स्वभाव दर्शन….
रोज बाईकने अॉफिसला जाताना-येताना केलेले हे निरिक्षण आहे. आपल्या गाडी चालवण्याच्या पध्दतीवरुन स्वभावाचे संबंध जोडून काही गोष्टींवर मत मांडले आहे. बघा पटतंय का…
प्रथम वर्ग - ज्यात सर्व प्रकारच्या व्यक्ती आढळून येतात. जसे की जेष्ठ, मध्यम वयस्कर आणि तरूण जे संथ गतीने गाडी रस्त्याच्या कडेने चालवताना दिसतात. गाडी चालवताना येणारा प्रत्येक क्षण फुल अॉन जगायचा असेच समजुन. कसली काळजी नसलेली आपल्याच मुड मधे असतात. गाडी चालवताना कोणाला कसला त्रास देत नाहीत किंवा होणार नाही याची काळजी घेतात. याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात लागु पडतात. ( माझी ही सर्वात आवडता वर्ग आहे )
याच वर्गातील उपगट येतो वरीलपैकी सर्व गुण येतात पण एक बदल असा की हे लोक बरोबर रस्त्यांच्या मध्ये गाडी चालवताना आढळून येतात. आता हे लोक जरी स्वतः च्या तंद्रीत असले तरी मागच्या लोकांना त्रास होतो आहे हे कळत नाही यांना. त्यामुळे कायम बोल खाण्याची वेळ येते त्यांच्यावर खऱ्या आयुष्यात सुध्दा.
दुसरी वर्ग - नोकरपेशा वर्ग… यांना कायम घाई असते. एकतर घड्याळ्याच्या काट्यावर चालतात त्यामुळे सदा ना कदा गडबडीत असतात. स्वतः साठी किंवा दुसर्याला देयला वेळ अजिबात नसतो. गाडी चालवताना अॉफिसला लवकर जायचे म्हणून मिळेल तो, जमेल तो रस्ता वापरून गाडी चालवतात पण हे कोणालाच त्रास देत नाहीत. उशिरा पोहोचण्याचे सर्वात जास्त बळी हे लोक असतात इतकी घाई करून पण.
तिसरा वर्ग - तरुण पिढी कारण नसताना उगाच गाडी दामटत असतात, सालेंसरचा फाटका कर्कश आवाज, त्यात त्यांना कुठे जायची घाई असते देवाला माहिती म्हणून हॉर्नच्या बटनवर बोट चिटकवल्यागत हॉर्न वाजवत असतात. त्या गाडीचा खुळखुळा करून ठेवतात बिचार्या गाडीबद्दल सहानुभूती वाटते. ज्यांना निर्जीव वस्तू बद्दल जाणिव नसते ते सजीवांना काय न्याय देणार. यांचा सगळ्यांना त्रास होतो त्यात रस्त्यावरील लोक तर येतातच शिवाय त्यांच्या आयुष्यातील पण.
चौथा वर्ग - हा फक्त त्यांच्यासाठी आहे जे लोक वाहतूकीचे नियम पाळतात. यात मुख्यत्वे करून सिग्नल यंत्रणा पाळणे हे महत्वाचे मानले पाहिजे आणि त्यांना माझा सलाम पण. कसली गडबड नाही की घाई नाही वेळेला महत्व देऊन कामे करतात. त्यामुळे सगळे व्यवस्थित पार होते अश्या लोकांचे कारण नियमानुसार चालले तर आयुष्यात ट्रॅफिक पण होत नाही आणि आयुष्याचा रस्ता सुखकर होतो नाही का. (हा माझा वर्ग आहे आणि आवडता पण)
तर मंडळी आता तुम्ही कोणत्या वर्गात मोडता ते पहा.
-हर्षद कुंभार (०७-१२-२०१७ ०५.३०)
#KshanKahiWechalele #harshadkumbhar
No comments:
Post a Comment