Thursday, March 8, 2012

"शाळा" पाहिल्यानंतर

                                                                                  "शाळा"  
           खरच बोकिलांची "शाळा" भाग पडते आपल्याला शाळेत पुन्हा बसायला. पुन्हा सगळे ते क्षण आठवायला खरच भाग पडते ही "शाळा" ही कलाकृती विचार करायला. मी जेव्हा "शाळा" पाहत होतो खरच मलाही असे वाटत होते की मी त्या शाळेतला एक विद्यार्थी आहे. 
             वर्गात प्रार्थना असताना केलेली धमाल, खरच तसेच जसे काही सर्व आता समोर "शाळा" पाहताना वाटले. प्रार्थना करताना केलेल्या दंगेमुळे खाल्लेला मार ही आठवतो.  प्रतिज्ञा चालू असताना हात दुखावल्या मुले समोरच्याच्या खांद्यावर हाताला थोडा आधार देणे असे अनेक किस्से आठवले.  माझे ही शाळेतले दिवस अगदी जोश्या सारखेच होते. जोश्याच्या जगी मी स्वतः ला पहिले होते.    
             मला माझा गृहपाठ केला नाही तर मार बसेल की काय "शाळा" पाहताना वाटले. इतिहासाचा तास ज्यात मलाच वाचायला सांगायचे तेव्हा, वाटले की या "शाळेतले" सरपण मलाच सांगतील आता धडा वाच म्हणून. इंग्लिशची मात्र माझीही बोंब होती जशी यात सुऱ्या आणि पवार यांची होती. आम्हाला खास असे कुणी नव्हतेच इंग्लिश शिकवायला कुणीतरी येयचे काही दिवस शिकवायचे की जायचे, अन असेच वर्ष संपायचे.      
            विज्ञानच्या वर्गाला तर तेव्हा मैडम त्यांनी नवीन पद्धत काढली होती आम्ही मुलांनी आधीच उद्या शिकवणाऱ्या धड्याच वाचन करून येयचे, आणि दुसऱ्या दिवशी मैडम आधी आम्हाला प्रश्न विचारणार त्यातले आणि आम्ही उत्तर सांगायचे, अर्थात सुरुवातीला त्याचे काटेकोर पालन केले आम्ही, नंतर मात्र एक शक्कल केली , बाकाखाली पुस्तक धरून थोडासा संदर्भ घेवून मैडम ने विचरले त्याबद्दल थोडे बोलले की झाले, त्यामुळे मैडम च्या नजरेत आम्ही हुशार ठरलो होतो म्हणजे होतोच आम्ही.                 
                शाळेत असताना आम्हाला आठवतंय जसे सुऱ्या आणि इतर त्यांच्या बाईंकडे बघायचे तसेच काहीसे आमचेही होते. आम्हाला एक बाई होत्या त्या खूप आवडायच्या, त्यांचा वर्ग चालू असताना आम्ही फक्त आ वासून त्यांना बघतच राहायचो अर्थात त्यांची नजर चुकवून. 
आज "शाळा" पाहतानापण त्या सुऱ्या अन पवार यांच्यासोबत मागल्या बाकावर बसल्यासारखे वाटले. 
              जोश्याची जशी लाईन होती तशीच माझीपण होती बर का आणि जोश्याने मारलेला डायलॉग  "आपल्या लाइन कड़े बघणे ही एक सुद्धा कला आहे, लाइन ला पण नाय कळला पाहिजे... की आपण तिच्याकडे बघतोय, समोर मैडम क़िवा सर आले ना... तरी पण, आपल्याला आपल्या लाइन कड़े बघता आला पाहिजे... कळला काय . . . "   . अगदी तंतोतंत आहे. फक्त फरक एक होता जोश्याने शिरोडकरला बोलून दाखवले होते की ती त्याला आवडते , तेव्हा माझे काही धाडस झाले नव्हते सांगायचे.   
             शाळेतली गेलेली एकच ट्रिप सारखी आठवते, तेव्हा ५० /- मध्ये आम्हाला मुंबई दर्शन घडवले होते. नेहरू तारांगण, महालक्ष्मी , म्हातारीचा बूट , नेहरू उद्यान, हे सारे आठवते. या "शाळा" मधील त्यांचा गेलला कॅम्प याची आठवण करून देतो.   
           "शाळा" जेव्हा संपतो तेव्हा एक नवीन पडदा डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपल्याला आपल्या शाळेत घेवून जातो. शाळेतले सर्व दिवस नजरेसमोर उभे राहतात. " शाळा "  जेव्हा शेवटला पोचतो तेव्हा मन उदास अन खिन्न होते, शिरोडकर ते गाव सोडून गेलेली असते , सुऱ्या अन पवार नापास झाल्याने जोश्या पासून वेगळे होतात. शेवटी एकटाच जोश्या राहतो. यांची पुढची कथा आपण जोडू पाहतो, पुढे असे होईल तसे होईल करून "शाळेचा" शेवट आपल्या परीने पूर्ण करतो.  
- हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )
          

     
Post a Comment

ब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर