All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, March 17, 2012

आता तरी थोडी विश्रांती घेवू देणा रे.

आजकाल काय झाले आहे कळत नाही . काही सुचत नाही नीट . शेवटी प्रयत्न करून ही कविता केली. तेव्हा असे कळले की मनाला आता थोडा आराम द्यावा . मग आहे पुन्हा लिहायला वेळ आपल्याला. तेव्हा काही काळ कविता कदाचित तुम्हाला वाचायला मिळणार नाहीत तेव्हा माफी द्या  
हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला) 

Saturday, March 10, 2012

S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर

                                                             S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर 
                  लेख लिहायला मलाना काहीही विषय पुरेसा असतो. एखादी गोष्ट मनात घर करून बसली की झाले त्यावर काहीतरी लिखाण करायचे हे नक्कीच होते माझे. आता हा लेख लिहायचे कारण माहित नाही पण जेपण लिहीन ते तुम्हाला आवडेल हे खात्रीने मी सांगू शकतो. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला कारण हे असतेच. तर हा लेख लिहायचे कारण आहेत S . T . महामंडळातील काही चालक. आता तुम्ही म्हणाल यात काय लिहायचे लेखाच्या नावावरून कळतेच आहे की ते फास्ट चालवत असणार गाडी म्हणून.
                मला ही माहित आहे या एका ओळीतल्या गोष्टीला मी माझ्या शब्दात बांधून मांडेल तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणाल वा काय लिहिले आहे.आता बघा ना अजून मुळ मुद्द्याला सुरुवात झाली नाही तरी किती लिहून झाले. बर बर आता जास्त पण पकवत नाही तुम्हाला. तर करूया सुरुवात 
          मला जॉब लागला तेव्हा पासून माझा आणि  S . T . महामंडळाचा संबंध आला आहे. म्हणजे गेले ३ वर्ष मी S . T . महामंडळाच्या सेवेचा वापर करतो आहे. महामंडळात खूप चालक आहे जे आता ओळखीचे झाले आहेत , हो म्हणजे चालकाला ओळखून आम्ही समजतो ही आपली गाडी आहे ते. माझा प्रवास हा भिवंडी ते बोरीवली असा आहे रोजचा ज्यात साधारण १.५ तास हा लागतोच, म्हणजे हे एकदम सरासरी आहे बरे. हान आता ट्राफिक असेल तर मात्र २ तासाच्या वरच लागतो. 
            काही चालक तर अक्षरशा वैताग आणतात त्या प्रवासाला , हो अहो ते इतके स्लो चालवतात की वीट येतो नुसता वाटते कधी पोचतो देव जाणे. आणि हे असे चालक २ तास घेतातच इच्छित स्थळी पोचवायला. खरतर आम्ही ना चालक बघून गाडीत बसतो कारण नंतर उगाच बोर होण्यापेक्षा न बसलेलेच बरे नाही का. पण कधी कधी नाईलाज असतो आमचापण. 
           हान आता  S . T . महामंडळातील खरे हिरो ज्यांना आम्ही पायलट नाहीतर मायकल शुमाकर असे बोलवतो. अर्थात त्याला संदर्भ पण तसाच आहे. अहो हे पायलट न खरच कुशल आणि तरबेज आहेत गाडी चालवायला. हे सरासरी ज्या रोडने १.५ तास लागतो न त्याच रोडने १ तासाच्या आत गाडी आणतात बोला. आणि हे गाडी चालवत असताना तुम्हाला कितीही झोप आली असेल तरी तुम्ही झोपूच शकत नाही कारण ते इतके फास्ट चालवत असतात की कुठेतरी धरून बसावे लागते. ह्याला मागे टाक त्याला टाक करताना जी रेसिंग पाहायला मिळते ती वेगळीच आणि जोश भरणारी असते. जर तुम्ही कुठे धरून बसले नाही ना तर वळण मार्गावर बसल्या जागेवर आडवे झालात म्हणून समजा. आणि मुख्य म्हणजे यातल्या काहीना तर  २५ वर्ष गाडी कुठे न धडकावता वा ठोकता S . T . महामंडळामध्ये  सेवा केल्याबद्दल त्यांना बक्षीस मिळालेले आहे.           
            खरतर या गोष्टी तुम्हाला इतक्या महत्वाच्या नसतीलही पण माझ्या सारख्या रोज प्रवास करणाऱ्या मित्रांसाठी असेल कारण लवकर इच्छित स्थळी लवकर उतरणे सर्वात महत्वाचे नाही का. कालच मी फास्ट रेसिंग चा अनुभव घेतल्याने हा लेख लिहावा हे निश्चित झाले होते माझे. मला अशा आहे की तुम्हाला लेख नक्की आवडला असेल आणि तुम्ही हे वाचताना बोर झाला नसेल. चला परत भेटू नवीन विषयासोबत नाहीतर माझ्या कविता तर आहेतच तुमच्यासाठी. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

   

         


Thursday, March 8, 2012

"शाळा" पाहिल्यानंतर

                                                                                  "शाळा"  
           खरच बोकिलांची "शाळा" भाग पडते आपल्याला शाळेत पुन्हा बसायला. पुन्हा सगळे ते क्षण आठवायला खरच भाग पडते ही "शाळा" ही कलाकृती विचार करायला. मी जेव्हा "शाळा" पाहत होतो खरच मलाही असे वाटत होते की मी त्या शाळेतला एक विद्यार्थी आहे. 
             वर्गात प्रार्थना असताना केलेली धमाल, खरच तसेच जसे काही सर्व आता समोर "शाळा" पाहताना वाटले. प्रार्थना करताना केलेल्या दंगेमुळे खाल्लेला मार ही आठवतो.  प्रतिज्ञा चालू असताना हात दुखावल्या मुले समोरच्याच्या खांद्यावर हाताला थोडा आधार देणे असे अनेक किस्से आठवले.  माझे ही शाळेतले दिवस अगदी जोश्या सारखेच होते. जोश्याच्या जगी मी स्वतः ला पहिले होते.    
             मला माझा गृहपाठ केला नाही तर मार बसेल की काय "शाळा" पाहताना वाटले. इतिहासाचा तास ज्यात मलाच वाचायला सांगायचे तेव्हा, वाटले की या "शाळेतले" सरपण मलाच सांगतील आता धडा वाच म्हणून. इंग्लिशची मात्र माझीही बोंब होती जशी यात सुऱ्या आणि पवार यांची होती. आम्हाला खास असे कुणी नव्हतेच इंग्लिश शिकवायला कुणीतरी येयचे काही दिवस शिकवायचे की जायचे, अन असेच वर्ष संपायचे.      
            विज्ञानच्या वर्गाला तर तेव्हा मैडम त्यांनी नवीन पद्धत काढली होती आम्ही मुलांनी आधीच उद्या शिकवणाऱ्या धड्याच वाचन करून येयचे, आणि दुसऱ्या दिवशी मैडम आधी आम्हाला प्रश्न विचारणार त्यातले आणि आम्ही उत्तर सांगायचे, अर्थात सुरुवातीला त्याचे काटेकोर पालन केले आम्ही, नंतर मात्र एक शक्कल केली , बाकाखाली पुस्तक धरून थोडासा संदर्भ घेवून मैडम ने विचरले त्याबद्दल थोडे बोलले की झाले, त्यामुळे मैडम च्या नजरेत आम्ही हुशार ठरलो होतो म्हणजे होतोच आम्ही.                 
                शाळेत असताना आम्हाला आठवतंय जसे सुऱ्या आणि इतर त्यांच्या बाईंकडे बघायचे तसेच काहीसे आमचेही होते. आम्हाला एक बाई होत्या त्या खूप आवडायच्या, त्यांचा वर्ग चालू असताना आम्ही फक्त आ वासून त्यांना बघतच राहायचो अर्थात त्यांची नजर चुकवून. 
आज "शाळा" पाहतानापण त्या सुऱ्या अन पवार यांच्यासोबत मागल्या बाकावर बसल्यासारखे वाटले. 
              जोश्याची जशी लाईन होती तशीच माझीपण होती बर का आणि जोश्याने मारलेला डायलॉग  "आपल्या लाइन कड़े बघणे ही एक सुद्धा कला आहे, लाइन ला पण नाय कळला पाहिजे... की आपण तिच्याकडे बघतोय, समोर मैडम क़िवा सर आले ना... तरी पण, आपल्याला आपल्या लाइन कड़े बघता आला पाहिजे... कळला काय . . . "   . अगदी तंतोतंत आहे. फक्त फरक एक होता जोश्याने शिरोडकरला बोलून दाखवले होते की ती त्याला आवडते , तेव्हा माझे काही धाडस झाले नव्हते सांगायचे.   
             शाळेतली गेलेली एकच ट्रिप सारखी आठवते, तेव्हा ५० /- मध्ये आम्हाला मुंबई दर्शन घडवले होते. नेहरू तारांगण, महालक्ष्मी , म्हातारीचा बूट , नेहरू उद्यान, हे सारे आठवते. या "शाळा" मधील त्यांचा गेलला कॅम्प याची आठवण करून देतो.   
           "शाळा" जेव्हा संपतो तेव्हा एक नवीन पडदा डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपल्याला आपल्या शाळेत घेवून जातो. शाळेतले सर्व दिवस नजरेसमोर उभे राहतात. " शाळा "  जेव्हा शेवटला पोचतो तेव्हा मन उदास अन खिन्न होते, शिरोडकर ते गाव सोडून गेलेली असते , सुऱ्या अन पवार नापास झाल्याने जोश्या पासून वेगळे होतात. शेवटी एकटाच जोश्या राहतो. यांची पुढची कथा आपण जोडू पाहतो, पुढे असे होईल तसे होईल करून "शाळेचा" शेवट आपल्या परीने पूर्ण करतो.  
- हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )
          

     

असाधारण ती

असाधारण ती  
- हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Monday, March 5, 2012

पण तो लढतोय

पण तो लढतोय -
एक सत्य कथा ही कविता एका मुलाच्या आयुष्याबद्दल केली आहे, ज्याला मी लहानपणापासून पहिले आहे 
अर्थात त्या मुला बद्दल जास्त काही सांगू शकत नाही. पण ही कविता तुम्हाला सर्व सांगेल . 
  


                                                                                - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Monday, February 20, 2012

सत्यात उतरलेले राशी भविष्य

                                                                सत्यात उतरलेले राशी भविष्य 
                    नोट : ही कथा पूर्णतः सत्य घटनेवर आधारित आहे , या घटनेतली पात्र खरी आहे त्यांचा जीवित व्यक्तींशी थेट संबंध आहे,  काही साधर्म्य आढळल्यास तो योगायोगच समजावा. 

             ही कहाणी सुरु होते ती आपल्या हिरोचे ऑफिस सुटल्यानंतर, हिरो रोजच्याप्रमाणे आपल्या ऑफिसच्या मित्रांसोबत घरी जाण्यासाठी निघाला होता, साधारण वेळ असेल ७.१५ ते ७.३७ . हिरो मित्रांसोबत गोरेगाव स्टेशनला येतो. स्टेशनला पूर्वेकडून हिरो आणि त्याचे मित्र स्टेशन मध्ये प्रवेश करण्यासाठी नेहमी वापरत असलेल्या ब्रिजचा वापर करत असतात. हीरोचे मित्र पुढे ब्रिज चढत होते आणि आपला हिरो पाठीच होता. 
         हिरोच्या पाठीवर Sack होती. चढत असताना sack ला कुणी छेडत असल्याचे त्याला जाणवले, म्हणून हिरोने पाठी पाहिलं. हिरोने मागील व्यक्तींकडे लक्ष दिले तर जे होते ते आपल्याच नादात असल्याचे जाणवले जसे काही घडलेच नाही. त्याने Sack पहिले तर सर्वात बाहेरचा कप्पा होता, त्याची चैन ओपन होती. हिरोच्या चांगल्या लक्षात होते की त्याने ऑफिसचे ओळखपत्र त्या कप्प्यात ठेवून नीट चैन लावून बंद केले होते. 
        चोरी करण्याचा प्रयत्न हिरोच्या लक्षात आल्यावर त्याने पुन्हा त्या गर्दीत पहिले तिथे संशय घेण्यासारखे कुणी दिसत नव्हते. कप्प्यात ओळखपत्र तसेच होते ते खात्री करून त्याने पुन्हा चैन लावली, तोपर्यंत त्याचा मित्रांना सगळा प्रकार कळला होता. पण ७.३७ ची ट्रेन असल्याने तिथे जास्त वेळ न थांबता ते निघाले गाडीसाठी. 
        हिरो काहीतरी आठवल्यासारखे झाले आणि त्याचा लक्षात आले की रविवारी आईने राशी भविष्याबाबत वाचून सांगितले होते की या सप्ताहात पाकीट चोरीपासून सावधान राहा म्हणून. हिरोला तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच भविष्या खरे झाल्याची अनुभूती आली होती. 
                                                                          -- समाप्त --

स्थळ  : गोरेगाव स्टेशन 
कलाकार  : हिरो (मी स्वतः म्हणजे हर्षद कुंभार) , विलन : जो कुणी चोरी करण्याचा प्रयत्न करत होता तो , इतर : माझे मित्र आणि आजूबाजूची लोक 
दिग्दर्शन : बहुतेक देवाने केले असावे. तो करता करविता नाही का.  
संकल्पना : सकाळ पेपर राशीभविष्या 
कथा ,पटकथा   : हर्षद कुंभार 
वितरक : फेसबुक , ब्लॉग  

         

Sunday, February 19, 2012

घ्या साहेब थोडी चिरी - मिरी / Corruption

घ्या साहेब थोडी चिरी - मिरी / Corruption 
                                                                                                                                                 - हर्षद कुंभार

Saturday, February 18, 2012

मी एकटाच धावतोय

मी एकटाच धावतोय 
                                                                                                                                          हर्षद कुंभार 

Tuesday, February 14, 2012

शोध प्रेमाचा

शोध प्रेमाचा 
                १४ फेब , अगदी लहान थोरांपर्यंत सगळ्यांना ही तारीख फक्त valentine डे म्हणून परिचित आहे  .
प्रेम काय असते . नक्की कशाला तुम्ही प्रेम म्हणता , नाही नाही मी इथे तुम्हाला त्याची व्याख्या सांगायला आलो नाही. हा फक्त माझ्या मनात असलेली  प्रेमाबद्दलची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत आहे. नाही जमले ते तरी निदान त्याचे आजचे रूप मात्र तुम्हाला नक्कीच सांगीन.     
            आजचा तरुण वर्ग प्रेमाची ओळख त्यांनी भलतीच विचित्र तयार केली आहे. आजच्या या तरुण वर्गात प्रेमाला दिखावूपणाची  जोड देण्यात आली आहे. आजची पिढी प्रेम कशी करते माहितेय काही उदाहरणे देतो तुम्हाला .
१) एकाच  वर्गात शिकताना 
२) एकाच  ऑफिसमध्ये     
३) एकाच ठिकाणी राहत असलेली 
४ हल्लीच जन्माला आलेले इंटरनेट   
             आजची पिढी वरील एखाद्या माध्यमाशी जोडून असल्याने प्रेमात पडलेली आढळतील. आता मला सांगा दिवसातून खूप तास एखाद्या व्यक्ती सोबत राहिल्याने साहजिक त्याची सवय होते, त्याच्या हरेक गोष्टीची कल्पना येते, आवडी - निवडी कळतात. आणि आजच्या धावपळीच्या आयुष्यात चार हसरे क्षण घालवणारे कुणी असले की त्या व्यक्तीला आपण प्रेमात असल्याची अनुभती होते. म्हणजे बघा ना जी खर तर एक सवय असते त्याला ते प्रेम समजतो. 
           आता तुम्ही म्हणाल मग प्रेम म्हणायचे तरी कशाला. खर तर प्रेम ही एक कल्पना आहे जी विविध नात्यांमधून जन्माला येते. 
अर्थात हे कितपत योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. पण माझ्या मते आई - मुल यांचे खरे प्रेमाचे नाते असते. 
स्त्री ही एका जीवाला जन्म देते जी एक नैसर्गिक किमया आहे, त्यात खरे प्रेम असते. हा पण जो वर त्या मुलाला वं मुलीला अक्कल येत नाही तोवर ते प्रेम. कारण त्यांना अक्कल आली की ते दुसरे प्रेम शोधत असतात, काय बरोबर ना हसू नका खरच बोलत आहे मी.
 पण आईचे तुम्ही एकच असता आणि शेवटपर्यंत. जावूद्या हा आईच्या प्रेमाचा मुद्दा खूप गहन आणि मोठा आहे , त्यावर पुन्हा केव्हा लिहीन. 
