All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Sunday, May 16, 2021

मित्रा


मित्रा



प्रसंग - १ 

स्थळ - पुणे 


नेहमी प्रमाणे सोहम आणि अक्षय ऑफिसला चालले होते. अक्षय कडे एक ओपन जीप होती ती जीप घेऊन ते रोजच ऑफिसला जात असे कारण ओपन जीप मध्ये जाताना आजूबाजूचे सर्व स्पष्ट दिसणे सोहमला आवडत असे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचे बारीक निरीक्षण त्याला करता येत होते आणि ते केल्यावर त्याला लिहायला मदत होत असे. सोहमला लिहिणे हा त्याचा छंद गेली १०-१२ वर्ष त्याने जोपासला होता. बऱ्याच सोसिअल साईट्स वर त्याचे बरेच फॉलवर पण बनले होते त्यामुळे त्याला दर वेळी नवनवीन लिहायला हवे असे वाटायचे. 


असेच त्या दिवशी ऑफिसला जाताना एका सिग्नलला त्यांची गाडी थांबली होती. दोघांच्या गप्पा चालू होत्या आणि जसा सिग्नल सुटला तसेच अक्षय गाडी पुढे घेणार तेव्हडयात एका मोठ्या आलिशान गाडीने त्यांच्या गाडीला घासून सुसाट निघून गेली. अचानक झालेल्या प्रकाराने सोहम आणि अक्षय थबकले आणि काही कळायच्या आतच ती गाडी भरधाव पुढे निघून गेली. मागील गाड्यांच्या हॉर्न ने हे भानावार आले आणि तिथून निघाले पण त्यांना दोघांना खूपच राग आला होता आणि त्या गाडीचा पाठलाग कर म्हणून सोहम अक्षयला म्हणाला. त्या गाडीचा पाठलाग सुरु केला तसा थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांनी त्या गाडीला कसेबसे गाठले. 


सोहमने डावा हात दाखवत गाडी बाजूला घेण्यासाठी खुणावले तशी ती पांढरी शुभ्र गाडी बाजूला झाली काळ्या काचा असल्याने आत कोण आहे कळत नव्हते. दोघेही खाली उतरून गाडी जवळ गेले आणि सोहमने ड्राइव्हर साईडला जाऊन काचेवर टकटक केले तसे त्या ड्रायवर साइडने असलेल्या व्यक्तीने काच खाली केली. सोहम काही बोलणार त्या आत ड्राइव्हरच्या ड्रेस मध्ये असलेली व्यक्ती रागाने पाहून "काय झाले गाडी का अडवली आहे" विचारले. सोहम अजून चिडला अरे एक तर बेदरकार गाडी चालवून आमच्या गाडीला तुम्ही इतकी मोठी डॅश मारून गेला वर सॉरी बोलायचे सोडून जसे काही घडलेच नाही असा आव आणत आहेस. इतकी काय गुर्मी तुमच्यात श्रीमंत आहात म्हणुन रोड काय विकत घेतला का तु हवी तशी चालवायला. 


ड्राइव्हर - तुमच्या गाडीचे जे काय नुकसान झाले असेल ते भरून देतो पण आता आम्हाला जावू द्या.

सोहम - ए पैशाची गुरमी कोणाला दाखवतोस तू असे म्हणत त्याला खाली उतर तू असे बोलत होता. . 

ड्रायवर - आम्हाला जरा घाई होती म्हणून थांबलो नाही. आम्हाला माफ कर जावूद्या ओ उशीर होत आहे आम्हाला.


सोहम आणि त्याच्यात वादावादी चालू होती. हे सगळे चालू असताना अक्षय मात्र दुसऱ्या बाजूला गाडीतील व्यक्ती सोबत बोलत उभा होता. शेवटी अक्षय सोहमला समजावयाला आला 


अक्षय - चल जाऊदे एवढे काही झाले नाहीये आपल्याला उशीर पण होत आहे चल निघू. सॉरी बोलत आहेत ना ते. 

सोहम - अरे काय तू घाबरला का यांना थांब आता इंगा दाखवतो मी. कोण समजतात कोण हे स्वतःला असा नाही सोडणार यांना. 

अक्षय - अरे चल बाबा तू, मला माहितेय किती हिंमत आहे तुझ्यात ते . तो माणूस सॉरी बोलला मला चल आता आपल्याला उशीर होत आहे मीटिंग पण आहे आपली. 


आणि अक्षय सोहमला घेऊन गाडीत बसला ते दोघे निघाले ऑफिसला. सोहमचा पूर्ण मूड ऑफ झाला होता त्याला अक्षयचे पटले नव्हते. ऑफिसला गेल्यावर अक्षय कामात गुंतला आणि सोहमच्या डोक्यात अजूनही त्याच घटनेचे विचार चालू होते. सोहमला लगेच एखादी गोष्ट मनाला लागत असे कारण तो प्रॅक्टिकल विचारांचा असला तरी थोडा हळवा ही होता. मिटींग मध्ये पण त्याचे जास्त लक्ष नव्हते इतरांच्या हे लक्षात आले पण कारण कोणाला माहीत नव्हते अक्षय सोडून. सगळ्यांनी विचारले पण तो काहीच बोलला नाही. अक्षयला माहीत होते म्हणुन तो गप्प होता दुपारी लंच टाइम झाला तेव्हा अक्षय सोहमला घेऊन जेवायला गेला. अक्षयने विचारले अरे काय यार तू का अपसेट आहेस अजून जाऊदे ते झाले ते एवढे काय मनावर घेत आहेस. सोहम जेवत असताना त्याचे अक्षयच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते तो आपल्याच विचारात होता. 


कसा बसा दिवस संपला घरी जाताना पण सोहम जास्त बोलत नव्हता त्याने खूप मनावर घेतले होते. दोघे फ्लॅटवर गेले रेंटवर असलेल्या फ्लॅट मध्ये दोघेच राहत होते. फ्लॅट त्यांना चांगला मिळाला होता भरपूर उजेड असलेला. खिडकीतून छान सूर्यप्रकाश येत असे. त्यांच्याकडे जास्त सामान नसले तरी आपापली गादी,बॅग्स आणि एक बीन बॅग होती. सोहम लिहायला खिडकीत बसत असे त्याची आवडती जागा जिथे त्याला चांगले लिहायला जमायचे. आजच्या प्रसंगावर पण त्याला लिहावे म्हणून तो बसला त्याला सामाजिक भान या विषयावर आजचा प्रसंग लिहायचा होता लोक किती बेजबाबदार असतात समाजाबद्दल म्हणून. प्रसंग पुन्हा आठवताना त्याला एक गोष्ट लक्षात आली की तो ड्राइवर सोबत भांडत असताना अक्षय काय करत होता नक्की त्या मागे बसलेल्या व्यक्तीसोबत. अक्षय बीन बॅग वर बसलेला आणि मोबाइल वर काहीतरी पाहत होता. तेव्हा सोहम त्याच्या कडे पाहत 


सोहम - काय रे अक्षय मला गोष्ट सांग, सकाळी जेव्हा मी ड्राइव्हर सोबत भांडत होतो तेव्हा तुझे काय चालले होते. 

अक्षय - काही नाही रे तू तिकडे ड्राइव्हर कडे गेलास आणि मी या साईडला होतो तेव्हा त्या गाडीत मागे बसलेल्या व्यक्तीने काच खाली केली. तुला माहितेय का आत कोण बसले होते तुझा विश्वास बसणार नाही.

सोहम - असे कोण होते. हिरो होता का कोणी.

अक्षय - नाही रे पण तुझ्यासाठी तर होताच. 

सोहम - म्हणजे

अक्षय - अरे हिरानी सर होते आत.

सोहम - (सोहमचे डोळे एकदम चमकले) चल काहीही तू थट्टा करत आहेस माझी. 

   

    हिरानी म्हणजे सोहम साठी एकदम गुरूच होते. त्यांच्या ज्या फिल्म मध्ये त्यांनी रायटर व डिरेक्टर असे काम केले ते चित्रपट माईलस्टोन ठरले होते चित्रपटसृष्टीला. सोहम एक अभ्यास म्हणून त्या चित्रपटाच्या कथा स्टडीज करायचा. त्याला स्वतःला लिखाणाची आवड असल्याने या क्षेत्रातील बरीच असे  व्यक्ती आहेत त्यांना सोहम फॉलो करत होता. पण हिरानी सर जरा जास्त खास वाटायचे त्याला. कधी तरी त्यांना असिस्ट करायला मिळावे हे त्याचे एक स्वप्न बाळगून होता.


 अक्षय - अरे खरंच आपण अशी अचानक गाडी अडवली ना आणि त्यांना घाईत कुठेतरी जायचे होते. त्यामुळे लवकर तिथून निघावे म्हणून त्यांनी मग मला विनंती केली आणि तुमच्या गाडीचा जो काही खर्च असेल तो मी देतो. मी म्हणालो राहूद्या सर आपली भेट झाली यातच जमा झाले सगळे. 

सोहम - (सोहम हे सगळे अवाक होऊन ऐकत होता) BC , हरामी तू मला सांगितले का नाहीस. असला कसला रे मित्र तू. सोहमला तोंडात खूप शिव्या येत होत्या. तो हे ऐकूनच थक्क झाला होता की इतका सुंदर सुवर्ण क्षण असा डोळ्यासमोरून गेला आणि मला तो अनुभवता ही आला नाही. 

अक्षय - अरे चील कर रे तू भेटून तरी लगेच काय करणार होता का असाच अवाक होत बघतच बसला असता ना. तुला सुचले तरी असते का काय बोलायचे ते. जस काय सर तुला लगेच कामावरच ठेवून घेणार होते.

सोहम - जाऊदे तुला नाही कळणार मला ते किती महत्वाचे होते ते. मनात खूप राग धरून सोहम बाल्कनी मध्ये गेला. 


        सोहम गप्प झाला होता आणि त्याला आता अक्षयचा भयंकर राग आला होता कारण जिवाभावाच्या मित्राने असे केले होते. तो आपला बाहेर बघत एकदम शांत बसला होता. त्याला आता काहीच लिहू वाटत नव्हते. सोहम जेवण करून लगेच झोपायला गेला कारण  त्याला अक्षय सोबत बोलायचे नव्हते. अक्षयला सर्व कळत होते पण त्याला सोहमचा स्वभाव माहीत असल्याने त्यानेही त्याला जास्त डिस्टर्ब केले नाही. 


         सकाळी अक्षय उठला तेव्हा सोहम कुठेच दिसत नव्हता. सोहम आधीच ऑफिसला निघून गेला आहे हे त्याच्या लक्षात आले. अक्षय ने बोलायचा प्रयत्न केला पण सोहम काही बोलला नाही नीट पुढे १-२ दिवस असेच गेले. नंतर हळू हळू सोहमचा राग गेला आणि तो शांत झाला आणि अक्षय सोबत त्याने बोलने ही पुन्हा सुरु केले. सगळे नॉर्मल झाले आहे पाहून अक्षयने एक दिवस आपण मुंबईला फिरायला जाऊ असे सोहमला सांगितले. सोहमला वाटले त्याचा राग घालवण्यासाठी तो हे करत असेल. तो ही लगेचच हो म्हणाला तसेही अक्षय त्याचा लहानपणापासूनचा परम मित्र असल्यामुळे जास्त काळ न बोलता राहु शकत नाहीत हे त्यालाही माहीत होते. 



प्रसंग - २

स्थळ - मुंबई 


         आता बरेच दिवस झाले होते सोहम तो दिवस बर्‍यापैकी विसरला होता पण ठरल्याप्रमाणे एक रविवार फिक्स केला आणि दोघांनी जायचे नक्की केले. मुंबईतील तशी सर्व ठिकाणी दोघेही आधीच पाहून आले होते पण अक्षय त्याला म्हणाला ही नवीन जागा आहे आणि तू पाहिलेली नाही. त्यामुळे वेगळे काही तरी पाहायला मिळेल म्हणून सोहम जरा उत्साहित होता. दोघेही त्यांच्या ओपन जीपनेच मुंबईत गेले आणि वांद्रे येथे पोहोचल्यावर तेथील एका आलिशान बंगल्याजवळ अक्षयने गाडी थांबवली. सोहमला २ मिनिटात आलो बोलून तो खाली उतरला. त्याने आपला मोबाईल काढला आणि कोणाला तरी कॉल केला. सोहमला काहीही कळत नव्हते काय चालू आहे बहुतेक एखाद्या मित्राला कॉल केला असेल असा त्याने अंदाज बांधला. अक्षयचा कॉल झाला आणि तो गाडीत येऊन बसला तेव्हा 


सोहम - बाबा काय चालू आहे सांगशील का जरा कुठे चाललो आहे आपण.

अक्षय - तू थांब रे जरा म्हणत (गाडी चालु केली आणि त्या बंगल्यात गाडी घेऊन गेला.)

सोहम - आता मात्र कमाल झाली अरे कोणाचा बंगला आहे हा. 

अक्षय - तू शांत रहा आणि माझ्या मागे मागे ये फक्त. 


    गाडी लावून दोघे खाली उतरले आणि मेन डोर जवळ गेले सोहम त्याला सतत विचारत होता अरे कोणाचा बंगला आहे हा, कोणाकडे आलो आहोत आपण पण अक्षय त्याला फक्त हाताने गप्प बस आणि सोबत चल इतकेच खुणावत होता. नोकराने दरवाजा उघडला आणि दोघेही आत गेले आणि तिथे नोकराने त्यांना एका सोफ्यावर बसायला सांगितले. बंगल्यातील आतील भव्यता पाहून दोघे ही चाट पडले होते सोहम काही वेळ तरी त्यांच्या प्रश्नांना विसरला होता. नोकराने त्यांना पाणी आणून दिले आणि "साहेब येतीलच आता" असे बोलून तो निघून गेला. 


     सगळ्या गोष्टी पाहत असताना एका भिंतीवर त्यांनी बरीच बक्षिसं आणि ट्रॉफी एका मोठ्या कपाटात मांडलेल्या पाहिल्या. लांबून त्यांना त्यावरचे लिहिलेले स्पष्ट दिसत नव्हते म्हणून सोहम उठला आणि जवळ पाहायला जाणार तितक्यात नोकर आला आणि साहेबांनी त्यांना आत बोलवले आहे म्हणून निरोप दिला. दोघे ही नोकर घेऊन जाईल त्याच्या मागे मागे निघाले. दोघे ही जाताना मधील पॅसेजच्या दोन्ही बाजूला असलेल्या चित्रपटांची मोठी पोस्टर लावलेली पाहिली. अक्षयला सर्व माहीत होते हे कोणाचे घर आहे पण सोहमला माहीत नसल्याने तो आपला अंदाज बांधत होता. 

   

            सोहमला वाटले असेल कोणी शॉकींन म्हणून पोस्टर लावले आहेत म्हणून त्याने सुरुवातीला थोडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघाला. एका मोठ्या स्टुडिओ सारख्या हॉल मध्ये दोघे पोचले आणि हिरानी सर आत येणार आणि सोहमला जे पोस्टर त्याने पाहिले होते त्याची लिंक लागली की हे तर हिरानी सरांचे सर्व चित्रपट आहेत म्हणजे आपण त्यांच्या घरी तर आलो नाही ना. त्याला आलेले विचार आणि हिरानी सरांची एन्ट्री एकाच वेळी झाली होती. स्वर्गातून एखादा देवदूत जिना उतरून खाली यावा तसे हिरानी सर त्याच्या समोर आले होते. 


हिरानी - हॅलो guys . कैसे है आप लोग. उस दिन के लिये फिर से सॉरी. 

अक्षय - (अक्षय पुढे होऊन सरांसोबत हस्तांदोलन केले.) अरे नहीं नहीं सर आप हमें शर्मिंदा कर रहे है.   


सोहमला काही कळत नव्हते तो एकदम मूर्तीसारखा स्तब्ध झाला होता. अक्षयने त्याला कोपर मारत भानावर आणले. तो ही मग सरांकडे जाऊन हस्तांदोलन करून माघारी आला. नोकराने चहा कॉफी साठी विचारलं आणि आम्ही पण "कॉफी चालेल" जरा अवघडल्या सारखे बोललो. 

  

हिरानी - रिलॅक्स Guys. अच्छा तो, तुम उस दिन जो बोल रहे थे ना तुम्हारा कोई दोस्त है जो अच्छा लिखता है, ये वही है क्या ? ड्राइवर के साथ तो अच्छा झगडा कर रहा था. (असे मिश्किल हसत हिरणी सरांनी टोमणा दिला). 


सोहम खूप गोंधळून गेला होता की नक्की काय प्रकार आहे एकतर अक्षय हिरानी सरांना कसा काय ओळखतो आणि मला इतक्या दिवसात मला माहीत कसे नाही. मुळात माझे स्वप्न त्याला माहीत असताना त्याची जर सरांसोबत इतकी ओळख होती तर माझ्यासाठी त्याने काहीच कसे केले नाही. आणि ड्रायवर सोबत भांडायची गोष्ट सरांना कशी काय माहीत. त्याने अक्षयचा शर्ट ओढून जरा २ मींन बाजूला ये म्हणून बोलला.  पण अक्षय ने तिथेच त्याच्या कानात "अरे त्या दिवशी गाडीत मागे हिरानी सर होते". 


सोहम - सॉरी सर. पता नहीं था आपकी गाडी हैं. (सोहमला वाटले आपल्याला बहुतेक यांनी  समज देयला बोलवले आहे. म्हणून तो खाली मान घालून बसला.)  


अक्षय - हा सर यही है सोहम. मैंने जो उस दिन आपसे कहा था उसपर कुछ हो सकता है तो देखो ना सर प्लिज.  


सोहमला काही कळेना कोणते भाव आणावे ते, कारण काय चालू आहे हे दोघे कशाबद्दल बोलत आहेत. तो आपला चेहऱ्यावर हास्य आणत सगळे माहीत असल्याचे भाव आणत होता. तितक्यात नोकर कॉफी घेऊन आला. 


हिरानी - कॉफी लीजिए, और बताइए क्या काम करते हैं आप दोनों. 

अक्षय - Sir we are working in a software company. 

हिरानी - बढ़िया है. तुमने बताया था उसपे मैने सोचा है. Actually मुझे भी एक लड़का चाहिए था. अच्छा हुआ तुम मिल गए. पर मुझे निराश मत करना भाई असे सोहम कडे पाहत हिरानी सर म्हणाले. 


       बोलता बोलता ते उठले आणि त्यांच्या पुढील प्रोजेक्ट बद्दल बोलू लागले. आम्ही पण लगेच उभे राहिलो. आता सोहम बदल काय बोलणार म्हणुन अक्षयचे लक्ष लागून राहिले. सोहम अजूनही बुचकळ्यात पडला होता. 


हिरानी  - ठीक है मेरा एक नया प्रोजेक्ट जो कुछ महिनों बाद शुरू होने वाला है. उसके डेट्स फायनल होने के बाद इसको कॉल करूंगा.  चलो अभी मुझे निकलना है सॉरी Guys. अच्छा लगा तुम लोग आए मिलने. फिर मिलते है. Bye and Good Luck. 


एवढे बोलून ते निघून गेले आणि आम्ही पण घराबाहेर पडलो. अक्षयला त्याचे प्रयत्न सार्थकी लागल्या सारखे झाले सोहमला इथे घेऊन येयचे त्याचे उद्देश सफल झाले होते. अक्षयने अशी काय जादूची कांडी फिरवली होती आणि हा चमत्कार झाला आहे त्याचा तर किती वेळ विश्वास बसत नव्हता. हसता हसता त्याने अक्षयला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. अक्षय त्याच्या पाठीवर थाप मारत त्याला आवरत होता. सोहम भानावर येत 

      

सोहम - अक्षय तू मला सगळे नीट सांगणार आहेस का नाहीतर तू काय आज जिवंत राहत नाहीस बघ. (सोहमने अक्षयचा गळा धरून त्याला बजावले) 

अक्षय - अरे हो हो चल गाडीत बस तरी. जाता जाता सांगतो सगळे. 

           सोहमने गळा सोडत ठीक आहे चल पटकन बस म्हणत त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. अक्षयला त्याची घाई कळत होती. गाडी सुरू झाली मुंबईच्या ट्रॅफिक मधून बाहेर पडत त्यांचे बोलणे चालू झाले. 

अक्षय - अरे त्या दिवशी तू ड्रायवर सोबत भांडत बसलास आणि मी मागे कोण बसले आहे म्हणून पाहायला गेलो तेव्हा मागे बसलेल्या व्यक्तीने गाडीची काच खाली घेतली, पाहतो तर काय चक्क हिरानी सरच होते आत. मी तसा खूपच Shocked होतो पण लगेच भानावर येत मी त्यांच्याशी बोलणे सुरू केले. गाडीच सगळे मी कधीच विसरून त्यांच्याशी त्यांच्याबद्दल च बोलत होतो. अर्थात त्यांना याची सवय असेल पण त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. गाडी बद्दल किती पैसे देऊ असे जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी नको नको म्हणालो आणि तुझ्या बद्दल सांगू लागलो तू किती छान लिहितोस ते शिवाय तुमचा किती मोठा फॅन पण हे बोलता बोलता मुद्दाम सांगितले. पण त्यांना खरंच खूप घाई होती शूटिंगसाठी उशीर होत होता म्हणून त्यांनी जाऊ देण्याची मला विनंती केली. पण त्याचवेळी न विसरता त्यांनी त्यांचे विजिटिंग कार्ड दिले होते आणि मला नंतर कॉल करायला सांगितले. तुला लगेच सांगणार होतो पण तुझा मूड पाहून विचार केला नंतर सांगावे. जेव्हा सगळे नॉर्मल झाले तेव्हा मी ठरवले सरांना एकदा कॉल करून पाहतो, तसा कॉल करून मी त्यांची अपॉईंटमेंट घेतली होती आजची आणि आपण इकडे आलो होतो. दिले की नाही तुला Surprised मित्रा. 

           सोहम अक्षरशः रडत होता अक्षय सारखा मित्र त्याला आज अगदी देवदूतासारखा वाटत होता ज्याने त्याची त्याच्या देवासोबत भेट घडवून आणली होती. 



समाप्त 



#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #article #marathiblog #blogger #marathimulga #writingcommunity #writing #lekhak #lekh #pune #maharashtra #mumbai #wai #satara #friends #friendship #मित्रा #मित्र #मराठी #लेख #लेखन #लघुकथा #कथा #मैत्री 

4 comments: