नमस्कार प्रिय वाचक, माझ्या डिजिटल घरात आपले स्वागत आहे! माझा ब्लॉग हा विचार, कल्पना आणि भावना यांचा एक रंगीबेरंगी कोलाज आहे, जो तुम्हाला माहिती देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी लिहिला गेला आहे. तुम्ही सध्याच्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी, ट्रेंडिंग विषयांमध्ये डोकावण्यासाठी, सर्जनशील कवितांचा आस्वाद घेण्यासाठी किंवा जीवनाच्या कथा वाचून विचारमग्न होण्यासाठी येथे आला असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
All The Contents by Labels
Books Review/ पुस्तक परिक्षण
(1)
Current Affairs
(1)
Ghazal
(1)
Life Hacks
(2)
Life Style
(2)
Marathi
(1)
qoutes /सुविचार
(1)
Traveling Spots
(1)
Trending Topics
(1)
आजचे जग
(1)
इतर कविता
(23)
इतर कविता / General Poems
(84)
कविता
(4)
कविता/Poem
(2)
ग़ज़ल
(6)
चालू घडामोडी
(10)
चालू घडामोडी /Current Affairs
(8)
चालू घडामोडी/Current Affairs
(9)
जीवनशैली
(13)
प्रेम कविता / Prem Kavita
(60)
प्रेम कविता /Love Poems
(4)
प्रेरणादायी कविता
(3)
प्रेरणादायी कविता / Inspiring Poems
(10)
मराठी
(6)
मराठी कविता
(6)
मराठी कविता / Marathi Kavita
(2)
मराठी कविता / Marathi Poetry
(1)
मराठी कविता / Poems
(1)
मराठी कविता /Marathi Poem
(1)
मराठी कविता /Marathi Poetry
(3)
मराठी ग़ज़ल
(4)
मराठी लेख
(1)
मराठी लेख / Articles
(18)
मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा
(3)
मराठी सुविचार /Quotes
(1)
मुक्तछंद
(1)
मैत्रीच्या कविता
(7)
मैत्रीच्या कविता / Friendship Poems
(10)
लेख
(1)
लेख /Articles
(18)
लेख Marathi Lekhan
(3)
लेखन
(10)
लेखन / Marathi Lekhan
(57)
वास्तविकता
(1)
विचार / thoughts
(2)
विडंबन कविता
(2)
शायरी
(1)
सुविचार / One Liner
(2)
सुविचार / Quotes
(2)
सुविचार /Quotes
(7)
सुविचार/Quotes
(1)
हिंदी
(1)
हिंदी / Quotes
(1)
हिंदी Quotes
(1)
हिंदी कविता / Hindi Poems
(2)
हिंदी कविता /Hindi Poems
(3)
हिंदी कविता /Poems /Quotes
(1)
हिन्दी कविता / Hindi Poems
(2)
Saturday, March 26, 2011
काही काळ एकट रहायचय.
Labels:
इतर कविता,
इतर कविता / General Poems
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Sunday, March 20, 2011
E - Love (Click to See Full view)

न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan (Advertise With Shah Rukh Khan)
"न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan "
लेखाचे नाव बघून तुम्ही चकित झाला असाल पण हे सत्य आहे. तर या घटनेला आता ३ वर्ष झाली .त्यावेळेस मी पुणेला होतो माझ्या शिक्षणासाठी
माझे एम. सी. एम. चे (Master in Computer Management) दुसरे वर्ष चालू होते. तर ही तिसऱ्या टर्म ची गोष्ट आहे. आम्ही कॉलेजचे खास ५ मित्र समीर , सागर, तुषार, हरिष आणि मी आणि हो माझा मावस भाऊ निलेश.
तर नेहमी प्रमाणे आम्ही कॉलेज मधून ५-६ पर्यंत घरी आलो होतो. आप आपल्या घरी पोचल्यावर , इतरांसारखा मला पण सम्याचा (सम्या म्हणजे समीर हे तुमच्ता लक्षात आले असेल) फोन आला की
"अरे Shah Rukh Khan चे शुटींग आहे त्यात त्याचा सोबत मुलांची गरज आहे".
ती हुंदाई कंपनीच्या i10 ची जाहिरात होती. मला थोडे रोमांचक वाटले अर्थातच कुणालाही वाटेल Shah Rukh Khan सोबत जाहिरात करणार आपण टीवी मध्ये दिसणार , हे आणि अनेक स्वप्न डोळ्यासमोर जमा झाली. माझ्यासारखे इतर मित्रांचे पण तसेच हाल होते. मग काय आम्ही तयार झालो. आणि हो तिकडे संध्याकाळचे जेवण होते येयला आणि जायला गाडी होती (खर तर त्या adervertise पेक्षा आमचा Timepass होणार हे आम्हाला जास्त मजेशीर वाटले ). त्यामुळे वाटले एवढे सगळे जुळून आले आहे, पण आम्ही घरी होतो आणि हे घरी सांगितले असते तर जावू दिले नसते. मग मित्राच्या घरी पूजा घडवली आम्ही त्यादिवशी आणि निघालो. bollywood च्या सुपरस्टार ला प्रत्यक्ष पाहायला.
बहाणा करून आम्ही निघालो आणि ठरलेल्या ठिकाणी भेटलो . तासभर वाट बघत एकदाची गाडी आली, आधीच खूप मुले मुली त्या गाडीत होते. मग गाडीत बसलो तेव्हा नुकताच Shah Rukh Khan चा ओम शांती ओम येवून गेला होता म्हणून गाडीत "दर्द ए डिस्कोचे" गाणे आणि इतर गाणी वाजत होती. गाडीत सगळे धमाल मस्ती चालू होती, सगळ्याच्या डोळ्यात एकच स्वप्न दिसत होते Shah Rukh Khan ला पाहण्याचे.
तर आमची गाडी जाणार होती बालेवाडी स्टेडीयम ला जिथे कॉमन वेल्थचे गेम्स होणार होते,त्यासाठी contruction चे तिथे बरेचसे काम चालू होते. आम्ही तिथे पोचलो तेव्हा खूप गाड्यांचा ताफा आधीच हजर होता. फक्त ३-४ मी. च्या जाहिरातीसाठी पण बराच लवाजमा लागतो हे तेव्हा कळले. बर तर आम्ही गाडीतून उतरलो नाही स्टेडीयम चे दिशेने निघालो.
आत गेलो तेव्हा एक स्टेज दिसले स्टेडीयम अजून पूर्ण झालेले नव्हते त्यामुळे काही भागच त्याचा advertise साठी वापरणार होते, त्या स्टेज नंतर आम्ही सगळ्यांनी थोडी नजर फिरवली तेव्हा कळले आधीच उर्वरित स्टेडीयम भरगच्च प्रेक्षकांनी भरले होते. आमच्या मनात पाल चुकचुकली आम्ही त्या मित्राला बोललो अरे हे काय आहे . तेव्हा त्या महाभागाने पूर्ण खुलासा केला मी Shah Rukh Khan च्या Advertise साठी मॉब हवा होता, सो तुम्हाला शुटींग पण बघायला मिळेल म्हणून तुम्हाला बोललो चला. आम्हाला थोडे थोंडत मारल्यासारखे झाले, नंतर भानावर आलो तेव्हा आम्हाला पण त्या प्रेक्षात बसायला सांगितले. "आलीय भोगासी असावे सादर " ही म्हण आठवून आम्ही आहेत त्यात मज्जा मस्ती करू ठरवले. स्टेडीयम वर हिरवळ चांगली होती तेव्हा म्हंटले चला इतकेपण बोर तरी होणार नाही.
इतके स्टेडीयमच्या तिथे कसले तरी शुटींग चालू होते थोडे तिकडे पण लक्ष गेले. तिथे काही फिरंगी मोडेल्स नाचत होत्या . काही वेळ ते पाहिल्यावर कंटाळा आला मग म्हंटले थोडे जवळ जावून पाहावे म्हणून त्या दिशेने गेलो तर काय ४-५ पैलवान समोर उभे , थोडे इकडे तिकडे पहिले तर त्या स्टेडीयमच्या चहुबाजूला असेच पैलवान उभे होते कुणी आमच्या सारखे तिथे जावू नये म्हणून
मग काय मोर्चा माघारी वळला, तिथे खाण्यासाठी नास्टा आला कालाल्य्वर थोडे हायसे वाटले
काय आहे ते पाहायला गेलो तर लग्नात जसा उपीट , उपमा नाहीतर कांदेपोहे अगदी तसेच होते ते
आणि अश्या लग्नातल्या नास्त्याचा आणि आमचा आधीपासून ३६ चा आकडा.
नास्टा आणि ते उरकल्यावर तिथे काही लोक ते bannar आणि काही झेंडे घेवून आले. काही वेळाने एक कॅमेरावाला तिथे आला आणि काही सेकंद त्याने काय शूट केले ते तो स्वतः आणि देवच जाने. म्हंटले आता Shah Rukh Khan तरी पाहायला मिळेल म्हणून तिथे कसातरी ११ पर्यंत थांबलो , देव जणू आमची परीक्षाच घेत होता Shah Rukh Khan कसला तिथे त्याची सावली पण दिसली.
आता मात्र सगळ्यांना झक्क मारली आणि इथे आलो असे वाटायला लागले. पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यानंतर जो काही शिव्यांचा पाऊस पडला आम्ही , आता तुम्हाला कळलेच असेल कुणा कुणाला त्या पावसात भिजवले असेल ते आम्ही.
तिथून बाहेर आलो आणि आधी पोटापाण्याचे काही बघायचे ठरवले. सगळ्यांनी आपले खिसे चाचपले आणि ढाबा शोधायला लागलो, आता आम्ही होते बालेवाडीला जो हायवे टच आहे तिथे ढाबा शोधायला जे काही आम्हाला चालायला लागले. त्या नंतर ढाबा दिसला तिथे गेलो स्टार्टर म्हणून पापड मागवले तेव्हा त्या सम्याच्या मित्राचा फोन आला. ते सगळे निघालो होते आणि आम्हाला शोधात होते. झाले का मग त्या पापडाचे पैसे दिले, पापड हातात उचलेले आणि निघालो आपापल्या घरी.
जे काही घडले त्या नंतर दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जे काही आम्ही हसलो. दिवसभर एकमेकांना चिडवत होतो Shah Rukh Khan कसा दिसतो रे.
तर अशी आमची सत्य घटना "न घडलेली Advertise विथ Shah Rukh Khan "
Labels:
लेखन,
लेखन / Marathi Lekhan
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Sunday, March 13, 2011
माझी आई
आज थोडे वेगळ्या वाटेवर जात आहे. लेखचे नाव बघून तुम्हाला कळलेच असेल हा लेख माझ्या आई शी संबधित आहे.
खरतर आई हा विषय इतका मोठा आहे की त्याला हात घालायला हिम्मत लागते, तेव्हा मी थोडे डेरिंग केले आहे.
आपली आई ही सगळ्यांना प्रिय असते, आणि मी त्याला अपवाद नाही पण बाबापण तितकेच आहेत , सध्या फक्त आई बद्दल बोलणार आहे.
तुम्ही विचार करत असाल या कवीला एकदम काय झाले, कविता सोडून लेख लिहायला ,
पण आईला कवितेमध्ये यमकांच्या चौकटीत नाही व्यक्त करता येणार, मी तसा प्रयत्न केला पण जमला नाही,
म्हणून हा लेख शेवटी भावना पोचवणे याला महत्व. तर जेव्हा कळायला लागले तेव्हा पासून मी आईला बघतोय तिने टेलरिंगच्या कामात स्वतःला इतके झोकून दिले आहे.
माझ्या आईला पहिले कि जिद्द , कठोर मेहनत याचा अर्थ काय असतो तो स्वतः मी आईमध्ये पहिला आहे.
आजतागायत ती रोजनिशी चालू आहे. आम्हा ३ भावांना सांभाळून टेलरिंगचे काम आई करायची. तेव्हा आई सकाळी ५.३० उठायची
बाबांचा डबा करून देयाचा मग शिवनकाम करायचे ते ११.३० पर्यंत नंतर मग दुपारचे जेवण बनवून, जेवण झाले कि थोडे १ तास आराम म्हणून जोपायाचे , जोपायाचे कसले घडीभर पडायचे म्हणा ना
की पुन्हा शिवणकाम ते थेट ७.०० पर्यंत मग रात्रीचे जेवण बनवून मग सगळे आवरून पुन्हा शिवणकाम ते रात्री १२.०० - १२.३० पर्यंत. बघा असे रोजनिशी होती आईची
आजही तशीच आहे. कधी कंटाळा नाही की हयगय नाही. किती दुखणे असो नाहीतर आजारपण असो ती कधी थांबली नाही.
तिची ही चिकाटी पाहून त्यावेळेस आम्हाला वेडेपणा वाटायचा , पण आता आम्ही थक्क होतो ते सगळे आठवून. आईने कधी ऐकले नाही आमचे , आम्ही तिला त्रास होयचा म्हणून शिवणकाम नको करू असे नेहमीच सांगत आलो आहे.

आज इतकी वर्ष झाली आम्ही लहानाचे मोठे झालो कामाला लागलो , आई अजून जशी पूर्वी होती तितकीच उत्साही आहे. आम्हाला कधी कधी नवल वाटते हे सगळे. ती आजही सकाळी त्याच वेळेला उठते आधी फक्त बाबांचा डब्बा होता आता आमचा पण असतो. जिद्द , चिकाटी , खूप मेहनत परिश्रम याचा अर्थ आईने तिच्या जगण्यावरून आम्हाला शिकवला . बाकी आमचे लाड , इतर गोष्टी जश्या सगळ्यांच्या आई करतात तशाच झाल्या. पण आईचा आयुष्याचा हा प्रवास मला नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे आणि पुढेही तरेल यात शंका नाही. सांगण्यासारखे खूप आहे पण आता इथेच थांबवतो. माझ्या आईची ओळखा करून देयाचा हा माझा प्रयत्न होता. - हर्षद कुंभार
Labels:
लेखन,
लेखन / Marathi Lekhan
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Thursday, March 10, 2011
कदाचित हा प्रसंग घडायचाच होता माझे मन पूर्ण पदावर येण्यासाठी.
आज काम थोडे जास्तच होते आणि आधीच दिलेले काम पूर्ण झाले नव्हते त्याचे वेगळेच टेन्शन, तरी कसाबसा काम थोडे उरकून घेतले मुंबई मधील मित्रांना माहीतच असेल ट्रेन पकडायची धावपळ मी पण असाच ७.०२ ची पकडण्यासाठी आटोपून निघालो तरी थोडासा उशीर झाला आणि समोर गाडी उभी फक्त ब्रिज ओलांडून जायचे होते पण माझ्या त्याच ट्रेन मधील लोकांनी ब्रिज असा भरून गेला कि गाडी अशी डोळ्यासमोरून गेली. आणि डोळ्यासमोरून गाडी गेल्याचे दुख तुम्हाला पण माहित असेल , मग उगाच त्या ब्रिज अडवलेल्या लोकांना शिव्या देताच खाली उतरलो , एकतर आधीच कामाचे टेन्शन होते त्यात असे काही झाले कि खूप राग येतो . मग काय आता पुढच्या ७.२१ च्या गाडीची वाट बघत बसलो होतो . मोबाईलमध्ये मग उगाच गेम खेळण्याचा प्रयत्न करू लागलो, तसे लक्ष नव्हते त्या गेममध्ये उगाच मन उदास झाले होते. काही काळ गेल्यावर एक लग्न झालेली मुलगी कडेवर एक छानशी छोतुशी मुलगी घेवून माझ्याजवळ आली आणि म्हणाली मला वेस्ट ला जायचे आहे कसे जायचे . मी जास्त विचार न करता , कुठलेश्या विचारात तिला समोरच्या ब्रिजवरून डाव्या हाताला जा म्हणालो. ती thanx म्हणाली आणि आणि गर्दीत नाहीशी झाली.काही क्षणात भानावर आल्यावर एकदम खडबडून जागा झालो आणि मी केलेली चूक लक्षात आली , मी त्या मुलीला उजव्या बाजूला जा सांगण्याऐवजी डाव्या बाजूला जा बोललो. मला कसेतरी वाटले मी तडक उठलो आणि धावत गेलो त्या गर्दीत त्या मुलीला शोधात ब्रिज वर गेली ती नुकतीच डाव्या बाजूला वळलेली पहिले, लगेच गेली आणि त्यांना माफ करा मी चुकीचे सांगितले गडबडीत पण वेस्ट ला इथून उजव्या बाजूला जावे लागेल तुम्हाला. ती " अय्या तुम्ही इथपर्यंत आलात सांगायला खरच thanx a lot . मी sorry म्हणालो , माझ्यामुळे उगाच तुम्ही चुकीच्या दिशेने गेला असता , हलकेच चेहेर्यावर हास्य आणून आभारी मानाने ती गेली उजव्या बाजूला , तो पर्यंत पुन्हा माझी ७.२१ ची गाडी आली होती मग काय आता पुन्हा धावत जावून एकदाची पकडली गाडी. आता थोडे मन हलके वाटत होते या प्रसंगानंतर..............
कदाचित हा प्रसंग घडायचाच होता माझे मन पूर्ण पदावर येण्यासाठी. - हर्षद कुंभार
Labels:
लेखन,
लेखन / Marathi Lekhan
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Saturday, March 5, 2011
एक अनुभव असाही
एक अनुभव असाही
मध्यंतरी पुण्याला गेलो होतो यात्रेला सासवड मध्ये पांगारे गाव आहे आईचे तिथे तेव्हा ची गोष्ट आहे ही
माझी मावस बहिण आणि आम्ही बसलो होतो timepass म्हणून मी cell मधली गाणी लावली तेव्हा ते
" माझिया प्रियाला प्रीत कळेना " गाणे लागले , तेव्हा माझी बहिण म्हणाली अरे याचे original गाणे माहित आहे का ?
माझ्या माहितीप्रमाणे जे गाणे आहे तेच original आहे. तर तिने मला तिच्या मोबाइल मध्ये मेसेग दाखवला
आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी कविता आहे ना "का माझिया प्रियाला प्रीत कळेना " याचेच पहिले कडवे होते ते.
मला हसावे कि रडावे तेच कळेना. तिला म्हणालो वा माझीच कविता मला दाखव, तर तिचा विश्वास बसेना या गोष्टीवर,
मग माझ्या मोबाईल मध्ये मला जेव्हा ही कविता सुचली त्यावेळेस save केलेला ड्राफ्ट तिला दाखवला. तेव्हा तिला पटले ते
आता बोला .........
हर्षद कुंभार
Labels:
लेखन,
लेखन / Marathi Lekhan
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Subscribe to:
Comments (Atom)