फक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...
All The Contents by Labels
Wednesday, December 18, 2019
मेरे हिस्से का सूरज
Sunday, December 15, 2019
सुविचार १५/१२/२०१९
Thursday, December 5, 2019
Sunday, December 1, 2019
स्वतः चा वेळ
Friday, November 29, 2019
कर्म कांड
Tuesday, November 26, 2019
सुविचार 26/11/2019
Saturday, November 23, 2019
सुविचार - 23/11/2019
Monday, November 18, 2019
Sunday, November 17, 2019
ख़ामोशी की दुनिया
Saturday, November 16, 2019
Thursday, November 14, 2019
सुविचार १४/११/२०१९
Sunday, November 10, 2019
सुविचार १०/११/२०१९
Thursday, November 7, 2019
Wednesday, November 6, 2019
Monday, November 4, 2019
Sunday, November 3, 2019
सुविचार - ०३/११/२०१९
Monday, October 28, 2019
सुविचार - २८/१०/२०१९
Wednesday, October 23, 2019
सुविचार - २३/१०/२०१९ ९:३७
Tuesday, October 22, 2019
love with togetherness
तेरी और मेरी सांसों में आने वाली हवा
अगर एक ही है तो समझ लेना
अपना प्यार अभी भी बरकरार है. - हर्षद कुंभार
#harshadkumbhar #KshanKahiWechalele #quotes #hindiquotes #hindiquote #pune #maharashtra #poetry #loveforever #love #loveforever #lovequotesसुविचार - २२/१०/२०१९ १०:३०
आपले लक्ष कोणाला सांगू नका त्यापेक्षा आपली मेहनत लक्षात येऊ द्या.
"यशाची वाहवा मिळवण्यापेक्षा मेहनतीची प्रशंसा कधीही चांगली."
#harshadkumbhar #KshanKahiWechalele #marathi #quotes #maharashtra #pune #quote #oneliner #quoteofthedayWednesday, October 16, 2019
कवित्व
कवितेच्या चार ओळींमध्ये ही…
छान आयुष्य जगता येते,
फक्त चार ओळी सुचायला…
मन तेवढी मोकळीक मागते.
दिवसातला एक क्षण ही…
पुरतो कवित्व जागवायला,
फक्त तो क्षण येयला पण…
भावनांचे प्रलोभन लागते. - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #marathikavita #kavita #poetry
Monday, September 30, 2019
लिहिता राहो...
लिहिता यावे सारे काही…
हाच माझा स्वार्थ आहे,
मन माझे कृष्ण अन…
मी लेखणीतला पार्थ आहे.
हे कागदच माझे रणांगण…
साधायचा तो परमार्थ आहे,
अंत पर्यंत लिहिता राहो…
तर जीवन हे सार्थ आहे. - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #marathi #kavita #marathikavita #poetry #pune #maharashtra #marathimulga
Sunday, September 15, 2019
तु नसताना मला तुझा भास होतो
तु नसताना मला तुझा भास होतो
आपले पिल्लू माझ्या पाठीशी
घुसलेले असते तेव्हा जाग येते ,
डोळे अलगद उघडून पाहिले तर
निरागस ते शांत झोपलेले असते ,
वळून मग तुला ही नजर शोधते,
झोप गेलेली नसते पण
तुझे प्रथम दर्शन घेण्याला ही नजर जागीच असते,
मग तू येतेस रोजच्या डब्बा बनवण्याच्या घाईत मला उठवतेस ,
रोज नित्याची ही सकाळ
तू नसताना मला तुझा भास होतो.
आवरताना पिल्लूच मागे मागे फिरणे
बेल्ट, डब्बा गाडीची चावी मिळेल त्या वस्तू सोबत खेळत बसणे ,
आवरून सारे निघताना तुम्हा दोघांचा मला पडलेला घेरा,
पिल्लूच गोड पण स्पष्टपणे केलेले बाय बाय
तुझ शेवटी "लवकर ये" बोलणे ,
आज निघताना तू समोर नसताना मला तुझा भास होतो.
दिवसभर ऑफिस मध्ये भले मिनिटा-मिनिटाला नसेल बोलत पण
एखादा तरी मेसेज असतोच,
शेवटी "कधी निघणार" हा हक्काचा प्रश्न विचाराला जातोच,
मी पण अंदाजे वेळ सांगून ती पाळायचा पूर्ण प्रयत्न करतो
निघताना "निघतो" हा रीप्लाय करत घरचा रस्ता धरतो,
गाडी चालवताना हे सारे आठवते तू नसताना मला तुझा भास होतो.
दारावरची बेल वाजवली की पिल्लू धावत येवून
दाराजवळ घुटमळत बसते,
तु दार उघडल्यावर तिचे गोड हास्य माझे स्वागत करते,
पुन्हा सुरू होते तिचे मागे मागे फिरणे आणि उचलून घेण्याचा हट्ट करू लागते.
आज घरी आल्यावर तू नसताना मला तुझा भास होतो.
फ्रेश होऊन बसलो की
चहाचा वाफाळता कप घेऊन तू येतेस,
दिवसभराचा क्षीण मग
काही घोट घेत नाहीसा होतो,
जोडीला काही गप्पांची सोबत घेत
चहाची मज्जा द्विगुणित होते.
आज एकट्याने चहा घेताना मला तुझा भास होतो.
रात्रीच्या स्वयंपाकात तुझी सोबत मिळावी म्हणून
थोडा मदतीचा आधार घेतो,
अर्धा अर्धा स्वयंपाक करण्याचा थोडा मान घेतो,
पिल्लूच्या लुडबुडने जरा उशीरच होतो,
तिला पण कडेवर घेत थोड बाळकडू देतो,
आज किचन मध्ये तू नसताना मला तुझा भास होतो.
पिल्लूच जेवण आपल्या आधीच असते
तिला भरवताना मात्र तुझी चांगलीच दैना उडते,
नंतर आपण जेवताना तिच्यासाठी ही ताट मांडावे लागते
खोट खोट आमच्यासारखे तीही मग नाटक करते,
आज एकट्याने जेवताना मला तुझा भास होतो.
पिल्लूच्या उशीरपर्यंत जागण्याने
आपला दिवस रात्री उशिरापर्यंत सुरूच असतो,
तिच्याशी खेळत पण वेळेचे भान ही नाही उरत
तिला झोपवताना तुझी अंगाई ही कमी पडते,
शेवटी दमून भागून तुम्ही दोघीही झोपता
पूर्ण दिवस असा काहीसा मावळतो,
आज पूर्ण मोकळ्या घरात तू नसताना मला तुझा भास होतो. - हर्षद कुंभार
#harshadkumbhar #KhanKahiWechlele #maharashtra #pune #blogger
#marathi #kavita #marathikavita
Wednesday, September 11, 2019
त्या वळणावर
रमलो पुन्हा मी त्याच वळणावर…
जिथे तू एकदा हसली होतीस,
प्रवास केला मी आठवणीतला…
जिथे तू मला एकदा भेटली होतीस.
भले आज तुझा - माझा मार्ग वेगळा…
पण प्रेमाचा उगम एकच होता,
शिकलो मी लढायला तुझ्यामुळे…
बहुतेक जगण्याचा तो ही एक भागच होता.
असो पण आयुष्याच्या मावळत्या वेळी…
जेव्हा नसतील कोणतीच बंधने,
पुन्हा तू मला भेटशील का त्याच वळणावर?
थकले असेल शरीर जरी चालतील ही स्पंदने. - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #maharashtra #pune #poetry
Sunday, September 8, 2019
सपने
कुछ सपने ऐसे भी होते हैं की वो सपनों में ही अच्छे लगते हैं हकीक़त में नहीं। - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #hindi #quotes #oneliner #quoteoftheday #hindistatus #hindiquote #quote
Saturday, September 7, 2019
चांद्रयान 2.0
वो मोहब्बत धरती की, जो इतनी दूर से लाया था।
ए चाँद, तूझे हमारा विक्रम मिलने आया था।
अनहोनी सी हो गई, जब मिट्टी चूमने झुका था।
थे कुछ मीटर के फासले, अब अनंत काल में रुका था।
पर वादा हैं तूझसे ए चाँद, लौट के फिर से आयेगें।
इस बार सिख के गए हैं, कल इतिहास ज़रूर बनाएँगे। - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #hindi #poems #poetry #isro #chandrayan2 #ISRO #Chandrayan
Wednesday, August 28, 2019
संधी पुन्हा नव्याने
कधी कधी आपल्याला एखाद्या काळ्या कुट्ट अंधारात ढकलले जाते पुन्हा नव्याने जन्म घेण्यासाठी पण हे ढकलणे म्हणजे जमिनीत पेरलेल्या बिया सारखे असते आणि आपल्या अंगी-भूत गुणांवर ठरते हारुन कुजून जायचे की लढून रुजुन रोप बनायचे.
काळाने जरी फेकले तुला…
एकट्याला गर्द काळ्या गर्भात,
विसरू नको त्या बियाणाला…
पेरले ज्याला मातीच्या पोटात.
संधी दिली पुन्हा नव्याने…
जन्म घेण्या राखेतून,
परिस्तिथीला नको देऊ दोष …
उभारून ये परत त्या गोटातून.
तुझ्या अंगीचे गुण तूच जाण…
अन ठरव हारून कुजून जायचे की,
परिस्तिथीशी दोन हात करून…
गर्भातून रुजुनच बाहेर पडायचे. - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #maharashtra #pune #poetry
Monday, August 19, 2019
Poetry Life
ज़ख्म सा लगाता है,
खाली खाली बीता दिन।
कभी कभी दो पंक्तियाँ,
जरासा मरहम बन जाती है.
दर्द नहीं होता कोई,
मगर उदासी छाई रहती है।
पर लिख गया दिल कुछ तो,
जीने की राह मिल जाती है। - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #hindi #poems #poetry
Wednesday, August 7, 2019
दुःख
जेव्हा दुसर्याच्या दुःखाला
महत्व आणि गांभीर्य द्याल,
तेव्हा स्वतः च्या दुःखाला पण
योग्य न्याय मिळेल. - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #quotes #maharashtra #pune #quote #oneliner #quoteoftheday
Tuesday, July 30, 2019
लेखकाच्या नजरेतून
लेखकाच्या नजरेतून
बर्याच वेळेला असे होते की एखादी भावना मनात चमकून जाते वीज कडाडून क्षणात निघून जावी तशी. पण मनाच्या नभात त्या भावनांची गडगडाट नाद स्वरुपात बराच काळ टिकून राहते. काही वेळेला त्या लगेच कागदावर उतरवणे जमते तर काही वेळा नाही.
सारा क्षणाचा खेळ आहे पण अशातही बरेच लोक ती भावना जपून ठेवतात, मनाच्या लॉकर मध्ये जसे सोन्याचे बिस्किट ठेवतो ना तसे. नंतर फुरसत मध्ये पण त्या भावनेची घडणावळ केली जाते आणि एक शब्दांचा साज, मुलामा देऊन त्या भावनेला सुंदर गद्य किंवा पद्य रुपात कागदावर उतरवले जाते. - हर्षद कुंभार
Monday, July 29, 2019
ख्वाहिश...
जिंदगी के समुंदर में,
ख्वाहिशें कुछ फेंकी थी।
पर मुसीबतों की लहरों ने,
सारी किनारे कर दी।
शायद बेखौफ लहरें,
इरादों में ज्यादा मजबूत थी।
और मेरी चाहत,
कुछ कमजोर थी। - हर्षद कुंभार
ती एक रहस्यमय रात्र
ती एक रहस्यमय रात्र
खूप जुना किस्सा आहे असे नाही पण १-२ वर्षे झाली असतील. प्रसंग तसा छोटाच आहे पण अजुनही सस्पेन्स मध्ये आहे. ही गावाकडे घडलेली घटना आहे त्याचे झाले असे की. मी, माझा भाऊ आणि मेहुणा आम्ही रात्री माझ्या कार मध्ये झोपायला गेलो होतो.
कार मध्ये झोपायला जाण्या पूर्वीची कहानी अशी होती की मला गावी थंडी मध्ये प्रचंड सर्दी आणि कफचा त्रास होतो अजुनही. आणि गावी त्यावेळी आमचे घर म्हणजे स्टील चे पत्रे असलेले त्यामुळे रात्री थंडी खूप प्रमाणात घरातील वातावरण थंड करून टाकायची. अश्या परिस्थितीत झोप येणे शक्य नसायचे. रात्रभर जागून काढायचो कारण झोपलो की छाती पूर्ण जॅम होत असे आणि श्वास घेण्यासाठी पण त्रास होत होता.
त्यावेळी मी असाच ४-५ दिवसा करीता गावी गेलो होतो आणि पहिल्याच दिवशी मला त्रास झाला. मग काय उपाय काय करावा म्हणुन मला आयडिया सुचली की कारचा ऐसी गरम वर ठेवून झोपू म्हणजे झोप लागेल. कारण झोपण्यापूर्वी कितीही शेकोटीच्या शेजारी बसलो तरी मध्य रात्री पुन्हा तीच अवस्था होत होती. आणि गावाकडील लोक तर म्हणायची की शेकोटी शेकली की अजून थंडी वाजते.
दुसर्या दिवशी माझे ठरले होते गाडीतच झोपायला जायचे तशी वडीलांना पूर्वकल्पना दिली होती. पण त्यातही एक चिंता वजा भीती मला होती ही की एकट्याने कसा झोपू. कारण गाड्या खाली पार रस्त्याच्या कडेला लावलेल्या असतात. हा रस्ता म्हणजे सातारा-वाई रस्ता रात्री वाहने कमीच असतात आणि शहरी भागातील असणारे पथदिवे इथे नाही त्यामुळे चहूबाजूंनी काळाकुट्ट अंधार.
यावर उपाय आणि सोबत म्हणुन मी माझ्या चुलत भावाला तयार केला अर्थात त्याला माझा थंडीचा त्रास माहीत होता. तो म्हणजे एक भाऊ कमी आणि दोस्त जास्त त्यामुळे आम्ही एकमेकांना नेहमीच प्रत्येक प्रसंगात साथ देत असतो. मग काय आमचे ठरले २ गोधडी घेऊन जाऊ आणि गाडीत झोपू असे ठरले.
रात्री १० च्या सुमारास जेव्हा पूर्ण वाडीतील लोक अर्ध्या झोपेत पोहोचली तेव्हा आम्ही निघालो गोधडी घेऊन आणि जाताना मध्ये मेहुणा भेटला. त्यांचे घर खाली रस्त्याकडे जाताना मध्ये लागते म्हणुन जाताना त्याला आवाज देऊन गेलो तर तो पण येतो म्हणाला.
गाडीत आम्ही किती वेळ तरी गप्पा मारल्या तरी रात्री १२-१ झाले तेव्हा कुठे जरा झोप येऊ लागली. हे दोघे झोपून पण गेले मी आपला जरा झोप लागेल का नाही या धास्तीने झोपेचा प्रयत्न करत होतो. आता गाडीत शेवटी अवघडल्यासारखं होत असल्याने किती झोप येणार मग मेहुणा म्हणाला मी जातो घरी झोपायला आणि तो गेला. आता गाडीत पुढे मी आणि मागच्या सीट वर भाऊ असे दोघे होतो.
बाहेर कडाक्याची थंड होती त्यामुळे गाडीचा ऐसी गरम वर ठेवल्याने मस्त वाटत होते. पण पुढे बसुन बसुन काय झोप येईना मला आणि भाऊ मात्र मागे मस्त आडवा होऊन झोपी गेला होता.
अधून मधून एखादी गाडी ये जा करत होती. मी गाडीत बसून जागा होतो त्यामुळे आजुबाजूला लक्ष जात होते.
रात्री उशिरा २-३ आसपास अशीच एक टाटा सुमो गाडी आमच्या वाडीच्या जवळ येउन थांबलेली मी पाहिली. मी जरा जागाच होतो त्यामुळे साहजिक माझे लक्ष गेले आणि पाहू लागलो तर गाडी मुळात येतात हेड लाइट बंद करून आली होती आणि जवळ येऊन थांबली आणि त्यातून २ माणसे उतरली आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेला प्राणी आता तो कुत्रा होता की बकरी की कोंबडी देव जाणे. मलाही स्पष्ट दिसत नव्हते ते त्यांनी पोत्यात घालून गाडीत टाकून पसार झाले.
हा काय प्रकार घडला मी आपला लपून हे सगळे पाहिले होते आणि भावाला उठवणार तर तितका वेळ त्या चोरांनी दिला नाही इतक्या जलद गतीने त्यांनी ते सारे केले होते. झाले आता तर काय टेंशन मध्ये मला काय झोप लागली नाही आणि रात्रभर मी पाळत ठेवल्या सारखे जागा राहिला होतो.
दुसर्या दिवशी मी घडला प्रकार सांगितला पण कोणाचे काही चोरीला गेल्याचे कोणी बोलले नाही. आता मात्र मला कळेना झालेला प्रकार खरच घडला होता की माझा भास. त्यामुळे ती घटना एक रहस्य बनून राहिली आहे. - हर्षद कुंभार
#harshadkumbhar #KshanKahiWechalele #memories