Sunday, May 6, 2012

सत्यमेव जयते

अमीर खान ने पुन्हा सिद्ध केले की तो नेहमीच वेगळे प्रयत्न करतो ते. 
त्याचा सामाजिक कार्यात नेहमीच उलेखनीय सहभाग राहिला आहे.
इतके दिवस त्याने ताणून धरलेली उत्सुकता शिगेला पोचली होती.
आणि त्याच्या या पहिल्याच एपिसोडने सगळ्यांची मने जिंकली खरी
. त्याने बरोबर भारतीयांची दुखती नस पकडली आहे आणि तीच दबून तो 
आता प्रत्येक भारतीयाचा आवाज बाहेर काढणार आहे. 
या आधी असे कधी दूरदर्शन जगतात झाले नव्हते. पण अमीर ने करून दाखवले 
त्याला कुणाचे मनोरंजन करायचे नाही तर न्याय मिळवायला जी लोक कुणाचा तरी आधार शोधत
आहेत तोच आधार तो या मिडियाच्या मार्गे मिळवून देत आहे.  
आता फक्त त्याचा परिमाण किती आणि कसा होतो हेच सगळ्यांच्या मनी असेल.
प्रत्येक भारतीयाने त्याचा या प्रयत्नाला खरच साथ देयला हवी. स्त्री भ्रुण हत्याच्या एपिसोडने 
बरेच धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. असेच करून या शो मार्गे तो एक एक गोष्टी बाहेर काढेल ही अपेक्षा आहे 
- हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Post a Comment

ब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर