काय घेऊन आलोय आपण या नवीन वर्षात. वर्षाची सुरुवात काय झाली आज सगळ्यांनी अनुभवले. आपण कधीच सुधारणार नाही का याबाबतीत. कोणालाच नाही कळत की ज्या समाजात आपण वावरत असतो त्याच तितकेच देणं लागतो जितके की आपण त्याचा उपभोग घेतो. सोयी सुविधा या फक्त सरकारने देण्याच्या गोष्टी आहेत असा समज असलेली लोक खूप आहेत पण ज्यांच्यासाठी त्या आहेत त्यांनाच त्याच महत्व लक्षात घेऊन आचरण, व्यवहार ठेवले नाही तर त्याचा बोजवारा तर उडणार हे साधं कळत नाही. माणसाने स्वतःचा वैयक्तिक विकास करण्याकडे लक्ष केंद्रित केले तरी देशाचा विकास सहज होईल अर्थात सरळ आणि प्रामाणिक मार्गाने ना की वाम मार्गाने.
गेली कित्येक वर्ष जे चालू होते ते तसेच पुढे आणतो आहोत आपण, कोणाला काय फायदा झाला यातून. शेवटी घरी आल्यावर काय यांना समाधान मिळत असेल अश्या लोकांना त्यांच्या परिस्तिथी मध्ये खूप काही सुधारणा होते असे पण नाही वैयत्तिक जे प्रश्न असतात ते तसेच असतात. विकास हवा म्हणून आपण सरकार ला दोष देतो पण स्वतःचा विकास कधी साधणार. हा विकास म्हणजे फक्त आर्थिक सुबत्ता नाही विचारांनी समृद्ध कधी होणार तो पण एक विकासाचं आहे की याकडे कधी आपण लक्ष देत नाही फक्त पैसे कमवयाच्या मागे लागलो आहे.
दरवर्षी नवीन संकल्प करणारे आपण किती जण पाळतात हे वेगळे सांगायला नको. अर्थात संकल्प पण कसले असतात की
१) मी जिम ला जाणार थोडं हेल्थ कडे लक्ष देणार (सर्वात जास्त मानला जाणारा
२) सिगरेट सोडणार
३) हे खाणार नाही ते खाणार नाही. जे काही असेल ते स्वतः पुरते पहायचे बस.
पण कधी असे संकल्प करतो का
१) सामाजिक भान ठेवून जबाबदारीने वागणार, बोलणार.
२) सोबतच्या प्रत्येक व्यक्तीला मी सुखी आणि समाधानी ठेवेन.
३) प्रामाणिक आणि सत्याने जगणार
मला माहित आहे हे सर्व वाचुन काही उपयोग होणार नाही. आपण वाचणार आणि विसरून जाणार उद्याचा दिवस आहे तसाच जाणार आपल्यात काही बदल होणार नाही. पूर्ण वर्ष असेच निघून जाते, बदलते पण आपली परिस्तिथी काही बदलत नाही. - हर्षद कुंभार (०३/०१/२०१८ ८.०० रात्रौ ).
No comments:
Post a Comment