लेखकाच्या नजरेतून
बर्याच वेळेला असे होते की एखादी भावना मनात चमकून जाते वीज कडाडून क्षणात निघून जावी तशी. पण मनाच्या नभात त्या भावनांची गडगडाट नाद स्वरुपात बराच काळ टिकून राहते. काही वेळेला त्या लगेच कागदावर उतरवणे जमते तर काही वेळा नाही.
सारा क्षणाचा खेळ आहे पण अशातही बरेच लोक ती भावना जपून ठेवतात, मनाच्या लॉकर मध्ये जसे सोन्याचे बिस्किट ठेवतो ना तसे. नंतर फुरसत मध्ये पण त्या भावनेची घडणावळ केली जाते आणि एक शब्दांचा साज, मुलामा देऊन त्या भावनेला सुंदर गद्य किंवा पद्य रुपात कागदावर उतरवले जाते. - हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment