नमस्कार प्रिय वाचक, माझ्या डिजिटल घरात आपले स्वागत आहे! माझा ब्लॉग हा विचार, कल्पना आणि भावना यांचा एक रंगीबेरंगी कोलाज आहे, जो तुम्हाला माहिती देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी लिहिला गेला आहे. तुम्ही सध्याच्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी, ट्रेंडिंग विषयांमध्ये डोकावण्यासाठी, सर्जनशील कवितांचा आस्वाद घेण्यासाठी किंवा जीवनाच्या कथा वाचून विचारमग्न होण्यासाठी येथे आला असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
All The Contents by Labels
Books Review/ पुस्तक परिक्षण
(1)
Current Affairs
(1)
Ghazal
(1)
Life Hacks
(2)
Life Style
(2)
Marathi
(1)
qoutes /सुविचार
(1)
Traveling Spots
(1)
Trending Topics
(1)
आजचे जग
(1)
इतर कविता
(23)
इतर कविता / General Poems
(84)
कविता
(4)
कविता/Poem
(2)
ग़ज़ल
(6)
चालू घडामोडी
(10)
चालू घडामोडी /Current Affairs
(8)
चालू घडामोडी/Current Affairs
(9)
जीवनशैली
(13)
प्रेम कविता / Prem Kavita
(60)
प्रेम कविता /Love Poems
(4)
प्रेरणादायी कविता
(3)
प्रेरणादायी कविता / Inspiring Poems
(10)
मराठी
(6)
मराठी कविता
(6)
मराठी कविता / Marathi Kavita
(2)
मराठी कविता / Marathi Poetry
(1)
मराठी कविता / Poems
(1)
मराठी कविता /Marathi Poem
(1)
मराठी कविता /Marathi Poetry
(3)
मराठी ग़ज़ल
(4)
मराठी लेख
(1)
मराठी लेख / Articles
(18)
मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा
(3)
मराठी सुविचार /Quotes
(1)
मुक्तछंद
(1)
मैत्रीच्या कविता
(7)
मैत्रीच्या कविता / Friendship Poems
(10)
लेख
(1)
लेख /Articles
(18)
लेख Marathi Lekhan
(3)
लेखन
(10)
लेखन / Marathi Lekhan
(57)
वास्तविकता
(1)
विचार / thoughts
(2)
विडंबन कविता
(2)
शायरी
(1)
सुविचार / One Liner
(2)
सुविचार / Quotes
(2)
सुविचार /Quotes
(7)
सुविचार/Quotes
(1)
हिंदी
(1)
हिंदी / Quotes
(1)
हिंदी Quotes
(1)
हिंदी कविता / Hindi Poems
(2)
हिंदी कविता /Hindi Poems
(3)
हिंदी कविता /Poems /Quotes
(1)
हिन्दी कविता / Hindi Poems
(2)
Saturday, February 23, 2013
धुंद क्षणी… - हर्षद कुंभार
Labels:
प्रेम कविता / Prem Kavita
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Saturday, February 9, 2013
- बालक - पालक अर्थात BP. -
- बालक - पालक अर्थात BP. -
काल हा चित्रपट पाहण्याचा योग आला. कालपर्यंत जे काही या चित्रपटाबद्दल ऐकले , वाचले ते खरंच अनुभवले.
म्हणतात ना तुमचे बालपण तुम्हाला नेहमी खुणवत असते आणि चिडवत देखील , कारण गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असच आपण नेहमी म्हणत असतो. आपल्या बालपणाशी साधर्म्य साधणारे काही तुम्हाला दिसले किव्वा वाचण्यात आलं की कसं छान वाटत ना. जेव्हा शाळा चित्रपट पाहिला तेव्हापण असच काहीसं झालं होत आणि तेव्हाही जुन्या आठवणींचे गलबत काळाच्या पडद्यामागं अलगद तरंगत गेल होत.
