-- पावसाळ्यातील दोन द्रुव --
गैरसमज नसावा मी कोणत्याही भोगौलिक विषयात हात घालत नाहीये. माझं घर आणि ऑफिस हे सध्या ज्या भोगौलिक स्तिथीत आहेत त्याच साधर्म्य म्हणून दोन द्रुव म्हणलं आहे. तसं पाहिले तर घर आणि ऑफिस मधील अंतर देखील जास्त नाही फक्त १६ किमी आहे. पण घर आहे ते मोठं - मोठ्या इमारतींच्या मध्ये आणि ऑफिस आहे ते मोठं - मोठाल्या डोंगरांच्यामध्ये. बऱ्यापैकी तिन्ही बाजूने डोंगर रांग तठस्थ पहारा म्हणून ऑफिसच्या बाजूने उभी आहे .
पावसाळ्यात तर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाशी स्पर्धा करावी असे वातावरण असते . त्यामुळे ऑफिसला जातोय की हिल-स्टेशन असे जाणवते. कधी कधी असे हवामान असते की घराजवळ कडक उन्ह असते आणि इकडे ऑफिस हे मस्त पाऊस चालू असतो, अर्थात हे सगळं डोंगरांमुळे होते. म्हणून माझ्यासाठी जणू दोन द्रुवच पण फक्त पावसाळ्यातच.
तस काही फारसे लिहिण्यासारखे नाही वाटले पण थोडक्यात सध्य स्तिथी सांगावी म्हणून हा प्रयत्न.
-हर्षद कुंभार १४/०७/२०१६, १. ३१ PM
No comments:
Post a Comment