All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, May 1, 2021

Old School - नकाराचा दिवस






Old School - नकाराचा दिवस 


गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा स्मार्ट फोन नव्हते आणि ३००० SMSचा रिचार्ज मिळायचा फक्त ३० रुपये मध्ये. २००५ च्या आधी आणि २००० नंतरचा साल तेव्हा चॅटिंग ही SMS नेच होत होती. 


अंकिता आणि सिद्धार्थ एकाच चाळीत रहात होते. अगदी लहानपणापासून त्यांची मैत्री आणि घरी ये जा होत होती. दोघे ही जसे जसे वयात येत होते तसे ते एकमेकांत गुंतत चालले होते. पण कोणीही पुढाकार घेत नव्हते जे आहे ते हक्काचे आहे असे गृहीत धरले होते आणि योग्य वेळ आली विचारू असे मनोमनी दोघांनी ठरवले होते. जेव्हा कॉलेजचे दिवस होते तेव्हा दिवस भर एकत्र असायचे आणि घरी आल्यावर पण SMS मध्ये चॅटिंग होत होती. त्यांना ही ओढ जाणवत होती मैत्रीची वेस ओलांडावी वाटे पण मनाशी पक्के केलेल्या निश्चयाची त्यांना सारखी आठवण होती.


           सिद्धार्थ तिच्या पेक्षा मोठा होता त्यामुळे लवकरच त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून तो नोकरीला लागला. दोघेही खुश होते एकाचे स्वप्न पूर्ण झाले म्हणुन. अंकिताला तर अभिमान वाटत होता सिद्धार्थला नोकरी लागली त्याने त्याचे एक स्वप्न पूर्ण केले आणि त्याच्या आईचा भार हलका केला. आता तिला तिची चिंता सतावत होती कारण अंकिता अजून कॉलेजला होती लास्ट ईयर बीकॉम. तिची खूप स्वप्नं होती घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला आपोआप बंधने लागली होती. अंकिता पण तशी शांत पण महत्त्वाकांक्षी होती एकदा मनाशी पक्की केलेली गोष्ट ती पूर्ण करायचीच. ती एकुलती एक असल्याने तिला आई बाबाची स्वप्नं पूर्ण करायची होती आणि त्यासाठी तिने स्वतः च्या बर्‍याच इच्छाना तिलांजली दिली होती. सिद्धार्थ पण एकटाच होता तो आणि त्याची आई दोघे राहत होते त्याचे वडील सिद्धार्थ लहान असतानाच वारले. एकट्या आईनेच त्याला लहानचे मोठे केले त्यामुळे त्याची आई म्हणजे जीव की प्राण होती त्याच्यासाठी. 


सिद्धार्थ नोकरीला लागल्यापासून त्यांच्या मध्ये हळू हळू बोलणे कमी झाले आणि त्यांना एकमेकांना वेळ देणे कठीण झाले. सुट्टीच्या दिवशी भेट मात्र होत होती तेव्हा किती बोलू किती नये असे होत असे. इतके सगळे असून पण अजुनही कोणीच कोणाला प्रेमाची कबुली देत नव्हते. पण कळत होते की प्रेम तर आहे कधी ही विचारले तरी होकार हा असणार आहे. त्यामुळे असेच चालू ठेवत त्यांनी दिवस काढायला सुरुवात केली. सिद्धार्थला राहून राहून वाटायचे की आपण एकाच वर्गात असतो तर बरे झाले असते. एक वर्ष नापास होवून त्याला अंकिता सोबत एकाच वर्षात येयचे होते पण अंकिताला ते मान्य नव्हते त्यामुळे पुढे जाऊन अशी वेळ येणार हे देखील माहीत होते. प्रत्यक्षात होणार त्रास हा आता जाणवायला लागला होता. 


