All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, August 25, 2012

" परतलेला भात "


                                             " परतलेला भात "

नमस्कार सगळ्यांना, 
                            आज अजून एक वेगळा लेख. मी नेहमीच माझे स्वानुभव तुमच्याशी शेयर करत असतो. तुम्हीपण चवीने ते वाचता लाईक करता शेयर करता त्याबद्दल आभारी आहे.  तर आजचा लेख आहे तो एका खाद्य पदार्थाबद्दल.  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या कवीला काव्य अन या गोष्टी सोडून मध्येच खायचे काय सुचले. पण खायचा पदार्थ तर ऐका आधी. 
        हा पदार्थ आहे " परतलेला भात ". अर्थात आई लहानपणापासून जे म्हणत होती तेच नाव मीपण सांगत आहे. तुमच्या घरी याला अजून काही म्हणत असतील. पण एक गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रात हा पदार्थ लहान थोरापासून सगळ्यांना आवडणारा आहे. आधी लहान असताना आई बनवून देयची जेव्हा पासून नीट कळायला लागले मी स्वतः करायला लागलो.  
          हा भात करण्यासाठी मुख्य गोष्ट लागते ती म्हणजे रात्रीचा शिळा भात. आता तुमच्या चांगलेच लक्षात आले असेल मी कोणत्या खाद्य पदार्थाबद्दल बोलत आहे.  आधी मी माझी स्वतःची पद्धत सांगतो मी कसा बनवतो ते.  
 चला तर मग करूया सुरुवात 
 साहित्य : रात्रीचा शिळा भात, २-३ हिरव्या मिरच्या, हळद , जिरे , मोहरी, शेंगदाण्याचा कुट, थोडेसे तेल.       
 कृती : प्रथम शिळा भात जरा मोकळा करून घ्या. भातावर थोडी हळद टाकून जरा मिश्रण करून घ्या. कढईत थोडे तेल तापवून घेवून त्यात जिरे , मोहरी, आणि मिरची ही फोडणी तळा. आता . आता तो भात त्या कढईत टाकून मस्त फोडणीसोबत परतून घ्या.  त्या  नंतर त्यावर १-२  शेंगदाण्याचा कुट टाकून थोडा मिश्रण करून मंद आचेवर थोडा वेळ ठेवा की झाला तुमचा भात.  

  तर ही झाली माझी कृती प्रत्येकाची आपली वेगळी कृती असेल घरची. पण हमखास सगळ्यांच्या घरी होणारा हा पदार्थ आहे तर मित्रांनो माझ्या या लेखाशी सहमत असाल तर मलाही सांगा तुमचा अनुभव. चला काळजी घ्या. - तुमचा कवी हर्षद कुंभार 
  
          

Sunday, August 19, 2012

Ek Kavita


                                                                           -हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणतात मला)


Sunday, August 5, 2012

मैत्रीच नातं ....

मैत्रीला कोणतीच परिभाषा नाही
आणि परिसीमा ही नसते.
अनोळखी कुणी कधी 
इतके जवळचे होऊन जाते की कळतही नाही   

जीवनाच्या प्रवासात ...
अपघाताने कोण अचानक येतो ...
मत आणि मन जुळवत आपलसं होतं.
तर....
कधी नेहमीच सोबत असणार ...
कुणी दुर्लक्षित एक... 
मैत्रीच नातं बेमालुणपणे जपत असतं.  - हर्षद कुंभार 

Friends Forever Then...

हाताच्या कोपऱ्यापर्यंत...  
बांधून फ्रेंडशिप band,
मार्करने गिरगटून...
भरवलेले T -Shirt n Hand       

मोबाइलचा inbox भरून...
वाहतो फ्रेंडशिपच्या sms नी,
स्वताच्या मनातले काही नसतं...
पाठवतात sms सारी उसनी.

जर मानतो आपण.. 
सदा फ्रेंड्स Forever ,
मग का celebrate करावा..
फक्त एका day वर.  - हर्षद कुंभार 

Saturday, August 4, 2012

मनाची सुंदरताच...

" चेहरा कितीही सुंदर असला तरीही मन सुंदर असावयास हवे. जर मन शुद्ध नसेल तर त्या सुंदर चेह-याचा काय उपयोग. म्हणून सुंदर पवित्र आणि शुद्ध मन ठेवा. ते मन स्वतःला आणि आपल्या जवळच्या मित्र परिवारास, नातेसंबंधितांना आनंदित, समाधानी ठेवेल. यातूनच ईश्वरी कृपेची अनुभती घ्या आणि ती निश्चित मिळेल याची खात्री बाळगा."  - प्रदीपकुमार केळकर

मुळ विचार प्रदीपकुमार केळकर यांचे आहेत . त्यांच्या इच्छेनुरूप मी त्यांच्या प्रगल्भ विचारांना काव्यरूप दिले आहे. त्यांच्या अनुमतीने मी 
केलेली ही कविता तुम्हाला अर्पण करत आहे मित्रांनो.   

चेहेऱ्याचे रंग रूप... 
असो कितीही छान,
मनाची सुंदरताच...
शेवटी करते महान.

कलुषित, ग्रासलेल मन...
न देई कसलीच सुंदरता, 
फासून लाख प्रसाधने...
न येईल ती उदारता.

पवित्र,शुद्ध विचारी मन...
करील आनंदी चारही दिशा,
नातलग,मित्रपरिवारात...
नांदेल सुख-समाधानाचा वसा.

ईश्वर मनी तेच असते...
जे तुम्ही चिंतिता,
स्वच्छ मनी वाहुद्या...
सदा सुविचारांचा झरा. -  मुळ विचार  (प्रदीपकुमार केळकर) , कविता अनुवादन (हर्षद कुंभार)
 
 

       
 
 
 

"अंकल ये रस्ता किधर जाता है " .

                    फार जुनी घडलेली ही सत्य घटना आहे. तेव्हा मी नुकतीच विज्ञान शाखेची पदवीधर परीक्षा दिली होती. आणि सुट्टीचा काळ होता. लग्न सोहळा म्हंटले की काय धाम धूम असते तुम्हाला माहीतच आहे. आणि तेव्हा आमच्या घरात पहिलेच लग्न माझ्या मोठ्या भावाचे ठरले होते. मी त्या वेळेस साहजिकच खूप खुश होतो. तेव्हा माझ्या घराचे सगळे पुढे गावाला लग्नाच्या तयारीला गेले होते . मी आणि माझ्या मावस भाऊ दोघे नंतर जाणार होतो. 
                तर मी माझ्या मित्रांना पत्रिका देण्याचे काम चालू केले होते. बरीचशी झाली होती देयची, आता फक्त एक मित्र जो जरा लांब राहायला होता. म्हंटले त्याला शेवटली देऊ. म्हणून त्या लांब राहणाऱ्या मित्राला पत्रिका देयचे ठरले. त्यावेळेस मोबाइल आमच्या एकाही मित्राकडे नव्हता त्यामुळे संवाद साधायला काही साधन नव्हते. 
                 त्या मित्राकडे मी एकदाच गेलो असल्याने फारसे काही लक्षात राहिले नाही कुठून कसे जायचे ते. आणि त्या मित्राकडे जायला फार गल्ली-बोळ असे पार करून जायला लागते. तेव्हा संभ्रमात असे काहीच लक्षात राहिले नाही. 
                 मी अन माझा मावस भाऊ दोघे संध्याकाळी त्याच्याकडे जायला निघालो. तेव्हा ५-६ वाजले असतील आणि आम्ही त्या मित्राच्या घराजवळ 
गेलो तेव्हा ७ वगैरे झालें असतील. आम्ही दोघे कधी या बोळातून तर कधी त्या गल्लीतून जात होतो पण ओळखीचे असे काहीच दिसत नव्हते.
                   माझा भाऊ मला शिव्या घालत होता की कुठे कुठे फिरवतोय म्हणून , तो आणि दोघही खूप वैतागलो होतो. एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही एका बोळात गेलो तिथे खूप अंधार होता आणि एक इसम इथे त्याच्या घराच्या उंबऱ्यात बसला होता.  पुढे अंधार असल्याने मी त्या 
इसमाला  विचारले "अंकल ये रस्ता किधर जाता है " .
                  त्या अंकल ने जे उत्तर दिले त्याने आम्ही दोघे जे काही हसत हसत तिथून पलायन केले की.  कारण ते अंकल काय म्हणाले माहितेय 
"ये रस्ता हमारी मोरी में जाता है.". त्याने आम्हाला काय समजले देव जाणे पण शिव्या घालत होता. मग आम्ही तिथून पळ काढणे भाग होते. 
                   भाऊ कंटाळून शेवटी म्हणाला जाऊदे ना यार , चल जाऊ घरी. मीपण म्हंटले ठीक आहे चल करून तिथून निघालो आणि समोर त्या मित्राचाच लहान भाऊ दिसला. काय सांगू तेव्हा इतके हायसे वाटले ना काय सांगू, सरते शेवटी त्याच्या घरी गेलो घडलेला सगळा प्रकार सांगितला. एकदम सगळीकडे हशा पिकली.  त्याला पत्रिका दिली आणि निघालो घरी जाई पर्यंत आम्ही दोघे सारखे हसत होतो त्या अंकलला आणि त्याच्या त्या वाक्याला आठवून. -  हर्षद कुंभार