        महत्वाचे असे आहे की प्रेम म्हणजे नक्की काय जे आजच्या तरुण वर्गात प्रचलित आहे. मुलांना - मुलीना उमलत्या काळात भासणारी परी किव्वा राजकुमार हा स्वप्नापुरता असतो ज्याला कोणताच चेहरा नसतो, आपण तो चेहराच जनमानसात शोधत असतो. जेव्हा तसे कुणी मिळते तेव्हा त्या स्वप्नातल्या व्यक्तीला चेहरा मिळतो नाही का, पण तेही प्रेम आहे का  
      बरेच जन असे बोलतात की आयुष्यात प्रेम एकदाच होते मुळात मला हे पटत नाही. कारण भावना तीच असते ती कोणा एका चेहेरयाशी निगडीत का असावी. प्रेमाला कोणते रंग रूप लागत नाही, किव्वा सवयीला पण प्रेम म्हणते येत नाही. मग आता मला सांगा प्रेम म्हणजे काय 
तुम्ही बोलाल एखाद्यावर जीव लावून प्रेम करणे, एकमेकांत एकरूप होणे याला प्रेम म्हणतात , खरच असे काही असते का. किती प्रेमीवीर जोडप्यांचे  लग्न होते मला सांगा, आणि किती त्यात पूर्णपणे सुखी असतात, नाही नाही तुम्ही पुन्हा चुकतंय इथे मी अरेंगे मेरेज किव्वा लव मेरेग तफावत सांगत नाहीये, दोन्ही गोष्टीत नफे तोटे आहेतच की. मुळात एकनिष्ठ असे कोण असते प्रेमात आजच्या जगात सांगा ना .       
             प्रेमात असलेल्या खूप मुलांना मी विचारले ते म्हणतात अरे GF म्हणजे नुसता त्रास आहे यार , बर झाले तू प्रेमात नाहीस ,  म्हणजे याला काय म्हणायचे मग, मुळात प्रेम ही कल्पना सगळ्यांना झेपते का , की उगाच सगळे करतात म्हणून मी पण केले असे आहे ते. 
        बघा मी कुणाच्या विरुध्द बोलत नाही किव्वा कुणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण जे प्रश्न पडले त्या बद्दल तुम्हाला सांगावे म्हणून हा सगळा खटाटोप. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात.         
                                                                                                                                              - हर्षद कुंभार 
                     
                     

Sunday, February 5, 2012

आजारपण


आजारपण , तुम्ही म्हणाल या या विषयावर कुणी कशी कविता करू शकतो , 
पण माझी झाली , म्हणजे मी आजारी होतो त्यावेळेसच्या भावना मी मांडल्या आहेत. 
अशा आहे तुम्हाला त्या भावतील  - हर्षद कुंभार