तो एक बेफिकीर क्षण…
का भरभरून जगत नाही ?
आपलेच दुख, आपलेच सुख…
तरी समतोल साधत नाही !
असीम विचारांच्या गर्तेत …
का जीव अडकून पडतो ?
विचारही माझे, मनही माझे …
तरी चित्त साधत नाही !
उद्याची चिंता, कालची खंत …
का स्वस्थ जगू देत नाही ?
आजचा दिवस हातात …
तरी जगणे साधत नाही ! - हर्षद कुंभार (२३/१२/२०१७ १२:०२ रात्रौ )
#KshanKahiWechlele #harshadkumbhar
No comments:
Post a Comment