आज काम थोडे जास्तच होते आणि आधीच दिलेले काम पूर्ण झाले नव्हते त्याचे वेगळेच टेन्शन, तरी कसाबसा काम थोडे उरकून घेतले मुंबई मधील मित्रांना माहीतच असेल ट्रेन पकडायची धावपळ मी पण असाच ७.०२ ची पकडण्यासाठी आटोपून निघालो तरी थोडासा उशीर झाला आणि समोर गाडी उभी फक्त ब्रिज ओलांडून जायचे होते पण माझ्या त्याच ट्रेन मधील लोकांनी ब्रिज असा भरून गेला कि गाडी अशी डोळ्यासमोरून गेली. आणि डोळ्यासमोरून गाडी गेल्याचे दुख तुम्हाला पण माहित असेल , मग उगाच त्या ब्रिज अडवलेल्या लोकांना शिव्या देताच खाली उतरलो , एकतर आधीच कामाचे टेन्शन होते त्यात असे काही झाले कि खूप राग येतो . मग काय आता पुढच्या ७.२१ च्या गाडीची वाट बघत बसलो होतो . मोबाईलमध्ये मग उगाच गेम खेळण्याचा प्रयत्न करू लागलो, तसे लक्ष नव्हते त्या गेममध्ये उगाच मन उदास झाले होते. काही काळ गेल्यावर एक लग्न झालेली मुलगी कडेवर एक छानशी छोतुशी मुलगी घेवून माझ्याजवळ आली आणि म्हणाली मला वेस्ट ला जायचे आहे कसे जायचे . मी जास्त विचार न करता , कुठलेश्या विचारात तिला समोरच्या ब्रिजवरून डाव्या हाताला जा म्हणालो. ती thanx म्हणाली आणि आणि गर्दीत नाहीशी झाली.काही क्षणात भानावर आल्यावर एकदम खडबडून जागा झालो आणि मी केलेली चूक लक्षात आली , मी त्या मुलीला उजव्या बाजूला जा सांगण्याऐवजी डाव्या बाजूला जा बोललो. मला कसेतरी वाटले मी तडक उठलो आणि धावत गेलो त्या गर्दीत त्या मुलीला शोधात ब्रिज वर गेली ती नुकतीच डाव्या बाजूला वळलेली पहिले, लगेच गेली आणि त्यांना माफ करा मी चुकीचे सांगितले गडबडीत पण वेस्ट ला इथून उजव्या बाजूला जावे लागेल तुम्हाला. ती " अय्या तुम्ही इथपर्यंत आलात सांगायला खरच thanx a lot . मी sorry म्हणालो , माझ्यामुळे उगाच तुम्ही चुकीच्या दिशेने गेला असता , हलकेच चेहेर्यावर हास्य आणून आभारी मानाने ती गेली उजव्या बाजूला , तो पर्यंत पुन्हा माझी ७.२१ ची गाडी आली होती मग काय आता पुन्हा धावत जावून एकदाची पकडली गाडी. आता थोडे मन हलके वाटत होते या प्रसंगानंतर..............
कदाचित हा प्रसंग घडायचाच होता माझे मन पूर्ण पदावर येण्यासाठी. - हर्षद कुंभार
khup chan ahe
ReplyDeletehe help manala samadhan dete.
ReplyDeleteho tasech jhale khare
ReplyDelete