लॉक डाऊन २.० - दिवस १२ वा
जवळपास १ महिना होत आला आहे. लॉकडाऊन मुळे आपण सगळेच जण घरी आहोत. प्रत्येक जण या ना त्या कारणाने स्वतः ला दिवस काढण्यात यश मिळवतो. त्यातून मनोरंजन क्षेत्र असे आहे जे तेजीत आहे. हे नवीन सर्वे नुसार समोर आले.
Amazon Prime, Netflix, Zee5 आणि HotStar यांना बराच फायदा झाला आहे. आपल्यापैकी कित्येक जणांनी या सुविधा घेतल्या असतील. त्यामुळे नवीन येणाऱ्या सिरीज, सिनेमा सगळे पाहुन झाले असेल. त्यातही वेळ जावा म्हणून पुन्हा पुन्हा पाहून पण झाला असेल.
मी ही यातून सुटलो नाही. अगदी MCU चे सगळे चित्रपट तसेच इतर सिनेमे आणि वेब सिरीज सगळे पाहुन झाले. आजही असेच नवे सगळे पाहुन झाल्यामुळे जुने काहीतरी शोधत असताना मला HotStar वर शाळा हा सिनेमा सापडला. सुजय डहाके यांनी जे काही मास्टर पीस बनवून ठेवले आहे त्याला तोड नाही.
जुना काळ अगदी 2 तासात अनुभवणे आणि आजही शाळेतील बाकावर घेऊन जाणारा सिनेमा. शाळेतील एक एक दिवस एक एक कप्पा उघडत आपल्याला मंत्रमुग्ध करून जातो.
ताज्या फुलांचा जसा सुगंधित सुवास येतो तसाच हा सिनेमा आजही एकदम फ्रेश वाटतो.
तुम्हाला तुमचा मूड थोडा हलका करायचा असेल आणि हे लॉकडाऊन आणि निगेटिविटी पासून सुटका हवी असल्यास आणि शाळेतील तुमचा हक्काचा बाक पुन्हा आठवायचा असेल तर हा सिनेमा नक्की पहा. - हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment