जुन्या आठवणी भाग २
ही खूप जुनी गोष्ट आहे मी साधारण शाळेत असेल त्या वेळची म्हणजे २००१ पूर्वीची. एके दिवशी मी आणि माझा चुलत भाऊ नातेवाईकाला कॉल करण्यासाठी म्हणून PCO जवळ गेलो होतो. त्या काळी मोबाईल ही ब्याद हयात नव्हती असे नाही पण आज इतकी प्रचलित तरी नव्हती. आणि मोबाईल म्हणाल तर माझ्याकडे २००७ ला आलाय.
असो… तर आमचा कॉल झाल्यावर एक मुस्लिम काका आमच्या मागे उभे असलेले लक्षात आले. आम्ही मागे वळालो तर त्यांनी आम्हा दोघांना अक्षरशः अडवत रागाने विचारलं
“ किसको कॉल किये थे ? ”
आम्ही विचारलं
“ क्यो क्या हुवा ?”
मग ते काका जे काही सुरु झाले आमच्या बत्त्याच गुल
“ तुम लोग कितने दिन से मेरे घर कॉल करके मेरे लड़की को परेशान करते. ”
आम्ही म्हणलं
“ क्या अंकल कुछ भी क्या बोल रहे हो हमने नही किया ”
ते काका काही ऐकायला तयारच नाही उलट बोलत होते की
“ मैने अभी देखा तुमने कॉल किया , मेरे घर अभी कॉल आया करके मैं देखने आया इधर ”
आम्ही पण मग हुशारी मारत विचारलं
“ आपको कैसे पता इसी फोन से किया है. किसी और फोन से किया होगा तो. ”
काका थोडे नरमले पण विश्वास काही बसेना :
“ मेरे घर के पास यही एक फोन है. ”
मग आम्ही सांगितले
“ ठीक है चलो फिरसे रिडायल करते है तब तो पता चलेगा ना. ”
असे करून शेवटी त्यांना रिडायल करून आम्ही केलेला नंबर दाखवला आणि तेव्हा ते शांत झाले आणि निघून गेले.
आम्ही सुरुवातीला थोडं घाबरलो होतो कारण ते मुस्लिम होते आणि त्यांनी केलेला आरोप पण मार खाण्यासारखा होता. आमच्या प्रसंगावधान मुळे वाचलो नाहीतर उगच चित्र वेगळे झाले असते आणि आठवण ही . - हर्षद कुंभार (२०/१०/२०१६ ७.२७) )
No comments:
Post a Comment