पिंपरीमधील सजीव दुभाजक …
नावावरून काहींना कळले असेल तर काहींना नाही, पण हरकत नाही तसही हा विषय तितकासा खास नाही फक्त मलाच लिहायला आवडते म्हणून आपला विषय शोधत असतो.
असो तर स्टोरी अशी की…
पिंपरी-चिंचवड, पुणे मधील पिंपरी या गावातील गोष्ट. पिंपरी नावाने खूप गावे असतील म्हणून तपशील. गाव तसं खुप छान आहे मी जरी प्रत्यक्ष पिंपरीमध्ये राहत नसलो तरी रोजची एक फेरी असतेच. हां म्हणजे ड्युटी म्हणा हवं तर पण रोज बायकोला पिंपरीत तिच्या कामावर सोडून यायचं काम असतं.
हा झाला स्टोरीमधील एक भाग आता दुसरा…
पिंपरीमध्ये बेवारस अशी खुप मोठी गायी-बैलांची फौज आहे. ती बेवारस असली तरी त्यांना जपणारी आणि खाऊ - पिऊ घालणारी पिंपरी येथील स्थानिक लोक आहेत. त्यामुळे त्या जनावरांना बरोबर माहिती असते कुठे खायला मिळेल ते त्या ठिकाणी दिवसभर फिरत असतात. आता होतं काय की ही जनावरे बर्याचदा रस्त्यावर मधोमध बसलेली किंवा उभी असतात.
पिंपरी गावात दुभाजक नाही पण ही जनावरे दुभाजकाचं काम उत्तम निभावतात. अर्थात मी हे गमतीने बोलतोय. तसा तो काही विशेष त्रास नाही पण रोज सकाळी हे अडथळे पार करून जावे आणि यावे लागते. एक दोनदा गायीचे वासरू अचानक गाडी समोर आल्याने पडता पडता वाचलो मी. त्या जनावरांना पण गाड्यांची इतकी सवय झाली आहे की तुम्ही हॉर्न वाजवला की ती मान बाजूला करून तुम्हाला जायला थोडी वाट देतात. साहजिकच ही मोठी गोष्ट नाही जस की मी वरती बोललो होतो, कारण तुमच्या जवळपास पण बेवारस जनावरे असतील. त्यामुळे तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल ही.
कधी कधी मला असपण वाटते की महापालिकाने ही बेवारस जनावरे दत्तक घ्यायला हवी. त्यामुळे जनावरांना आसरा मिळेल आणि पालिकेला पण दुग्ध व्यवसायातून फायदा होईल तसेच जनावरांनापण पोसता येईल. आर्थिक द्रुष्ट्या पाहिले तर ते समतोल साधणारे ठरेल.
असो विषय लहानच होता पण थोडं जास्त शब्दातून रंजक केला - हर्षद कुंभार 16/07/2016 08:29 pm.