मी कवी असलो तरी
कवी ही जात माझी ...
शब्दांचा खेळ मी करतो,
फिक्या बेरंगी भावनेत
साजेसे रंग भरतो.
कुणाच्या बोलाचे घाव...
खोलवर मनात रुततात,
शब्दातला त्याच्या भाव...
मलाही रडवतात.
शरीरावरील माराचे घाव
काही काळ टिकतात,
पण शब्दांनी छळणी झालेलं
मन ते आयुष्यभर पोसतात - हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment