नमस्कार प्रिय वाचक, माझ्या डिजिटल घरात आपले स्वागत आहे! माझा ब्लॉग हा विचार, कल्पना आणि भावना यांचा एक रंगीबेरंगी कोलाज आहे, जो तुम्हाला माहिती देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी लिहिला गेला आहे. तुम्ही सध्याच्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी, ट्रेंडिंग विषयांमध्ये डोकावण्यासाठी, सर्जनशील कवितांचा आस्वाद घेण्यासाठी किंवा जीवनाच्या कथा वाचून विचारमग्न होण्यासाठी येथे आला असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
All The Contents by Labels
Saturday, December 25, 2021
पार्टनर - वपुमय होताना
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Friday, July 9, 2021
मराठी सुविचार - ०९/०७/२०२१
स्वतः चच खर आहे असे वाटणार्या लोकांना बाकीचे जग हे नेहमी वाईटच आहे असे वाटते. - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #quotes #maharashtra #oneliner #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #marathiquotes #marathistatus #marathimulga #writingcommunity #writing #instaquote #instawriter #poetsofinstagram #pune #wai #satara #marathiwriters #kavi #blogger #blog #marathikavitablog
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Wednesday, July 7, 2021
Book Review - शोध कादंबरी
नोकरीला लागल्यापासून तसं वाचन कमीच झाले होते. वाचन म्हणजे फक्त अभ्यास नवनवीन शिकण्यासाठी केलेला खटाटोप होता. गेली ७/८ वर्ष तरी साहित्य वाचन हे झालेच नव्हते त्यात कामाच्या वेळेमधून अवांतर वाचन करणे ही वेगळी कसरत असते. फेसबुकला २ वर्षांपूर्वी पुस्तक-बुस्टक या ग्रुप मध्ये जॉईन झालो आणि जसे चित्रपटाचे रिव्हिव येतात तसे पुस्तकांबद्दल मिळत गेले. तेव्हा पासून मी माझी एक वाचन लिस्ट बनवत गेलो.
याच वाचन माळेतली २ पुस्तक मी या वेळी मी अगदी परिस्थितीसोबत आणि स्वतःविरुद्ध हट्ट करून मागवून घेतलीच. माहित नव्हते वेळ मिळेल की नाही पण एकदा पुस्तक हाती घेतली की खऱ्या वाचकाला त्याचे व्यसन लागते. यातून जमेल तर दिवसातून २० मी. नाहीतर ३० मी. जागून मी पहिले पुस्तक पूर्ण केले ते होते
१) “शोध” - मुरलीधर खैरनार - या कादंबरी बद्दल आधीच खूप लोकांनी लिहून ठेवले आहेच त्यामुळे मी जास्त काही लिहीत नाही पण तुम्ही एकदा नक्की वाचाच असे मी सांगेन. मुरलीधर आज हयात नाही पण ते या कादंबरीच्या रूपाने कायम स्मरणात राहतील. त्यांनी लिहिलेलं कथानक एखाद्या रंजक चित्रपटाला शोभेल असेच आहे. मुळात तेच सिनेसुर्ष्टीसोबत जोडलेले असल्याने त्यांनी मुद्दाम कथा आणि पटकथा पद्धतीने ते लिहिले आहे उद्या यावर कोणी चित्रपट काढला तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही. त्यांची कल्पना शक्ती आणि वास्तवाचा जोड इतकी अप्रतिम झाली आहे की खरेच असे काही झाले असेल या मतापर्यंत आपण येऊन पोहोचतो. इतिहासातील सुरत दुसऱ्यांदा लुटली त्याची घटना केंद्रसाठी ठेवून ती अर्ध्यापेक्षा जास्त मधेच कुठे गहाळ झाली त्याचा शोध आजच्या काळात घेतला गेला आहे. भौगोलिक ज्ञान अत्यंत शिताफीने वापरून प्रसंग अगदी जिवंत केले आहेत. रंजक कथेला हवे असलेले सर्व धागेदोरे पद्धतीशीरपणे उलघडत त्यांनी रंजकता शेवट पर्यंत कायम ठेवली आहे. सर्व संदर्भ पूर्ण इतिहास जाणीवपूर्वक आणि तपासून वापरला गेला आहे त्यामुळे कुठेच अतिशयोक्ती, अवास्तव वाटत नाही. जास्त काही सांगत नाही पण तुम्ही स्वतः वाचावी म्हणून नक्कीच सांगेन.
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #novel #muralidharkhairnar #marathi #books #literature
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Wednesday, June 2, 2021
श्यामाचा वाढदिवस - एकांततला
श्यामाचा वाढदिवस - एकांततला
श्यामा आणि त्याचे कुटुंब जेमतेम होते आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने. श्यामा नुकताच त्याचे कॉलेज पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेला होता. तो जिथे राहत होते ते छोटे गाव होते त्यामुळे शिक्षणासाठी मोठ्या शहरातच जावे लागते असे. तिथे राहायचं कुठे हा प्रश्न त्याच्या आईला पडला नाही कारण तिकडे तिचा भाऊ राहत होता आणि श्यामा त्यांच्याकडे राहील हे साहजिक होते. एकदम साधारण सुखवस्तू कुटुंब असल्याने कधी अवास्तव खर्च केला गेला नाही त्यामुळे श्यामाला बाहेर कुठे राहायला ठेवायचे हे त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडले नसते. वडील एका छोट्या कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून कामाला होते त्यांनी फक्त घर आणि काम ह्याच दोन गोष्टींना प्राधान्य दिले होते. पण त्यांनी त्यांच्या सुखाच्या व्याख्येनुसार शक्य ते सर्व केले होते आणि करत होते कुटुंबासाठी.
अवास्तव खर्च म्हणाल तर कोणतीही चैनीची वस्तु घेतली नाही अगदी एकुलता एक मुलगा असला तरी त्याची खास अशी हौस मौज कधी केली नाही. त्याचे वडील मुळात ज्या वातावरणात वाढले त्यानुसार त्याच्या सवयी आणि तत्व. आपल्या मुलाने पण तसेच राहावे ही त्यांची न बोलून इच्छा होती. त्याउपर शिक्षणासाठी सर्वतोपरी त्याला हवे ते मिळवून द्यायचे हे त्यांचे धोरण. कारण स्वतः जास्त शिकले नसले तरी श्यामा खूप शिकला पाहिजे असे त्यांना वाटायचे. श्यामा दहावी परीक्षा पास झाला म्हणून त्याला दिलेली सायकल ही आजवरची सर्वात खर्चीक आणि पहिली भेटवस्तू असेल. पण त्या सायकल देण्यामागे त्याच्या वडिलांचे प्रेमरूपी मुख्य कारण श्यामा सायकलने शाळेला जाऊ शकेल आणि त्याची पायपीट होणार नाही हेच होते.
श्यामाचा मामा मोठ्या शहरात राहत होता आणि त्याचा छोटासा व्यवसाय होता तो शहराबाहेर करत होता. त्याच्या मामाने स्वतःच्या मेहनतीने १५ गुंठे जागा घेऊन तिथे एक कारखाना सुरू केला होता. नवीन सुरुवात होती म्हणून जास्त कामगार नव्हते अगदी २ शिफ्ट मध्ये काम आणि २ कामगार या व्यतिरिक्त मामा स्वतः पण जातीने काम करत असे. कारखाना ज्या भागात होता तिथे गुरवार म्हणजे आठवड्याचा वार सगळया कंपन्या/कारखाने बंद असायच्या आणि त्याला कारण पण तसे होते गुरुवारी तिथे लाइट नसायची. श्यामा मामाला मदत म्हणून कंपनी मध्ये जात असे. तेवढाच थोडा हातभार आणि मामाकडे राहतो त्याचे थोडे पांग फेडल्यासारखे त्याला वाटत असे. श्यामाला कामातले इतके कळत नसले तरी जमेल ते काम तो करायचा. तिथल्या कामगारांसोबत त्याची चांगली गट्टी जमली होती त्यातील एक काका तिथे जवळच राहत होते त्यांना कारखान्यावर देखरेखीसाठी पण ठेवले होते. श्यामा तसा चांगला रुळला होता आता मामाकडे कॉलेज आणि कारखाना दोन्ही कडे तो लक्ष देत असे.
वाढदिवस म्हणजे श्यामाला त्याची आई दरवर्षी औक्षण करणार आणि त्याचे वडील त्याला एक कॅडबरी आणून देणार हे अगदी ठरलेले असायचे. इतक्या वर्षात यापेक्षा वेगळे कधीच घडले नाही हे श्यामाला पण अंगवळणी पडले होते. त्याच्यासाठी हे साधे सुख देणारे सेलेब्रेशन पण खूप महत्वाचे होते. फक्त एक वाढदिवस त्याचा मात्र वेगळा घडला अगदी अनावधानाने कोणाची काही चूक नव्हती तरीही. त्याबद्दल त्यानेही कधी ही कोणाला दोष दिला नाही. आई बाबांपासून पहिल्यांदा दूर राहिल्यामुळे कधी एकदा घरी जातोय असे श्यामाला झाले होते. बरेच दिवस घरापासून लांब असल्याने या वर्षी वाढदिवसाला घरी जायचे असे त्याने ठरवले होते त्यामुळे तो आनंदात होता.
वाढदिवसाच्या आदल्या दिवशी श्यामाने मामाला सांगितले होते की उद्या मी घरी चाललो आहे दोन दिवसासाठी दुपारी जाईन म्हणून. कारखाना तसा जाताना मध्येच लागतो त्यामुळे मामाने एक फाइल श्यामा कडे दिली आणि जाताना कारखान्यात ठेवून पुढे जा. श्यामाला वाटले ठीक आहे त्यात काय इतके ठेवेन जाताना म्हणून तो दुपारी जेवण करून निघाला आणि कारखान्यामध्ये गेला. त्या दिवशी नेमका गुरुवार कारखान्यात कोणी नव्हते शिवाय ते कामगार काका जे तिथेच राहायचे ते असायचे गुरुवारी म्हणजे त्यांना पूर्ण २४ तास तिथेच थांबावे लागायचे गुरुवार असला की. त्या दिवशी पण काका होते त्यांना फाइल देऊन लगेच निघू असे श्यामाला वाटले पण श्यामा थोडा वेळ थांबला त्याच्यासोबत बिचारे एकटेच असायचे पूर्ण दिवस कारखान्यात. काकांना २/३ तासाच्या वेळाने कारखान्यात एक फेरफटका मारावा लागत असे. काका त्यावेळी जाणारच होते तेव्हा त्यांना सोबत म्हणून श्यामा ही सोबत गेला फेरफटका मारायला. चालता बोलता श्यामाने काकांना सांगितले की आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून तो घरी चालला आहे काकांनी पण त्याला शुभेच्छा दिल्या. पण म्हणतात ना काही गोष्टी नशिबाने बदलतात अगदी तसेच झाले काकांना त्यांच्या गावावरून फोन आला की त्यांची आई आजारी पडली आहे त्यांना लगेच घरी बोलवले आहे.
त्यांना मोठा प्रश्न पडला काय करावे ते खूपच चिंतेत दिसत होते. त्यांना वाटले की श्यामाला बोलावे का “की आजची रात्र इथे थांबतोस का मी गावी जावून उद्या सकाळी सकाळी लवकर येतो म्हणून”. पण त्याचा वाढदिवस होता कोणत्या तोंडाने विचारावे हे त्यांना कळत नव्हते आणि शिवाय इतकी मोठी जबाबदारी त्याच्या अंगावर टाकायला त्यांचे मन होत नव्हते. श्यामाला त्यांची अस्वस्थता कळून चुकली त्याने काकांना “तुम्ही जा निरदास्तपणे मी थांबतो आज इथे उद्या जाईन घरी तुम्हा आलात की”. तरी काका नको नको म्हणत होते “नको श्यामा राहूदे नाही देणार तुला त्रास तू जा घरी आज तुझा वाढदिवस पण आहे ना तू नको थांबूस इथे आणि एकटा कसा राहशील तू.
श्यामाला किती सांगितले तरी तो ऐकत नव्हता. उलट तोच काकांना “तुम्ही जा घरी आजची तर रात्र आहे ना मी थांबतो मी नाही घाबरत काही”. शेवटी श्यामा काही ऐकत नाही पाहून त्यांनी मन घट्ट करून जाण्याचा निर्णय घेतला. तोवर संध्याकाळ झाली होती आणि अंधार पडायला लागला होता. आजूबाजूला सगळीकडे अंधार दाटून येत होता. काकांनी आवरून लगेच निघायची तयारी केली आणि जाता जाता श्यामाला कारखान्याचे दरवाजे बंद करून घे म्हणुन सांगितले. लाईट नव्हती म्हणून काकांनी त्याला आधीच २ मेणबत्ती आणि एक रॉकेल वाला दिवा शोधून काढून दिला होता. काका गेले आणि श्यामा ने मेन गेट लावून आत आला. आत गेल्यावर पहिला त्याने आईला फोन लावला आणि सर्व प्रकार सांगितला. आईला तशी काळजी वाटली पण श्यामाची मदत तिला पटली होती. श्यामाला वाढदिवसाच्या दिवशी एकटे राहावे लागणार ह्याचे तिला वाईट वाटत होते. पण श्यामाने तिला धीर दिला होता आणि सकाळी येतो लवकर तेव्हा करुयात आपण औक्षण म्हणुन समजावून सांगितले.
१५ गुंठे जागेवरील कारखाना तसा मोठाच परिसर शिवाय आजुबाजूला म्हणावी तशी वस्ती पण नव्हती. या सगळ्यावर प्रसंग बनला होता तो त्या दिवशी गुरुवार होता म्हणून कुठेच लाइट नव्हती सगळीकडे काळाकुट्ट अंधार. मामाच्या कारखान्यात त्याने राहण्याजोगे दोन खोल्या काढल्या होत्या कधी तरी राहण्याची सोय म्हणून. पहिल्यांदाच श्यामा असा एकटा राहणार होता त्याला थोडी भीती ही वाटत होती. भयाण शांतता आणि त्यात रातकिडे आणि घुबडाचा आवाज भितीदायक असे वातावरण पोषक करत होते. याला छेद द्यावा म्हणुन श्यामाला युक्ती सुचली कारखान्यात एक जुना रेडियो होता तो त्याने आणला आणि तो चालू करून छान गाणी ऐकत बसू असे त्याने ठरवले. त्याने रॉकेल वाला दिवा लावून रेडियो स्टेशन चालू केले. घड्याळातील काटे पुढे सरकत होते तसा अंधार ही पुढे सरकत होता.
जवळपास रात्र झाली होती आणि दुपार नंतर काकांच्या जाण्याच्या घाईत रात्रीच्या जेवणाचे काहीच पाहिले नव्हते. काका पण पूर्ण विसरून गेले शिवाय श्यामाला भूक लागल्यावर ही गोष्ट लक्षात आली. आता काय जवळ पास इतक्या उशिरा काय मिळणार नव्हते आणि त्यात गुरुवार असल्याने हॉटेल, दुकान सर्व काही बंद होते. आज नेमका वाढदिवसाच्या दिवशी उपवास घडणार हे श्यामाला कळून चुकले. श्यामा भूक भागवायला पानी पित होता पण थोड्या थोड्या वेळाने त्याला सारखी भूक लागत होती. ह्या सगळ्या प्रकारचे परिणाम असे झाले की त्याला झोप येत नव्हती आणि रात्र ही जगून निघते की काय याची त्याला भीती वाटत होती. त्याच्यामुळे दिव्यातील रॉकेल आणि २ मेनबत्त्या किती वेळ साथ देतील हा ही एक प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.
रात्र जशी चढत होती तसे शांतता भंग करणारे आवाज जास्त प्रमाणात येऊ लागले होते. इतक्या मोकळ्या परिसरात वाऱ्याची झुळूक येणे साहजिक होते आणि त्यामुळे कारखान्यातील दरवाजे आणि खिडक्या एकसारख्या वाजत होत्या. भयान शांततेत अश्या आवाजाने श्यामा जास्त घाबरू लागला होता त्यातल्या त्यात रेडियो वरील गाण्यांवर लक्ष देऊन ती मोठ्यामोठ्याने गुणगुणू लागला जेणेकरून बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष होईल. बराच वेळ गेला मध्यरात्र होत आली होती आणि त्यात अजून एक वाईट गोष्ट झाली दिव्यातील रॉकेल संपत आले होते. दिव्याचा प्रकाश जास्त होता मेणबत्ती पेक्षा त्यामुळे जशी मेणबत्ती लावली तसा तिचा कल काहीसा अंधार करण्याच्या बाजूने जास्त आहे असा श्यामाला वाटत होते. श्यामाने झोपण्याचा प्रयत्न केला पण मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक येत असे आणि श्यामाची झोप सोबत वाहून नेत असे. कसाबसा वेळ जातच होता त्यात अजून एक वाईट गोष्ट घडली रेडियो वरील वाहिन्या ह्या फक्त रात्री २ पर्यंत चालू असतात आणि सगळे स्टेशन बंद होतात. आता श्यामाची मोठी पंचायत झाली होती रेडियो पण बंद झाला होता आणि शिवाय एकच मेणबत्ती शिक्कल राहिली होती. त्याने रेडियो वरील सर्व मेगाहार्टज लावून पाहिले पण सगळीकडे खर-खर असाच आवाज येत होता कंटाळून त्याने रेडियो बंद केला. आता खरी कसोटी होती, एकटेपणा होता. त्याला जुने सगळे दिवस आठवू लागले होते आईची आणि वडिलांची आठवण येऊ लागली होती. इतका वेळ त्याच्या मनात हे विचार आलेच नाही पण आता या शांत काळोखात त्याला त्याचे जुने सगळे वाढदिवस एकामागून लख्ख प्रकाशात दिसू लागले होते.
श्यामा विचारांमध्ये इतका गुंतून गेला की त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही. दुसरी मेणबत्ती तशीच राहून गेली आणि सकाळ झाली श्यामा गाढ झोपी गेला होता. सकाळी काका लवकरच आले त्यांनी गेट उघडून आत गेले आणि श्यामा जिथे झोपला होता तिथे त्यांनी दरवाजा ठोठावला. श्यामाला जाग येयला उशीरच झाला पण तो उठला आणि सकाळ झालेली त्याच्या लक्षात आली. त्याने दार उघडले तर समोर काका होते आणि त्याचा जीव भांड्यात पडला पटकन त्याने काकांना मिठी मारली. काकांना काही क्षण कळलेच नाही, पण श्यामा पूर्ण रात्र एकटा राहिला असल्याने त्याला आता मी आलो आहे ह्याने हायसे वाटले असेल.
काकांनी विचारले “श्यामा भीती नाही ना वाटली एकट्याला”. श्यामा “नाही काका मी नाही घाबरलो” मिश्किलपणे हसत त्याने उत्तर दिले पण काकांना कळले होते त्यामुळे त्यांनी जरा ही वेळ दवडता त्याला आवरायला सांगितले. काका त्याच्यासाठी चहा आणि खारी घेऊन आले होते त्यांना घरी गेल्यावर आठवले की श्यामाला खायला काही नव्हते ते. श्यामाचे खाऊन झाले आणि दोघे निघाले काका त्याला गाडीत बसवायला घेऊन गेले. काकांना श्यामाचे किती आभार मनू किती नको असे झाले होते पण ते काहीच बोलू शकले नाही. त्यांचे वागणे श्यामाला कळत होते आणि त्यांनी आभार मानू नये अशी श्यामाची इच्छा होती.
आणि श्यामाचा वाढदिवस अश्या प्रकारे संपला होता. पण त्याच्या मनात एक प्रकारचे समाधान होते की तो काकांच्या कामी आला त्याच्या वाढदिवशी. - हर्षद कुंभार
समाप्त :
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Sunday, May 16, 2021
मित्रा
मित्रा
प्रसंग - १
स्थळ - पुणे
नेहमी प्रमाणे सोहम आणि अक्षय ऑफिसला चालले होते. अक्षय कडे एक ओपन जीप होती ती जीप घेऊन ते रोजच ऑफिसला जात असे कारण ओपन जीप मध्ये जाताना आजूबाजूचे सर्व स्पष्ट दिसणे सोहमला आवडत असे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचे बारीक निरीक्षण त्याला करता येत होते आणि ते केल्यावर त्याला लिहायला मदत होत असे. सोहमला लिहिणे हा त्याचा छंद गेली १०-१२ वर्ष त्याने जोपासला होता. बऱ्याच सोसिअल साईट्स वर त्याचे बरेच फॉलवर पण बनले होते त्यामुळे त्याला दर वेळी नवनवीन लिहायला हवे असे वाटायचे.
असेच त्या दिवशी ऑफिसला जाताना एका सिग्नलला त्यांची गाडी थांबली होती. दोघांच्या गप्पा चालू होत्या आणि जसा सिग्नल सुटला तसेच अक्षय गाडी पुढे घेणार तेव्हडयात एका मोठ्या आलिशान गाडीने त्यांच्या गाडीला घासून सुसाट निघून गेली. अचानक झालेल्या प्रकाराने सोहम आणि अक्षय थबकले आणि काही कळायच्या आतच ती गाडी भरधाव पुढे निघून गेली. मागील गाड्यांच्या हॉर्न ने हे भानावार आले आणि तिथून निघाले पण त्यांना दोघांना खूपच राग आला होता आणि त्या गाडीचा पाठलाग कर म्हणून सोहम अक्षयला म्हणाला. त्या गाडीचा पाठलाग सुरु केला तसा थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांनी त्या गाडीला कसेबसे गाठले.
सोहमने डावा हात दाखवत गाडी बाजूला घेण्यासाठी खुणावले तशी ती पांढरी शुभ्र गाडी बाजूला झाली काळ्या काचा असल्याने आत कोण आहे कळत नव्हते. दोघेही खाली उतरून गाडी जवळ गेले आणि सोहमने ड्राइव्हर साईडला जाऊन काचेवर टकटक केले तसे त्या ड्रायवर साइडने असलेल्या व्यक्तीने काच खाली केली. सोहम काही बोलणार त्या आत ड्राइव्हरच्या ड्रेस मध्ये असलेली व्यक्ती रागाने पाहून "काय झाले गाडी का अडवली आहे" विचारले. सोहम अजून चिडला अरे एक तर बेदरकार गाडी चालवून आमच्या गाडीला तुम्ही इतकी मोठी डॅश मारून गेला वर सॉरी बोलायचे सोडून जसे काही घडलेच नाही असा आव आणत आहेस. इतकी काय गुर्मी तुमच्यात श्रीमंत आहात म्हणुन रोड काय विकत घेतला का तु हवी तशी चालवायला.
ड्राइव्हर - तुमच्या गाडीचे जे काय नुकसान झाले असेल ते भरून देतो पण आता आम्हाला जावू द्या.
सोहम - ए पैशाची गुरमी कोणाला दाखवतोस तू असे म्हणत त्याला खाली उतर तू असे बोलत होता. .
ड्रायवर - आम्हाला जरा घाई होती म्हणून थांबलो नाही. आम्हाला माफ कर जावूद्या ओ उशीर होत आहे आम्हाला.
सोहम आणि त्याच्यात वादावादी चालू होती. हे सगळे चालू असताना अक्षय मात्र दुसऱ्या बाजूला गाडीतील व्यक्ती सोबत बोलत उभा होता. शेवटी अक्षय सोहमला समजावयाला आला
अक्षय - चल जाऊदे एवढे काही झाले नाहीये आपल्याला उशीर पण होत आहे चल निघू. सॉरी बोलत आहेत ना ते.
सोहम - अरे काय तू घाबरला का यांना थांब आता इंगा दाखवतो मी. कोण समजतात कोण हे स्वतःला असा नाही सोडणार यांना.
अक्षय - अरे चल बाबा तू, मला माहितेय किती हिंमत आहे तुझ्यात ते . तो माणूस सॉरी बोलला मला चल आता आपल्याला उशीर होत आहे मीटिंग पण आहे आपली.
आणि अक्षय सोहमला घेऊन गाडीत बसला ते दोघे निघाले ऑफिसला. सोहमचा पूर्ण मूड ऑफ झाला होता त्याला अक्षयचे पटले नव्हते. ऑफिसला गेल्यावर अक्षय कामात गुंतला आणि सोहमच्या डोक्यात अजूनही त्याच घटनेचे विचार चालू होते. सोहमला लगेच एखादी गोष्ट मनाला लागत असे कारण तो प्रॅक्टिकल विचारांचा असला तरी थोडा हळवा ही होता. मिटींग मध्ये पण त्याचे जास्त लक्ष नव्हते इतरांच्या हे लक्षात आले पण कारण कोणाला माहीत नव्हते अक्षय सोडून. सगळ्यांनी विचारले पण तो काहीच बोलला नाही. अक्षयला माहीत होते म्हणुन तो गप्प होता दुपारी लंच टाइम झाला तेव्हा अक्षय सोहमला घेऊन जेवायला गेला. अक्षयने विचारले अरे काय यार तू का अपसेट आहेस अजून जाऊदे ते झाले ते एवढे काय मनावर घेत आहेस. सोहम जेवत असताना त्याचे अक्षयच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते तो आपल्याच विचारात होता.
कसा बसा दिवस संपला घरी जाताना पण सोहम जास्त बोलत नव्हता त्याने खूप मनावर घेतले होते. दोघे फ्लॅटवर गेले रेंटवर असलेल्या फ्लॅट मध्ये दोघेच राहत होते. फ्लॅट त्यांना चांगला मिळाला होता भरपूर उजेड असलेला. खिडकीतून छान सूर्यप्रकाश येत असे. त्यांच्याकडे जास्त सामान नसले तरी आपापली गादी,बॅग्स आणि एक बीन बॅग होती. सोहम लिहायला खिडकीत बसत असे त्याची आवडती जागा जिथे त्याला चांगले लिहायला जमायचे. आजच्या प्रसंगावर पण त्याला लिहावे म्हणून तो बसला त्याला सामाजिक भान या विषयावर आजचा प्रसंग लिहायचा होता लोक किती बेजबाबदार असतात समाजाबद्दल म्हणून. प्रसंग पुन्हा आठवताना त्याला एक गोष्ट लक्षात आली की तो ड्राइवर सोबत भांडत असताना अक्षय काय करत होता नक्की त्या मागे बसलेल्या व्यक्तीसोबत. अक्षय बीन बॅग वर बसलेला आणि मोबाइल वर काहीतरी पाहत होता. तेव्हा सोहम त्याच्या कडे पाहत
सोहम - काय रे अक्षय मला गोष्ट सांग, सकाळी जेव्हा मी ड्राइव्हर सोबत भांडत होतो तेव्हा तुझे काय चालले होते.
अक्षय - काही नाही रे तू तिकडे ड्राइव्हर कडे गेलास आणि मी या साईडला होतो तेव्हा त्या गाडीत मागे बसलेल्या व्यक्तीने काच खाली केली. तुला माहितेय का आत कोण बसले होते तुझा विश्वास बसणार नाही.
सोहम - असे कोण होते. हिरो होता का कोणी.
अक्षय - नाही रे पण तुझ्यासाठी तर होताच.
सोहम - म्हणजे
अक्षय - अरे हिरानी सर होते आत.
सोहम - (सोहमचे डोळे एकदम चमकले) चल काहीही तू थट्टा करत आहेस माझी.
हिरानी म्हणजे सोहम साठी एकदम गुरूच होते. त्यांच्या ज्या फिल्म मध्ये त्यांनी रायटर व डिरेक्टर असे काम केले ते चित्रपट माईलस्टोन ठरले होते चित्रपटसृष्टीला. सोहम एक अभ्यास म्हणून त्या चित्रपटाच्या कथा स्टडीज करायचा. त्याला स्वतःला लिखाणाची आवड असल्याने या क्षेत्रातील बरीच असे व्यक्ती आहेत त्यांना सोहम फॉलो करत होता. पण हिरानी सर जरा जास्त खास वाटायचे त्याला. कधी तरी त्यांना असिस्ट करायला मिळावे हे त्याचे एक स्वप्न बाळगून होता.
अक्षय - अरे खरंच आपण अशी अचानक गाडी अडवली ना आणि त्यांना घाईत कुठेतरी जायचे होते. त्यामुळे लवकर तिथून निघावे म्हणून त्यांनी मग मला विनंती केली आणि तुमच्या गाडीचा जो काही खर्च असेल तो मी देतो. मी म्हणालो राहूद्या सर आपली भेट झाली यातच जमा झाले सगळे.
सोहम - (सोहम हे सगळे अवाक होऊन ऐकत होता) BC , हरामी तू मला सांगितले का नाहीस. असला कसला रे मित्र तू. सोहमला तोंडात खूप शिव्या येत होत्या. तो हे ऐकूनच थक्क झाला होता की इतका सुंदर सुवर्ण क्षण असा डोळ्यासमोरून गेला आणि मला तो अनुभवता ही आला नाही.
अक्षय - अरे चील कर रे तू भेटून तरी लगेच काय करणार होता का असाच अवाक होत बघतच बसला असता ना. तुला सुचले तरी असते का काय बोलायचे ते. जस काय सर तुला लगेच कामावरच ठेवून घेणार होते.
सोहम - जाऊदे तुला नाही कळणार मला ते किती महत्वाचे होते ते. मनात खूप राग धरून सोहम बाल्कनी मध्ये गेला.
सोहम गप्प झाला होता आणि त्याला आता अक्षयचा भयंकर राग आला होता कारण जिवाभावाच्या मित्राने असे केले होते. तो आपला बाहेर बघत एकदम शांत बसला होता. त्याला आता काहीच लिहू वाटत नव्हते. सोहम जेवण करून लगेच झोपायला गेला कारण त्याला अक्षय सोबत बोलायचे नव्हते. अक्षयला सर्व कळत होते पण त्याला सोहमचा स्वभाव माहीत असल्याने त्यानेही त्याला जास्त डिस्टर्ब केले नाही.
सकाळी अक्षय उठला तेव्हा सोहम कुठेच दिसत नव्हता. सोहम आधीच ऑफिसला निघून गेला आहे हे त्याच्या लक्षात आले. अक्षय ने बोलायचा प्रयत्न केला पण सोहम काही बोलला नाही नीट पुढे १-२ दिवस असेच गेले. नंतर हळू हळू सोहमचा राग गेला आणि तो शांत झाला आणि अक्षय सोबत त्याने बोलने ही पुन्हा सुरु केले. सगळे नॉर्मल झाले आहे पाहून अक्षयने एक दिवस आपण मुंबईला फिरायला जाऊ असे सोहमला सांगितले. सोहमला वाटले त्याचा राग घालवण्यासाठी तो हे करत असेल. तो ही लगेचच हो म्हणाला तसेही अक्षय त्याचा लहानपणापासूनचा परम मित्र असल्यामुळे जास्त काळ न बोलता राहु शकत नाहीत हे त्यालाही माहीत होते.
प्रसंग - २
स्थळ - मुंबई
आता बरेच दिवस झाले होते सोहम तो दिवस बर्यापैकी विसरला होता पण ठरल्याप्रमाणे एक रविवार फिक्स केला आणि दोघांनी जायचे नक्की केले. मुंबईतील तशी सर्व ठिकाणी दोघेही आधीच पाहून आले होते पण अक्षय त्याला म्हणाला ही नवीन जागा आहे आणि तू पाहिलेली नाही. त्यामुळे वेगळे काही तरी पाहायला मिळेल म्हणून सोहम जरा उत्साहित होता. दोघेही त्यांच्या ओपन जीपनेच मुंबईत गेले आणि वांद्रे येथे पोहोचल्यावर तेथील एका आलिशान बंगल्याजवळ अक्षयने गाडी थांबवली. सोहमला २ मिनिटात आलो बोलून तो खाली उतरला. त्याने आपला मोबाईल काढला आणि कोणाला तरी कॉल केला. सोहमला काहीही कळत नव्हते काय चालू आहे बहुतेक एखाद्या मित्राला कॉल केला असेल असा त्याने अंदाज बांधला. अक्षयचा कॉल झाला आणि तो गाडीत येऊन बसला तेव्हा
सोहम - बाबा काय चालू आहे सांगशील का जरा कुठे चाललो आहे आपण.
अक्षय - तू थांब रे जरा म्हणत (गाडी चालु केली आणि त्या बंगल्यात गाडी घेऊन गेला.)
सोहम - आता मात्र कमाल झाली अरे कोणाचा बंगला आहे हा.
अक्षय - तू शांत रहा आणि माझ्या मागे मागे ये फक्त.
गाडी लावून दोघे खाली उतरले आणि मेन डोर जवळ गेले सोहम त्याला सतत विचारत होता अरे कोणाचा बंगला आहे हा, कोणाकडे आलो आहोत आपण पण अक्षय त्याला फक्त हाताने गप्प बस आणि सोबत चल इतकेच खुणावत होता. नोकराने दरवाजा उघडला आणि दोघेही आत गेले आणि तिथे नोकराने त्यांना एका सोफ्यावर बसायला सांगितले. बंगल्यातील आतील भव्यता पाहून दोघे ही चाट पडले होते सोहम काही वेळ तरी त्यांच्या प्रश्नांना विसरला होता. नोकराने त्यांना पाणी आणून दिले आणि "साहेब येतीलच आता" असे बोलून तो निघून गेला.
सगळ्या गोष्टी पाहत असताना एका भिंतीवर त्यांनी बरीच बक्षिसं आणि ट्रॉफी एका मोठ्या कपाटात मांडलेल्या पाहिल्या. लांबून त्यांना त्यावरचे लिहिलेले स्पष्ट दिसत नव्हते म्हणून सोहम उठला आणि जवळ पाहायला जाणार तितक्यात नोकर आला आणि साहेबांनी त्यांना आत बोलवले आहे म्हणून निरोप दिला. दोघे ही नोकर घेऊन जाईल त्याच्या मागे मागे निघाले. दोघे ही जाताना मधील पॅसेजच्या दोन्ही बाजूला असलेल्या चित्रपटांची मोठी पोस्टर लावलेली पाहिली. अक्षयला सर्व माहीत होते हे कोणाचे घर आहे पण सोहमला माहीत नसल्याने तो आपला अंदाज बांधत होता.
सोहमला वाटले असेल कोणी शॉकींन म्हणून पोस्टर लावले आहेत म्हणून त्याने सुरुवातीला थोडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघाला. एका मोठ्या स्टुडिओ सारख्या हॉल मध्ये दोघे पोचले आणि हिरानी सर आत येणार आणि सोहमला जे पोस्टर त्याने पाहिले होते त्याची लिंक लागली की हे तर हिरानी सरांचे सर्व चित्रपट आहेत म्हणजे आपण त्यांच्या घरी तर आलो नाही ना. त्याला आलेले विचार आणि हिरानी सरांची एन्ट्री एकाच वेळी झाली होती. स्वर्गातून एखादा देवदूत जिना उतरून खाली यावा तसे हिरानी सर त्याच्या समोर आले होते.
हिरानी - हॅलो guys . कैसे है आप लोग. उस दिन के लिये फिर से सॉरी.
अक्षय - (अक्षय पुढे होऊन सरांसोबत हस्तांदोलन केले.) अरे नहीं नहीं सर आप हमें शर्मिंदा कर रहे है.
सोहमला काही कळत नव्हते तो एकदम मूर्तीसारखा स्तब्ध झाला होता. अक्षयने त्याला कोपर मारत भानावर आणले. तो ही मग सरांकडे जाऊन हस्तांदोलन करून माघारी आला. नोकराने चहा कॉफी साठी विचारलं आणि आम्ही पण "कॉफी चालेल" जरा अवघडल्या सारखे बोललो.
हिरानी - रिलॅक्स Guys. अच्छा तो, तुम उस दिन जो बोल रहे थे ना तुम्हारा कोई दोस्त है जो अच्छा लिखता है, ये वही है क्या ? ड्राइवर के साथ तो अच्छा झगडा कर रहा था. (असे मिश्किल हसत हिरणी सरांनी टोमणा दिला).
सोहम खूप गोंधळून गेला होता की नक्की काय प्रकार आहे एकतर अक्षय हिरानी सरांना कसा काय ओळखतो आणि मला इतक्या दिवसात मला माहीत कसे नाही. मुळात माझे स्वप्न त्याला माहीत असताना त्याची जर सरांसोबत इतकी ओळख होती तर माझ्यासाठी त्याने काहीच कसे केले नाही. आणि ड्रायवर सोबत भांडायची गोष्ट सरांना कशी काय माहीत. त्याने अक्षयचा शर्ट ओढून जरा २ मींन बाजूला ये म्हणून बोलला. पण अक्षय ने तिथेच त्याच्या कानात "अरे त्या दिवशी गाडीत मागे हिरानी सर होते".
सोहम - सॉरी सर. पता नहीं था आपकी गाडी हैं. (सोहमला वाटले आपल्याला बहुतेक यांनी समज देयला बोलवले आहे. म्हणून तो खाली मान घालून बसला.)
अक्षय - हा सर यही है सोहम. मैंने जो उस दिन आपसे कहा था उसपर कुछ हो सकता है तो देखो ना सर प्लिज.
सोहमला काही कळेना कोणते भाव आणावे ते, कारण काय चालू आहे हे दोघे कशाबद्दल बोलत आहेत. तो आपला चेहऱ्यावर हास्य आणत सगळे माहीत असल्याचे भाव आणत होता. तितक्यात नोकर कॉफी घेऊन आला.
हिरानी - कॉफी लीजिए, और बताइए क्या काम करते हैं आप दोनों.
अक्षय - Sir we are working in a software company.
हिरानी - बढ़िया है. तुमने बताया था उसपे मैने सोचा है. Actually मुझे भी एक लड़का चाहिए था. अच्छा हुआ तुम मिल गए. पर मुझे निराश मत करना भाई असे सोहम कडे पाहत हिरानी सर म्हणाले.
बोलता बोलता ते उठले आणि त्यांच्या पुढील प्रोजेक्ट बद्दल बोलू लागले. आम्ही पण लगेच उभे राहिलो. आता सोहम बदल काय बोलणार म्हणुन अक्षयचे लक्ष लागून राहिले. सोहम अजूनही बुचकळ्यात पडला होता.
हिरानी - ठीक है मेरा एक नया प्रोजेक्ट जो कुछ महिनों बाद शुरू होने वाला है. उसके डेट्स फायनल होने के बाद इसको कॉल करूंगा. चलो अभी मुझे निकलना है सॉरी Guys. अच्छा लगा तुम लोग आए मिलने. फिर मिलते है. Bye and Good Luck.
एवढे बोलून ते निघून गेले आणि आम्ही पण घराबाहेर पडलो. अक्षयला त्याचे प्रयत्न सार्थकी लागल्या सारखे झाले सोहमला इथे घेऊन येयचे त्याचे उद्देश सफल झाले होते. अक्षयने अशी काय जादूची कांडी फिरवली होती आणि हा चमत्कार झाला आहे त्याचा तर किती वेळ विश्वास बसत नव्हता. हसता हसता त्याने अक्षयला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. अक्षय त्याच्या पाठीवर थाप मारत त्याला आवरत होता. सोहम भानावर येत
सोहम - अक्षय तू मला सगळे नीट सांगणार आहेस का नाहीतर तू काय आज जिवंत राहत नाहीस बघ. (सोहमने अक्षयचा गळा धरून त्याला बजावले)
अक्षय - अरे हो हो चल गाडीत बस तरी. जाता जाता सांगतो सगळे.
सोहमने गळा सोडत ठीक आहे चल पटकन बस म्हणत त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. अक्षयला त्याची घाई कळत होती. गाडी सुरू झाली मुंबईच्या ट्रॅफिक मधून बाहेर पडत त्यांचे बोलणे चालू झाले.
अक्षय - अरे त्या दिवशी तू ड्रायवर सोबत भांडत बसलास आणि मी मागे कोण बसले आहे म्हणून पाहायला गेलो तेव्हा मागे बसलेल्या व्यक्तीने गाडीची काच खाली घेतली, पाहतो तर काय चक्क हिरानी सरच होते आत. मी तसा खूपच Shocked होतो पण लगेच भानावर येत मी त्यांच्याशी बोलणे सुरू केले. गाडीच सगळे मी कधीच विसरून त्यांच्याशी त्यांच्याबद्दल च बोलत होतो. अर्थात त्यांना याची सवय असेल पण त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. गाडी बद्दल किती पैसे देऊ असे जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी नको नको म्हणालो आणि तुझ्या बद्दल सांगू लागलो तू किती छान लिहितोस ते शिवाय तुमचा किती मोठा फॅन पण हे बोलता बोलता मुद्दाम सांगितले. पण त्यांना खरंच खूप घाई होती शूटिंगसाठी उशीर होत होता म्हणून त्यांनी जाऊ देण्याची मला विनंती केली. पण त्याचवेळी न विसरता त्यांनी त्यांचे विजिटिंग कार्ड दिले होते आणि मला नंतर कॉल करायला सांगितले. तुला लगेच सांगणार होतो पण तुझा मूड पाहून विचार केला नंतर सांगावे. जेव्हा सगळे नॉर्मल झाले तेव्हा मी ठरवले सरांना एकदा कॉल करून पाहतो, तसा कॉल करून मी त्यांची अपॉईंटमेंट घेतली होती आजची आणि आपण इकडे आलो होतो. दिले की नाही तुला Surprised मित्रा.
सोहम अक्षरशः रडत होता अक्षय सारखा मित्र त्याला आज अगदी देवदूतासारखा वाटत होता ज्याने त्याची त्याच्या देवासोबत भेट घडवून आणली होती.
समाप्त
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #article #marathiblog #blogger #marathimulga #writingcommunity #writing #lekhak #lekh #pune #maharashtra #mumbai #wai #satara #friends #friendship #मित्रा #मित्र #मराठी #लेख #लेखन #लघुकथा #कथा #मैत्री
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Saturday, May 1, 2021
Old School - नकाराचा दिवस
Old School - नकाराचा दिवस
गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा स्मार्ट फोन नव्हते आणि ३००० SMSचा रिचार्ज मिळायचा फक्त ३० रुपये मध्ये. २००५ च्या आधी आणि २००० नंतरचा साल तेव्हा चॅटिंग ही SMS नेच होत होती.
अंकिता आणि सिद्धार्थ एकाच चाळीत रहात होते. अगदी लहानपणापासून त्यांची मैत्री आणि घरी ये जा होत होती. दोघे ही जसे जसे वयात येत होते तसे ते एकमेकांत गुंतत चालले होते. पण कोणीही पुढाकार घेत नव्हते जे आहे ते हक्काचे आहे असे गृहीत धरले होते आणि योग्य वेळ आली विचारू असे मनोमनी दोघांनी ठरवले होते. जेव्हा कॉलेजचे दिवस होते तेव्हा दिवस भर एकत्र असायचे आणि घरी आल्यावर पण SMS मध्ये चॅटिंग होत होती. त्यांना ही ओढ जाणवत होती मैत्रीची वेस ओलांडावी वाटे पण मनाशी पक्के केलेल्या निश्चयाची त्यांना सारखी आठवण होती.
सिद्धार्थ तिच्या पेक्षा मोठा होता त्यामुळे लवकरच त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून तो नोकरीला लागला. दोघेही खुश होते एकाचे स्वप्न पूर्ण झाले म्हणुन. अंकिताला तर अभिमान वाटत होता सिद्धार्थला नोकरी लागली त्याने त्याचे एक स्वप्न पूर्ण केले आणि त्याच्या आईचा भार हलका केला. आता तिला तिची चिंता सतावत होती कारण अंकिता अजून कॉलेजला होती लास्ट ईयर बीकॉम. तिची खूप स्वप्नं होती घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला आपोआप बंधने लागली होती. अंकिता पण तशी शांत पण महत्त्वाकांक्षी होती एकदा मनाशी पक्की केलेली गोष्ट ती पूर्ण करायचीच. ती एकुलती एक असल्याने तिला आई बाबाची स्वप्नं पूर्ण करायची होती आणि त्यासाठी तिने स्वतः च्या बर्याच इच्छाना तिलांजली दिली होती. सिद्धार्थ पण एकटाच होता तो आणि त्याची आई दोघे राहत होते त्याचे वडील सिद्धार्थ लहान असतानाच वारले. एकट्या आईनेच त्याला लहानचे मोठे केले त्यामुळे त्याची आई म्हणजे जीव की प्राण होती त्याच्यासाठी.
सिद्धार्थ नोकरीला लागल्यापासून त्यांच्या मध्ये हळू हळू बोलणे कमी झाले आणि त्यांना एकमेकांना वेळ देणे कठीण झाले. सुट्टीच्या दिवशी भेट मात्र होत होती तेव्हा किती बोलू किती नये असे होत असे. इतके सगळे असून पण अजुनही कोणीच कोणाला प्रेमाची कबुली देत नव्हते. पण कळत होते की प्रेम तर आहे कधी ही विचारले तरी होकार हा असणार आहे. त्यामुळे असेच चालू ठेवत त्यांनी दिवस काढायला सुरुवात केली. सिद्धार्थला राहून राहून वाटायचे की आपण एकाच वर्गात असतो तर बरे झाले असते. एक वर्ष नापास होवून त्याला अंकिता सोबत एकाच वर्षात येयचे होते पण अंकिताला ते मान्य नव्हते त्यामुळे पुढे जाऊन अशी वेळ येणार हे देखील माहीत होते. प्रत्यक्षात होणार त्रास हा आता जाणवायला लागला होता.
सिद्धार्थला नोकरी लागल्यापासून तसा थोडा तो निर्धास्त झाला होता त्याला वाटले की आता लपून ठेवण्यात काही अर्थ नाही. सरळ तिला बोलून टाकू म्हणजे दोघातला दुरावा तरी कमी होईल आणि तसेही लगेच काय लग्नाचा विचार नाही. त्याला अंकिताचीही तितकीच काळजी होती जेव्हढी तिला असलेल्या तिच्या जबाबदारी आणि स्वप्नांची होती. पण एकदा फक्त बोलून दाखवावे असे त्याला सारखे वाटत होते. त्यामुळे त्याने अंकिता विचारायचे ठरवले. त्या दिवशी शुक्रवार होता समोर भेटून बोलण्यासाठी सिद्धार्थची हिम्मत होत नव्हती कारण असे रोजचे बोलणे वेगळे आणि शेवटी प्रेमाची कबुली देणे हे वेगळेच होते. म्हणून त्याने तिला कॉल करायचा ठरवले आणि सगळी हिंमत एकवटून त्याने तिला कॉल करुन आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि एकदम सांगितले की माझ तुझ्यावर मनापासून प्रेम आहे अगदी लहानपणापासून हे तर तुला माहीत असेलच. आजवर बोललो नाही पण आता मला नोकरी मिळाली आहे त्यामुळे तुला सांगाव असे वाटले.
याची काहीच कल्पना नसल्याने अंकिता त्याला मध्येच थांबवत नाही म्हणाली कारण एकदम सिद्धार्थचे असे प्रेमाचे बोलणे ऐकून अंकिता थोडी गोंधळली आणि काय बोलाव तिला सुचेना. आनंद मानावा की चिंता हेच तिला कळेना तिचेही प्रेम होते पण ही ती वेळ नाही आणि नव्हतीच निदान तिच्यासाठी तरी. आता हा एक होकर दिला तर सगळे बदलणार होते हे तिला माहीत होते. तिचे स्वप्नं, आई वडिलांची अपेक्षा या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्या समोर उभ्या राहिल्या आणि आजवर सिद्धार्थ वर केलेले प्रेम तिला फिके वाटू लागले. या सगळया विचारांच्या गदारोळात तिने पटकन नाही म्हणून सांगितले आणि “ सिद्धार्थ तू हे काय बोलत आहेस आपण तर छान मित्र आहोत ना. मग हे मध्ये प्रेम कुठून आले. आणि तसेही मला माझे करियर करायचे आहे. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मी माझा वेळ प्रेमात नाही वाया घालवू शकत. मला ते नाही जमणार माझ सगळीकडे दुर्लक्ष होईल.” असे बरीच टोचणारी वाक्य मुद्दाम बोलून तिने सिद्धार्थला एकदम जमिनीवर आणले होते. नाही म्हटले तरी कबुली न दिल्यामुळे एक मर्यादेचे कुंपण तरी होतेच दोघांमधे इतकी वर्ष आणि तेच तिला अजून काही दिवस हवे होते.
सिद्धार्थला तर एकदम श्वास काढून घेतल्यासारखे झाले. तो तिला समजावत होता की सगळे पाहिल्यासारखेच असेल मी फक्त प्रेमाची कबुली देत आहे. पण अंकिताला ते नको होते आता तरी, कारण प्रेमात लगेच अपेक्षा वाढतील मग नाही पूर्ण झाल्या की चिडचिड होईल आणि शारीरिक आकर्षण ही वाटेल. म्हणजे हे वेगळे जग आत्ताच तिला नको होते. तिने ठरवले होते स्वतःहून काही करियर करायचं आणि मग सिद्धार्थला कबुली देयची. पण सिद्धार्थ ने आधीच विचारून सगळे होत्याचे नव्हते केले होते. सिद्धार्थ ने खूप समजवले पण तिने ऐकले नाही आणि आपल्याच मतावर ठाम राहिली.
त्याला काहीच सुचत नव्हते आपला अंदाज कसा काय चुकला अंकिता बद्दल या विचाराने तो वेडापिसा झाला होता. ऑफिस मध्ये कामात लक्ष लागत नव्हते. आधीच मितभाषी असलेला सिद्धार्थ कोणाला काही बोलू शकला नाही आणि ऑफिस सुटल्यावर त्याला घरी देखील जावे वाटत नव्हते. कारण आईला त्याला पडलेला चेहरा लगेच कळेल हे त्याला माहीत होते. सिद्धार्थ ने स्वतः ला या विचारांतून बाहेर पडायचे म्हणुन कुठे तरी बिझी करने महत्वाचे होते. तो सरळ ऑफिस संपले की टेबल टेनिस खेळलाय गेला. कारण हा एक टाइमपास तो नेहमी मोकळ्या वेळेत ऑफिस मध्ये करत असे आणि तिथे खेळात लक्ष देवून शरीराला त्रास दिला की मनाला काही वेळ ते बाजूला ठेवते त्यामुळे हा प्रसंग जास्त त्रास देणार नाही असा त्याचा समज झाला. ऑफिसच काम तीन शिफ्ट मध्ये होते त्यामुळे कोणी ना कोणी सोबत खेळायला असायचे. सिद्धार्थने घरी आईला कॉल करुन सांगितले उशीर होईल तू जेवण करून झोप. खरतर त्याला त्या सगळ्या लोकांना टाळायचे होते जे रोज त्याच्याशी बोलत असत. त्यादिवशी सिद्धार्थ सकाळ पर्यंत खेळला इतका की आता शरीरातून घाम येणे ही जवळपास बंद झाले होते अगदी कोरडे ठाक शरीर ज्यात पाण्याचा एकही थेंब शिल्लक नसेल अगदी डोळ्यातून निघावा इतकाही. इतके असतानाही त्याच्या मनातील भावना मात्र वेळोवेळी जन्म घेत होत्या. त्याला कळून चुकले यातून लवकर सुटका नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० ला कंपनीची शेवटची कैब निघते ती करून जाणे एकदम नाईलाज असल्याने सिद्धार्थ त्याने घरी निघाला. गाडीचा वेग ही फिका वाटेल इतके विचार त्याच्या मनात पळत होते. त्याला एकाच गोष्टीचे जास्त दुःख झाले होते की नजरेची भाषा, काळजी, आपुलकी, आकर्षण या सगळ्या गोष्टी मिळून जे प्रेम जन्माला येते हे तेच होते आमच्यात पण मग तिने अश्या पद्धतीने का नकार दिला. इतकी वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो तर मला नाही का तिच्या मनातले कळणार. नाही का कळणार तिची स्वप्न तिच्या इच्छा, अपेक्षा, जबाबदाऱ्या मला. एखाद्या परक्या माणसाला उत्तर द्यावे असे तिने मला दिले होते.
गाडी घरी जात होती पण त्याला कुठेच पोहोचायचे नव्हते इतके त्याला जग परके वाटू लागले होते. एखादा शेवट गोड वाटावा इतका त्याला अंत जवळ वाटू लागला होता, पुढे काय होईल अंकिता तर पुन्हा त्याला दिसणार होती मग भावनांना आवर घालून नॉर्मल कसे राहू हे आणि अनेक प्रश्न त्याला पडू लागले होते. गाडीच्या खिडकीतून घर जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या. ह्रदयाची धडधड इतकी स्पष्ट त्याने कधीच ऐकली नसेल त्याला अंकिता समोर दिसेल की काय भीती ने तो जास्तच धास्तावला होता. कैब ड्राइवरने मध्येच मला हाताने हलवत भानावर आणले तो कधी पासून सिद्धार्थला हाक मारत होता कुठे उतरायचे आहे म्हणून याचेही त्याला भान नव्हते. आज त्याचेच घर त्याला परके करू वाटत होते. शेवटी घराजवळच्या नाक्यावर तो उतरला तिथून त्याला पायी जायचे होते पण आज पावले पण उचलत नव्हती शरीर जड झाल्यासारखे वाटत होते. घर जवळ आल्यावर राहून राहून त्याला हे पण वाटत होते की आईला यातले काही कळता कामा नये.
लहानपणापासूनचे प्रेम आज तिच्या नकारामुळे एक दिवसात तिरस्कार आणि राग या भावनेत कधी बदलत गेले हे त्याला ही कळले नाही. आता त्याला अंकिता समोर येऊ नये असेच वाटत होते, वर कुठेही न पाहता मान खाली घालून सिद्धार्थ घरच्या दरवाज्यात पोहोचला. थोड मन घट्ट करून त्याने दरवाजा वाजवला आणि आईने जसा दरवाजा उघडला तसा सिद्धार्थने तिला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून एकही अश्रू न गाळत त्या दिवशी तो खूप रडला. आईला वाटले दमून भागून आल्यामुळे सिद्धार्थने असे केले असेल तिने पण त्याला मायेने गोंजारत थोडा वेळ तसेच दोघे थांबले. सिद्धार्थसाठी सगळे संपले होते पण आईमुळे आणि आईसाठी जगण्याचा श्वास त्याने राखून ठेवला होता.
- हर्षद कुंभार
क्रमश:..
#harshadkumbhar #kshankahiwechalele #marathi #article #marathiwriters #blogspot #india #wai #satara #maharashtra #pune #mumbai #bloggers #marathiblog #marathibloggers #story #breakupstory #breakup #love #लघुकथा #मराठी #हर्षदकुंभार #क्षणकाहीवेचलेले #प्रेम #कथा #ब्लॉग
Copyrights to @harshadkumbhar
भाग -२
नांदेड एनजीओ
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Tuesday, April 27, 2021
लसीची रांग
लसीची रांग
तारीख : २६/०४/२०२१
वेळ : सकाळी ७:००
स्थळ : प्राथमिक आरोग्य केंद्र, भुईंज, वाई.
आदल्या दिवशीच मामींचा कॉल आला उद्या लसीची नोंदणी झाली आहे सकाळी लवकर जावून नंबर लाव. त्यानुसार मी सकाळी ७ च्या आधीच केंद्रावर पोहोचलो, पाहतो तर काय माझ्या आधीच १४ जण रांगेत उभे आहेत. तिथे असलेल्या नर्स बाईंना नाव नोंदवून घेण्यासाठी विचारले तर त्या म्हणाल्या आजपासून कागदावर नाव नोंदवले जाणार नाही. शुक्रवारी असेच केले होते आणि त्यानंतर बराच गोंधळ झाल्याने ते बंद केले आहे. तुम्हाला इथेच रांगेत उभे राहावे लागेल. मी आपला सकाळी सरळ काही न आवरता इथेच आलो होतो म्हणले नाव नोंदवून मग घरी सगळे आवरून नंतर आरामात मामींना आणले असते. पण आता तिथेच थांबणे भाग होते त्यात रांगेतील लोक बर्यापैकी वयस्क मंडळी होती म्हणले आपण पण थांबू थोडा वेळ नंबर लावून मग जाऊ आणायला. त्यांना मागच्या वेळी लस न घेता घरी जावे लागले होते म्हणून आधीच काही जण चिडलेले होते. त्यातील एक वयस्क सेवानिवृत्त शिक्षक असल्याने त्यांनी रांगेची शिस्त लावली होती ती बराच वेळ टिकली पण होती. त्या वयस्कर लोकांमध्ये मला धरून २/३ तरुण असतील जे कोणासाठी तरी रांगेत उभे होते. हळू हळू लोक येयला लागली होती.
मुळात दहा वाजता सुरू होणारे लसीकरण असले तरी फक्त दिवसागणिक १००/१५० होत असलेल्या लसीकरणात आपला नंबर लागावा म्हणुन लोक सकाळी सात वाजता नंबर लावत होती. काही न खाता पिता ही लोक तिथे आली होती एकदा का रजिस्टर वर नाव नोंदविले की घरी जाऊन आवरून येऊ या धारणेतून सकाळचा हा खटाटोप. पण आजचे चित्र वेगळे होते कोणाला जाता आले नाही १०:३० वाजे पर्यंत तरी. बघता बघता रांग खूप मोठी झाली जवळपास ४०० पर्यंत नंबर झाले होते. जुना अनुभव असलेली जागरूक लोक थोड्या थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा रांगेतील लोक मोजत होती. कारण एकच आज तरी आपला नंबर लागेल का?. सगळ्यांनाच नाही जमत घरची कामे सोडून सकाळी रांगेत उभे राहायला त्यामुळे केंद्राने दिलेल्या वेळेत ते येत होते.
तिथे असलेल्या नर्स पण वारंवार सांगत होत्या तुमचा नंबर तुम्ही लक्षात ठेवा इथे आम्ही नोंदवत नाही. तुमच्या मागे आणि पुढे असलेल्या व्यक्तीला पाहून ठेवा. सर्वात पहिला नंबर असलेली बाई गेले ४ दिवस येत होती पण उशीर होत असल्याने तिला लस मिळत नव्हती त्यामुळे ती आज ६ लाच आली होती लांबून नक्की गाव माहीत नाही. काही लोक इतक्या वेळा येवून गेली होती की त्या नर्स बाईंना पण आता ती लोक माहीत झाली होती त्यातील ही बाई पण एक होती. एक आजोबा तर चक्क पूर्ण तयारीनिशी घरून डब्बा, पाणी आणि बसायला छोटासा स्टूल पण घेऊन आले होते. त्यांच्या सोबत कोणी नव्हते त्यांच्या ऐवजी रांगेत उभे राहायला त्यामुळे त्यांना हे सर्व करणे भाग होते.
काही लोक दुसर्या डोस साठी रांगेत होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना वेगळी रांग हवी होती पण तितके व्यवस्थापन तिथे नव्हतेच. मुळातच एक मुख्य प्रवेश असलेले केंद्र तिथे #covid तपासणी साठी पण त्याच बाजूने आत जात होते. आज रांग पाहून शेवटी पोलिस तिथे आल्याने तपासणी साठी आलेल्या लोकांना केंद्राच्या मागील बाजूने येण्यास रांग लावायला सांगितली गेली. विदारक चित्र असे होते की मुळात आम्ही उभे असलेली रांग पण रेशनच्या रांगेसारखी जवळपास खांद्याला खांदा लावून लागली होती. अंतरावर उभे राहण्याचे महत्व एकालाही नव्हते. काहींनी मास्क नावापुरता तोंडाला लावला होता कारण त्यांना तंबाखू थुंकायला बरे पडते ते पण अगदी जवळच, रांग सोडून लांब थुंकणे त्यांना सोयीचे वाटले नाही.
सकाळपासून म्हणजे २ तास झाल्यानंतर बर्यापैकी सगळे चेहेरे ओळखीचे वाटू लागले होते. कोण कोणत्या नंबरला आहे माझ्या मागे पुढे कोण आहे हे कळले होते. कंटाळून खूप जण खाली जमिनीवर बसून गेले. केंद्रात झाडे खुप असल्याने सावली चांगली होती आजुबाजूला अगदी गर्द अशी त्यामुळे सर्वांना हा उन्हाळा सुसह्य वाटत होता. Social Distancing अजूनही कोणी पाळत नव्हते या परिणाम कदाचित काही दिवसांनी दिसून येईल. आमच्या मागे काही बायका तर ग्रुप करून गप्पा मारत बसल्या होत्या आणि काही तर चक्क दगडाचे सागर-गोटे खेळ खेळत होत्या. ज्याला कोणाला इथे केंद्र आहे हे माहीत नसेल त्यांना दुरून एखादी पिकनिक चालू असेल असे नक्कीच वाटेल.
वयस्कर लोकांमधे ही पण एक चर्चा होती की १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण आहे तर तेव्हा अक्षरशः चोंबाळ (हा त्यांचा शब्द आहे) होईल. कदाचित हाणामारी पण होईल तरुण पोरांची त्यांना असेही वाटत होते की निदान ४५ वरील लोकांचे तरी लसीकरण पूर्ण होऊ देयला पाहिजे होते. वयस्क व्याधींनी ग्रस्त लोकांना मरण जवळ आल्याचा भास होतो आहे हे यातून कळले. तरुण पोर त्यांची प्रतिकार शक्ति चांगली असते ते कसेही वाचतील पण आमच्या सारख्यांचे काय हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. त्यामुळे ह्या शेवटच्या आठवड्यात लस घेतलीच पाहीजे म्हणुन झालेली ही गर्दी आहे हे माझ्या ही लक्षात आले होते. माझ्या सारखे कमी जण होते जे कोणासाठी तरी रांगेत उभे असतील. काही बायका तर आमचा परवा दिवशी शेवटपर्यंत चोथा नंबर होता आता तरी पुढे मिळवा लवकर म्हणुन बऱ्याच वेळ भांडायला लागल्या पण कोणीच त्यांचे ऐकत नव्हते. शेवटी काही समंजस लोक त्यांना आपल्या जागेत पुढे मागे घेत होते ते पण अश्या अटी ने की सर्व जण २-२ जणांचे नंबर लावू शकत होते (हा नियम रांगेतील लोकांकडूनच जन्माला आला होता केंद्राकडून असे काही निर्बंध नव्हते त्यामागे कारण ही असे होते की आधीच्या काही दिवसात कोण एक माणूस येत आणि गावातील १० लोकांचे नाव नोंदवत लस घेयचा म्हणुन बाकी लोकांची अर्थातच गैरसोय होत होती आणि नंबर लावून पण लस मिळत नव्हती). आणि जे एकटे आले होते त्यांनी अश्या लोकांना आपल्या नंबर सोबत दिले होते त्यातील मी पण एक होतो.
२-३ तास उलटून गेले होते आणि काही वेळात लसीकरण सुरू होईल असे नर्स बाईंनी सांगितल्यावर लोकांची आता एकमेकांना ओळख असल्याने प्रत्येक जण आपापल्या घरी जावून सोबतच्या व्यक्तीला आणत होते. काही जण जेवून-खावून येतो असे बोलुन ही गेले होते. मी पण मामीं ना १०.३० च्या आसपास आणायला गेलो होतो. मी सकाळी आलो तेव्हा माझ्या पुढे एक गृहस्त होते ते सकाळी कानटोपी, मास्क असे लावून आले होते आणि त्यांना धार काढायला जायचे आहे म्हणून मला आणि आमच्यापुढे असलेले शिक्षक त्यांना सांगून गेले होते. मी जेव्हा परत आलो तर माझ्या पुढे वेगळेच कोणी आले की काय म्हणून मी विचारणा केली कारण सकाळी गेलेला माणूस वेगळ्याच कपड्यात होता. शेवटी त्याने मीच तो धार काढायला गेलो होतो (एकदम हसा पिकली रांगेत) सांगितले तेव्हा हायसे वाटले की बाबा तोच माणूस आहे.
११ वाजले तसे सातारा वरून एक गाडी लस घेऊन आली आणि आमचा जीव भांड्यात पडला कारण काहींना शंका होती लस येईल की नाही. आता पटापट सगळे लसीकरण उरकून घरी जाता येईल. पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न (मामींच्या तोंडातील वाक्य) तसेच काहीसे घडले होते. आधीच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे लसीकरण १०-१० च्या संखेने पटकन उरकते आणि आमचा नंबर १५ (x२ = ३०) धरला तरी लवकरच लागला पाहिजे. पण इथे पहिलेच ५ मध्ये ३० मींन पेक्षा जास्त वेळ लागत होता. न राहवून आम्ही चौकशी केली असता असे कळले की आधार कार्ड ची वेबसाइट खूपच हळू हळू चालत आहे त्यामुळे प्रत्येकाच आधार कार्ड तपासून पुढे पाठवायलच खूप वेळ जात आहे. वयस्क लोकांना हे टेक्निकल कारण समजून सांगायला आमची दमछाक होत होती ती वेगळी. ९५ टक्के वयस्कर रांगेत होते ज्याना त्यांचा मोबाइल नंबर देखील माहीत नव्हता त्यांनी एक छोट्या कागदावर लिहून आणला होता त्यांना कम्प्युटरच हळू चालतोय हे कारण पटलेले होते.
बराच वेळ गेला १२ वाजून गेले तरी पहिले १० पण नंबर झाले नव्हते. शेवटी मामी म्हणाल्या तू जा घरी आवरून, जेवण करून ये आरामात मी तुला कॉल करेन माझे झाले की ये आणि त्यांना कळून चुकले होते की इथे खूप वेळ जाणार आहे. आणि मला पण २:३० वाजता ऑफिसची शिफ्ट चालू होणार होती त्यामुळे नाईलाजाने जाणे भागच होते. मी घरी आलो आंघोळ, जेवण करून बसलो, म्हणले आता तरी झाले असेल काम लवकर म्हणून कॉल केला तर अजून वेळ आहे सांगितले मामींने. तोवर २;३० पासून वाजून गेले मी ऑफिसच्या कामाला लॉगिन केले असले तरी मी घेयला येतो म्हणून आधीच सांगून ठेवले होते. ३ च्या आसपास काहीतरी त्यांना लस मिळाली असा त्यांनी मला कॉल केला आणि त्या त्यांच्या मुलासोबत त्या घरी आल्या जो की कामासाठी कालच बाहेर गेला होता तो नेमका त्यावेळी आला.
ही अशी रांग प्रत्येक गावात तुम्हाला दिसेल, तुम्हाला ही असे अनुभव आलेच असतील. हे मी घालवलेले ५ तास लसीच्या रांगेतले. यातून हे पण कळते की आपली यंत्रणा अजून खूपच मागे पडते आहे. अजून १२५ करोंड लोकांना लस मिळे पर्यन्त काय माहीत कोणते वर्ष उजाडलेले असेल. तोवर सगळ्यांनी कृपया काळजी घ्या वयस्क लोकांना जपा.
हर्षद कुंभार
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.