सिद्धार्थला नोकरी लागल्यापासून तसा थोडा तो निर्धास्त झाला होता त्याला वाटले की आता लपून ठेवण्यात काही अर्थ नाही. सरळ तिला बोलून टाकू म्हणजे दोघातला दुरावा तरी कमी होईल आणि तसेही लगेच काय लग्नाचा विचार नाही. त्याला अंकिताचीही तितकीच काळजी होती जेव्हढी तिला असलेल्या तिच्या जबाबदारी आणि स्वप्नांची होती. पण एकदा फक्त बोलून दाखवावे असे त्याला सारखे वाटत होते. त्यामुळे त्याने अंकिता विचारायचे ठरवले. त्या दिवशी शुक्रवार होता समोर भेटून बोलण्यासाठी सिद्धार्थची हिम्मत होत नव्हती कारण असे रोजचे बोलणे वेगळे आणि शेवटी प्रेमाची कबुली देणे हे वेगळेच होते. म्हणून त्याने तिला कॉल करायचा ठरवले आणि सगळी हिंमत एकवटून त्याने तिला कॉल करुन आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि एकदम सांगितले की माझ तुझ्यावर मनापासून प्रेम आहे अगदी लहानपणापासून हे तर तुला माहीत असेलच. आजवर बोललो नाही पण आता मला नोकरी मिळाली आहे त्यामुळे तुला सांगाव असे वाटले. 


याची काहीच कल्पना नसल्याने अंकिता त्याला मध्येच थांबवत नाही म्हणाली कारण एकदम सिद्धार्थचे असे प्रेमाचे बोलणे ऐकून अंकिता थोडी गोंधळली आणि काय बोलाव तिला सुचेना. आनंद मानावा की चिंता हेच तिला कळेना तिचेही प्रेम होते पण ही ती वेळ नाही आणि नव्हतीच निदान तिच्यासाठी तरी. आता हा एक होकर दिला तर सगळे बदलणार होते हे तिला माहीत होते. तिचे स्वप्नं, आई वडिलांची अपेक्षा या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्या समोर उभ्या राहिल्या आणि आजवर सिद्धार्थ वर केलेले प्रेम तिला फिके वाटू लागले. या सगळया विचारांच्या गदारोळात तिने पटकन नाही म्हणून सांगितले आणि “ सिद्धार्थ तू हे काय बोलत आहेस आपण तर छान मित्र आहोत ना. मग हे मध्ये प्रेम कुठून आले. आणि तसेही मला माझे करियर करायचे आहे. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मी माझा वेळ प्रेमात नाही वाया घालवू शकत. मला ते नाही जमणार माझ सगळीकडे दुर्लक्ष होईल.”  असे बरीच टोचणारी वाक्य मुद्दाम बोलून तिने सिद्धार्थला एकदम जमिनीवर आणले होते. नाही म्हटले तरी कबुली न दिल्यामुळे एक मर्यादेचे कुंपण तरी होतेच दोघांमधे इतकी वर्ष आणि तेच तिला अजून काही दिवस हवे होते. 


सिद्धार्थला तर एकदम श्वास काढून घेतल्यासारखे झाले. तो तिला समजावत होता की सगळे पाहिल्यासारखेच असेल मी फक्त प्रेमाची कबुली देत आहे. पण अंकिताला ते नको होते आता तरी, कारण प्रेमात लगेच अपेक्षा वाढतील मग नाही पूर्ण झाल्या की चिडचिड होईल आणि शारीरिक आकर्षण ही वाटेल. म्हणजे हे वेगळे जग आत्ताच तिला नको होते. तिने ठरवले होते स्वतःहून काही करियर करायचं आणि मग सिद्धार्थला कबुली देयची. पण सिद्धार्थ ने आधीच विचारून सगळे होत्याचे नव्हते केले होते. सिद्धार्थ ने खूप समजवले पण तिने ऐकले नाही आणि आपल्याच मतावर ठाम राहिली. 


त्याला काहीच सुचत नव्हते आपला अंदाज कसा काय चुकला अंकिता बद्दल या विचाराने तो वेडापिसा झाला होता. ऑफिस मध्ये कामात लक्ष लागत नव्हते. आधीच मितभाषी असलेला सिद्धार्थ कोणाला काही बोलू शकला नाही आणि ऑफिस सुटल्यावर त्याला घरी देखील जावे वाटत नव्हते. कारण आईला त्याला पडलेला चेहरा लगेच कळेल हे त्याला माहीत होते. सिद्धार्थ ने स्वतः ला या विचारांतून बाहेर पडायचे म्हणुन कुठे तरी बिझी करने महत्वाचे होते. तो सरळ ऑफिस संपले की टेबल टेनिस खेळलाय गेला. कारण हा एक टाइमपास तो नेहमी मोकळ्या वेळेत ऑफिस मध्ये करत असे आणि तिथे खेळात लक्ष देवून शरीराला त्रास दिला की मनाला काही वेळ ते  बाजूला ठेवते त्यामुळे हा प्रसंग जास्त त्रास देणार नाही असा त्याचा समज झाला. ऑफिसच काम तीन शिफ्ट मध्ये होते त्यामुळे कोणी ना कोणी सोबत खेळायला असायचे. सिद्धार्थने घरी आईला कॉल करुन सांगितले उशीर होईल तू जेवण करून झोप. खरतर त्याला त्या सगळ्या लोकांना टाळायचे होते जे रोज त्याच्याशी बोलत असत. त्यादिवशी सिद्धार्थ सकाळ पर्यंत खेळला इतका की आता शरीरातून घाम येणे ही जवळपास बंद झाले होते अगदी कोरडे ठाक शरीर ज्यात पाण्याचा एकही थेंब शिल्लक नसेल अगदी डोळ्यातून निघावा इतकाही. इतके असतानाही त्याच्या मनातील भावना मात्र वेळोवेळी जन्म घेत होत्या. त्याला कळून चुकले यातून लवकर सुटका नाही. 


दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० ला कंपनीची शेवटची कैब निघते ती करून जाणे एकदम नाईलाज असल्याने सिद्धार्थ त्याने घरी निघाला. गाडीचा वेग ही फिका वाटेल इतके विचार त्याच्या मनात पळत होते. त्याला एकाच गोष्टीचे जास्त दुःख झाले होते की नजरेची भाषा, काळजी, आपुलकी, आकर्षण या सगळ्या गोष्टी मिळून जे प्रेम जन्माला येते हे तेच होते आमच्यात पण मग तिने अश्या पद्धतीने का नकार दिला. इतकी वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो तर मला नाही का तिच्या मनातले कळणार. नाही का कळणार तिची स्वप्न तिच्या इच्छा, अपेक्षा, जबाबदाऱ्या मला. एखाद्या परक्या माणसाला उत्तर द्यावे असे तिने मला दिले होते. 


गाडी घरी जात होती पण त्याला कुठेच पोहोचायचे नव्हते इतके त्याला जग परके वाटू लागले होते. एखादा शेवट गोड वाटावा इतका त्याला अंत जवळ वाटू लागला होता, पुढे काय होईल अंकिता तर पुन्हा त्याला दिसणार होती मग भावनांना आवर घालून नॉर्मल कसे राहू हे आणि अनेक प्रश्न त्याला पडू लागले होते. गाडीच्या खिडकीतून घर जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या. ह्रदयाची धडधड इतकी स्पष्ट त्याने कधीच ऐकली नसेल त्याला अंकिता समोर दिसेल की काय भीती ने तो जास्तच धास्तावला होता. कैब ड्राइवरने मध्येच मला हाताने हलवत भानावर आणले तो कधी पासून सिद्धार्थला हाक मारत होता कुठे उतरायचे आहे म्हणून याचेही त्याला भान नव्हते. आज त्याचेच घर त्याला परके करू वाटत होते. शेवटी घराजवळच्या नाक्यावर तो उतरला तिथून त्याला पायी जायचे होते पण आज पावले पण उचलत नव्हती शरीर जड झाल्यासारखे वाटत होते. घर जवळ आल्यावर राहून राहून त्याला हे पण वाटत होते की आईला यातले काही कळता कामा नये. 


लहानपणापासूनचे प्रेम आज तिच्या नकारामुळे एक दिवसात तिरस्कार आणि राग या भावनेत कधी बदलत गेले हे त्याला ही कळले नाही. आता त्याला अंकिता समोर येऊ नये असेच वाटत होते, वर कुठेही न पाहता मान खाली घालून सिद्धार्थ घरच्या दरवाज्यात पोहोचला. थोड मन घट्ट करून त्याने दरवाजा वाजवला आणि आईने जसा दरवाजा उघडला तसा सिद्धार्थने तिला घट्ट मिठी मारली.  डोळ्यातून एकही अश्रू न गाळत त्या दिवशी तो खूप रडला. आईला वाटले दमून भागून आल्यामुळे सिद्धार्थने असे केले असेल तिने पण त्याला मायेने गोंजारत थोडा वेळ तसेच दोघे थांबले. सिद्धार्थसाठी सगळे संपले होते पण आईमुळे आणि आईसाठी जगण्याचा श्वास त्याने राखून ठेवला होता. 


