने. म्हंटले आता Shah Rukh Khan तरी पाहायला मिळेल म्हणून तिथे कसातरी ११ पर्यंत थांबलो , देव जणू आमची परीक्षाच घेत होता Shah Rukh Khan कसला तिथे त्याची सावली पण दिसली.         
         आता मात्र सगळ्यांना झक्क मारली आणि इथे आलो असे वाटायला लागले. पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यानंतर जो काही शिव्यांचा पाऊस पडला आम्ही , आता तुम्हाला कळलेच असेल कुणा कुणाला त्या पावसात भिजवले असेल ते आम्ही.
             तिथून बाहेर आलो आणि आधी पोटापाण्याचे काही बघायचे ठरवले. सगळ्यांनी आपले खिसे चाचपले आणि ढाबा शोधायला लागलो, आता आम्ही होते बालेवाडीला जो हायवे टच आहे तिथे ढाबा शोधायला जे काही आम्हाला चालायला लागले. त्या नंतर ढाबा दिसला तिथे गेलो स्टार्टर म्हणून पापड मागवले तेव्हा त्या सम्याच्या मित्राचा फोन आला. ते सगळे निघालो होते आणि आम्हाला शोधात होते. झाले का मग त्या पापडाचे पैसे दिले, पापड हातात उचलेले आणि निघालो आपापल्या घरी.
                जे काही घडले त्या नंतर दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जे काही आम्ही हसलो. दिवसभर एकमेकांना चिडवत होतो  Shah Rukh Khan कसा दिसतो रे.


तर  अशी आमची सत्य घटना "न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan "
                  

Sunday, March 13, 2011

माझी आई

आज थोडे वेगळ्या वाटेवर जात आहे. लेखचे नाव बघून तुम्हाला कळलेच असेल हा लेख माझ्या आई शी संबधित आहे.
खरतर आई हा विषय इतका मोठा आहे की त्याला हात घालायला हिम्मत लागते, तेव्हा मी थोडे डेरिंग केले आहे.
आपली आई ही सगळ्यांना प्रिय असते, आणि मी त्याला अपवाद नाही पण बाबापण तितकेच आहेत , सध्या फक्त आई बद्दल बोलणार आहे.
तुम्ही विचार करत असाल या कवीला एकदम काय झाले, कविता सोडून लेख लिहायला ,
पण आईला कवितेमध्ये यमकांच्या चौकटीत नाही व्यक्त करता येणार, मी तसा प्रयत्न केला पण जमला नाही,
म्हणून हा लेख शेवटी भावना पोचवणे याला महत्व. तर जेव्हा कळायला लागले तेव्हा पासून मी आईला बघतोय तिने टेलरिंगच्या कामात स्वतःला इतके झोकून दिले आहे.  
 माझ्या आईला पहिले कि जिद्द , कठोर मेहनत याचा अर्थ काय असतो तो स्वतः  मी आईमध्ये पहिला आहे.
आजतागायत ती रोजनिशी चालू आहे. आम्हा ३ भावांना सांभाळून टेलरिंगचे काम आई करायची. तेव्हा आई सकाळी ५.३० उठायची   
बाबांचा डबा करून देयाचा मग शिवनकाम करायचे ते ११.३० पर्यंत नंतर मग दुपारचे जेवण बनवून, जेवण झाले कि थोडे १ तास आराम म्हणून जोपायाचे , जोपायाचे कसले घडीभर पडायचे म्हणा ना
की पुन्हा शिवणकाम ते थेट ७.०० पर्यंत मग रात्रीचे जेवण बनवून मग सगळे आवरून पुन्हा शिवणकाम ते रात्री १२.०० - १२.३०  पर्यंत. बघा असे रोजनिशी होती आईची
आजही तशीच आहे. कधी कंटाळा नाही की हयगय नाही. किती दुखणे असो नाहीतर आजारपण असो ती कधी थांबली नाही.
तिची ही चिकाटी पाहून त्यावेळेस आम्हाला वेडेपणा वाटायचा , पण आता आम्ही थक्क होतो ते सगळे आठवून. आईने कधी ऐकले नाही आमचे , आम्ही तिला त्रास होयचा म्हणून शिवणकाम नको करू असे नेहमीच सांगत आलो आहे. 

आज इतकी वर्ष झाली आम्ही लहानाचे मोठे झालो कामाला लागलो , आई अजून जशी पूर्वी होती तितकीच उत्साही आहे. आम्हाला कधी कधी नवल वाटते हे सगळे. ती आजही सकाळी त्याच  वेळेला उठते आधी फक्त बाबांचा डब्बा होता आता आमचा पण असतो. जिद्द , चिकाटी , खूप मेहनत परिश्रम याचा अर्थ आईने तिच्या जगण्यावरून आम्हाला शिकवला . बाकी आमचे लाड , इतर गोष्टी जश्या सगळ्यांच्या आई करतात तशाच झाल्या.   पण आईचा आयुष्याचा हा प्रवास मला नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे आणि पुढेही तरेल यात शंका नाही.  सांगण्यासारखे खूप आहे पण आता इथेच थांबवतो.  माझ्या आईची ओळखा करून देयाचा हा माझा प्रयत्न होता.  - हर्षद कुंभार 
 
 
   

Thursday, March 10, 2011

कदाचित हा प्रसंग घडायचाच होता माझे मन पूर्ण पदावर येण्यासाठी.

आज काम थोडे जास्तच होते आणि आधीच दिलेले काम पूर्ण झाले नव्हते त्याचे वेगळेच टेन्शन, तरी कसाबसा काम थोडे उरकून घेतले मुंबई मधील मित्रांना माहीतच असेल ट्रेन पकडायची धावपळ मी पण असाच ७.०२ ची पकडण्यासाठी आटोपून निघालो तरी थोडासा उशीर झाला आणि समोर गाडी उभी फक्त ब्रिज ओलांडून जायचे होते पण माझ्या त्याच ट्रेन मधील लोकांनी ब्रिज असा भरून गेला कि गाडी अशी डोळ्यासमोरून गेली. आणि डोळ्यासमोरून गाडी गेल्याचे दुख  तुम्हाला पण माहित असेल , मग उगाच त्या ब्रिज अडवलेल्या लोकांना शिव्या देताच खाली उतरलो , एकतर आधीच कामाचे टेन्शन होते त्यात असे काही झाले कि खूप राग येतो . मग काय आता पुढच्या ७.२१ च्या गाडीची वाट बघत बसलो होतो . मोबाईलमध्ये मग उगाच गेम खेळण्याचा प्रयत्न करू लागलो, तसे लक्ष नव्हते त्या गेममध्ये उगाच मन उदास झाले होते. काही काळ गेल्यावर एक लग्न झालेली मुलगी कडेवर एक छानशी छोतुशी मुलगी घेवून माझ्याजवळ आली आणि म्हणाली मला वेस्ट ला जायचे आहे कसे जायचे . मी जास्त विचार न करता , कुठलेश्या विचारात तिला समोरच्या ब्रिजवरून  डाव्या हाताला जा म्हणालो. ती thanx म्हणाली आणि आणि गर्दीत नाहीशी झाली.काही क्षणात भानावर आल्यावर एकदम खडबडून जागा झालो आणि मी केलेली चूक लक्षात आली , मी त्या मुलीला उजव्या बाजूला जा सांगण्याऐवजी डाव्या बाजूला जा बोललो.  मला कसेतरी वाटले मी तडक उठलो आणि धावत गेलो त्या गर्दीत त्या मुलीला शोधात ब्रिज वर गेली ती नुकतीच डाव्या बाजूला वळलेली पहिले, लगेच गेली आणि त्यांना माफ करा मी चुकीचे सांगितले गडबडीत पण वेस्ट ला इथून उजव्या बाजूला जावे लागेल तुम्हाला. ती " अय्या तुम्ही इथपर्यंत आलात सांगायला खरच thanx a lot . मी sorry  म्हणालो , माझ्यामुळे उगाच तुम्ही चुकीच्या दिशेने गेला असता , हलकेच चेहेर्यावर हास्य आणून आभारी मानाने ती गेली उजव्या बाजूला , तो पर्यंत पुन्हा माझी ७.२१ ची गाडी आली होती मग काय आता पुन्हा धावत जावून एकदाची पकडली गाडी. आता थोडे मन हलके वाटत होते या प्रसंगानंतर..............


 कदाचित हा प्रसंग घडायचाच होता माझे मन पूर्ण पदावर येण्यासाठी.      - हर्षद कुंभार 
          

Saturday, March 5, 2011

एक अनुभव असाही

                                                      एक अनुभव असाही  

मध्यंतरी  पुण्याला गेलो होतो यात्रेला सासवड मध्ये पांगारे गाव आहे आईचे तिथे तेव्हा ची गोष्ट आहे ही
माझी मावस बहिण आणि आम्ही बसलो होतो timepass म्हणून मी cell मधली गाणी लावली तेव्हा ते 
" माझिया प्रियाला प्रीत कळेना " गाणे लागले , तेव्हा माझी बहिण म्हणाली अरे याचे original गाणे माहित आहे का ?
माझ्या माहितीप्रमाणे जे गाणे आहे तेच original आहे. तर तिने मला तिच्या मोबाइल मध्ये मेसेग दाखवला 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी कविता आहे ना "का माझिया प्रियाला प्रीत कळेना "  याचेच पहिले कडवे होते ते.
मला हसावे कि रडावे तेच कळेना. तिला म्हणालो वा माझीच कविता मला दाखव, तर तिचा विश्वास बसेना या गोष्टीवर, 
मग माझ्या मोबाईल मध्ये मला जेव्हा ही कविता सुचली त्यावेळेस save केलेला  ड्राफ्ट तिला दाखवला. तेव्हा तिला पटले ते
आता बोला .........

 हर्षद कुंभार 
 
 

Sunday, February 20, 2011

पहिल्या भेटीनंतर

पहिल्या भेटीसाठीची हुरहूर तर तुम्ही पहिली आता त्याचा पुढचा भाग म्हणजे
त्यांची भेट झाल्यानंतर त्या मुलाची झालेली ही मनस्तिती
दाखवण्यचा माझा छोटासा प्रयत्न
 


Sunday, February 13, 2011

तुझ्या भेटीची हुरहुर

पहिल्यांदा प्रेम करणाऱ्या मित्रांच्या मनातील काही भावना 
टिपण्याच्या छोटासा प्रयत्न केला आहे 
पहिल्या प्रेमाच्या त्या पहिल्या भेटीसाठी ही कविता 

सादर करत आहे कविता 
"तुझ्या भेटीची हुरहुर"