काव्याच द्राव्य,
खुप साचलेलं असतं.
पोहरा आडात,
तर मी रोजच टाकतो.
पण...
तो कधी भरुन येतो,
तर कधी रिकामा. - हर्षद कुंभार...
फक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...
मी जळत राहीलो ...
तिच्या इच्छांना प्रकाश मिळण्यासाठी...
मी रात्र जागत राहीलो ...
तिच्या स्वप्नांना दिवस दिसण्यासाठी...
मी वाहत राहीलो ...
तिच्या विचारांना वेग येण्यासाठी...
मी सारं देत राहीलो ...
तिच्या ओंझळीत सुःख भरण्यासाठी... - हर्षद कुंभार...
कधी क्षणभराचा ओलावा...
कधी क्षणभराचा विसावा...
कधी हसवतोस ...
कधी रडवतोस ...
कवितेत दिसतोस तु ...
भावनांनमधे वसतोस तु ...
कधी डोळ्यात तरळतोस ...
कधी मनात बरसतोस ...
तुमच्या आमच्या मनातला
तो एक पाऊस... - हर्षद कुंभार -
समदीकड बग कसं कोरडं पडलयं
डोळ्यात काय ती फकस्त पाणी उरलय...
अजुन कीती रे अंत पायशील
शेतीगत तुबी आता लाटरीच तिकीट बनलय...
कुठनं जगण्याची कास धरायची
मानसंच ते हाल जनावरांच काय होईल...
दरवर्षी पिकाचा भरोसा नाय
औंदा तु नाय आला तर आयुष्याच पिक काय राईल.
सांग ना राजा कवा तु येणार
हाल जीवांचे हे संपवीनार ....
जीवांना घोर लावाया
जीव तरी का ह्यो उरनार... - हर्षद कुंभार .
मनाच्या डोहात ...
खुप भावना असतात,
शब्दांच्या गळाला मात्र ...
मोजक्याच लागतात.
काही भावना ...
अलगद शब्दात अडकतात ,
तर काही आढे-वेढे घेऊन ...
खुप रडवतात.
मोठ्या मासळीसम ...
कधी छान कविता होतात,
तर कधी छोट्या ...
चारोळीनच जाळी भरवतात. - हर्षद कुंभार -
सतत होऊन विचारांचा मारा ...
मन करी मझ बेजार,
दमुन मेंदु तव माझा ...
जडवी मझ नव आजार.
लाख विचार करुन ...
मनास ना मिळे कोणतीच शांती
देहास परी पीडा फार ...
सवे त्याच्या न राही मझ भ्रांती. - हर्षद कुंभार --
दुःखी विचारांचच वादळ
का बर मनात घोंगावत राहतं...
जुण्या - नव्या सगळ्याच मनीच्या
जखमा ताज्या करत जातं...
सुखाने भरलेला क्षण
कितीही भक्कम असला तरी...
दुःखाचा एकच मारा
सुःखाला नामशेष करुन टाकतं. - हर्षद कुंभार
..
नविन लोकांशी जुळवून घेयला ...
त्यांच्या मनात घर करायला...
पहिले आपल्या मनाची कवाडे ...
उघडी करावी लागतात.
त्यांच्याशी मिळतं-जुळतं ...
थोडं कमी, थोडं जास्त ...
मैत्रीचं रुप घडायला...
मनाला साच्याच स्वरुप द्यावं लागतं.
विचारांच्या कणांनी घट्ट ...
झालेलं मैत्रीचं ते नातं ...
पहिल्या दिवशी जरा असलेलं ....
नंतर मात्र खुप झालेलं असतं. - हर्षद कुंभार
तुझ्याशिवाय प्रेमाची ...
व्याख्या काहीच नव्हती,
तुझ्याशिवाय आयुष्याची ...
मझ गणती शुन्य होती.
तुझ्याशिवाय जगण्याची ...
इच्छा कधीच नव्हती,
तुझ्याशिवाय स्वप्नांची...
मझ किंमत ती काय होती.
तुझ्याशिवाय अधुरा मी ....
श्वासाविन ह्रदयची धडपड होती,
तुझ्याशिवाय काय मी...
फक्त अस्तित्वाची लढाई भवती. - हर्षद कुंभार
एक वेगळच विश्व
आता उभं होत आहे...
जबाबदारीच जणू नवं
पर्व सुरू होत आहे...
हवं हवस स्वप्नांतलं
जग सत्यात उतरत आहे...
गोड आव्हान पेलायला
मन तयार होत आहे... - हर्षद कुंभार
स्वप्नांची सावली...
खुप मोठी होते,
परी प्रयत्नांची प्रतिमा...
मात्र लहानच राहते.
मिळालेल्या यशाने...
समाधान न काही होते,
हव्यासाची भूख ...
मात्र वाढतच राहते.
प्रयत्नाला दोष देण्या ...
धाडस न काही होते,
अपयशाचे खापर मात्र...
नशिबावर फोडले जाते. - हर्षद कुंभार
समाधानाची एक
पातळी नक्कीच असावी...
पण प्रगतीला ती कधी
मारक नसावी...
मनी नशिब घडवायची
जिद्द असावी...
पण प्रयत्नांची पाळी
कधी रद्द नसावी... - हर्षद कुंभार