---------------- आयुष्य काय असावे ---------------
झेप घ्यावी अशी …
स्वप्नांच्या पलीकडे,
वास्तव दिसेल जिथे ...
डोळ्यांच्या पुढे.
मार्ग एक निवडावा …
अवघड जरा ,
लागून कस इच्छांचा …
निर्णय होईल खरा.
सिध्द करावे स्वतः ला…
ध्येय काही आखून,
आयुष्य काय असावे …
द्यावे जगाला दाखवून. - हर्षद कुंभार (२४/०५/२०१८ रात्रौ १०:१०)
#KshanKahiWechlele #harshadkumbhar #poem #poerty
#मराठी #कविता
No comments:
Post a Comment