All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Tuesday, October 2, 2012

|| माझ्या FB वरील नावाची जन्मकथा ||

                                                             ||  माझ्या FB वरील नावाची जन्मकथा || 

                             नावाची जन्म कथा नेहमीच खूप आकर्षक असते. मी मध्यंतरी एकदा एक पुस्तक पहिले होते त्यात आता पर्यंत सर्व नामांकित असलेल्या नावाच्या जन्मकथा होत्या. उदारणार्थ HP , Microsoft , इत्यादी. कंपन्या यांच्या नावाच्या जन्मकथा खूप छान होत्या. अर्थात हे ज्याने वाचल्या असतील त्याला किव्वा वाचेल त्याला कळेलच. 
                             तर इथे मुळ विषय असा की जसे या लोकांनी त्याच्या या गोष्टी शेयर केल्या तसाच मी ही प्रयत्न करावा असे मला वाटले म्हणून हा लेख. मी जेव्हा प्रथमतः फेसबुकवरला जुळतो तेव्हा आपले साधेच नाव टाकले होते  " Harshad Kumbhar " असे आणि तेव्हा मी कविता देखील करत नव्हतो आणि फेसबुकपण जास्त वापरात नव्हते फक्त account काढून ठेवले होते जसे आता twitter वर आहे . तेव्हा ओर्कुटचा जमाना होता. त्यावेळेस ओर्कुटवर पडीक असायचो. सुरुवातीच्या काही कविता मी ओर्कुटमध्ये पोस्ट केल्या आहेत. 
                 कालांतराने फेसबुक वापरात आले ज्या वेळेस मी कविता करण्याच्या पूर्ण भरात होतो. मग ओर्कुट सोडून फेसबुक वर कविता हळू हळू टाकायला सुरुवात केली. आता मराठी कविता असल्याने माझा मराठी बाणा जागा झाला होता आणि मी फेसबुकवरचे माझे नाव " हर्षद कुंभार " असे केले. काही दिवसांनी त्यातपण बदल करून मी आमचे मुळचे आडनाव लावून असे नाव केले " हर्षद राजे " . आले की नाही नावात वजन. मलाही अभिमानास्पद वाटायचे ते. FB मध्ये मित्रांना पण आवडले नाव ते. खूप जणांच्या कमेंट त्यावेळेस मला मिळाल्या होत्या.
खूप काळ हेच नाव मी ठेवले होते. 
              एकदा मला सहजच वाटले की यार प्रत्येक नामांकित व्यक्ती कोणत्यातरी खास ओळखीने नावाजलेला असतोच. महाराष्ट्राला लाभलेले कवी पहिले की सर्वाना टोपण नावे आहेत. त्यावेळेस मला कोणता ज्वर चढला देव जाने वाटले की आपले असे काहीतरी नाव असावे जेणेकरून ती आपली ओळख बनेल. मग झाली नाव काय असावे हे ठरवण्याची मोहीम. खूप विचार केला काही सुचेनाच. यात बराच वेळ गेला बर का तोपर्यंत माझे नाव " हर्षद राजे " हेच होते.
           एके दिवशी मी टीवी वर " My Name Is Khan " चित्रपट पहिला. एक वेगळेपण होते या नावात आणि त्यावेळेस एक मेसेज खूप वेळा मी पहिला ज्यात हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांची नावे जर तो चित्रपट मराठीत केला तर त्याचे नाव काय असेल अश्या प्रकारचा होता.  आणि मला त्यावेळेस सुचले की यार जर  " My Name Is Khan " असा चित्रपट मराठीमध्ये बनवला तर त्याचे नाव काय असेल. आणि डोक्यात एक नाव आले ते होते  " पाटील म्हणतात मला  " . अर्थात ते इतके आवडले मला ना म्हंटले यार मराठी निर्मात्यांनी असा एखादा चित्रपट नक्की काढावा.
कदाचित  हा लेख वाचून कुणी हे नाव सुचवेल पण कुणाला चित्रपटासाठी. 
       तर आता पुढे यावरून मी माझ्या नावाची शक्कल केली आणि सध्याचे तुम्ही पाहत असलेल नाव " कवी म्हणतात मला " हे त्यावरून सुचलेले आहे. तुम्हालापण या नावाची सवय झाली आहे हो की नाही आणि हे नाव दिसले कोणत्या कविताच्या खाली की लगेच तुम्हाला कळते ही हर्षद कुंभार ची कविता आहे. सरळ म्हणायले गेले तर हीच ओळख बनली आहे माझी त्या नावातल्या वेगळेपणामुळे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असाच राहूद्या आणि हे नाव पुढेही माझी अशीच ओळख बनून राहिलं हीच अशा करतो. 
                                                                                      - तुमचा हर्षद कुंभार ( फेसबुक वरचा कवी म्हणतात मला )



      
    

   
                      

No comments:

Post a Comment