All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, December 30, 2017

साधत काही नाही

तो एक बेफिकीर क्षण…
का भरभरून जगत नाही ?
आपलेच दुख, आपलेच सुख…
तरी समतोल साधत नाही !

असीम विचारांच्या गर्तेत …
का जीव अडकून पडतो ?
विचारही माझे, मनही माझे …
तरी चित्त साधत नाही !

उद्याची चिंता, कालची खंत …
का स्वस्थ जगू देत नाही ?
आजचा दिवस हातात …
तरी जगणे साधत नाही !  - हर्षद कुंभार (२३/१२/२०१७ १२:०२ रात्रौ )

#KshanKahiWechlele #harshadkumbhar

Thursday, December 7, 2017

स्वभाव दर्शन...

स्वभाव दर्शन….

रोज बाईकने अॉफिसला जाताना-येताना केलेले हे निरिक्षण आहे. आपल्या गाडी चालवण्याच्या पध्दतीवरुन स्वभावाचे संबंध जोडून काही गोष्टींवर मत मांडले आहे. बघा पटतंय का…

प्रथम वर्ग - ज्यात सर्व प्रकारच्या व्यक्ती आढळून येतात. जसे की जेष्ठ, मध्यम वयस्कर आणि तरूण जे संथ गतीने गाडी रस्त्याच्या कडेने चालवताना दिसतात. गाडी चालवताना येणारा प्रत्येक क्षण फुल अॉन जगायचा असेच समजुन. कसली काळजी नसलेली आपल्याच मुड मधे असतात. गाडी चालवताना कोणाला कसला त्रास देत नाहीत किंवा होणार नाही याची काळजी घेतात. याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात लागु पडतात. ( माझी ही सर्वात आवडता वर्ग आहे )

     याच वर्गातील उपगट येतो वरीलपैकी सर्व गुण येतात पण एक बदल असा की हे लोक बरोबर रस्त्यांच्या मध्ये गाडी चालवताना आढळून येतात. आता हे लोक जरी स्वतः च्या तंद्रीत असले तरी मागच्या लोकांना त्रास होतो आहे हे कळत नाही यांना. त्यामुळे कायम बोल खाण्याची वेळ येते त्यांच्यावर खऱ्या आयुष्यात सुध्दा.

दुसरी वर्ग - नोकरपेशा वर्ग… यांना कायम घाई असते. एकतर घड्याळ्याच्या काट्यावर चालतात त्यामुळे सदा ना कदा गडबडीत असतात. स्वतः साठी किंवा दुसर्‍याला देयला वेळ अजिबात नसतो. गाडी चालवताना अॉफिसला लवकर जायचे म्हणून मिळेल तो, जमेल तो रस्ता वापरून गाडी चालवतात पण हे कोणालाच त्रास देत नाहीत. उशिरा पोहोचण्याचे सर्वात जास्त बळी हे लोक असतात इतकी घाई करून पण.

तिसरा वर्ग - तरुण पिढी कारण नसताना उगाच गाडी दामटत असतात, सालेंसरचा फाटका कर्कश आवाज, त्यात त्यांना कुठे जायची घाई असते देवाला माहिती म्हणून हॉर्नच्या बटनवर बोट चिटकवल्यागत हॉर्न वाजवत असतात. त्या गाडीचा खुळखुळा करून ठेवतात बिचार्‍या गाडीबद्दल सहानुभूती वाटते. ज्यांना निर्जीव वस्तू बद्दल जाणिव नसते ते सजीवांना काय न्याय देणार. यांचा सगळ्यांना त्रास होतो त्यात रस्त्यावरील लोक तर येतातच शिवाय त्यांच्या आयुष्यातील पण.

चौथा वर्ग - हा फक्त त्यांच्यासाठी आहे जे लोक वाहतूकीचे नियम पाळतात. यात मुख्यत्वे करून सिग्नल यंत्रणा पाळणे हे महत्वाचे मानले पाहिजे आणि त्यांना माझा सलाम पण. कसली गडबड नाही की घाई नाही वेळेला महत्व देऊन कामे करतात. त्यामुळे सगळे व्यवस्थित पार होते अश्या लोकांचे कारण नियमानुसार चालले तर आयुष्यात ट्रॅफिक पण होत नाही आणि आयुष्याचा रस्ता सुखकर होतो नाही का. (हा माझा वर्ग आहे आणि आवडता पण)

तर मंडळी आता तुम्ही कोणत्या वर्गात मोडता ते पहा.

-हर्षद कुंभार (०७-१२-२०१७ ०५.३०)

#KshanKahiWechalele #harshadkumbhar

Thursday, November 16, 2017

पाश....

तोडुन पाश मोहाचे…
उभा मी ठाकलो,
राखेचा होऊनी अंश …
प्रकाश मीच जाहलो.

संकटे वाटली अनेक …
झगडत मी राहिलो,
कालची रात्र भयान…
आज मीच सुर्य जाहलो.

नाही वाट मोजली…
दिशा शोधत चाललो,
आज माझ्यातुन मी…
पुन्हा नव्याने जन्मालो. - हर्षद कुंभार (१६-११-२०१७ ४.००)

#KshanKahiWechalele #harshadkumbhar

Wednesday, November 15, 2017

नाउमेद....

मोकळे आभाळ माझे…
दाही दिशाही स्पष्ट मला,
पण झेप घेऊ कशी…
मनात अंधकार माजलेला. ¦¦

मी, मीच आहे का ती …
प्रश्न माझाच मला,
विस्कटलेल्या क्षणी…
वाटे आधार हरवलेला. ¦¦

हरवून बसले जग …
शोध नकोच मला,
अंतच नाही ना हा …
प्रश्न मनी उरलेला. ¦¦ - हर्षद कुंभार (१५-११-२०१७ १२.०७ )

Monday, November 6, 2017

ओशाळून बसलो मी....

ओशाळून बसलो मी…
समोर संधीच गाव तरी,
मागतो पहाट नवी …
पण निश्चय रेंगाळत काही.

रोजचेच जीणं म्हणून…
दोषी मलाच मी,
विसावु थोडे करून…
काळ चाखले काही.

येईल एक दिवस करत…
गेल्या रात्री उलटून,
त्याच विचारांमध्ये मी
आजही पहुडलेला काही. - हर्षद कुंभार (०६-११-२०१७ ११.०० रात्र )

#KshanWechaleleKahi  #harshadkumbhar

Wednesday, September 13, 2017

एक ग्रह...

एक ग्रह मनात आहे,

विचारांच्या वलयावर फिरणारा…

आणि एक दुर अवकाशात,

आपल्याच धुंदीत रमणारा…

एक ग्रह मुक्त आहे,

सर्वच बाबतीत…

अन एक मनात,

सदैव बंदिस्त आणि ग्रासलेला…

एक ग्रह ठरवतो म्हणे,

आपले भविष्य….

अन एक दर्शवितो आपली

वर्तमान मनस्थिती….

एका ग्रहाला तमा नाही,

अस्तित्वाची, जाणिवांची…

आणि एक मात्र विसंबून,

त्यावर चित्र बदलेल काही… - हर्षद कुंभार (१३/०९/२०१७ )

Tuesday, August 1, 2017

शाळेतल्या काही आठवणी...

शाळेतल्या काही आठवणी …

पहिली ते सहावी पर्यंतचा शालेय प्रवास असा काही फारसा ठळक आठवत नाही. पण इयत्ता ७ वी ते १० वी पर्यंतचे शालेय जीवन खूप ठळक आणि यादगार स्वरूपातले गेले. सामान्य विद्यार्थी ते वर्गातील टॉप १० या हुशार यादी येण्या पर्यंतचा प्रवास. हा काळ खूप संघर्षमय होता असे नाही पण तरीही शिस्त आणि नियमात बांधणारा मात्र होता. 
    माझी शाळा मा. दादासाहेब दांडेकर विदयालय, भिवंडी , ठाणे. आणि वडील गो. ग. दांडेकर मशीन वर्क्स, भिवंडी येते कामाला होते. आमची शाळा ही दांडेकरांनी सुरु केली होती, त्यामुळे दांडेकर कंपनीमधील बऱ्याच कामगारांची मुले याच शाळेत शिकायला होती. कंपनी आणि शाळेचे हे नाते असल्याने माझ्या वडिलांना शाळेतील शिक्षक बऱ्यापैकी ओळखत होते. बरं यामुळे शाळेत माझ्यावर शिक्षकांचे विशेष लक्ष होते असेही नाही. 
आयुष्याला खरी कलाटणी तर तेव्हा मिळाली जेव्हा ७ वी मध्ये मला कमी मार्क मिळाले आणि त्यामुळे वडिलांचा ओरडा खायला लागला होता. माझं शिक्षणाकडे लक्ष नाही हे मूळ कारण वडिलांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी मला खाजगी शिकवणी लावायची ठरवले. घरगुती शिकवणी पासून सुरु केले खरे पण म्हणावी तितकी प्रगती दिसत नव्हती म्हणून वडिलांनी चांगल्या शिकवणी मध्ये पाठवले.
शेवटी मी थोरात सरांकडे स्तिरावलो पूर्ण ३ वर्ष. जसे चांगले शिक्षक योग्य वळण आणि मार्गदर्शन करतात त्यानुसार मी बदलत गेलो. सरांचा वैयक्तिक प्रभाव असा होता की अभ्यासाची गोडी निर्माण झाली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की ८वी मध्ये मी मराठी, हिंदी, विज्ञान, इतिहास अश्या काही विषयांमध्ये जास्त मार्क मिळवून पहिल्या ५ मध्ये पोचलो. एका वर्षातील ही प्रगती पाहून वडील सुखावले होते आणि आता मी सर आणि मॅडम यांच्या दृष्टिक्षेपात आलो होतो. त्यामुळे साहजिकच या सगळ्यांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या होत्या. ज्या ज्या विषयांमध्ये मी चांगला होतो त्या त्या शिक्षकांसोबत विशेष ओळख बनली होती.
मराठीमध्ये मी सर्वात जास्त मार्क पाडले होते तर राणे मॅडम यांचे खास लक्ष होते माझ्यावर. त्यांना अपेक्षा होती बोर्डात मी मराठीमध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळवेल. कारण मी नेहमीच चांगले मार्क्स मिळवायचो.
विज्ञान शिकवणाऱ्या पाटील मॅडमची विशिष्ट पद्धत होती शिकवण्याची. त्या उद्या काय शिकवणार ते आधीच आम्हाला वाचून येयला लावत असत आणि मग दुसऱ्या दिवशी प्रथम मुलांनी मूळ मुद्दे सांगायचे आणि मग मॅडम त्याचे स्पष्टीकरण देणार. मॅडमला हे नक्की माहीत असायचे की कोणी काही बोलले नाही तरी हर्षद एकतरी पॉईंट सांगेलच म्हणून एकदा तरी माझं नाव पुकारायच्याच. त्यामुळे बऱ्याचदा मुलं वाचायची मॅडमचा मार खाण्यापासून.
इतिहास विषयाचे पवार सर. सरांची माझ्यावर खास मर्जी होती त्याच खास कारण असे होते की
सर जे काही त्या दिवशी शिकवणार असतील ते आधी मला वर्गात मोठ्या आवाजात वाचायला लावायचे आणि मग ते नंतर शिकवायचे. त्या वेळी आम्ही पौगंडावस्तेत असल्याने कोवळ्या आवाजातून पुरुषरुपी आवाजात येत होतो म्हणून आवाज मोठा आणि स्पष्ट होता. म्हणून सर मला नेहमी वाचायला लावायचे.
    हिंदी चांगलं होण्या मागचे कारण खरं तर आमचे शेजारी जे उत्तर प्रदेशचे होते त्यांच्यासोबत आमचा चांगला घरोबा होता. त्यामुळे हिंदी मध्ये देखील पकड लगेच बसली आणि चांगले मार्क्स मिळत गेले. सर आणि मॅडम म्हणाल तर एखादे नेमलेले शिक्षक कधी नव्हतेच.
    बाकी विषय म्हणाल तर मी भूमिती, बीजगणित मध्ये जेमतेम होतो आणि इंग्लिशमध्ये मात्र खूपच गरीब होतो अगदी छत्तीसचा आकडा म्हणा. त्याला कारण पण तसेच होते मुळात एक धड शिक्षक कधी मिळाले नाहीत आणि जे कुलकर्णी सर होते ते इंग्लिश तासाला इंग्लिश विषय सोडून बाकीचे माहितीपर विषय जास्त शिकवत होते. पण त्यांच्यामुळे वर्गाबाहेरच ज्ञान आम्हाला मिळत होते.
    इतर उपक्रम म्हणाल तर माझी चित्रकला त्यावेळी छान होती. त्यामुळे कोणत्याही थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी असली की शाळेच्या फळ्यावर मला त्या व्यक्तीचे चित्र काढायला हमखास सांगायचे.

या काही आठवणी कायम लक्षात राहतील माझ्या आणि माझ्या वर्गमित्रांच्या. पुन्हा हे जेव्हापण वाचनात येईल तेव्हा आठवण्या अजून ताज्या होतील हे नक्की. - हर्षद कुंभार (३०-०७-२०१७ ११:५०)

#दांडेकरशाळा #जुन्याआठवणी #भिवंडी

Thursday, May 18, 2017

आभाळ भरून येतं

भावनांनी भरलेलं हे आभाळ ...

मोकळं करू वाटतं.

अगदी शब्द होऊन ...

पानापानावर विसावू वाटतं.

 

मग भरून आलेलं मन ...

एक-एक ढग जमा करू लागतं,

पण वास्तवाचा खट्याळ वारा ...

सारं आभाळच वाहून न्हेत.

 

पुन्हा मन मोकळे ...

पान मोकळे ...

वीज पडल्यागत मन...

जळकं झाड होऊन जातं.  - हर्षद कुंभार (१८/०५/२०१७ ११.२०)