तुझं स्वप्न आणि माझं प्रेम
तुझ्या स्वप्नांची उडान
खूप मोठी आहे
त्यापुढे माझ्या प्रेमाची
उंची थोडी लहान आहे.
तुझ्या स्वप्नांच्या ...
आड मी येणार नाही,
माझ्या सावलीचही रूप
तुला दाखवणार नाही.
पण तुझी मी वाट
पाहणार आहे,
तुला दिलेलं वचन
मी पाळणार आहे - हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment