प्रतिबिंब
कधी स्वतःला आरशात पाहून प्रश्न विचारलाय का? आपण खरंच आपले आहोत की या जगाच्या गडबडीत स्वतःलाच हरवत चाललोय? हाच विचार मांडणारी ही कविता – 'प्रतिबिंब'! ✨🪞
पूर्ण वाचा, मनात उमटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच सापडतील...
—-----------------------------------------------------------
प्रतिबिंब
शून्यात नजर लावून कधी स्वतःला विचारलंय का?
सगळं गाठताना, स्वतःलाच मागे टाकलंय का?
आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडलं पाहिजे का?
की कधी प्रश्नांमध्येच अर्थ शोधायचा राहिलंय का?
समोरच्या आरशात आपण सहज पाहतो,
मनातल्या आरशात डोकावायची हिंमत होते का?
नवी स्वप्नं गाठताना जुन्या आठवणी हरवतात का?
लोकांना जिंकताना, आपण स्वतःलाच हरवतो का?
जगाच्या शर्यतीत धावताना स्वतःला विसरतो का?
शेवटी जिंकलो तरी काय, जर फक्त आपणच उरलो का?
– हर्षद कुंभार
#प्रतिबिंब #स्वतःशीसंवाद #आत्मचिंतन #कविता #मराठीकविता #मनातीलगुंतागुंत #स्वतःचेसत्य #माझेप्रतिबिंब #MarathiPoetry #Kavita #LifeReflections #HarshadKumbhar
No comments:
Post a Comment