भुत्याबाबा आणि धरीबाबा...
आज एक जुनीच गोष्ट पण नव्याने सांगणार आहे. नावावरुन कोणाला कळलं असेल कोणाला नाही. लहान मुलांची खुप कुतुहल निर्माण करणारी गोष्ट आहे.
माझे लहाण दोन पुतने एक ३ वर्षाची आणि एक २ वर्षाचा. आमची वहिनी त्यांना घाबरवण्यासाठी दोन काल्पनिक माणसांना वापरते म्हणजेच धरीबाबा आणि भुत्याबाबा.
आता तरी तुम्हाला कळलं असेलच. आपलं लहाणपण पण असचं कोणत्यातरी काल्पनिक माणसाच्या भितीच्या छायेत गेले असेल. माझ्या लहाणपणचं इतकं काही आठवत नाही पण आई पण मला " तो बाबा घेऊन जाईल हां खा बघु पटकन " असं म्हणायची.
प्रत्येकाला अस कोणत्या तरी बाबा ने शहाणं केलं असेलच नाही का. त्या काल्पनिक माणसाने लहाणपणी आपल्यावर चांगल्या- वाईटाचे संस्कार केलेले असतील.
आजही ही एक पध्दत बर्यापैकी प्रचलित आहे, जेणेकरून लहान मुले संस्कारांचा बाळकडू पितात. बहुतांशी यात मुलांना खाण्या-पिण्याबाबत, खोटे बोलू नये, लवकर झोपण्याबाबत इत्यादी गोष्टींची भिती दाखवली जाते.
लहानपणी तुम्हाला लाभलेले असेच बाबा आठवुन पहा किव्वा आईला विचारून पहा गंमत वाटेल. - हर्षद कुंभार....