आपण आपल्या बाह्य रुपाची किती काळजी घेतो ना... म्हणजे कसं असतं ना नानाप्रकारच्या क्रिम, फेस पॅक, फेस वॉश, वेषभूषा वापरून आपण कितीही खर्च करायला तयार असतो. हे सगळ काही फक्त छान दिसायला पुरते..
पण छान वागायला आणि बोलायला इतकी मेहनत कोण घेतं का.... म्हणजे कोणी इतकं करत का की मी इथे असे वागले पाहिजे असे बोलले पाहिजे...
कसं आहे ना छान दिसण्याने लोकांना काही क्षणासाठी भुरळ घालु शकता... पण आचार-विचार यांनी त्यांच्या मनात घर करून शकता.
दिसण्यासाठी मेहनत घेतली तरी लोकांना प्रभावित करायला पण मेहनत करावी लागते, कारण जे काही केलय ते दाखवले तर पाहिजे ना म्हणून. त्याउलट वागण्या-बोलण्याने लोक आपोआप प्रभावित आणि आकर्षित होतील. चांगले दिसणं म्हणजे नीटनेटके आणि स्वच्छ इतकंच महत्वाचे नाही का.
असो आजवर हा विषय तुम्ही अनेक वेळा वाचला असेल पण माझ्या स्टाईल ने लिहिले आहे तेव्हा थोडं तरी वेगळं वाटलं असणार. आणि तसंही बदल घडविण्यासाठी चांगल्या गोष्टींचा मारा करत राहिले पाहिजे ना. - हर्षद कुंभार....
No comments:
Post a Comment