पावसाचा पूर्वार्ध ….
आजकाल आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांचा ढीग दिसू लागला आहे . हे असचं भासतं जस काही कापूस कोणीतरी आकाशात चिटकावला. समोर पहिले की नजर संपेल तिकडे म्हणजे क्षितिजात म्हणा हवं तर ढगांची गर्दी झालेली दिसते. असं वाटत डास मारणारी धुरांडी नसते का ती गल्लोगल्ली मारतात तसं एकच धूर सगळीकडे झालाय काहीसं.
पाहिलं तर गडद छोटे छोटे पिल्लू ढग दिसतात अधे-मधे मोठ्या वडिलधाऱ्या पांढऱ्या ढगांच्या रांगेत. जणू काही लहान मुले उतावळी आहेत बरसायला पण फक्त मोठ्यांच्या होकाराची वाट पाहत थांबलेली.
मध्येच कुठेतरी डोंगरमाथ्यावर मोठी सावली पडलेली दिसते. रोजचे चाकरमानी नाहीतर इतर बाहेर पडणारी लोक अचानक आलेलं ढगांच आच्छादन अनुभवून थंड पावतात.
आता फक्त वाट आहे ती पहिल्या पावसाची जे की सगळेच आतुरतेने करत आहेत. - हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment