All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Sunday, October 23, 2016

पाण्याची सर होऊन


दि. ०४-०३-२०१६,
आज आॅफिसच्या मित्रांसोबत दुपारी बाहेर जेवण्याचा बेत झाला आणि परतत असताना भेटलेल्या पावसाने सुचवलेली कविता...
पाण्याची सर होऊन
नभातुन पडावे...
स्वैर बागडुन तव
मोती बनुन वसावे...
मोहक चित्र होऊन
मना-मनात उतरावे...
जिकुंन सार्‍यांना मग
लाडका क्षण ह्वावे... - हर्षद कुंभार....

पावसाचा पूर्वार्ध ….



पावसाचा पूर्वार्ध ….
आजकाल आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांचा ढीग दिसू लागला आहे . हे असचं भासतं  जस काही कापूस कोणीतरी आकाशात चिटकावला. समोर पहिले की नजर संपेल तिकडे म्हणजे क्षितिजात म्हणा हवं तर ढगांची गर्दी झालेली दिसते. असं वाटत डास मारणारी धुरांडी नसते का ती गल्लोगल्ली मारतात तसं एकच धूर सगळीकडे झालाय काहीसं.
पाहिलं तर गडद छोटे छोटे पिल्लू ढग दिसतात अधे-मधे  मोठ्या वडिलधाऱ्या पांढऱ्या ढगांच्या रांगेत. जणू काही लहान मुले उतावळी आहेत बरसायला पण फक्त मोठ्यांच्या होकाराची वाट पाहत थांबलेली.  
मध्येच कुठेतरी डोंगरमाथ्यावर मोठी सावली पडलेली दिसते. रोजचे चाकरमानी नाहीतर इतर बाहेर पडणारी लोक अचानक आलेलं ढगांच आच्छादन अनुभवून थंड पावतात.
आता फक्त वाट आहे ती पहिल्या पावसाची जे की सगळेच आतुरतेने करत आहेत. - हर्षद कुंभार

मी चंद्र नाही की,



मी चंद्र नाही की,
सुर्य नाही...
प्रकाश मात्र होत आहे...
मी सागर नाही की,
नदी नाही...
तहान मात्र भागवत आहे...
मी मित्र नाही की,
शत्रू नाही...
नातं मात्र निभावत आहे...
मी दूरचा नाही की,
जवळचा नाही...
अंतर मात्र ठेवून आहे... - हर्षद कुंभार...

पांगारे गाव आणि आठवण



नमस्कार
काही लहानपणीच्या जुन्या आठवणी ज्या बायको सोबत गप्पा मारताना उजळून आल्या... 
ह्या आठवणी आहेत माझ्या आजोळच्या म्हणजे माझ्या आईच्या गावातील. आईचे गाव पांगारे, सासवड, पुणे येथील. हां तिकडे आता कोणी नसतं फक्त यात्रेला किव्वा अधे मधे जाणे होते. 
आमचं काही लहानपण तिकडे झाले आहे.  तिकडच्या आठवणी म्हणजे आमचे आप्पा ज्याच्या भोवतीच सार्‍या गोष्टी गुंफल्या आहेत. आप्पा म्हणजे आईचे काका जे शेतकरी होते.  आता आप्पा हयात नाहीत परवा म्हणजे 17 जुनला त्यांच वर्ष श्राद्ध झाले म्हणून सगळे आठवले. आप्पा म्हणजे भारदस्त व्यक्तीमत्व कायम डोक्यावर फेटा, जॅकेट, सदरा आणि धोतर. आप्पांना पान खायची सवय त्यामुळे सोबत एक पोतडी त्यात सगळ्या गोष्टी असायच्या जसं अडकित्ता, सुपारी, चुना इत्यादी.
आप्पांकडे बर्‍यापैकी जनावरे होती आणि माझ्या माहितीप्रमाणे एकही विकत घेतले नव्हते निदान आमच्या काळात तरी.  वाडीच्या समोरचं पारडं होतं आणि घराला लागूनच गोठा.  गोठ्यात एक गाय जी काळ्या रंगाची आणि पांढर्‍या ठिपक्यांनी सजलेली होती. पारड्यात मात्र 3 बैल होते.  गायीचं नाव काय आठवत नाही पण बैलांची चांगलीच आठवतात. कारवाण्या, नंद्या आणि समऱ्या जो आमच्या समोर मोठा झालेला. ही सगळी घरच्या गायींची झालेली.  गायीच्या संदर्भात अस्पष्ट असे आठवते ते तिचे एक बाळंतपण म्हणजे आम्ही अंगणात खेळत असताना गायीच्या मागे दोन छोटे पाय बाहेर दिसले. ते चमत्कारिक वाटले म्हणून तेव्हा आम्ही आप्पांना हाका मारल्या होत्या. ते सगळे प्रथमच पाहिले होते.
बैलांची माहिती अशी की कारवाण्या सर्वात मोठा रंगरूपाने अगदी गायीसारखा त्या नंतर नंद्या तोपण काळाच पण त्यात थोड वेगळेपण होते आणि शेवटी समऱ्या तो पूर्ण वेगळा म्हणजे तपकिरी रंगाचा.
वयानुसार त्यांच वागणेपण तसेच होते.  कारवाण्या शांत, नंद्या थोडा शांत आणि गरम, समऱ्या तर नुसते भांडण काढायच्या कामाचा, दुसरा बैल दिसला की हा पठ्ठ्या हुंकारायला चालुच. 
तशी आप्पांपुढे सगळी चांगलीच वागायची कारण आप्पांनी कधी आसूड वापरलेला आम्ही पाहिला नाही.  लहानपणापासून सगळी जनावरे घर, वावर आणि पाणवठे फिरलेली त्यामुळे त्यांना बरोबर कळायचे कोणत्या वेळी कुठे जायचे ते. पाणी पाजायला आम्ही पण बर्‍याच वेळा आप्पांसोबत गेलो होतो.  एकदा तर आम्ही असचं पाणी पाजायला गेलो होतो त्यावेळी कारवाण्याचे पुढचे पाय गाळात रुतले होते, त्याचे वय झाले असल्याने त्याला पाय निघत नव्हते. लोकांना बोलवून पायाला धरून उचलून बाहेर काढले होते. 
आप्पांनी बैलांना एक सवय लाऊन ठेवली होती. शेतातील काम करुन आले की घराच्या दारात उभे राहायचे आणि जोवर भाकरी खायला मिळत नाही तोवर हालायचे नाही.  तशी ती ऐकत पण नव्हती.  एकदा भाकरी मिळाली की आपापल्या जागी जायची.
शेतातून निघाली की थेट घरी जायची लहानपणापासून आप्पांनी त्यांना तशी सवयच लावली होती. भले यांच्यामधील एकही बैल आता नाही पण आमच्या आठवणीत मात्र कायम राहतील. आता सगळे बदलले आहे गाव पण...
बर्‍यापैकी ठळक अश्या गोष्टी आठवण बनुन राहिल्या आहेत.  - हर्षद कुंभार... 

चहा एक आठवण …



चहा एक आठवण …
२०११ मधील गोष्ट ही . मी नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतर ६ महिन्याने माझी बदली बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स येतील सिडबी (SIDBI) मध्ये झाली. अर्थात ते काम ही तात्पुरते होते आणि मला सपोर्टच काम देण्यात आले होते. जास्त काही खास असे काम नव्हतेच मुळी फक्त मेल चेक करून पुढे सिडबी वाल्याना पाठवायचे एवढेच . मुळात मी सॉफ्टवेअर इंजिनीयर असल्याने हे असलं काम करायला रटाळ वाटत होते. पण कंपनीने मला १ महिन्यासाठी पाठवले असल्याने इलाज नव्हता.
सुरुवातीला कंटाळा येत होता पण शेवटी मन कुठेतरी रमण्याचा प्रयत्न करतंच.  बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये बऱ्यापैकी सगळ्या बँकांचे डेटा सेंटर आहे आणि त्यात तिथे खाण्या पिण्या साठी बाहेर काहीच सोय नव्हती. काही ठिकाणी बांधकाम चालू होते तिथे आपली एखादी चहाची, वडापाव आणि समोसा इत्यादी मिळेल अशी टपरी वजा हॉटेलची सोय. त्यामुळे तिकडे आमची एक फेरी असायचीच. समोसा तिथला लहान पण खास होता अर्थात आजवर खाल्लेल्या समोश्या पेक्षा निश्चितच निराळा असा.
हे झालं बाहेरचं पण बाहेर पण किती वेळ थांबणार ना शेवटी कंटाळवाणं का असेना काम करायला जावं लागायचं . सिडबी (SIDBI) मध्ये २ वेळेला एक काका सगळ्यांना चहा घेऊन येयचे . हाच तो खास चहा ज्यासाठी आधीच थोडा सारांश. त्यांची एक ट्रॉली असायची ज्यात सगळ्याने कप असायचे . चहाची सोबतची खासियत अशी की जाड चिनी मातीचे कप आणि बशी. त्यामुळे जुन्या इराणी चहा वाल्यांकडे असतात तास फील येयच चहा पिताना.
कपात फक्त दूध असायचं अर्थात गरम आणि त्यासोबत टी बॅग (टेटली),शुगर क्यूब आणि छोटासा चमचा.
काकांसोबत चांगली ओळख झाली असल्याने ते मला हवे असलेले परिमाण देयचे म्हणजे २ टी बॅग्स आणि ४ शुगर क्युब्स.  काय माहीत तो चहा इतका अप्रतिम चवीला लागत असे की काका पुन्हा कधी येतात याची खूप वाट पाहायचो मी. चहाचा तो क्षणिक प्रसंग थोडा वेळ तरी राजेशाही थाट असल्यासारखा भासवून जायचा.  
    तिकडचा माझा सहवास एक महिन्याचा असल्याने नंतर ठरल्याप्रमाणे दुसरीकडे बदली झाली. पण आजही तो एक महिना का असेना आठवणीत चांगला राहिला आहे.  - हर्षद कुंभार 

जुन्या आठवणी भाग - ३



जुन्या आठवणी भाग - ३
रायगडावर जेव्हा जाग आली. हे वाक्य तुम्हाला या पुढील लेखातून कळेलच. ही आठवण आहे तेव्हाची जेव्हा मी भिवंडीला राहत होतो. माझी कंपनी गोरेगावला होती त्यामुळे मुंबईचा आणि माझं संबंध तसा रोजचाच. सोशल नेटवर्किंग मुळे माझी मुंबई मधील महाराष्ट्र ट्रेकर्स या ट्रेकिंग ग्रुप सोबत ओळख झाली आणि पहिला ट्रेक केला तो रायगडचा.
२ दिवसांच्या ट्रेकमध्ये २ गोष्टींनी खूप प्रभाव पडला. एक म्हणजे सर्वात महत्वाच आहे ते महाराजांबद्दल आदर एका वेगळ्या उंचीवर पोचला तो आणि दुसर टकमक टोकावरून खाली ३५० फुट Rappelling (ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी म्हणजे दोरीच्या सहाय्याने खाली उतरणे.).
महाराजांबद्दल आदर प्रत्येकाला आहेच, पण त्याच स्वरूप खूप लोकाच्या मनात वेगवेगळे आहे जे काही योग्य आणि काही अयोग्य प्रमाणात. अर्थात मीही त्याआधी अयोग्य पातळीत होतो पण रायगड ट्रेक केला आणि मला जाग आली असच मी म्हणेन.
महाराज म्हणजे इतिहासात अजरामर झालेलं एक व्यक्तिमत्व. त्यामुळे आम्हाला कमी अधिक प्रमाणात जी काही माहिती होती त्यात भर पडावी म्हणून ट्रेकमध्ये दुर्ग संवर्धन आणि इतिहास संशोधन करणाऱ्या शिल्पाताई परब
यांना आग्रहाने बोलवले होते. त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि महाराजांप्रती सांगितलेली माहिती याने आमचे अज्ञान दूर तर झालेच शिवाय आमचा दृष्टीकोन बदलला.
महाराजांना महाराज किंवा छत्रपती यानेच संबोधणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी समजावले. आपण महाराजांना एकेरी नावाने संबोधणे योग्य नाही कारण तितके आपण लायक नक्कीच नाही. म्हणून जय भवानी …. असे म्हणने पण योग्य नाही. त्यांनी आम्हाला त्यावेळी एक ललकारी शिकवली होती, ज्यावेळी पण महाराजांचा जयघोष करायचा असेल तेव्हा हीच ललकारी म्हणा असे त्यांनी सुचवले होते.

