कल्याण स्टेशन
वेळ रात्री : १२.०० - २.००
नमस्कार सगळ्यांना,
एक प्रसंग तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. खरतर या गोष्टीला आता बरेच दिवस म्हणजे महिने झाले आहेत.
माझा एक ट्रेकरचा ग्रुप आहे. आम्ही कुठे ना कुठे ट्रेकला जात असतो. तसाच त्या वेळेस आम्ही चंदेरी गड सर करायचा बेत केला होता.
सगळे ठरल्याप्रमाणे झाले होते त्यानुसार मला कल्याण स्टेशन थांबायचे होते आणि रात्री शेवटची गाडी २.०० ची जी कर्जतला जाते त्यासाठी वाट बघायची होती. बाकी माझे ग्रुप मेम्बर cst कडून येणार होते.
तर मी जेवण करून लवकरच निघालो होतो. st महामंडळाचा मला फार जुना आणि चांगलाच अनुभव असल्या कारणाने मी लवकरच निघणे पसंत केले. आणि त्यानुसार मी कल्याण स्टेशनला १२.०० पर्यंत पोचलो होतो. दिवसा दिसणारे कल्याण स्टेशन रात्री मात्र खूप वेगळे असते. मी तिकीट काढून फलाट क्र. २/३ ला गेलो. आधी कधी रात्री कल्याण स्टेशनला न आल्यामुळे मला हा अनुभव नवीनच होता.
तसे बघायला गेले तर कल्याण स्टेशन खूपच गलीच्ह आहे. सर्वत्र कचरा इथे तिथे पडलेला दिसत होता. सगळीकडे भिकाऱ्यांचा वावर असतो रात्री. तिथे बसायला म्हणजे बाकडे बघत असताना, माझ्या लक्षात आले की रेलवे पोलिसांनी नुकतीच त्या भिकाऱ्यांची फटके लगावून हकालपट्टी केली होती. कारण त्यातले बरेच जर हात पाय धरतच पुन्हा स्टेशनला त्यांच्या हक्काच्या घरी आले होते. स्टेशन म्हणजे त्यांचे घरच नाही का ?
प्रत्येकाची झोपायची जागा ठरलेली म्हणजे बाकडे ज्याने त्याने बुक केले असतील या अर्थाने. मी गेलो तेव्हा काहीजण झोपले पण होते आणि काहीजण त्याच तयारीत होते. मी मात्र बसायला बाकडे बघत फिरत होतो स्टेशनला. शेवटी मला बाकडे दिसले जिथे आधीच २-३ प्रवासी बसले होते. तिथेच मी बसलो आणि आजूबाजूला माझे निरीक्षण चालू झाले. तिथे बाजूलाच त्या बाकडयाचे रात्रीचे हक्कदार कधीचे झोपण्यासाठी वाट बघत बसले होते. तिथे एक लहान भिकारी मुलगी साधारण वय असेल १०-१२ वर्ष तिथेच बसली होती. निरागसपणा हे लहान मुलांचे भाबडे रूप असते तसेच तिचेही होते. तिथे एका वयस्क भिकाऱ्याने तिला खायला म्हणून काहीतरी आणून दिले होते , पण कोण जाणे तिने घेतले नाही आणि तशीच बसून होती. तिच्या हातात १ रुपयाच नाण होत, ती त्या नाण्याकडे एक - सारखी पाहत होती. काय तुम्ही पण हाच विचार केला ना की त्या १ रुपयात ती काहीतरी खायला घेवून येईल.
पण पुढे चित्र वेगळेच दिसले, तुम्ही आणि मी जसा विचार करत होतो तसे काही घडलेच नाही. मी वाट बघत होतो की ही आता जाईल नंतर जाईल, स्वतः साठी काहीतरी घेवून येईल. पण तिने एक धक्का देणारी गोष्ट केली, जवळच एक वजन मोजण्याचे मशीन होते
तिने चक्क त्या १ रुपयाने स्वताचे वजन केले. माझ्यासाठी ते इतके विस्मयकारक होते ना !.
तिच्या मनातले नेमके तसे करण्यामागचे कारण काही झाल्या कळेनाच मला, मी विचारात असताना एव्हडे सगळे घडत असताना कधी २.०० वाजले कळलेच नाही. मित्रांनी पण फोन केला तयार रहा म्हणाले आणि त्या बाकड्यावरून मी उठलो, नंतर कळले ते बाकडे त्या मुलीचे होते बिचारी माझ्यामुळे आणि इतर दोघांमुळे तिची झोपायाची जागा आम्ही घेवून बसलो होतो. मी उठल्यावर ती शांतपणे जावून त्या बाकड्यावर झोपली आणि मी २.०० ची गाडी पकडली आणि मित्रांमध्ये सामील झालो. पुन्हा घरी आल्या नंतर मला त्या मुलीचे अप्रूप सारखे वाटत होते.
काही घटना मनाला खरच चटका लावून जातात तशीच ही एक - हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment