माझा शाळेतला पहिला दिवस …
माझं शालेय शिक्षण भिवंडी येते झाले आहे. भिवंडीमध्ये आमच्या जवळची आणि मुळात वडील ज्या कंपनीत कामाला होते त्याच मालकाने स्थापन केलेली शाळा. आधीच नाव शिशुविहार विद्यालय असे होते नंतर म्हणजे मी ८-९ इयत्तेत असेल तेव्हा गणवेष आणि नाव दोन्ही बदलण्यात आहे तेव्हा आताचे नाव आहे माननीय गोपाळ गणेश दांडेकर विद्यालय (D .D .V.). वडील कामाला होते ती कंपनी G.G. Dandekar Machine Works. साहजिकच वडील मला त्याच शाळेत शिकायला टाकणार हे वेगळे सांगायाला नको.
असो हा झाला माझ्या शाळेचा थोडासा तपशील. मला थेट पहिल्या इयत्तेत टाकलं होतं त्यामुळे माझा पहिला दिवस पहिलीतला असचं म्हणावं लागेल. मला आठवतंय आई शाळेत सोडायला आली होती. त्यावेळी एक छोटं दप्तर होत आणि खायला म्हणून पार्ले जी बिस्किटचा पूड दिला होता. तसं मला ऐकून की बघून पण हे माहिती होत की शाळेची घंटा वाजली की घरी येयच. आई मला शाळेत सोडून घरी गेली मी रडलो की नाही ते आठवत नाही. पण मधल्या सुट्टीची घंटा झाली आणि मी माझं दप्तर आवरलं बिस्किटचा पुडा घेऊन थेट निघालो घरी आणि एकटाच बिस्कीट खात खात घरी पोचलो. आई एकदम आश्चर्यचकित कारण मी लवकर घरी आलो होतो आणि तोही एकटाच. घंटा झाली म्हणून मी घरी आलो हे सांगितल्या वर आई हसली आणि मला नीट सगळं सांगितली मधली सुट्टी होती ती त्यात खाऊ खायचा असतो आणि बाकी बराच काही. दुसऱ्या दिवशी आईने मास्तरांना घडलेली गोष्ट सांगितली… मास्तरांना पण गंमत वाटली आणि त्यानंतरच सगळं आलबेल होतं जे इतकं खास असे आठवतही नाही.
तर हा होता माझा शाळेचा पहिला दिवस…. - हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment