All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Thursday, July 19, 2012

पण आपण

काळ्या कुट्ट नभातून... 
आशेचा किरण झळकतो...
पण त्यातून आपल्या उमेदी का जाग्या होत नाही.

निर्जन डोंगर माथ्यावर...
सहज फुले अन पालवी फुटते...
पण त्यातून आपण जगण्याचा हुरूप का घेत नाही.

दुसऱ्यांवर सल्ल्यांचा...
पाऊस आपण पडतो...
पण त्याच पावसात आपण स्वतः का भिजत नाही.   - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Sunday, July 8, 2012

-- तुझ्या अन माझ्यात--


-- तुझ्या अन माझ्यात--

तुझ्या अन माझ्यात...
अबोल असा करार आहे,
जरी नसेल बोललो काही...
सारा मनाचा कारभार आहे.

तुझ्या अन माझ्यात...
विणलेल छान स्वप्न आहे,
जरी नसेल सोबत विणल...
तरी सार मनोमनी ठरलेलं आहे.

तुझ्या अन माझ्यात...
भले दुराव्याची रेषा आहे,
परिस्थितीने दूर जरी...
मनी ध्येयाची मनीषा आहे. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Saturday, July 7, 2012

मी चुकत असेल

मी चुकत असेल - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Sunday, July 1, 2012

एक दिवस मी ... इतका हतबल होईल वाटले नव्हते

एक दिवस मी ...
इतका हतबल होईल वाटले नव्हते,
ती अश्यारीतीने माझ्याशी वागेल 
हे खरच वाटले नव्हते.

आम्ही खूप प्रेम केले...
अगदी दिवस दिवस एकमेकांत गुंतून,
सारखे आठवते तिने मान्य केलेलं ते प्रेम...
चार चौघातपण एकांत साधून.

आज सगळे एकदम स्तब्ध...  
आजुबाजूच विश्व जस थांबल काही, 
फक्त मी तिच्या विचारात...
जसा जगाचा अन माझा संबंध उरला नाही.

मैत्री दाखवायला की 
"हां तुझी आठवण येते "
हे समजायला कधीतरी मेसेग करते.   
पण त्यात Love , प्रेम असले शब्द वगळून    

तिला प्रेमाचा तिरस्कार आहे की माझा 
काही कळायला मार्ग नाही,
पर्स्थितीने ती अशी वागत आहे की मुद्दाम
का तिने सांगितले नाही.

पण मी हरणार नाही ...
प्रेम काल जसे तसेच उद्याही असेल,
सांगा तिला मी तिथेच उभा...
तुझा हात धरायला तयार असेल. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
       

Saturday, June 30, 2012

मी नेहमी तुम्हाला ...

मी नेहमी तुम्हाला ...
तिच्या सौंदर्यात भुलवतो,
तुम्ही तिला पहिले नसताना...

मी नेहमी तुम्हाला ...
तिच्या शब्दांमध्ये गुंतवतो,
तुम्ही तिला ऐकले नसताना...

मी नेहमी तुम्हाला...
तिला माझ्या काव्यातून दाखवतो,
तुम्ही तिला ओळखत नसताना...    

मी नेहमी तुम्हाला...
आमच्या प्रेमात जगवतो,
तुम्ही आमच्यापासून दूर असताना... - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)



Sunday, June 24, 2012

पावसा ....



आज बरसलास तू इतक्या दिवसांनी... 
का काहीच कसे वाटत नाही तुला,
कोण वाट पाहत असेल ... 
का जाणवत नाही तुला, 

एक तर आधीच असतोच...
फक्त तीनच महिने, 
त्यातपण तुझे आधीच...
ठरलेले असते उशिरा येणे.

तुझ्या चाहुलीनेच फक्त...
इथे कवींचे होते काव्यरूप बरसणे,
तुझ्या कल्पनेने सगळ्यांना...
अगदी चिंब चिंब भिजवणे.  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Sunday, June 17, 2012

माझेच मन ते...

थोडा वेळ दिला मनाला ...
तिच्या विचारांमध्ये अंत घाठायला,
सगळ्यांपासून दूर....
क्षितिजात तिच्यासवे फिरायला.

मनानं मला एकटे केलं...
काही काळ दूर लोटलं होत,
तो तिच्या विचारात गुंग असे...
माझं मात्र त्याच्या परतीच वाट पाहण चालू होत 

अखेर तो आलाच...
गाठोड्यात सांर काही बांधून,
माझेच मन ते...
सांर काही ठेवलं माझ्यापुढ मांडून. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Sunday, May 6, 2012

सत्यमेव जयते

अमीर खान ने पुन्हा सिद्ध केले की तो नेहमीच वेगळे प्रयत्न करतो ते. 
त्याचा सामाजिक कार्यात नेहमीच उलेखनीय सहभाग राहिला आहे.
इतके दिवस त्याने ताणून धरलेली उत्सुकता शिगेला पोचली होती.
आणि त्याच्या या पहिल्याच एपिसोडने सगळ्यांची मने जिंकली खरी
. त्याने बरोबर भारतीयांची दुखती नस पकडली आहे आणि तीच दबून तो 
आता प्रत्येक भारतीयाचा आवाज बाहेर काढणार आहे. 
या आधी असे कधी दूरदर्शन जगतात झाले नव्हते. पण अमीर ने करून दाखवले 
त्याला कुणाचे मनोरंजन करायचे नाही तर न्याय मिळवायला जी लोक कुणाचा तरी आधार शोधत
आहेत तोच आधार तो या मिडियाच्या मार्गे मिळवून देत आहे.  
आता फक्त त्याचा परिमाण किती आणि कसा होतो हेच सगळ्यांच्या मनी असेल.
प्रत्येक भारतीयाने त्याचा या प्रयत्नाला खरच साथ देयला हवी. स्त्री भ्रुण हत्याच्या एपिसोडने 
बरेच धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. असेच करून या शो मार्गे तो एक एक गोष्टी बाहेर काढेल ही अपेक्षा आहे 
- हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Saturday, May 5, 2012

---- मन एकटे ----

---- मन एकटे ----  
  - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Friday, May 4, 2012

Ek Kavita - Anamik


शब्दांच्या मागे नको लागुस 
ते तुझे गुलाम आहेत,
तू बोलशील तसे अर्थ 
ते तुला समजावून देतील.

सरळ रस्त्याने नको जाऊस...
पायवाट हवीशी वाटेल,
यशाची वाट पहायची...
सवय कशी बरे राहील.

किती चालायचे हे नको ठरवूस...
फक्त चालत राहायचं,
थोडे रडणे जरी असले,
हास्याच औषद त्यावर लावायचं.    - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)