All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Wednesday, June 2, 2021

श्यामाचा वाढदिवस - एकांततला

 



श्यामाचा वाढदिवस - एकांततला 



श्यामा आणि त्याचे कुटुंब जेमतेम होते आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने. श्यामा नुकताच त्याचे कॉलेज पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेला होता. तो जिथे राहत होते ते छोटे गाव होते त्यामुळे शिक्षणासाठी मोठ्या शहरातच जावे लागते असे. तिथे राहायचं कुठे हा प्रश्न त्याच्या आईला पडला नाही कारण तिकडे तिचा भाऊ राहत होता आणि श्यामा त्यांच्याकडे राहील हे साहजिक होते. एकदम साधारण सुखवस्तू कुटुंब असल्याने कधी अवास्तव खर्च केला गेला नाही त्यामुळे श्यामाला बाहेर कुठे राहायला ठेवायचे हे त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडले नसते. वडील एका छोट्या कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून कामाला होते त्यांनी फक्त घर आणि काम ह्याच दोन गोष्टींना प्राधान्य दिले होते. पण त्यांनी त्यांच्या सुखाच्या व्याख्येनुसार शक्य ते सर्व केले होते आणि करत होते कुटुंबासाठी.  


अवास्तव खर्च म्हणाल तर कोणतीही चैनीची वस्तु घेतली नाही अगदी एकुलता एक मुलगा असला तरी त्याची खास अशी हौस मौज कधी केली नाही. त्याचे वडील मुळात ज्या वातावरणात वाढले त्यानुसार त्याच्या सवयी आणि तत्व. आपल्या मुलाने पण तसेच राहावे ही त्यांची न बोलून इच्छा होती. त्याउपर शिक्षणासाठी सर्वतोपरी त्याला हवे ते मिळवून द्यायचे हे त्यांचे धोरण. कारण स्वतः जास्त शिकले नसले तरी श्यामा खूप शिकला पाहिजे असे त्यांना वाटायचे. श्यामा दहावी परीक्षा पास झाला म्हणून त्याला दिलेली सायकल ही आजवरची सर्वात खर्चीक आणि पहिली भेटवस्तू असेल. पण त्या सायकल देण्यामागे त्याच्या वडिलांचे प्रेमरूपी मुख्य कारण श्यामा सायकलने शाळेला जाऊ शकेल आणि त्याची पायपीट होणार नाही हेच होते. 


श्यामाचा मामा मोठ्या शहरात राहत होता आणि त्याचा छोटासा व्यवसाय होता तो शहराबाहेर करत होता. त्याच्या मामाने स्वतःच्या मेहनतीने १५ गुंठे जागा घेऊन तिथे एक कारखाना सुरू केला होता. नवीन सुरुवात होती म्हणून जास्त कामगार नव्हते अगदी २ शिफ्ट मध्ये काम आणि २ कामगार या व्यतिरिक्त मामा स्वतः पण जातीने काम करत असे. कारखाना ज्या भागात होता तिथे गुरवार म्हणजे आठवड्याचा वार सगळया कंपन्या/कारखाने बंद असायच्या आणि त्याला कारण पण तसे होते गुरुवारी तिथे लाइट नसायची. श्यामा मामाला मदत म्हणून कंपनी मध्ये जात असे. तेवढाच थोडा हातभार आणि मामाकडे राहतो त्याचे थोडे पांग फेडल्यासारखे त्याला वाटत असे.  श्यामाला कामातले इतके कळत नसले तरी जमेल ते काम तो करायचा. तिथल्या कामगारांसोबत त्याची चांगली गट्टी जमली होती त्यातील एक काका तिथे जवळच राहत होते त्यांना कारखान्यावर देखरेखीसाठी पण ठेवले होते. श्यामा तसा चांगला रुळला होता आता मामाकडे कॉलेज आणि कारखाना दोन्ही कडे तो लक्ष देत असे. 


वाढदिवस म्हणजे श्यामाला त्याची आई दरवर्षी औक्षण करणार आणि त्याचे वडील त्याला एक कॅडबरी आणून देणार हे अगदी ठरलेले असायचे. इतक्या वर्षात यापेक्षा वेगळे कधीच घडले नाही हे श्यामाला पण अंगवळणी पडले होते. त्याच्यासाठी हे साधे सुख देणारे सेलेब्रेशन पण खूप महत्वाचे होते. फक्त एक वाढदिवस त्याचा मात्र वेगळा घडला अगदी अनावधानाने कोणाची काही चूक नव्हती तरीही. त्याबद्दल त्यानेही कधी ही कोणाला दोष दिला नाही. आई बाबांपासून पहिल्यांदा दूर राहिल्यामुळे कधी एकदा घरी जातोय असे श्यामाला झाले होते. बरेच दिवस घरापासून लांब असल्याने या वर्षी वाढदिवसाला घरी जायचे असे त्याने ठरवले होते त्यामुळे तो आनंदात होता.  


वाढदिवसाच्या आदल्या दिवशी श्यामाने मामाला सांगितले होते की उद्या मी घरी चाललो आहे दोन  दिवसासाठी दुपारी जाईन म्हणून. कारखाना तसा जाताना मध्येच लागतो त्यामुळे मामाने एक फाइल श्यामा कडे दिली आणि जाताना कारखान्यात ठेवून पुढे जा. श्यामाला वाटले ठीक आहे त्यात काय इतके ठेवेन जाताना म्हणून तो दुपारी जेवण करून निघाला आणि कारखान्यामध्ये गेला. त्या दिवशी नेमका गुरुवार कारखान्यात कोणी नव्हते शिवाय ते कामगार काका जे तिथेच राहायचे ते असायचे गुरुवारी म्हणजे त्यांना पूर्ण २४ तास तिथेच थांबावे लागायचे गुरुवार असला की. त्या दिवशी पण काका होते त्यांना फाइल देऊन लगेच निघू असे श्यामाला वाटले पण श्यामा थोडा वेळ थांबला त्याच्यासोबत बिचारे एकटेच असायचे पूर्ण दिवस कारखान्यात. काकांना २/३ तासाच्या वेळाने कारखान्यात एक फेरफटका मारावा लागत असे.  काका त्यावेळी जाणारच होते तेव्हा त्यांना सोबत म्हणून श्यामा ही सोबत गेला फेरफटका मारायला. चालता बोलता श्यामाने काकांना सांगितले की आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून तो घरी चालला आहे काकांनी पण त्याला शुभेच्छा दिल्या. पण म्हणतात ना काही गोष्टी नशिबाने बदलतात अगदी तसेच झाले काकांना त्यांच्या गावावरून फोन आला की त्यांची आई आजारी पडली आहे त्यांना लगेच घरी बोलवले आहे.  


त्यांना मोठा प्रश्न पडला काय करावे ते खूपच चिंतेत दिसत होते. त्यांना वाटले की श्यामाला बोलावे का “की आजची रात्र इथे थांबतोस का मी गावी जावून उद्या सकाळी सकाळी लवकर येतो म्हणून”. पण त्याचा वाढदिवस होता कोणत्या तोंडाने विचारावे हे त्यांना कळत नव्हते आणि शिवाय इतकी मोठी जबाबदारी त्याच्या अंगावर टाकायला त्यांचे मन होत नव्हते.  श्यामाला त्यांची अस्वस्थता कळून चुकली त्याने काकांना “तुम्ही जा निरदास्तपणे मी थांबतो आज इथे उद्या जाईन घरी तुम्हा आलात की”. तरी काका नको नको म्हणत होते “नको श्यामा राहूदे नाही देणार तुला त्रास तू जा घरी आज तुझा वाढदिवस पण आहे ना तू नको थांबूस इथे आणि एकटा कसा राहशील तू. 


श्यामाला किती सांगितले तरी तो ऐकत नव्हता. उलट तोच काकांना “तुम्ही जा घरी आजची तर रात्र आहे ना मी थांबतो मी नाही घाबरत काही”. शेवटी श्यामा काही ऐकत नाही पाहून त्यांनी मन घट्ट करून जाण्याचा निर्णय घेतला. तोवर संध्याकाळ झाली होती आणि अंधार पडायला लागला होता. आजूबाजूला सगळीकडे अंधार दाटून येत होता. काकांनी आवरून लगेच निघायची तयारी केली आणि जाता जाता श्यामाला कारखान्याचे दरवाजे बंद करून घे म्हणुन सांगितले. लाईट नव्हती म्हणून काकांनी त्याला आधीच २ मेणबत्ती आणि एक रॉकेल वाला दिवा शोधून काढून दिला होता. काका गेले आणि श्यामा ने मेन गेट लावून आत आला. आत गेल्यावर पहिला त्याने आईला फोन लावला आणि सर्व प्रकार सांगितला. आईला तशी काळजी वाटली पण श्यामाची मदत तिला पटली होती. श्यामाला वाढदिवसाच्या दिवशी एकटे राहावे लागणार ह्याचे तिला वाईट वाटत होते. पण श्यामाने तिला धीर दिला होता आणि सकाळी येतो लवकर तेव्हा करुयात आपण औक्षण म्हणुन समजावून सांगितले. 


१५ गुंठे जागेवरील कारखाना तसा मोठाच परिसर शिवाय आजुबाजूला म्हणावी तशी वस्ती पण नव्हती. या सगळ्यावर प्रसंग बनला होता तो त्या दिवशी गुरुवार होता म्हणून कुठेच लाइट नव्हती सगळीकडे काळाकुट्ट अंधार. मामाच्या कारखान्यात त्याने राहण्याजोगे दोन खोल्या काढल्या होत्या कधी तरी राहण्याची सोय म्हणून. पहिल्यांदाच  श्यामा असा एकटा राहणार होता त्याला थोडी भीती ही वाटत होती. भयाण शांतता आणि त्यात रातकिडे आणि घुबडाचा आवाज भितीदायक असे वातावरण पोषक करत होते. याला छेद द्यावा म्हणुन श्यामाला युक्ती सुचली कारखान्यात एक जुना रेडियो होता तो त्याने आणला आणि तो चालू करून छान गाणी ऐकत बसू असे त्याने ठरवले. त्याने रॉकेल वाला दिवा लावून रेडियो स्टेशन चालू केले. घड्याळातील काटे पुढे सरकत होते तसा अंधार ही पुढे सरकत होता. 


जवळपास रात्र झाली होती आणि दुपार नंतर काकांच्या जाण्याच्या घाईत रात्रीच्या जेवणाचे काहीच पाहिले नव्हते. काका पण पूर्ण विसरून गेले शिवाय श्यामाला भूक लागल्यावर ही गोष्ट लक्षात आली. आता काय जवळ पास इतक्या उशिरा काय मिळणार नव्हते आणि त्यात गुरुवार असल्याने हॉटेल, दुकान सर्व काही बंद होते. आज नेमका वाढदिवसाच्या दिवशी उपवास घडणार हे श्यामाला कळून चुकले. श्यामा भूक भागवायला पानी पित होता पण थोड्या थोड्या वेळाने त्याला सारखी भूक लागत होती. ह्या सगळ्या प्रकारचे परिणाम असे झाले की त्याला झोप येत नव्हती आणि रात्र ही जगून निघते की काय याची त्याला भीती वाटत होती. त्याच्यामुळे दिव्यातील रॉकेल आणि २ मेनबत्त्या किती वेळ साथ देतील हा ही एक प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.   


रात्र जशी चढत होती तसे शांतता भंग करणारे आवाज जास्त प्रमाणात येऊ लागले होते. इतक्या मोकळ्या परिसरात वाऱ्याची झुळूक येणे साहजिक होते आणि त्यामुळे कारखान्यातील दरवाजे आणि खिडक्या एकसारख्या वाजत होत्या. भयान शांततेत अश्या आवाजाने श्यामा जास्त घाबरू लागला होता त्यातल्या त्यात रेडियो वरील गाण्यांवर लक्ष देऊन ती मोठ्यामोठ्याने  गुणगुणू लागला जेणेकरून बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष होईल. बराच वेळ गेला मध्यरात्र होत आली होती आणि त्यात अजून एक वाईट गोष्ट झाली दिव्यातील रॉकेल संपत आले होते. दिव्याचा प्रकाश जास्त होता मेणबत्ती पेक्षा त्यामुळे जशी मेणबत्ती लावली तसा तिचा कल काहीसा अंधार करण्याच्या बाजूने जास्त आहे असा श्यामाला वाटत होते.  श्यामाने झोपण्याचा प्रयत्न केला पण मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक येत असे आणि श्यामाची झोप सोबत वाहून नेत असे. कसाबसा वेळ जातच होता त्यात अजून एक वाईट गोष्ट घडली रेडियो वरील वाहिन्या ह्या फक्त रात्री २ पर्यंत चालू असतात आणि सगळे स्टेशन बंद होतात. आता श्यामाची मोठी पंचायत झाली होती रेडियो पण बंद झाला होता आणि शिवाय एकच मेणबत्ती शिक्कल राहिली होती. त्याने रेडियो वरील सर्व मेगाहार्टज लावून पाहिले पण सगळीकडे खर-खर असाच आवाज येत होता कंटाळून त्याने रेडियो बंद केला. आता खरी कसोटी होती, एकटेपणा होता. त्याला जुने सगळे दिवस आठवू लागले होते आईची आणि वडिलांची आठवण येऊ लागली होती. इतका वेळ त्याच्या मनात हे विचार आलेच नाही पण आता या शांत काळोखात त्याला त्याचे जुने  सगळे वाढदिवस एकामागून लख्ख प्रकाशात दिसू लागले होते.    


श्यामा विचारांमध्ये इतका गुंतून गेला की त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही. दुसरी मेणबत्ती तशीच राहून गेली आणि सकाळ झाली श्यामा गाढ झोपी गेला होता. सकाळी काका लवकरच आले त्यांनी गेट उघडून आत गेले आणि श्यामा जिथे झोपला होता तिथे त्यांनी दरवाजा ठोठावला. श्यामाला जाग येयला उशीरच झाला पण तो उठला आणि सकाळ झालेली त्याच्या लक्षात आली. त्याने दार उघडले तर समोर काका होते आणि त्याचा जीव भांड्यात पडला पटकन त्याने काकांना मिठी मारली. काकांना काही क्षण कळलेच नाही, पण श्यामा पूर्ण रात्र एकटा राहिला असल्याने त्याला आता मी आलो आहे ह्याने हायसे वाटले असेल. 


काकांनी विचारले “श्यामा भीती नाही ना वाटली एकट्याला”. श्यामा “नाही काका मी नाही घाबरलो” मिश्किलपणे हसत त्याने उत्तर दिले पण काकांना कळले होते त्यामुळे त्यांनी जरा ही वेळ दवडता त्याला आवरायला सांगितले. काका त्याच्यासाठी चहा आणि खारी घेऊन आले होते त्यांना घरी गेल्यावर आठवले की श्यामाला खायला काही नव्हते ते. श्यामाचे खाऊन झाले आणि दोघे निघाले काका त्याला गाडीत बसवायला घेऊन गेले. काकांना श्यामाचे किती आभार मनू किती नको असे झाले होते पण ते काहीच बोलू शकले नाही. त्यांचे वागणे श्यामाला कळत होते आणि त्यांनी आभार मानू नये अशी श्यामाची इच्छा होती.  


आणि श्यामाचा वाढदिवस अश्या प्रकारे संपला होता. पण त्याच्या मनात एक प्रकारचे समाधान होते की तो काकांच्या कामी आला त्याच्या वाढदिवशी.     - हर्षद कुंभार 





समाप्त :




#birthday #blog #blogger #harshadkumbhar #kshankahiwechalele #marathi #marathiblog #pune #mumbai #satara #wai #indianblogger #lekh #marathilekh #marathimulga 





     

  



1 comment: