Old School - नकाराचा दिवस
गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा स्मार्ट फोन नव्हते आणि ३००० SMSचा रिचार्ज मिळायचा फक्त ३० रुपये मध्ये. २००५ च्या आधी आणि २००० नंतरचा साल तेव्हा चॅटिंग ही SMS नेच होत होती.
अंकिता आणि सिद्धार्थ एकाच चाळीत रहात होते. अगदी लहानपणापासून त्यांची मैत्री आणि घरी ये जा होत होती. दोघे ही जसे जसे वयात येत होते तसे ते एकमेकांत गुंतत चालले होते. पण कोणीही पुढाकार घेत नव्हते जे आहे ते हक्काचे आहे असे गृहीत धरले होते आणि योग्य वेळ आली विचारू असे मनोमनी दोघांनी ठरवले होते. जेव्हा कॉलेजचे दिवस होते तेव्हा दिवस भर एकत्र असायचे आणि घरी आल्यावर पण SMS मध्ये चॅटिंग होत होती. त्यांना ही ओढ जाणवत होती मैत्रीची वेस ओलांडावी वाटे पण मनाशी पक्के केलेल्या निश्चयाची त्यांना सारखी आठवण होती.
सिद्धार्थ तिच्या पेक्षा मोठा होता त्यामुळे लवकरच त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून तो नोकरीला लागला. दोघेही खुश होते एकाचे स्वप्न पूर्ण झाले म्हणुन. अंकिताला तर अभिमान वाटत होता सिद्धार्थला नोकरी लागली त्याने त्याचे एक स्वप्न पूर्ण केले आणि त्याच्या आईचा भार हलका केला. आता तिला तिची चिंता सतावत होती कारण अंकिता अजून कॉलेजला होती लास्ट ईयर बीकॉम. तिची खूप स्वप्नं होती घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला आपोआप बंधने लागली होती. अंकिता पण तशी शांत पण महत्त्वाकांक्षी होती एकदा मनाशी पक्की केलेली गोष्ट ती पूर्ण करायचीच. ती एकुलती एक असल्याने तिला आई बाबाची स्वप्नं पूर्ण करायची होती आणि त्यासाठी तिने स्वतः च्या बर्याच इच्छाना तिलांजली दिली होती. सिद्धार्थ पण एकटाच होता तो आणि त्याची आई दोघे राहत होते त्याचे वडील सिद्धार्थ लहान असतानाच वारले. एकट्या आईनेच त्याला लहानचे मोठे केले त्यामुळे त्याची आई म्हणजे जीव की प्राण होती त्याच्यासाठी.
सिद्धार्थ नोकरीला लागल्यापासून त्यांच्या मध्ये हळू हळू बोलणे कमी झाले आणि त्यांना एकमेकांना वेळ देणे कठीण झाले. सुट्टीच्या दिवशी भेट मात्र होत होती तेव्हा किती बोलू किती नये असे होत असे. इतके सगळे असून पण अजुनही कोणीच कोणाला प्रेमाची कबुली देत नव्हते. पण कळत होते की प्रेम तर आहे कधी ही विचारले तरी होकार हा असणार आहे. त्यामुळे असेच चालू ठेवत त्यांनी दिवस काढायला सुरुवात केली. सिद्धार्थला राहून राहून वाटायचे की आपण एकाच वर्गात असतो तर बरे झाले असते. एक वर्ष नापास होवून त्याला अंकिता सोबत एकाच वर्षात येयचे होते पण अंकिताला ते मान्य नव्हते त्यामुळे पुढे जाऊन अशी वेळ येणार हे देखील माहीत होते. प्रत्यक्षात होणार त्रास हा आता जाणवायला लागला होता.
सिद्धार्थला नोकरी लागल्यापासून तसा थोडा तो निर्धास्त झाला होता त्याला वाटले की आता लपून ठेवण्यात काही अर्थ नाही. सरळ तिला बोलून टाकू म्हणजे दोघातला दुरावा तरी कमी होईल आणि तसेही लगेच काय लग्नाचा विचार नाही. त्याला अंकिताचीही तितकीच काळजी होती जेव्हढी तिला असलेल्या तिच्या जबाबदारी आणि स्वप्नांची होती. पण एकदा फक्त बोलून दाखवावे असे त्याला सारखे वाटत होते. त्यामुळे त्याने अंकिता विचारायचे ठरवले. त्या दिवशी शुक्रवार होता समोर भेटून बोलण्यासाठी सिद्धार्थची हिम्मत होत नव्हती कारण असे रोजचे बोलणे वेगळे आणि शेवटी प्रेमाची कबुली देणे हे वेगळेच होते. म्हणून त्याने तिला कॉल करायचा ठरवले आणि सगळी हिंमत एकवटून त्याने तिला कॉल करुन आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि एकदम सांगितले की माझ तुझ्यावर मनापासून प्रेम आहे अगदी लहानपणापासून हे तर तुला माहीत असेलच. आजवर बोललो नाही पण आता मला नोकरी मिळाली आहे त्यामुळे तुला सांगाव असे वाटले.
याची काहीच कल्पना नसल्याने अंकिता त्याला मध्येच थांबवत नाही म्हणाली कारण एकदम सिद्धार्थचे असे प्रेमाचे बोलणे ऐकून अंकिता थोडी गोंधळली आणि काय बोलाव तिला सुचेना. आनंद मानावा की चिंता हेच तिला कळेना तिचेही प्रेम होते पण ही ती वेळ नाही आणि नव्हतीच निदान तिच्यासाठी तरी. आता हा एक होकर दिला तर सगळे बदलणार होते हे तिला माहीत होते. तिचे स्वप्नं, आई वडिलांची अपेक्षा या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्या समोर उभ्या राहिल्या आणि आजवर सिद्धार्थ वर केलेले प्रेम तिला फिके वाटू लागले. या सगळया विचारांच्या गदारोळात तिने पटकन नाही म्हणून सांगितले आणि “ सिद्धार्थ तू हे काय बोलत आहेस आपण तर छान मित्र आहोत ना. मग हे मध्ये प्रेम कुठून आले. आणि तसेही मला माझे करियर करायचे आहे. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मी माझा वेळ प्रेमात नाही वाया घालवू शकत. मला ते नाही जमणार माझ सगळीकडे दुर्लक्ष होईल.” असे बरीच टोचणारी वाक्य मुद्दाम बोलून तिने सिद्धार्थला एकदम जमिनीवर आणले होते. नाही म्हटले तरी कबुली न दिल्यामुळे एक मर्यादेचे कुंपण तरी होतेच दोघांमधे इतकी वर्ष आणि तेच तिला अजून काही दिवस हवे होते.
सिद्धार्थला तर एकदम श्वास काढून घेतल्यासारखे झाले. तो तिला समजावत होता की सगळे पाहिल्यासारखेच असेल मी फक्त प्रेमाची कबुली देत आहे. पण अंकिताला ते नको होते आता तरी, कारण प्रेमात लगेच अपेक्षा वाढतील मग नाही पूर्ण झाल्या की चिडचिड होईल आणि शारीरिक आकर्षण ही वाटेल. म्हणजे हे वेगळे जग आत्ताच तिला नको होते. तिने ठरवले होते स्वतःहून काही करियर करायचं आणि मग सिद्धार्थला कबुली देयची. पण सिद्धार्थ ने आधीच विचारून सगळे होत्याचे नव्हते केले होते. सिद्धार्थ ने खूप समजवले पण तिने ऐकले नाही आणि आपल्याच मतावर ठाम राहिली.
त्याला काहीच सुचत नव्हते आपला अंदाज कसा काय चुकला अंकिता बद्दल या विचाराने तो वेडापिसा झाला होता. ऑफिस मध्ये कामात लक्ष लागत नव्हते. आधीच मितभाषी असलेला सिद्धार्थ कोणाला काही बोलू शकला नाही आणि ऑफिस सुटल्यावर त्याला घरी देखील जावे वाटत नव्हते. कारण आईला त्याला पडलेला चेहरा लगेच कळेल हे त्याला माहीत होते. सिद्धार्थ ने स्वतः ला या विचारांतून बाहेर पडायचे म्हणुन कुठे तरी बिझी करने महत्वाचे होते. तो सरळ ऑफिस संपले की टेबल टेनिस खेळलाय गेला. कारण हा एक टाइमपास तो नेहमी मोकळ्या वेळेत ऑफिस मध्ये करत असे आणि तिथे खेळात लक्ष देवून शरीराला त्रास दिला की मनाला काही वेळ ते बाजूला ठेवते त्यामुळे हा प्रसंग जास्त त्रास देणार नाही असा त्याचा समज झाला. ऑफिसच काम तीन शिफ्ट मध्ये होते त्यामुळे कोणी ना कोणी सोबत खेळायला असायचे. सिद्धार्थने घरी आईला कॉल करुन सांगितले उशीर होईल तू जेवण करून झोप. खरतर त्याला त्या सगळ्या लोकांना टाळायचे होते जे रोज त्याच्याशी बोलत असत. त्यादिवशी सिद्धार्थ सकाळ पर्यंत खेळला इतका की आता शरीरातून घाम येणे ही जवळपास बंद झाले होते अगदी कोरडे ठाक शरीर ज्यात पाण्याचा एकही थेंब शिल्लक नसेल अगदी डोळ्यातून निघावा इतकाही. इतके असतानाही त्याच्या मनातील भावना मात्र वेळोवेळी जन्म घेत होत्या. त्याला कळून चुकले यातून लवकर सुटका नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० ला कंपनीची शेवटची कैब निघते ती करून जाणे एकदम नाईलाज असल्याने सिद्धार्थ त्याने घरी निघाला. गाडीचा वेग ही फिका वाटेल इतके विचार त्याच्या मनात पळत होते. त्याला एकाच गोष्टीचे जास्त दुःख झाले होते की नजरेची भाषा, काळजी, आपुलकी, आकर्षण या सगळ्या गोष्टी मिळून जे प्रेम जन्माला येते हे तेच होते आमच्यात पण मग तिने अश्या पद्धतीने का नकार दिला. इतकी वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो तर मला नाही का तिच्या मनातले कळणार. नाही का कळणार तिची स्वप्न तिच्या इच्छा, अपेक्षा, जबाबदाऱ्या मला. एखाद्या परक्या माणसाला उत्तर द्यावे असे तिने मला दिले होते.
गाडी घरी जात होती पण त्याला कुठेच पोहोचायचे नव्हते इतके त्याला जग परके वाटू लागले होते. एखादा शेवट गोड वाटावा इतका त्याला अंत जवळ वाटू लागला होता, पुढे काय होईल अंकिता तर पुन्हा त्याला दिसणार होती मग भावनांना आवर घालून नॉर्मल कसे राहू हे आणि अनेक प्रश्न त्याला पडू लागले होते. गाडीच्या खिडकीतून घर जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या. ह्रदयाची धडधड इतकी स्पष्ट त्याने कधीच ऐकली नसेल त्याला अंकिता समोर दिसेल की काय भीती ने तो जास्तच धास्तावला होता. कैब ड्राइवरने मध्येच मला हाताने हलवत भानावर आणले तो कधी पासून सिद्धार्थला हाक मारत होता कुठे उतरायचे आहे म्हणून याचेही त्याला भान नव्हते. आज त्याचेच घर त्याला परके करू वाटत होते. शेवटी घराजवळच्या नाक्यावर तो उतरला तिथून त्याला पायी जायचे होते पण आज पावले पण उचलत नव्हती शरीर जड झाल्यासारखे वाटत होते. घर जवळ आल्यावर राहून राहून त्याला हे पण वाटत होते की आईला यातले काही कळता कामा नये.
लहानपणापासूनचे प्रेम आज तिच्या नकारामुळे एक दिवसात तिरस्कार आणि राग या भावनेत कधी बदलत गेले हे त्याला ही कळले नाही. आता त्याला अंकिता समोर येऊ नये असेच वाटत होते, वर कुठेही न पाहता मान खाली घालून सिद्धार्थ घरच्या दरवाज्यात पोहोचला. थोड मन घट्ट करून त्याने दरवाजा वाजवला आणि आईने जसा दरवाजा उघडला तसा सिद्धार्थने तिला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून एकही अश्रू न गाळत त्या दिवशी तो खूप रडला. आईला वाटले दमून भागून आल्यामुळे सिद्धार्थने असे केले असेल तिने पण त्याला मायेने गोंजारत थोडा वेळ तसेच दोघे थांबले. सिद्धार्थसाठी सगळे संपले होते पण आईमुळे आणि आईसाठी जगण्याचा श्वास त्याने राखून ठेवला होता.
- हर्षद कुंभार
क्रमश:..
#harshadkumbhar #kshankahiwechalele #marathi #article #marathiwriters #blogspot #india #wai #satara #maharashtra #pune #mumbai #bloggers #marathiblog #marathibloggers #story #breakupstory #breakup #love #लघुकथा #मराठी #हर्षदकुंभार #क्षणकाहीवेचलेले #प्रेम #कथा #ब्लॉग
Copyrights to @harshadkumbhar
भाग -२
नांदेड एनजीओ
No comments:
Post a Comment