- हर्षद कुंभार


क्रमश:.. 

 



#harshadkumbhar #kshankahiwechalele #marathi #article #marathiwriters #blogspot #india #wai #satara #maharashtra #pune #mumbai #bloggers #marathiblog #marathibloggers #story #breakupstory #breakup #love #लघुकथा #मराठी #हर्षदकुंभार #क्षणकाहीवेचलेले #प्रेम #कथा #ब्लॉग


Copyrights to @harshadkumbhar









भाग -२ 


नांदेड एनजीओ 








 

Tuesday, April 27, 2021

लसीची रांग

 लसीची रांग 


तारीख : २६/०४/२०२१ 

वेळ : सकाळी ७:०० 

स्थळ : प्राथमिक आरोग्य केंद्र, भुईंज, वाई. 


आदल्या दिवशीच मामींचा कॉल आला उद्या लसीची नोंदणी झाली आहे सकाळी लवकर जावून नंबर लाव. त्यानुसार मी सकाळी ७ च्या आधीच केंद्रावर पोहोचलो, पाहतो तर काय माझ्या आधीच १४ जण रांगेत उभे आहेत. तिथे असलेल्या नर्स बाईंना नाव नोंदवून घेण्यासाठी विचारले तर त्या म्हणाल्या आजपासून कागदावर नाव नोंदवले जाणार नाही. शुक्रवारी असेच केले होते आणि त्यानंतर बराच गोंधळ झाल्याने ते बंद केले आहे. तुम्हाला इथेच रांगेत उभे राहावे लागेल. मी आपला सकाळी सरळ काही न आवरता इथेच आलो होतो म्हणले नाव नोंदवून मग घरी सगळे आवरून नंतर आरामात मामींना आणले असते. पण आता तिथेच थांबणे भाग होते त्यात रांगेतील लोक बर्‍यापैकी वयस्क मंडळी होती म्हणले आपण पण थांबू थोडा वेळ नंबर लावून मग जाऊ आणायला. त्यांना मागच्या वेळी लस न घेता घरी जावे लागले होते म्हणून आधीच काही जण चिडलेले होते. त्यातील एक वयस्क सेवानिवृत्त शिक्षक असल्याने त्यांनी रांगेची शिस्त लावली होती ती बराच वेळ टिकली पण होती. त्या वयस्कर लोकांमध्ये मला धरून २/३ तरुण असतील जे कोणासाठी तरी रांगेत उभे होते. हळू हळू लोक येयला लागली होती.  

 

मुळात दहा वाजता सुरू होणारे लसीकरण असले तरी फक्त दिवसागणिक १००/१५० होत असलेल्या लसीकरणात आपला नंबर लागावा म्हणुन लोक सकाळी सात वाजता नंबर लावत होती. काही न खाता पिता ही लोक तिथे आली होती एकदा का रजिस्टर वर नाव नोंदविले की घरी जाऊन आवरून येऊ या धारणेतून सकाळचा हा खटाटोप. पण आजचे चित्र वेगळे होते कोणाला जाता आले नाही १०:३० वाजे पर्यंत तरी. बघता बघता रांग खूप मोठी झाली जवळपास ४०० पर्यंत नंबर झाले होते. जुना अनुभव असलेली जागरूक लोक थोड्या थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा रांगेतील लोक मोजत होती. कारण एकच आज तरी आपला नंबर लागेल का?. सगळ्यांनाच नाही जमत घरची कामे सोडून सकाळी रांगेत उभे राहायला त्यामुळे केंद्राने दिलेल्या वेळेत ते येत होते.

 

तिथे असलेल्या नर्स पण वारंवार सांगत होत्या तुमचा नंबर तुम्ही लक्षात ठेवा इथे आम्ही नोंदवत नाही. तुमच्या मागे आणि पुढे असलेल्या व्यक्तीला पाहून ठेवा. सर्वात पहिला नंबर असलेली बाई गेले ४ दिवस येत होती पण उशीर होत असल्याने तिला लस मिळत नव्हती त्यामुळे ती आज ६ लाच आली होती लांबून नक्की गाव माहीत नाही. काही लोक इतक्या वेळा येवून गेली होती की त्या नर्स बाईंना पण आता ती लोक माहीत झाली होती त्यातील ही बाई पण एक होती. एक आजोबा तर चक्क पूर्ण तयारीनिशी घरून डब्बा, पाणी आणि बसायला छोटासा स्टूल पण घेऊन आले होते. त्यांच्या सोबत कोणी नव्हते त्यांच्या ऐवजी रांगेत उभे राहायला त्यामुळे त्यांना हे सर्व करणे भाग होते. 


काही लोक दुसर्‍या डोस साठी रांगेत होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना वेगळी रांग हवी होती पण तितके व्यवस्थापन तिथे नव्हतेच. मुळातच एक मुख्य प्रवेश असलेले केंद्र तिथे #covid तपासणी साठी पण त्याच बाजूने आत जात होते. आज रांग पाहून शेवटी पोलिस तिथे आल्याने तपासणी साठी आलेल्या लोकांना केंद्राच्या मागील बाजूने येण्यास रांग लावायला सांगितली गेली. विदारक चित्र असे होते की मुळात आम्ही उभे असलेली रांग पण रेशनच्या रांगेसारखी जवळपास खांद्याला खांदा लावून लागली होती. अंतरावर उभे राहण्याचे महत्व एकालाही नव्हते. काहींनी मास्क नावापुरता तोंडाला लावला होता कारण त्यांना तंबाखू थुंकायला बरे पडते ते पण अगदी जवळच, रांग सोडून लांब थुंकणे त्यांना सोयीचे वाटले नाही. 


सकाळपासून म्हणजे २ तास झाल्यानंतर बर्‍यापैकी सगळे चेहेरे ओळखीचे वाटू लागले होते. कोण कोणत्या नंबरला आहे माझ्या मागे पुढे कोण आहे हे कळले होते. कंटाळून खूप जण खाली जमिनीवर बसून गेले. केंद्रात झाडे खुप असल्याने सावली चांगली होती आजुबाजूला अगदी गर्द अशी त्यामुळे सर्वांना हा उन्हाळा सुसह्य वाटत होता. Social Distancing अजूनही कोणी पाळत नव्हते या परिणाम कदाचित काही दिवसांनी दिसून येईल. आमच्या मागे काही बायका तर ग्रुप करून गप्पा मारत बसल्या होत्या आणि काही तर चक्क दगडाचे सागर-गोटे खेळ खेळत होत्या. ज्याला कोणाला इथे केंद्र आहे हे माहीत नसेल त्यांना दुरून एखादी पिकनिक चालू असेल असे नक्कीच वाटेल. 


वयस्कर लोकांमधे ही पण एक चर्चा होती की १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण आहे तर तेव्हा अक्षरशः चोंबाळ (हा त्यांचा शब्द आहे) होईल. कदाचित हाणामारी पण होईल तरुण पोरांची त्यांना असेही वाटत होते की निदान ४५ वरील लोकांचे तरी लसीकरण पूर्ण होऊ देयला पाहिजे होते. वयस्क व्याधींनी ग्रस्त लोकांना मरण जवळ आल्याचा भास होतो आहे हे यातून कळले. तरुण पोर त्यांची प्रतिकार शक्ति चांगली असते ते कसेही वाचतील पण आमच्या सारख्यांचे काय हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. त्यामुळे ह्या शेवटच्या आठवड्यात लस घेतलीच पाहीजे म्हणुन झालेली ही गर्दी आहे हे माझ्या ही लक्षात आले होते. माझ्या सारखे कमी जण होते जे कोणासाठी तरी रांगेत उभे असतील. काही बायका तर आमचा परवा दिवशी शेवटपर्यंत चोथा नंबर होता आता तरी पुढे मिळवा लवकर म्हणुन बऱ्याच वेळ भांडायला लागल्या पण कोणीच त्यांचे ऐकत नव्हते. शेवटी काही समंजस लोक त्यांना आपल्या जागेत पुढे मागे घेत होते ते पण अश्या अटी ने की सर्व जण २-२ जणांचे नंबर लावू शकत होते (हा नियम रांगेतील लोकांकडूनच जन्माला आला होता केंद्राकडून असे काही निर्बंध नव्हते त्यामागे कारण ही असे होते की आधीच्या काही दिवसात कोण एक माणूस येत आणि गावातील १० लोकांचे नाव नोंदवत लस घेयचा म्हणुन बाकी लोकांची अर्थातच गैरसोय होत होती आणि नंबर लावून पण लस मिळत नव्हती). आणि जे एकटे आले होते त्यांनी अश्या लोकांना आपल्या नंबर सोबत दिले होते त्यातील मी पण एक होतो. 


२-३ तास उलटून गेले होते आणि काही वेळात लसीकरण सुरू होईल असे नर्स बाईंनी सांगितल्यावर लोकांची आता एकमेकांना ओळख असल्याने प्रत्येक जण आपापल्या घरी जावून सोबतच्या व्यक्तीला आणत होते. काही जण जेवून-खावून येतो असे बोलुन ही गेले होते. मी पण मामीं ना १०.३० च्या आसपास आणायला गेलो होतो. मी सकाळी आलो तेव्हा माझ्या पुढे एक गृहस्त होते ते सकाळी कानटोपी, मास्क असे लावून आले होते आणि त्यांना धार काढायला जायचे आहे म्हणून मला आणि आमच्यापुढे असलेले शिक्षक त्यांना सांगून गेले होते. मी जेव्हा परत आलो तर माझ्या पुढे वेगळेच कोणी आले की काय म्हणून मी विचारणा केली कारण सकाळी गेलेला माणूस वेगळ्याच कपड्यात होता. शेवटी त्याने मीच तो धार काढायला गेलो होतो (एकदम हसा पिकली रांगेत) सांगितले तेव्हा हायसे वाटले की बाबा तोच माणूस आहे. 


११ वाजले तसे सातारा वरून एक गाडी लस घेऊन आली आणि आमचा जीव भांड्यात पडला कारण काहींना शंका होती लस येईल की नाही. आता पटापट सगळे लसीकरण उरकून घरी जाता येईल. पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न (मामींच्या तोंडातील वाक्य) तसेच काहीसे घडले होते. आधीच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे लसीकरण १०-१० च्या संखेने पटकन उरकते आणि आमचा नंबर १५ (x२ = ३०) धरला तरी लवकरच लागला पाहिजे. पण इथे पहिलेच ५ मध्ये ३० मींन पेक्षा जास्त वेळ लागत होता. न राहवून आम्ही चौकशी केली असता असे कळले की आधार कार्ड ची वेबसाइट खूपच हळू हळू चालत आहे त्यामुळे प्रत्येकाच आधार कार्ड तपासून पुढे पाठवायलच खूप वेळ जात आहे. वयस्क लोकांना हे टेक्निकल कारण समजून सांगायला आमची दमछाक होत होती ती वेगळी. ९५ टक्के वयस्कर रांगेत होते ज्याना त्यांचा मोबाइल नंबर देखील माहीत नव्हता त्यांनी एक छोट्या कागदावर लिहून आणला होता त्यांना कम्प्युटरच हळू चालतोय हे कारण पटलेले होते.

 

बराच वेळ गेला १२ वाजून गेले तरी पहिले १० पण नंबर झाले नव्हते. शेवटी मामी म्हणाल्या तू जा घरी आवरून, जेवण करून ये आरामात मी तुला कॉल करेन माझे झाले की ये आणि त्यांना कळून चुकले होते की इथे खूप वेळ जाणार आहे. आणि मला पण २:३० वाजता ऑफिसची शिफ्ट चालू होणार होती त्यामुळे नाईलाजाने जाणे भागच होते. मी घरी आलो आंघोळ, जेवण करून बसलो, म्हणले आता तरी झाले असेल काम लवकर म्हणून कॉल केला तर अजून वेळ आहे सांगितले मामींने. तोवर २;३० पासून वाजून गेले मी ऑफिसच्या कामाला लॉगिन केले असले तरी मी घेयला येतो म्हणून आधीच सांगून ठेवले होते. ३ च्या आसपास काहीतरी त्यांना लस मिळाली असा त्यांनी मला कॉल केला आणि त्या त्यांच्या मुलासोबत त्या घरी आल्या जो की कामासाठी कालच बाहेर गेला होता तो नेमका त्यावेळी आला.     


ही अशी रांग प्रत्येक गावात तुम्हाला दिसेल, तुम्हाला ही असे अनुभव आलेच असतील. हे मी घालवलेले ५ तास लसीच्या रांगेतले. यातून हे पण कळते की आपली यंत्रणा अजून खूपच मागे पडते आहे. अजून १२५ करोंड लोकांना लस मिळे पर्यन्त काय माहीत कोणते वर्ष उजाडलेले असेल. तोवर सगळ्यांनी कृपया काळजी घ्या वयस्क लोकांना जपा. 

  • हर्षद कुंभार  







 


Tuesday, June 30, 2020

तू आहेस


#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #poetry #wai #maharashtra #marathikavita #kavita #marathimulga #mimarathi #marathiwriters #marathistatus 

Saturday, June 27, 2020

सारा मनाचाच खेळ


#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #poetry #wai #satara #maharashtra #marathikavita #kavita #marathimulga #mimarathi #marathiwriters 

Monday, June 22, 2020

Love Bonding ...



#harshadkumbhar #kshankahiwechalele #marathi #kavita #marathikavita #poem #poerty
#wai #satara #maharashtra

Monday, June 15, 2020

एक हंसी


#KshanKahiWechalele #harshadkumbhar #hindi #poems #poetry #maharashtra #hindikavita #hindipoem #hindistatus 

जगणे मरणे


#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #poetry #marathistatus #marathimulga #marathikavita #kavita 

Sushant Singh Rajput


#KshanKahiWechalele #harshadkumbhar #hindi #poems #poetry #hindistatus #hindikavita #hindipoem 

Sunday, April 26, 2020

पुन्हा शाळा

लॉक डाऊन २.० - दिवस १२ वा 


जवळपास १ महिना होत आला आहे. लॉकडाऊन मुळे आपण सगळेच जण घरी आहोत. प्रत्येक जण या ना त्या कारणाने स्वतः ला दिवस काढण्यात यश मिळवतो. त्यातून मनोरंजन क्षेत्र असे आहे जे तेजीत आहे. हे नवीन सर्वे नुसार समोर आले. 


Amazon Prime, Netflix, Zee5 आणि HotStar यांना बराच फायदा झाला आहे. आपल्यापैकी कित्येक जणांनी या सुविधा घेतल्या असतील. त्यामुळे नवीन येणाऱ्या सिरीज, सिनेमा सगळे पाहुन झाले असेल. त्यातही वेळ जावा म्हणून पुन्हा पुन्हा पाहून पण झाला असेल. 


मी ही यातून सुटलो नाही. अगदी MCU चे सगळे चित्रपट तसेच इतर सिनेमे आणि वेब सिरीज सगळे पाहुन झाले. आजही असेच नवे सगळे पाहुन झाल्यामुळे जुने काहीतरी शोधत असताना मला HotStar वर शाळा हा सिनेमा सापडला. सुजय डहाके यांनी जे काही मास्टर पीस बनवून ठेवले आहे त्याला तोड नाही. 


जुना काळ अगदी 2 तासात अनुभवणे आणि आजही शाळेतील बाकावर घेऊन जाणारा सिनेमा. शाळेतील एक एक दिवस एक एक कप्पा उघडत आपल्याला मंत्रमुग्ध करून जातो. 

ताज्या फुलांचा जसा सुगंधित सुवास येतो तसाच हा सिनेमा आजही एकदम फ्रेश वाटतो. 


तुम्हाला तुमचा मूड थोडा हलका करायचा असेल आणि हे लॉकडाऊन आणि निगेटिविटी पासून सुटका हवी असल्यास आणि शाळेतील तुमचा हक्काचा बाक पुन्हा आठवायचा असेल तर हा सिनेमा नक्की पहा. - हर्षद कुंभार 

Saturday, April 18, 2020

Distance with Love

#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #love #marathikavita #kavita