All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, June 6, 2015

..... प्रपंच करावा नेटका....

नमस्कार सगळ्यांना,

आज थोडेच पण महत्वाचे

..... प्रपंच करावा नेटका.... 

हे वाक्य आजवर खुप वेळा कानावर पडलं होतं.  विवाहीत आहे त्यांना " नेटका " या शब्दाचा अर्थ काहींना कळला असेल किंवा काही त्या प्रवासात असतील. त्या सगळ्या व्यक्तींना आज मी काही मागत आहे.  त्यांच्या अनुभवातून तयार झालेल्या महत्वाच्या पण प्राथमिक स्वरुपातील नोंदी ज्या प्रापंचिक आयुष्यात फायद्याच्या ठरतील.
   कारण आजपासून सुरू होत आहे आमचा हा नवा अध्याय. तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद सोबत असतीलच. तर तुम्ही आता काय करायचं की पटापट आपले विचार, अनुभव मला सांगा.  - हर्षद कुंभार...

Friday, April 3, 2015

नित्यक्रम सध्याचा

रोजची सकाळ मला सुट्टी असल्यासारखी सुरु होते. नियमाने गजर लावलेला असतो. तो पण नियमाने डोळे हलकेच उघडुन बंद करायचा. नंतर काय रात्रीपेक्षा अधिक झोप आलेली असते. रुममेट शेवटी ११ ला जाग करतात किव्वा मलाच जाग येते. मग मोबाईल मधे वेळ बघतच स्वतःला शिव्या देत पटापट आवरायचं आणि १२ च्या ऑफिस टाईमला कसबस पोचायचं....
रात्री झोपताना उद्या मात्र लवकर कसही करुन उठायचचं अस ठरवुन जे झोपयचं... ते आहे ती गाडी पुन्हा त्याच रुळावर हा जणु नित्यक्रम बनला आहे....
असो लग्नानंतर हे चित्र नक्की बदलेल तोवर झोपुन घेतो. - हर्षद कुंभार...

Sunday, March 29, 2015

पाऊस मनातला अन डोळ्यातला

काल दि. २८-३-३०१५ रोजी. मी पुण्यातुन काम आटपुन साताऱ्याला निघालो. उन्हाने हैरान गाडी चालवु वाटत नव्हती. कारण काम उरकुन पुण्यातुन बाहेर पडायला पार १ वाजला. कात्रज घाटात असताना सावल्यांचा खेळ चालु झाला. वर पाहिले तर आकाशाच काही वेगळचं चाललं होत. हळु हळु तो आपला एक एक ढग जमा करत चालला होता. थंड वाऱ्याच्या हलक्या झुळुका मध्येच आमचा पाहुणचार घेत होत्या. एक तासाभरात सगळे चित्र पालटत गेलं आणि ढग असे काय भरुन आले की त्यांनी यथेच्य आमचा समाचार घेयला सुरु केलं. हलक्या सरींनी आम्हाला छान सुखद अनुभव दिला. मातीचा सुगंध दरवळु लागला. पाऊस थोडाचं झाला पण वातावरणात मात्र चांगलाच बदल झालेला होता. थोड्याच वेळात घरी पोचलो पण माझ्या मागं मागं ते ढग जणु पाठलाग करत आले होते.. गावी सगळी पिक सराई चालु होती म्हणजे मळनी,वाऱ्याला देणं, वाळवनं.. त्यामुळे सगळ्यांची एकदम तारांबळ झाली. गेल्या गेल्या पहिले गहु वाळवायला टाकले होते ते भरुन ठेवले. नंतर पावसाने इथे पण हजेरी लावली, मग काय काकांचं गहु मळनी आणि हरभरा पण राहिला होता तो भर पावसात मळला. पाऊस पण खरंच परिक्षा घेतो बळीराजाची अवकाळी पावसाने खुप नुकसान होत शेतकऱ्याचं आर्थिक आणि मानसीक पण. कोणाला माहीत पुण्याहुन निघालेला डोळ्यांना सुखवनारा तो प्रवास शेवटी डोळ्यात चिंतीत लोकांपर्यंत संपेल. - हर्षद कुंभार...

Wednesday, March 18, 2015

माझं शब्दात उतरणं

माझं शब्दात उतरणं ,
हल्ली कमी झालय...
मन खुष असतं ,
वेदनांच वर्ष ते सरलय...

सुखातपण थोडे ,
अश्रु ओघळतात़ ...
तेव्हडचं काय ,
शब्दांच बरसन उरलय... - हर्षद कुंभार...

Saturday, January 24, 2015

ऑफिस काम म्हणजे ऑफिस काम असतं

---- ऑफिस काम म्हणजे ऑफिस काम असतं ----

ऑफिसच काम म्हणजे  ...
ऑफिसच कामचं असतं ,
आज कितीही केले तरी ...
उद्या पुन्हा ते येतचं असतं .

सकाळी लवकर जाऊन ...
रात्री उशिरा थांबुन ...
अगदी दिवस कमी पडावा ...
एवढ ऑफिसच काम असतं.

खान-पान विसरुन ...
देहभान हरपुन ...
झोपेला टाळुन ...
इच्छांना जाळुन ...
केलेलं ते ऑफिसच काम असतं .

विचारांमधे काम, बोलण्यातन काम ....
शांततेत पण काम, रागारागत पण काम ...
कधी न संपनार काम , का असतं इतक काम ...
शेवटी ऑफिसच काम म्हणजे ,
ऑफिसच कामचं असतं.... - हर्षद कुंभार... 

Saturday, November 29, 2014

मनाच्या आडात...

मनाच्या आडात,
काव्याच द्राव्य,
खुप साचलेलं असतं.

पोहरा आडात,
तर मी रोजच टाकतो.
पण...
तो कधी भरुन येतो,
तर कधी रिकामा. - हर्षद कुंभार... 

Friday, November 21, 2014

राग आणि प्रेम

रागावण्याने तिच्या जणु ...
तिव्र सरींचा मारा होतो,
विनवण्या करुन करुन
जिव मात्र बिचारा होतो.

प्रेमाचा धागा हा ...
दरवेळी नाजुक नसतो,
रागवली ती की ...
तो सुतळीगत पण लागतो. - हर्षद कुंभार...

Sunday, November 16, 2014

सुचेलच अस काही नसतं

दर वेळी काही सुचेलच ,
अस काही नसतं...
मोकळा क्षणपण येतो,
एकही ढग नसलेल्या आकाशासारखा...

जेव्हा आपलं आकाश
एकदम निरभ्र असतं ...
तेव्हा फक्त दुसऱ्याचं बरसनं
अनुभवायचं असतं... - हर्षद कुंभार....





Friday, November 14, 2014

लहानपण...

लहानपण नकळत सरलं ....
मोठेपण कळत कळत आलं .
अल्लडपणा अलगद गेला ...
समजुतदारपणा सावरत आला .

लहान असताना मनी
मोठ होण्याच स्वप्ऩ ...
आता मोठ झालोय तर
मोठ का झालो हे उरी दुखःन...

काळ बदलला , वेळ गेली
भविष्याची पतंग उडवताना...
हाती वर्तमानाचा तर...
भुतकाळाच्या आठवणींचा मांजा
परेटीला गुंडाळलेला... - हर्षद कुंभार...

Thursday, September 18, 2014

मी देत राहीलो...

मी जळत राहीलो ...
तिच्या इच्छांना प्रकाश मिळण्यासाठी...
मी रात्र जागत राहीलो ...
तिच्या स्वप्नांना दिवस दिसण्यासाठी...

मी वाहत राहीलो ...
तिच्या विचारांना वेग येण्यासाठी...
मी सारं देत राहीलो ...
तिच्या ओंझळीत सुःख भरण्यासाठी... - हर्षद कुंभार...