✍️ लेखणीची हाक ✍️
शब्द उमटती हृदयावरती, भावना साऱ्या दाटती,
अर्थ सांडती वेदनांमधुनी, तरी दाद का हरवती?
मनगटावर लेखणी नाचे, अक्षरांतले प्राण बोले,
दाद मिळावी एक तरी, रोजच नवा सूर जोपे.
क्षणभर येतो कोणी तरी, नजर टाकूनी पुढे निघतो,
आतल्या वेदना शोधण्याआधी, फक्त मुखवटे पाहतो.
भावनांचे गाठोडे घेऊनी, किती हात येथे लिहिती,
आठवांचे घाव उमटता, शब्द पाण्यावाणी विरती.
रिकाम्या शब्दांवर कौतुक, फसवी दुनिया उधळते,
जीव ओतुनी लिहिता येथे, मौन काळीज चिरते.
सुरांमधुनी मन गुंफायचं, अजूनही हिय्या आहे,
तरी दाद जर मिळे ना, प्रश्न उरीचा आहे…
-हर्षद कुंभार
"भावना सांडणारे शब्द, हृदयातून उमटणारी अक्षरे, आणि तरीही न मिळणारी दाद…✍️
लेखणी मनगटावर ठेऊन रोज नव्याने जन्म घेणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी! ❤️
तुमची एक दाद, एक लाईक, एक शब्द… एखाद्याच्या लेखणीला नवी ऊर्जा देऊ शकतो! 📖✨
काय वाटतं तुम्हाला? 🤔 कमेंटमध्ये सांगा! 💬"
#लेखणीचीहाक #मराठीग़ज़ल #मराठीसाहित्य #भावना #मराठीलेखन #शब्दांचीजादू #ग़ज़ल #मराठीकवी #मराठीमन #कला #मराठीपोस्ट #शब्दसुगंध #कविता #ग़ज़लप्रेमी #मराठीस्टेटस
No comments:
Post a Comment