|| जल, स्थल, अम्बर दे ललकार
शिवछत्रपतींचा जयजयकार ||

त्याचं हे म्हणन मला अगदी मनापासून पटल जस की आपण वडिलांचा उल्लेख करताना माझे बाबा,वडील किंवा पप्पा असाच करतो ना , नाकी नावाने बोलतो मग तसाच महाराजांना पण महाराज असाच केला पाहिजे.
तेव्हापासून मी आजतागायत फक्त महाराज म्हणून उल्लेख करतो दुसरा कोणी नाहीच माझ्यासाठी महाराज म्हणण्यासारखे. म्हणून मी म्हटलं होत रायगडावर जेव्हा जाग आली.
दुसरा एक अनुभव म्हणजे Rappelling जे प्रथमच तेही ३५० फुट केले होते. २ दिवसाच्या ट्रेकमध्ये पहिल्या दिवसापासून Rappelling सुरुवात झाली होती. अनुभवी लोकांना प्रथम पाठवलं होते जेणेकरून आम्हाला सर्व कळेल. पहिल्या दिवशी काय नंबर आला नाही आणि दुसरया दिवसापर्यंत भीतीने पार जीव जायची वेळ आली होती. अंतरवक्र आकारात असलेला टकमक टोक दोरी द्वारे इतरांना उतरताना पाहून टेन्शन तर खूपच आले होते. थोड्या अंतरानंतर उतरणारा अजिबात दिसत नव्हता. जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा पोटात गोळाच आला होता पण हिम्मत केलीच जे होईल ते होईल म्हणत सुरु केले. भिती हळू हळू गेली पण हवेचा झोत जे काही हेलकावे देत होता विचारू नका, जस काही तो माझ्या हिम्मतीला, धिराला धक्का लावायचं काम करत होता. पण स्वतःला समजावत मी सरांनी सांगितल्याप्रमाणे आजूबाजूचा सर्व परिसर अनुभवला. भिती,थरकाप, दम, हिम्मत आणि नयनरम्य निसर्गाचा आस्वाद या सर्व गोष्टी एकत्रित अनुभवल्या होत्या. आकाश आणि जमीन या मध्ये दोरीवर लटकण्याचा तो अनुभव खूप रोमांचक होता. खाली पहिले की आमचे सहकारी अगदी १-२ इंच इतकी दिसत होती. कधी खाली पोचतोय असे झाले होते.
एकदाच खाली पोचलो तेव्हा शरीर एकदम हलक झाल्यासारखं वाटत होत अगदी शून्य गुरुत्वा सारखं. भानावर आलो तेव्हा जगातली ही इतकी मोठी गोष्ट केल्याचा स्वतःचा सार्थ अभिमान वाटू लागला होता. आयुष्यातले हे २ अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. - हर्षद कुंभार २३/१०/२०१६ ४.१५



Thursday, October 20, 2016

जुन्या आठवणी भाग २

जुन्या आठवणी भाग

    ही खूप जुनी गोष्ट आहे मी साधारण शाळेत असेल त्या वेळची म्हणजे २००१ पूर्वीची. एके दिवशी मी आणि माझा चुलत भाऊ नातेवाईकाला कॉल करण्यासाठी म्हणून PCO जवळ गेलो होतो. त्या काळी मोबाईल ही ब्याद हयात नव्हती असे नाही पण आज इतकी प्रचलित तरी नव्हती. आणि मोबाईल म्हणाल तर माझ्याकडे २००७ ला आलाय.

असो…  तर आमचा कॉल झाल्यावर एक मुस्लिम काका आमच्या मागे उभे असलेले लक्षात आले. आम्ही मागे वळालो तर त्यांनी आम्हा दोघांना अक्षरशः अडवत रागाने विचारलं

“ किसको कॉल किये थे ? ”   

आम्ही विचारलं

    “ क्यो क्या हुवा ?”

मग ते काका जे काही सुरु झाले आमच्या बत्त्याच गुल  

    “ तुम लोग कितने दिन से मेरे घर कॉल करके मेरे लड़की को परेशान करते. ”

आम्ही म्हणलं  

    “ क्या अंकल कुछ भी क्या बोल रहे हो हमने नही किया ”

ते काका काही ऐकायला तयारच नाही उलट बोलत होते की

    “ मैने  अभी देखा तुमने कॉल किया , मेरे घर अभी कॉल आया करके मैं देखने आया इधर ”

आम्ही पण मग हुशारी मारत विचारलं

    “ आपको कैसे पता इसी फोन से किया है. किसी और फोन से किया होगा तो. ”

काका थोडे नरमले पण विश्वास काही बसेना :

    “ मेरे घर के पास यही एक फोन है. ”

मग आम्ही सांगितले

    “ ठीक है चलो फिरसे रिडायल करते है तब तो पता चलेगा ना. ”

असे करून शेवटी त्यांना रिडायल करून आम्ही केलेला नंबर दाखवला आणि तेव्हा ते शांत झाले आणि निघून गेले.

आम्ही सुरुवातीला थोडं घाबरलो होतो कारण ते मुस्लिम होते आणि त्यांनी केलेला आरोप पण मार खाण्यासारखा होता. आमच्या प्रसंगावधान मुळे वाचलो नाहीतर उगच चित्र वेगळे झाले असते आणि आठवण ही . - हर्षद कुंभार (२०/१०/२०१६ ७.२७) )  




Friday, October 14, 2016

जुन्या आठवणी भाग - १

जुन्या आठवणी भाग - १

   

    ही जुनी आठवण दिवाळीमधील तेव्हा आम्ही चाळीत राहत होतो.  दिवाळीमध्ये किल्ले बनवतात हे तर माहीत असेलच तुम्हाला. आम्ही जिथे राहत होतो त्या भाग वेताळपाडा . तिथे आधीपासूनच किल्ल्यांची स्पर्धा असायची. आधीची वर्ष फक्त इतरांचे किल्ले पाहण्यात गेली. ज्या वर्षी किल्ला बनवला त्यावेळी कोणता बनवावा म्हणून शोध सुरु झाला. बऱ्यापैकी माहीत असलेले किल्ले सारेच बनवत होते. म्हणून वेगळ काही तरी नवीन करावे असे वाटत होते. मग आम्ही गावी म्हणजे वाई तालुक्यातील एक किल्ला वैराटगड बनवला होता.  अगदी हुबेहूब नाही पण किल्ला म्हणावा अस काही तरी बनले होते. त्यात टिव्ही वरील पौराणिक कथांवर आधारित कार्यक्रमाचे पडसाद म्हणून की काय महाराज यांच्या मागे आम्ही लहान मोटारीवर फ़िरणारे चक्र लावले होते. थोडी अजून सजावट म्हणून हळीव टाकून केलेली बाग आणि सलाईनच्या बाटल्या वापरून केलेले कारंजे.

             एक दिवस स्पर्धेत सहभागी होतो म्हणून परीक्षक पण आले. अर्थात परीक्षक म्हणून कोणी थोर असे नव्हते पण त्यातल्या त्यात काही जाणकार आणि आमच्यापेक्षा वयाने मोठी असलेली काही लोक. परीक्षकांनी काही प्रश्न पण विचारले जसे की ह्या किल्ल्याबद्दल कसं कळलं आणि ते मागे फिरणार चक्र होत का त्या काळी वगैरे वगैरे …

पण समाधान एकाच गोष्टीच होत आमचा ७ वा नंबर आला होता. त्याच मूळ कारण हे की नवीन किल्ला त्यांना कळला होता म्हणून.  

असो या पुढे अश्या जुन्या आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कोणी नाही वाचलेच तरी पुढे आयुष्याच्या उत्तर वयात हे पुन्हा चाळून पाहण्यात वेगळीच मज्जा असेल म्हणून तरी आठवणींचे संवर्धन  - हर्षद कुंभार (१४/१०/२०१६ - ८.४६)