काळ्या कुट्ट नभातून...
आशेचा किरण झळकतो...
पण त्यातून आपल्या उमेदी का जाग्या होत नाही.
निर्जन डोंगर माथ्यावर...
सहज फुले अन पालवी फुटते...
पण त्यातून आपण जगण्याचा हुरूप का घेत नाही.
दुसऱ्यांवर सल्ल्यांचा...
पाऊस आपण पडतो...
पण त्याच पावसात आपण स्वतः का भिजत नाही. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
पण त्याच पावसात आपण स्वतः का भिजत नाही
ReplyDelete...excellent punch in the last line..
- Sudhanwa
khup khup abhari ahe Sudhanwa
ReplyDelete