" बालक पालक " विषय अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा. म्हणजे बालक आणि पालक यांना लैंगिकते
बद्दल मोकळेपणाने बोलावे या बद्दल अजूनही धीर होत नाही म्हणा किव्वा तसे माध्यम नाही. चित्रपटात जे दाखवले अगदी तसच काही घडत नाही पण त्याच्याशी मिळते -जुळते असे घडलेले असते. सगळ्यांना ते आठवलेच असेच त्यांनी केलेले उपद्व्याप नाही का ?. आमच्या वेळेस पण नेट किव्वा मोबाईल इतका प्रचलित नव्हता. त्यामुळे प्रश्नही आमचेच आणि उत्तरेही आमचीच. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात "विशू" नावाचं पात्र पण असेल. ज्या त्या काळात मुलांनी अश्या प्रश्नांवर स्वतः आणि कुवतीप्रमाणे शोधलेली उत्तरे आहेत आणि असतील. त्या काळातलं निभावल आम्ही आणि आधीच्या पिढ्यांनी.
पण आताची पिढी आणि नंतर येणारी पिढी त्याचं काय. त्यांना कुणीतरी हे नाजूक वळण सावधगिरीने आणि संयमाने कसे पार पाडायचे ते कोण सांगेन ही जबाबदारी नवीन पालकांवरच आहे ना. तेव्हा मुलांसोबत लहानपणापासूनच मित्रवत राहा,
वागा म्हणजे ते न घाबरता तुमच्याशी सवांद साधू शकतील नाही का ? मुलाचं वयात येण पालकांना जाणवत नाही अस आहे काही नाही ना, मग आपल्या मुलांकडे आपल्यालाच पहाव लागणार ना. तुमच्या बाबतीत जे घडले ते त्यांच्या बाबतीत घडू नये म्हणून पालकांना नव्या पिढी सोबत जुळत घ्यावं लागेल. विचारात फरक पडला की माझ्या लेखाचं चीज झालं असे मी समजेन
हं पण तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि जर तुम्ही पालक असाल त्याच वर्गवारीत मोडणारे तर आपल्या पाल्याला सोबत घेवून जा. - हर्षद कुंभार
Labels:
इतर कविता / General Poems
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Sunday, January 27, 2013
एका ताऱ्याची भेट....
एका ताऱ्याची भेट....
मुंबई मध्ये राहणाऱ्या सर्वांनी कधी ना कधी एका तरी एकदातरी सेलेब्रेटीला पाहिलं असेल. तसं मीपण पाहिलंय पण ही भेट वेगळीच होती.
तर किस्सा असा आहे...
दिनांक : १७ - ०१ २०१३
वेळ : ११.०० - ११.३० सुमारास
ठिकाण : गोरेगाव (पूर्व) हब मॉलच्या मागील रोड.
मी आणि माझे ऑफिसचे मित्र रोजनिशीप्रमाणे चहा पिण्यासाठी आलो होतो. त्याच रोड लगत चहाची टपरी आहे. तर आम्ही चहा घेत निव्वळ ऑफिसच्या महत्व नसलेल्या गोष्टींवर बोलत असताना एक गाडी आमच्या जवळ येवून थांबली. त्या गाडीतील व्यक्तीने आम्हाला हटकून
एका पत्त्याबद्दल विचारणा केली. अर्थात ती व्यक्ती त्या रोडवरील जवळचा एक पत्ता विचारत होती. आम्ही ५ मित्रांमधील मी आणि अजून एका मित्राने त्यांना प्रतिसाद दिला. माझा मित्र त्यांच्याशी बोलत असताना मला मात्र एक कोडं पडल यार यांना कुठेतरी पाहिलंय. आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला
आणि थोडा पुढ होत त्यांना विचारलं तुम्ही " आशिष पवार " ना ? आणि त्यांनी " हो ". अरे सॉलिड म्हंटल आणि त्यांच्याशी हस्तांदोल करून त्यांना
नेमका पत्ता सांगितला आम्हाला जितका माहित होता. ते एका चित्रीकरण स्तळाबद्दल विचारत होते. ते घाईत असल्याने लगेच गेले. आणि आमचा ऑफिस चा तो विषय सोडून मग आम्ही "आशिष पवार " बद्दल बोलू लागलो, अर्थात जे लोक E -TV वरील " Comedy Express " बघत असतील त्यांना कळले असेल " आशिष पवार " कोण आहे ते. पण छान वाटले तेव्हा खरच मराठी नटांमध्ये विनोदी जगतात " आशिष पवार " याचं नाव खूप मोठ आहे. आणि त्यांच्याशी झालेली ही अचानक भेट खूप सुखद होती. - हर्षद कुंभार
Labels:
लेखन / Marathi Lekhan
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Sunday, January 6, 2013
Ek Prem Kavita

Thursday, November 15, 2012
एकालाच जमलं वाघ होयला....

Sunday, November 11, 2012
लहानपणाची दिवाळी
सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या खूप खूप शुभेछ्या. आनंदी रहा सुखी रहा
माझ्या या एका प्रश्नार्थक वाक्यानेच तुम्हाला तुमचे दिवाळी साजरी केलेले लहानपण आठवले असेल. हो कि नाही.
दिवाळीच्या काळात तुम्ही खूप दिवाळी अंक आणि लेख वाचले असतील पुस्तकात नाहीतर कोणत्यातरी वेबसाईटवर.
मी तुम्हाला माझ्या लहानपणाची दिवाळी सांगणार आहे. बघा बर तुमच्या लहानपणाशी मिळती जुळती आहे का ते.
तर सुरुवात करूया चला तर मग आपल्याला १२ वर्ष मागे जावे लागेल.
अर्थात जे मी काही सांगणार आहे ते सगळे शालेय कालखंडातले आहे बर का !
शाळेत परीक्षेचे वेळापत्रक लागले की आधी संपते कधी या गोष्टीवर जास्त भर असायचा.
कारण दिवाळीच्या सुट्टीची सगळेच आतुरतेने वाट पाहत असायचो . कधी एकदाचे पेपर संपतील असे होयचे.
आणि एकदा कि पेपर संपले कि बास नुसता धुडघूस असायचा आमचा चाळीत.
हो चाळीतच अर्थात दिवाळीची खरी मज्जा ही चाळीतच येते हे वेगळे सांगायला नको नाही का.
सर्वात आधी गेल्या दिवाळीची पिस्तुल आहे का ते शोधायचे काम आम्ही करायचो. ती चांगल्या अवस्तेत असेल तर ठीक नाहीतर बाबांच्या मागे लागून नवीन घेयचीच.
मला आठवतंय एकदा बाबांनी मला एक लोखंडी पिस्तुल आणली होती ती एकदम खरी पिस्तुलासारखी दिसायला होती आणि ते गोळ्या भरायचे हे तसेच होते फिरायचे ते गरगर.
दिवाळीच्या आधीच त्या पिस्तुलांनी आम्ही चोर - पोलीस खेळायचो. टिकल्या बंदुकीत भरून कंटाळा आला की एक कागदावर सगळ्या जमा करून
तो कागद पेटवायचा त्यात काही औरच मज्जा असायची. टिकल्यांची रीळ असली की निरनिराळ्या पद्धतीने त्या फोडण्याचा आमचा प्रयत्न असायचा.
जसे की नट आवळायची पक्कड घेयाची त्यात टिकली धरून फोडायची.
नाहीतर रीळ घेवून थोड्या रफ जागेवर बोटाने जोरात घासायची आणि टिकली फोडायची. असे आणि असेल प्रकार आम्ही करायचो
हे सगळे दिवाळीच्या आधी बर का. बाबा दिवाळीच्या आदल्या रात्री कधी फटाके आणायचे हे कधी कळले नाही आम्हाला.
पण सकाळी लवकर उठून सर्वात आधी आम्हाला फटाके दाखवून
लवकर उटन लावून अभ्यंगस्नान करायला लावायचे. तेव्हा अभ्यंग स्नानाचा खूप कंटाळा येयचा ते खरखरीत उटन आईला अंगाला लावायची अगदी नको वाटायचे ते.
पण महत्वाचे हे होते कि चाळीत सर्वात आधी उठून पहिला फटका कोण फोडणार. जणू शर्यंत लागली असायची तेव्हा. थोडा अंधार असे पर्यंत फटाके फोडायचे.
फटाके पूर्ण माळ आम्ही फोडलेली आठवत नाही उलट माळ सगळ्या सोडवून एक एक फटका फोडायला खूप आवडायचे. तो फटका पण कसा फोडायचा माहितेय
कुठ भिंतीत फट असेल तर तिथे खोचून फोडायचा. नाहीतर फटाक्यांचे रिकामे खोके घेयचे त्याच्यात ठेवून फोडायचा. अहो आम्ही तर काय करायचो माहितेय
पिठाच्या गिरणीतून खाली पडलेले पिठी पिशवीत आणायचे. आणि मुठभर पीठ खाली जमिनीवर ठेवायचे त्यात एक फटका खोवायचा आणि मग फोडायचा.
ते अक्षरशः चित्रपटातल्या दृष्यागत वाटायचे फुटताना आगीचा एक लोट उठायचं तेव्हा. खूप करामती केल्या त्येवेळेस आता आठवले कि फार छान वाटते.
चाळीत अजून एका गोष्टीची शर्यत असायची कुणी जास्त फटाके फोडले आणि त्यासाठी आम्ही एक शक्कल लढवायचो. रात्री गुपचूप आजूबाजूचा फटाक्यांचा कचरा स्वतःच्या घरासमोर
आणून ठेवायचा म्हणजे दुसऱ्याला वाटेल अरे किती फटके फोडलेत याने. मुळात दिवाळी या गोष्टीवर थांबत नाही अजून खूप काही असते. सुट्टी संपेपर्यंत बाकी गोष्टी इतक्या लक्षात राहण्यजोग्या
नव्हत्या किव्वा नसतील म्हणून ठळक काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत.
आठवणीतले बरेच क्षण सांगण्याचा मी प्रयत्न केला. अर्थात तुम्हाला जे नक्कीच आवडले असेल. आणि तुमचे बालपण तुम्हाला आठवले असेल अशी अशा करतो. तुम्ही केलेल्या काही अतरंग गोष्टीपण असतील नाकी कळवा. - हर्षद कुंभार
Labels:
लेखन / Marathi Lekhan
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Saturday, October 13, 2012
प्रेम म्हणजे फक्त ...
प्रेम म्हणजे फक्त ...
सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी होताना पाहणे का ?
प्रेम म्हणजे फक्त ...
दिवस रात्र तिच्याच गोष्टींमध्ये गुंतून राहणे आणि सतत ती जवळ असावे असे वाटणे
तिच्याशी बोलू वाटावे असे कि जसे जग फक्त दोघांचे आहे?
प्रेम म्हणजे फक्त ...
हेच कि ज्यात गुलाबाच्या फुलाला, विशिष्ट रंगाला अती महत्व येण . साऱ्या

नाजूक भावना जणू
फक्त त्याच काळात जन्माला येण. आयुष्यात काहीतरी नवीन घडतंय या भावनेने जगत राहण ?
प्रेम म्हणजे फक्त ...
ज्यात आपण विरहाच्या दुखाने साथीदाराशी बोलताना चंद्र ,सूर्य, ताऱ्यांचे नजराणे देत असतो.
प्रत्येक ती गोष्ट जी तिला आवडते त्यासाठी स्वतःच हट्ट धरणे. तिला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते
करू असे या ताकतीने भरून येणे.?
अशीच असते का प्रेम कहाणी ? कि अजून काही - हर्षद कुंभार
फक्त त्याच काळात जन्माला येण. आयुष्यात काहीतरी नवीन घडतंय या भावनेने जगत राहण ?
प्रेम म्हणजे फक्त ...
ज्यात आपण विरहाच्या दुखाने साथीदाराशी बोलताना चंद्र ,सूर्य, ताऱ्यांचे नजराणे देत असतो.
प्रत्येक ती गोष्ट जी तिला आवडते त्यासाठी स्वतःच हट्ट धरणे. तिला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते
करू असे या ताकतीने भरून येणे.?
अशीच असते का प्रेम कहाणी ? कि अजून काही - हर्षद कुंभार
Labels:
लेखन / Marathi Lekhan
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Tuesday, October 2, 2012
|| माझ्या FB वरील नावाची जन्मकथा ||
|| माझ्या FB वरील नावाची जन्मकथा ||
नावाची जन्म कथा नेहमीच खूप आकर्षक असते. मी मध्यंतरी एकदा एक पुस्तक पहिले होते त्यात आता पर्यंत सर्व नामांकित असलेल्या नावाच्या जन्मकथा होत्या. उदारणार्थ HP , Microsoft , इत्यादी. कंपन्या यांच्या नावाच्या जन्मकथा खूप छान होत्या. अर्थात हे ज्याने वाचल्या असतील त्याला किव्वा वाचेल त्याला कळेलच.
तर इथे मुळ विषय असा की जसे या लोकांनी त्याच्या या गोष्टी शेयर केल्या तसाच मी ही प्रयत्न करावा असे मला वाटले म्हणून हा लेख. मी जेव्हा प्रथमतः फेसबुकवरला जुळतो तेव्हा आपले साधेच नाव टाकले होते " Harshad Kumbhar " असे आणि तेव्हा मी कविता देखील करत नव्हतो आणि फेसबुकपण जास्त वापरात नव्हते फक्त account काढून ठेवले होते जसे आता twitter वर आहे . तेव्हा ओर्कुटचा जमाना होता. त्यावेळेस ओर्कुटवर पडीक असायचो. सुरुवातीच्या काही कविता मी ओर्कुटमध्ये पोस्ट केल्या आहेत.
कालांतराने फेसबुक वापरात आले ज्या वेळेस मी कविता करण्याच्या पूर्ण भरात होतो. मग ओर्कुट सोडून फेसबुक वर कविता हळू हळू टाकायला सुरुवात केली. आता मराठी कविता असल्याने माझा मराठी बाणा जागा झाला होता आणि मी फेसबुकवरचे माझे नाव " हर्षद कुंभार " असे केले. काही दिवसांनी त्यातपण बदल करून मी आमचे मुळचे आडनाव लावून असे नाव केले " हर्षद राजे " . आले की नाही नावात वजन. मलाही अभिमानास्पद वाटायचे ते. FB मध्ये मित्रांना पण आवडले नाव ते. खूप जणांच्या कमेंट त्यावेळेस मला मिळाल्या होत्या.
खूप काळ हेच नाव मी ठेवले होते.
एकदा मला सहजच वाटले की यार प्रत्येक नामांकित व्यक्ती कोणत्यातरी खास ओळखीने नावाजलेला असतोच. महाराष्ट्राला लाभलेले कवी पहिले की सर्वाना टोपण नावे आहेत. त्यावेळेस मला कोणता ज्वर चढला देव जाने वाटले की आपले असे काहीतरी नाव असावे जेणेकरून ती आपली ओळख बनेल. मग झाली नाव काय असावे हे ठरवण्याची मोहीम. खूप विचार केला काही सुचेनाच. यात बराच वेळ गेला बर का तोपर्यंत माझे नाव " हर्षद राजे " हेच होते.
एके दिवशी मी टीवी वर " My Name Is Khan " चित्रपट पहिला. एक वेगळेपण होते या नावात आणि त्यावेळेस एक मेसेज खूप वेळा मी पहिला ज्यात हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांची नावे जर तो चित्रपट मराठीत केला तर त्याचे नाव काय असेल अश्या प्रकारचा होता. आणि मला त्यावेळेस सुचले की यार जर " My Name Is Khan " असा चित्रपट मराठीमध्ये बनवला तर त्याचे नाव काय असेल. आणि डोक्यात एक नाव आले ते होते " पाटील म्हणतात मला " . अर्थात ते इतके आवडले मला ना म्हंटले यार मराठी निर्मात्यांनी असा एखादा चित्रपट नक्की काढावा.
कदाचित हा लेख वाचून कुणी हे नाव सुचवेल पण कुणाला चित्रपटासाठी.
तर आता पुढे यावरून मी माझ्या नावाची शक्कल केली आणि सध्याचे तुम्ही पाहत असलेल नाव " कवी म्हणतात मला " हे त्यावरून सुचलेले आहे. तुम्हालापण या नावाची सवय झाली आहे हो की नाही आणि हे नाव दिसले कोणत्या कविताच्या खाली की लगेच तुम्हाला कळते ही हर्षद कुंभार ची कविता आहे. सरळ म्हणायले गेले तर हीच ओळख बनली आहे माझी त्या नावातल्या वेगळेपणामुळे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असाच राहूद्या आणि हे नाव पुढेही माझी अशीच ओळख बनून राहिलं हीच अशा करतो.
- तुमचा हर्षद कुंभार ( फेसबुक वरचा कवी म्हणतात मला )
Labels:
लेखन / Marathi Lekhan
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Saturday, August 25, 2012
" परतलेला भात "
" परतलेला भात "
आज अजून एक वेगळा लेख. मी नेहमीच माझे स्वानुभव तुमच्याशी शेयर करत असतो. तुम्हीपण चवीने ते वाचता लाईक करता शेयर करता त्याबद्दल आभारी आहे. तर आजचा लेख आहे तो एका खाद्य पदार्थाबद्दल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या कवीला काव्य अन या गोष्टी सोडून मध्येच खायचे काय सुचले. पण खायचा पदार्थ तर ऐका आधी.
हा पदार्थ आहे " परतलेला भात ". अर्थात आई लहानपणापासून जे म्हणत होती तेच नाव मीपण सांगत आहे. तुमच्या घरी याला अजून काही म्हणत असतील. पण एक गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रात हा पदार्थ लहान थोरापासून सगळ्यांना आवडणारा आहे. आधी लहान असताना आई बनवून देयची जेव्हा पासून नीट कळायला लागले मी स्वतः करायला लागलो.
हा भात करण्यासाठी मुख्य गोष्ट लागते ती म्हणजे रात्रीचा शिळा भात. आता तुमच्या चांगलेच लक्षात आले असेल मी कोणत्या खाद्य पदार्थाबद्दल बोलत आहे. आधी मी माझी स्वतःची पद्धत सांगतो मी कसा बनवतो ते.
चला तर मग करूया सुरुवात
साहित्य : रात्रीचा शिळा भात, २-३ हिरव्या मिरच्या, हळद , जिरे , मोहरी, शेंगदाण्याचा कुट, थोडेसे तेल.
कृती : प्रथम शिळा भात जरा मोकळा करून घ्या. भातावर थोडी हळद टाकून जरा मिश्रण करून घ्या. कढईत थोडे तेल तापवून घेवून त्यात जिरे , मोहरी, आणि मिरची ही फोडणी तळा. आता . आता तो भात त्या कढईत टाकून मस्त फोडणीसोबत परतून घ्या. त्या नंतर त्यावर १-२ शेंगदाण्याचा कुट टाकून थोडा मिश्रण करून मंद आचेवर थोडा वेळ ठेवा की झाला तुमचा भात.
तर ही झाली माझी कृती प्रत्येकाची आपली वेगळी कृती असेल घरची. पण हमखास सगळ्यांच्या घरी होणारा हा पदार्थ आहे तर मित्रांनो माझ्या या लेखाशी सहमत असाल तर मलाही सांगा तुमचा अनुभव. चला काळजी घ्या. - तुमचा कवी हर्षद कुंभार
Labels:
लेखन / Marathi Lekhan
I’m a storyteller at heart, a curious mind, and someone deeply passionate about understanding the world around us. Writing has always been my way of connecting, expressing, and exploring. It allows me to transform everyday moments, global events, and inner musings into meaningful narratives.
This blog is an extension of my personality—a place where my thoughts meet the written word, where your interests align with engaging content, and where we journey together through the realms of knowledge and creativity.
मी एक गोष्टी सांगणारा, जिज्ञासू मनाचा आणि जग समजून घेण्याची प्रचंड आवड असलेला व्यक्ती आहे. लेखन हे माझ्यासाठी कनेक्ट होण्याचे, व्यक्त होण्याचे आणि शोध घेण्याचे माध्यम आहे. लेखनाच्या माध्यमातून मी रोजच्या घटनांना, जागतिक घडामोडींना आणि अंतर्मनातील विचारांना अर्थपूर्ण कथांमध्ये रूपांतरित करतो.
माझा ब्लॉग म्हणजे माझे व्यक्तिमत्त्व, माझे विचार, तुमच्या आवडींशी जुळणारी उत्साही सामग्री आणि ज्ञान व सर्जनशीलतेच्या प्रवासाचे दालन.
Sunday, August 19, 2012
Ek Kavita

Subscribe to:
Posts (Atom)