Sunday, July 8, 2012

-- तुझ्या अन माझ्यात--


-- तुझ्या अन माझ्यात--

तुझ्या अन माझ्यात...
अबोल असा करार आहे,
जरी नसेल बोललो काही...
सारा मनाचा कारभार आहे.

तुझ्या अन माझ्यात...
विणलेल छान स्वप्न आहे,
जरी नसेल सोबत विणल...
तरी सार मनोमनी ठरलेलं आहे.

तुझ्या अन माझ्यात...
भले दुराव्याची रेषा आहे,
परिस्थितीने दूर जरी...
मनी ध्येयाची मनीषा आहे. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Post a Comment

ब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर