चहा एक आठवण …
२०११ मधील गोष्ट ही . मी नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतर ६ महिन्याने माझी बदली बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स येतील सिडबी (SIDBI) मध्ये झाली. अर्थात ते काम ही तात्पुरते होते आणि मला सपोर्टच काम देण्यात आले होते. जास्त काही खास असे काम नव्हतेच मुळी फक्त मेल चेक करून पुढे सिडबी वाल्याना पाठवायचे एवढेच . मुळात मी सॉफ्टवेअर इंजिनीयर असल्याने हे असलं काम करायला रटाळ वाटत होते. पण कंपनीने मला १ महिन्यासाठी पाठवले असल्याने इलाज नव्हता.
सुरुवातीला कंटाळा येत होता पण शेवटी मन कुठेतरी रमण्याचा प्रयत्न करतंच. बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये बऱ्यापैकी सगळ्या बँकांचे डेटा सेंटर आहे आणि त्यात तिथे खाण्या पिण्या साठी बाहेर काहीच सोय नव्हती. काही ठिकाणी बांधकाम चालू होते तिथे आपली एखादी चहाची, वडापाव आणि समोसा इत्यादी मिळेल अशी टपरी वजा हॉटेलची सोय. त्यामुळे तिकडे आमची एक फेरी असायचीच. समोसा तिथला लहान पण खास होता अर्थात आजवर खाल्लेल्या समोश्या पेक्षा निश्चितच निराळा असा.
हे झालं बाहेरचं पण बाहेर पण किती वेळ थांबणार ना शेवटी कंटाळवाणं का असेना काम करायला जावं लागायचं . सिडबी (SIDBI) मध्ये २ वेळेला एक काका सगळ्यांना चहा घेऊन येयचे . हाच तो खास चहा ज्यासाठी आधीच थोडा सारांश. त्यांची एक ट्रॉली असायची ज्यात सगळ्याने कप असायचे . चहाची सोबतची खासियत अशी की जाड चिनी मातीचे कप आणि बशी. त्यामुळे जुन्या इराणी चहा वाल्यांकडे असतात तास फील येयच चहा पिताना.
कपात फक्त दूध असायचं अर्थात गरम आणि त्यासोबत टी बॅग (टेटली),शुगर क्यूब आणि छोटासा चमचा.
काकांसोबत चांगली ओळख झाली असल्याने ते मला हवे असलेले परिमाण देयचे म्हणजे २ टी बॅग्स आणि ४ शुगर क्युब्स. काय माहीत तो चहा इतका अप्रतिम चवीला लागत असे की काका पुन्हा कधी येतात याची खूप वाट पाहायचो मी. चहाचा तो क्षणिक प्रसंग थोडा वेळ तरी राजेशाही थाट असल्यासारखा भासवून जायचा.
तिकडचा माझा सहवास एक महिन्याचा असल्याने नंतर ठरल्याप्रमाणे दुसरीकडे बदली झाली. पण आजही तो एक महिना का असेना आठवणीत चांगला राहिला आहे. - हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment