All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, June 29, 2013

प्रेमाची पत्रिका .. Premachi Patrika


प्रेमाची पत्रिका .. Premachi Patrika


- Harshad Kumbhar

मन...



                                                                        मन...


अस्तित्वाच्या लढाईत…  
नेहमीच मन जिंकते,
हमरी तुमरीवर येत… 
शेवटी शरीरच झुकते. 

मनाचे लाड पुरवता…  
पुरती तारांबळ उडते,
भावनेच्या आहारी… 
कधी हसवते, कधी रडवते. - हर्षद कुंभार (Harshad  Kumbhar)

पाणावलेल्या डोळ्यात…



                                                                        पाणावलेल्या डोळ्यात…  


पाणावलेल्या डोळ्यात…  
अश्रूंनी काहूर माजलेला…  
जिथे भावनांना नाही जागा…  
तिथे स्वप्ने ती काय तरळनार. 

डोळ्यांची काजवे करून…  
रात रात जगलेली मने…
एकमेकांची आयुष्य गुंतवायला… 
वेळ तरी काय उरणार.  - हर्षद कुंभार (Harshad  Kumbhar)

Monday, June 24, 2013

प्रेम... Prem


                                                                  


                                                             प्रेम... Prem



विश्वासाच्या नात्याला … 
विश्वासाची गरज असते,
प्रेमाने पेरलेल्या बीजाला … 
प्रेमळ मायेची ऊब लागते. 

                                        साथ आयुष्यभर मिळायला … 
                                        साथ एकमेकांची हवी असते. 
                                        दुरावलेल्या मनाला…     
                                        दूरअसूनपण प्रेमाची आस असते.  - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Saturday, May 18, 2013

गिलीची क्रिकेटमधून अखेर सांगता

गिलीची क्रिकेटमधून अखेर सांगता 

        गिलख्रिस्ट एक असे नाव ज्याने विकेट कीपर या नावाभवती आपल वलय तयार केले होते. आस्ट्रेलिया मधून खेळणारा जरी गिली असला तरी जगभर तो लोकांचा चाहता होता हे सर्वाना माहित असेल , कारण तो खेळाडू सोबत एक चांगला प्रतिस्पर्धी म्हणून नावाजलेला होता. आक्रमक फलंदाजी आणि उत्तम 
यस्टीरक्षण याचे समतोल उदाहरण म्हणजे गिली.   
       आज गिलीबद्दल लिहाव वाटल कारण IPL चा  आज पंजाब आणि मुंबईचा सामना झाला . जो कि गिली चा संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीतला अखेरचा सामना होता. क्रिकेट कारकिर्दीत ज्याने Ball फक्त यस्टी मागे हातात घेतला आजवर, पण त्याने आयुष्यात प्रथमच गोलंदाजी करून पहिल्याच चेंडूवर बळी पण मिळवला. विलक्षण असा क्षण काहीसा भावनाप्रधान पण झाला. गिलीच्या या गोलंदाजीमुळे आज मला लिहावं असे वाटल त्यामुळे हा छोटासा लेख.  गिलीला आपण सगळे नेहमीच मिस करू.  - हर्षद कुंभार 

Sunday, March 17, 2013

मन शांत आहे


मन आजकाल इतकं
शांत आहे कि…
कसलीच तक्रार त्याला
नाही तिच्याकडून…

जेव्हा उदास असतं
हे मन तेव्हाच लिहिते…
तेव्हाचं शब्दांच्या
मागे धावते…

मनातली चलबिचल
तुमच्यापुढ मांडते…
भावनांची घुसमट
मनातून काढते…

पण आज ते शांत
जणू तरंगरहित पाणी…
न कसली चिंता कि
कसली आसक्ती मनी…  - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Saturday, March 9, 2013

Happy Women's Day - Harshad kumbhar

Happy Women's Day - Harshad kumbhar  


Saturday, March 2, 2013

Premachi Pahaat

Premachi Pahaat - Harshad kumbhar

Saturday, February 23, 2013

धुंद क्षणी… - हर्षद कुंभार


Saturday, February 9, 2013

- बालक - पालक अर्थात BP. -

 - बालक - पालक  अर्थात BP. -

काल हा चित्रपट पाहण्याचा योग आला. कालपर्यंत जे काही या चित्रपटाबद्दल ऐकले , वाचले ते खरंच अनुभवले.
म्हणतात ना तुमचे बालपण तुम्हाला नेहमी खुणवत असते आणि चिडवत देखील , कारण गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असच आपण नेहमी म्हणत असतो. आपल्या बालपणाशी साधर्म्य साधणारे काही तुम्हाला दिसले किव्वा वाचण्यात आलं की कसं छान वाटत ना. जेव्हा शाळा चित्रपट पाहिला तेव्हापण असच काहीसं झालं होत आणि तेव्हाही जुन्या आठवणींचे गलबत काळाच्या पडद्यामागं अलगद तरंगत गेल होत. 
" बालक पालक " विषय अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा. म्हणजे बालक आणि पालक यांना लैंगिकते 
बद्दल मोकळेपणाने बोलावे या बद्दल अजूनही धीर होत नाही म्हणा किव्वा तसे माध्यम नाही. चित्रपटात जे दाखवले अगदी तसच काही घडत नाही पण त्याच्याशी मिळते -जुळते असे घडलेले असते. सगळ्यांना ते आठवलेच असेच त्यांनी केलेले उपद्व्याप नाही का ?. आमच्या वेळेस पण नेट किव्वा मोबाईल इतका प्रचलित नव्हता. त्यामुळे प्रश्नही आमचेच आणि उत्तरेही आमचीच. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात "विशू" नावाचं पात्र पण असेल. ज्या त्या काळात मुलांनी अश्या प्रश्नांवर स्वतः आणि कुवतीप्रमाणे शोधलेली उत्तरे आहेत आणि असतील. त्या काळातलं निभावल आम्ही आणि आधीच्या पिढ्यांनी. 
पण आताची पिढी आणि नंतर येणारी पिढी त्याचं काय. त्यांना कुणीतरी हे नाजूक वळण सावधगिरीने आणि संयमाने कसे पार पाडायचे ते कोण सांगेन ही जबाबदारी नवीन पालकांवरच आहे ना.  तेव्हा मुलांसोबत लहानपणापासूनच मित्रवत राहा,
वागा म्हणजे ते न घाबरता तुमच्याशी सवांद साधू शकतील नाही का ? मुलाचं वयात येण पालकांना जाणवत नाही अस आहे काही नाही ना, मग आपल्या मुलांकडे आपल्यालाच पहाव लागणार ना. तुमच्या बाबतीत जे घडले ते त्यांच्या बाबतीत घडू नये म्हणून पालकांना नव्या पिढी सोबत जुळत घ्यावं लागेल. विचारात फरक पडला की माझ्या लेखाचं चीज झालं असे मी समजेन 
हं पण तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि जर तुम्ही पालक असाल त्याच वर्गवारीत मोडणारे तर आपल्या पाल्याला सोबत घेवून जा. - हर्षद कुंभार