Saturday, May 26, 2018

पक्षी मी थव्यातला ...
या कवितेचा संदर्भ किती लोकांना लागेल मला कल्पना नाही पण आज एका ठिकाणी इंटरव्यूसाठी गेलो होतो तेव्हा त्या वातावरणातील जाणवलेला भाव अलगद  असा उमटला.

पक्ष्यांच्या त्या थव्यात …
ढंग माझा वेगळा,
नव्याचा साज अंगी…  
पण जरासा घाबरलेला.

गप्प विसावतो त्याच झाडावर…
एकटा मी कोपर्‍यात फांदीवर,
किलकिलाट थव्यात सार्‍या…
पण मी माझा स्वर शोधतो.

एक दिवस माझीही असेल …
झेपही तीच, घिरटीही तीच ,
त्याच हवेतला, वाऱ्यावर उडणारा…
मी ही होईल त्या थव्यातला.  - हर्षद कुंभार (२६/०५/२०१८ १२:१५ दुपारी)

#KshanKahiWechlele #harshadkumbhar #marathi #poem #feeling
#क्षणकाहीवेचलेले #हर्षदकुंभार #मराठी #कविता #भावना   Post a Comment

ब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर