All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Monday, November 6, 2017

ओशाळून बसलो मी....

ओशाळून बसलो मी…
समोर संधीच गाव तरी,
मागतो पहाट नवी …
पण निश्चय रेंगाळत काही.

रोजचेच जीणं म्हणून…
दोषी मलाच मी,
विसावु थोडे करून…
काळ चाखले काही.

येईल एक दिवस करत…
गेल्या रात्री उलटून,
त्याच विचारांमध्ये मी
आजही पहुडलेला काही. - हर्षद कुंभार (०६-११-२०१७ ११.०० रात्र )

#KshanWechaleleKahi  #harshadkumbhar

Wednesday, September 13, 2017

एक ग्रह...

एक ग्रह मनात आहे,

विचारांच्या वलयावर फिरणारा…

आणि एक दुर अवकाशात,

आपल्याच धुंदीत रमणारा…

एक ग्रह मुक्त आहे,

सर्वच बाबतीत…

अन एक मनात,

सदैव बंदिस्त आणि ग्रासलेला…

एक ग्रह ठरवतो म्हणे,

आपले भविष्य….

अन एक दर्शवितो आपली

वर्तमान मनस्थिती….

एका ग्रहाला तमा नाही,

अस्तित्वाची, जाणिवांची…

आणि एक मात्र विसंबून,

त्यावर चित्र बदलेल काही… - हर्षद कुंभार (१३/०९/२०१७ )

Tuesday, August 1, 2017

शाळेतल्या काही आठवणी...

शाळेतल्या काही आठवणी …

पहिली ते सहावी पर्यंतचा शालेय प्रवास असा काही फारसा ठळक आठवत नाही. पण इयत्ता ७ वी ते १० वी पर्यंतचे शालेय जीवन खूप ठळक आणि यादगार स्वरूपातले गेले. सामान्य विद्यार्थी ते वर्गातील टॉप १० या हुशार यादी येण्या पर्यंतचा प्रवास. हा काळ खूप संघर्षमय होता असे नाही पण तरीही शिस्त आणि नियमात बांधणारा मात्र होता. 
    माझी शाळा मा. दादासाहेब दांडेकर विदयालय, भिवंडी , ठाणे. आणि वडील गो. ग. दांडेकर मशीन वर्क्स, भिवंडी येते कामाला होते. आमची शाळा ही दांडेकरांनी सुरु केली होती, त्यामुळे दांडेकर कंपनीमधील बऱ्याच कामगारांची मुले याच शाळेत शिकायला होती. कंपनी आणि शाळेचे हे नाते असल्याने माझ्या वडिलांना शाळेतील शिक्षक बऱ्यापैकी ओळखत होते. बरं यामुळे शाळेत माझ्यावर शिक्षकांचे विशेष लक्ष होते असेही नाही. 
आयुष्याला खरी कलाटणी तर तेव्हा मिळाली जेव्हा ७ वी मध्ये मला कमी मार्क मिळाले आणि त्यामुळे वडिलांचा ओरडा खायला लागला होता. माझं शिक्षणाकडे लक्ष नाही हे मूळ कारण वडिलांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी मला खाजगी शिकवणी लावायची ठरवले. घरगुती शिकवणी पासून सुरु केले खरे पण म्हणावी तितकी प्रगती दिसत नव्हती म्हणून वडिलांनी चांगल्या शिकवणी मध्ये पाठवले.
शेवटी मी थोरात सरांकडे स्तिरावलो पूर्ण ३ वर्ष. जसे चांगले शिक्षक योग्य वळण आणि मार्गदर्शन करतात त्यानुसार मी बदलत गेलो. सरांचा वैयक्तिक प्रभाव असा होता की अभ्यासाची गोडी निर्माण झाली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की ८वी मध्ये मी मराठी, हिंदी, विज्ञान, इतिहास अश्या काही विषयांमध्ये जास्त मार्क मिळवून पहिल्या ५ मध्ये पोचलो. एका वर्षातील ही प्रगती पाहून वडील सुखावले होते आणि आता मी सर आणि मॅडम यांच्या दृष्टिक्षेपात आलो होतो. त्यामुळे साहजिकच या सगळ्यांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या होत्या. ज्या ज्या विषयांमध्ये मी चांगला होतो त्या त्या शिक्षकांसोबत विशेष ओळख बनली होती.
मराठीमध्ये मी सर्वात जास्त मार्क पाडले होते तर राणे मॅडम यांचे खास लक्ष होते माझ्यावर. त्यांना अपेक्षा होती बोर्डात मी मराठीमध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळवेल. कारण मी नेहमीच चांगले मार्क्स मिळवायचो.
विज्ञान शिकवणाऱ्या पाटील मॅडमची विशिष्ट पद्धत होती शिकवण्याची. त्या उद्या काय शिकवणार ते आधीच आम्हाला वाचून येयला लावत असत आणि मग दुसऱ्या दिवशी प्रथम मुलांनी मूळ मुद्दे सांगायचे आणि मग मॅडम त्याचे स्पष्टीकरण देणार. मॅडमला हे नक्की माहीत असायचे की कोणी काही बोलले नाही तरी हर्षद एकतरी पॉईंट सांगेलच म्हणून एकदा तरी माझं नाव पुकारायच्याच. त्यामुळे बऱ्याचदा मुलं वाचायची मॅडमचा मार खाण्यापासून.
इतिहास विषयाचे पवार सर. सरांची माझ्यावर खास मर्जी होती त्याच खास कारण असे होते की
सर जे काही त्या दिवशी शिकवणार असतील ते आधी मला वर्गात मोठ्या आवाजात वाचायला लावायचे आणि मग ते नंतर शिकवायचे. त्या वेळी आम्ही पौगंडावस्तेत असल्याने कोवळ्या आवाजातून पुरुषरुपी आवाजात येत होतो म्हणून आवाज मोठा आणि स्पष्ट होता. म्हणून सर मला नेहमी वाचायला लावायचे.
    हिंदी चांगलं होण्या मागचे कारण खरं तर आमचे शेजारी जे उत्तर प्रदेशचे होते त्यांच्यासोबत आमचा चांगला घरोबा होता. त्यामुळे हिंदी मध्ये देखील पकड लगेच बसली आणि चांगले मार्क्स मिळत गेले. सर आणि मॅडम म्हणाल तर एखादे नेमलेले शिक्षक कधी नव्हतेच.
    बाकी विषय म्हणाल तर मी भूमिती, बीजगणित मध्ये जेमतेम होतो आणि इंग्लिशमध्ये मात्र खूपच गरीब होतो अगदी छत्तीसचा आकडा म्हणा. त्याला कारण पण तसेच होते मुळात एक धड शिक्षक कधी मिळाले नाहीत आणि जे कुलकर्णी सर होते ते इंग्लिश तासाला इंग्लिश विषय सोडून बाकीचे माहितीपर विषय जास्त शिकवत होते. पण त्यांच्यामुळे वर्गाबाहेरच ज्ञान आम्हाला मिळत होते.
    इतर उपक्रम म्हणाल तर माझी चित्रकला त्यावेळी छान होती. त्यामुळे कोणत्याही थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी असली की शाळेच्या फळ्यावर मला त्या व्यक्तीचे चित्र काढायला हमखास सांगायचे.

या काही आठवणी कायम लक्षात राहतील माझ्या आणि माझ्या वर्गमित्रांच्या. पुन्हा हे जेव्हापण वाचनात येईल तेव्हा आठवण्या अजून ताज्या होतील हे नक्की. - हर्षद कुंभार (३०-०७-२०१७ ११:५०)

#दांडेकरशाळा #जुन्याआठवणी #भिवंडी

Thursday, May 18, 2017

आभाळ भरून येतं

भावनांनी भरलेलं हे आभाळ ...

मोकळं करू वाटतं.

अगदी शब्द होऊन ...

पानापानावर विसावू वाटतं.

 

मग भरून आलेलं मन ...

एक-एक ढग जमा करू लागतं,

पण वास्तवाचा खट्याळ वारा ...

सारं आभाळच वाहून न्हेत.

 

पुन्हा मन मोकळे ...

पान मोकळे ...

वीज पडल्यागत मन...

जळकं झाड होऊन जातं.  - हर्षद कुंभार (१८/०५/२०१७ ११.२०)

Tuesday, April 18, 2017

मनाची तगमग ... - Harshad Kumbhar


Thursday, December 8, 2016

हिंदी चारोळ्या

१)

बस बेचैन है दिल …

दिमाग में काम भरा हैं,

फिर भी आँखों में…

तलाश जाने किसकी …

ना जाने क्या खोज रहा हैं .

२)

अकेले तो नहीं दुनिया में …

फिर भी अकेलापण हैं ,

उजाला कितना चारों तरफ …

फिर भी रात कों ढूंढ रहा हैं .

३)

वक्त तो नहीं लगता …

किसीका होणें कें लियें,

पर खुद कीं तलाश में …

दर दर भटक रहा हूं.

कहा खो गया मैं  …

इन इन्सानों के बीच ,

के अब सितारों मे …

जहाँ ढूंढ रहा हूं .

४)

आज फिर उमड़ आया दिल …

भूले बिछडे कायनात सें ,

लिख रहा फलसफा खुद का …

ना चहात हैं, ना कोई आरजू .

५)

मतलब शायद …

कुछ ना हो इन शायरी का,

बस दिल का आशियाना सुना रहा हूं ,

समझ लेना दिल कों …

सिर्फ वक्त का फ़ासला बयान कर रहा हूं

आज असंच काही सुचत गेले म्हणून लिहिले आहे. एक न दोन चांगल्या 5 चारोळ्या. ना कोणताच अर्थ, ना कोणतीच भावना फक्त जे सुचलं ते आहे. -- हर्षद कुंभार   (१२/०८/२०१६ ०७.२५)

Wednesday, November 23, 2016

जुन्या आठवणी भाग - ३

जुन्या आठवणी भाग -

        रायगडावर जेव्हा जाग आली. हे वाक्य तुम्हाला या पुढील लेखातून कळेलच. ही आठवण आहे तेव्हाची जेव्हा मी भिवंडीला राहत होतो. माझी कंपनी गोरेगावला होती त्यामुळे मुंबईचा आणि माझं संबंध तसा रोजचाच. सोशल नेटवर्किंग मुळे माझी मुंबई मधील महाराष्ट्र ट्रेकर्स या ट्रेकिंग ग्रुप सोबत ओळख झाली आणि पहिला ट्रेक केला तो रायगडचा.

२ दिवसांच्या ट्रेकमध्ये २ गोष्टींनी खूप प्रभाव पडला. एक म्हणजे सर्वात महत्वाच आहे ते महाराजांबद्दल आदर एका वेगळ्या उंचीवर पोचला तो आणि दुसर टकमक टोकावरून खाली ३५० फुट Rappelling (ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी म्हणजे दोरीच्या सहाय्याने खाली उतरणे.).

महाराजांबद्दल आदर प्रत्येकाला आहेच, पण त्याच स्वरूप खूप लोकाच्या मनात वेगवेगळे आहे जे काही योग्य आणि काही अयोग्य प्रमाणात. अर्थात मीही त्याआधी अयोग्य पातळीत होतो पण रायगड ट्रेक केला आणि मला जाग आली असच मी म्हणेन.

महाराज म्हणजे इतिहासात अजरामर झालेलं एक व्यक्तिमत्व. त्यामुळे आम्हाला कमी अधिक प्रमाणात जी काही माहिती होती त्यात भर पडावी म्हणून ट्रेकमध्ये दुर्ग संवर्धन आणि इतिहास संशोधन करणाऱ्या शिल्पाताई परब

यांना आग्रहाने बोलवले होते. त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि महाराजांप्रती सांगितलेली माहिती याने आमचे अज्ञान दूर तर झालेच शिवाय आमचा दृष्टीकोन बदलला.

महाराजांना महाराज किंवा छत्रपती यानेच संबोधणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी समजावले. आपण महाराजांना एकेरी नावाने संबोधणे योग्य नाही कारण तितके आपण लायक नक्कीच नाही. म्हणून जय भवानी …. असे म्हणने पण योग्य नाही. त्यांनी आम्हाला त्यावेळी एक ललकारी शिकवली होती, ज्यावेळी पण महाराजांचा जयघोष करायचा असेल तेव्हा हीच ललकारी म्हणा असे त्यांनी सुचवले होते.  

|| जल, स्थल, अम्बर दे ललकार

  शिवछत्रपतींचा जयजयकार ||

त्याचं हे म्हणन मला अगदी मनापासून पटल जस की आपण वडिलांचा उल्लेख करताना माझे बाबा,वडील किंवा पप्पा असाच करतो ना , नाकी नावाने बोलतो मग तसाच महाराजांना पण महाराज असाच केला पाहिजे.

तेव्हापासून मी आजतागायत फक्त महाराज म्हणून उल्लेख करतो दुसरा कोणी नाहीच माझ्यासाठी महाराज म्हणण्यासारखे. म्हणून मी म्हटलं होत रायगडावर जेव्हा जाग आली.

दुसरा एक अनुभव म्हणजे Rappeling जे प्रथमच तेही ३५० फुट केले होते. २ दिवसाच्या ट्रेकमध्ये पहिल्या दिवसापासून Rappeling सुरुवात झाली होती. अनुभवी लोकांना प्रथम पाठवलं होते जेणेकरून आम्हाला सर्व कळेल. पहिल्या दिवशी काय नंबर आला नाही आणि दुसरया दिवसापर्यंत भीतीने पार जीव जायची वेळ आली होती. अंतरवक्र आकारात असलेला टकमक टोक दोरी द्वारे इतरांना उतरताना पाहून टेन्शन तर खूपच आले होते. थोड्या अंतरानंतर उतरणारा अजिबात दिसत नव्हता. जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा पोटात गोळाच आला होता पण हिम्मत केलीच जे होईल ते होईल म्हणत सुरु केले. भिती हळू हळू गेली पण हवेचा झोत जे काही हेलकावे देत होता विचारू नका, जस काही तो माझ्या हिम्मतीला, धिराला धक्का लावायचं काम करत होता. पण स्वतःला समजावत मी सरांनी सांगितल्याप्रमाणे आजूबाजूचा सर्व परिसर अनुभवला. भिती,थरकाप, दम, हिम्मत आणि नयनरम्य निसर्गाचा आस्वाद या सर्व गोष्टी एकत्रित अनुभवल्या होत्या. आकाश आणि जमीन या मध्ये दोरीवर लटकण्याचा तो अनुभव खूप रोमांचक होता. खाली पहिले की आमचे सहकारी अगदी १-२ इंच इतकी दिसत होती. कधी खाली पोचतोय असे झाले होते.

एकदाच खाली पोचलो तेव्हा शरीर एकदम हलक झाल्यासारखं वाटत होत अगदी शून्य गुरुत्वा सारखं. भानावर आलो तेव्हा जगातली ही इतकी मोठी गोष्ट केल्याचा स्वतःचा सार्थ अभिमान वाटू लागला होता. आयुष्यातले हे २ अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. - हर्षद कुंभार २३/१०/२०१६ ४.१५

   

जुन्या आठवणी भाग - ४

जुन्या आठवणी भाग - ४

माझ लहानपण आणि मी सॉलिड करामती आहेत बरं. त्यातील एक आठवण्याचं कारण आज आॅफिसच्या बाहेर एक चहाची टपरी आहे तिकडे चहा प्यायला गेलो होतो. चहा पिताना अचानक एक छोटसं गोंडस कुत्र्याचं पिल्लू समोर आले. मी त्याला विशिष्ट (आपण नेहमी जस बोलवतो यु यु नाहीतर चू चू करून )आवाजाने बोलवले तर ते माझ्याकडे पळत आले आणि माझ्या शुजवर पुढचे पाय ठेवून एकदम रुबाबदार पद्धतीने उभे राहिले ( कल्पना करायची म्हणाल तर सिंबा मुव्ही मध्ये टेकडीवर छोटा सिंबा सूर्याकडे पाहत असतो अगदी तसंच भासलं मला ).  मला इतके कौतुक वाटले की लगेच मी खाली वाकून त्याला गोंजरले.

जुनी आठवण म्हणाल तर माझ्या लहानपणी म्हणजे मी अगदी ४-५ वर्षाचा असेल आणि आम्ही जिथे चाळीत राहत होतो तिथे पण अशीच ३-४ पिल्ले होती आणि त्यांची आई असे कुटुंब होते. मी सारखा दिवस रात्र तिकडेच खेळायला त्या पिल्लांसोबत. माझी आई अजूनही मला त्या आठवणी सांगते की मी पिल्लांमधला एक की काय म्हणून त्या पिल्लांची आईपण मला कोणतीच हरकत न घेता त्यांसोबत खेळू देयची. अर्थात मी इतका लहान होतो की त्या पिलांचे कान पकडून त्यांना झुला झुलवायचो. आई तर म्हणायची की मी खूप हाल करायचो त्या बिचाऱ्या पिल्लांचे. मला अगदीच सगळं स्पष्ट आठवते असे नाही पण एक काळ्या रंगाचा आणि एक भुऱ्या तपकिरी रंगाचा असे काहीशी पिल्ले होती आणि त्यांचे कान पकडून त्यांना समोर धरून त्यांच्याशी काय बोलायचो देव जाणे.

आजही मी आईकडून ते दिवस आठवून घेतो खास करून पिल्लांचा विषय ते ऐकून माझं मलाच कुतूहल वाटत… - हर्षद कुंभार (२३/११/२०१६ ९.०२ ).            

Saturday, November 19, 2016

फेसबुक सातारा,



फेसबुक सातारा,


साताऱ्याबद्दल काय बोलू आणि किती बोलू. माझं गावचं सातारा त्यामुळे गावची ओढ कायम होती लहानपणापासून. माझा जन्म पुण्याचा म्हणजे सासवडमधला पण लहानपण भिवंडीमध्ये झालेलं आहे. मे महिन्यातली अख्खी सुट्टी गावी असायची त्यामुळे गावची ओढ मनात लहानपणा पासूनच रुजलेली. साताऱ्यामध्ये जितकं काही भौगोलिक द्रुष्ट्या प्रेक्षणीय आहे ते सगळं काही अजून पाहिलेली नाही, अर्थात ते पहायलाच हवं.
पण त्यातल्या त्यात वाईचा गणपती हक्काचा (हक्काचा यासाठी की मी वाईमधील पाचवड हे गाव.) आणि नेहमीचा कारण गावी गेलो की एकदातरी दर्शनाला जातोच. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे महाबळेश्वर पण काहीसे पूर्ण नाही पाहिले, पाचगणी टेबल लॅंड, धोम धरणाचा थोडा भाग, कुसुंबी ( कुसुंबीला जाताना पाचवड आणि पिंपरी गावांमध्ये जो नदीवर पूल आहे त्या तिथे निसर्ग रम्य जागा म्हणजे ते नदीचं पात्र उन्हाळ्यामध्ये हिरवाईने नटलेलं अगदी दूरवर पसरलेलं ), प्रतापगड, वैराटगड, सज्जनगड, तळबीड (कराडमधलं हंबीरराव मोहिते यांच जन्मगाव, ते पाहण्याचा योग्य जुळून आला ते माझ्या एका भावामुळे त्याला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तिकडे झाला होता) आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोयना धरण अगदी त्याच्या भिंतीवर जाऊन पहिले आहे. कोयना आणि प्रतापगड पाहिला ती पावसाळ्यातली मित्रांसोबत केलेली ट्रिप लग्नाआधीची तेव्हा सगळे बॅचलर होते (आता ते शक्य नाही ;) ).
हे सगळं लिहायला प्रेरणा मिळाली ती फेसबुकमधील आपल्या “फेसबुक सातारा” पेज मुळे. पेज खूप ऍक्टिव्ह आहे त्याबद्दल खूप अभिनंदन आणि रोज येणारे फोटोसहित पोस्ट त्यामुळे बरच काही नवीन कळत. अगदी आपण पाहिलेला प्रदेश पण कधी कधी फोटोमध्ये नवीन वाटतो आणि त्याबद्दलची माहिती काही वेळेला आपल्यालाही माहीत नसते. आकाशवाणी रेडिओमध्ये मुलाखत आली तेव्हा अभिमान वाटला आणि थेट ऍडमीन ला संपर्क केला म्हणलं मलापण सातारा बद्दल लिहायचं आहे तुम्ही पोस्ट कराल का. गम्मत म्हणजे समोर जो ऍडमीन बोलत होता तो अजय जो की माझ्या मेहुण्याच्या मित्र. बघा जग किती लहान आहे ते. हां आता अजयने जे सुचवले होते ते अजून जमले नाही लिहायला त्या बद्दल क्षमस्व पण म्हणलं एक सुरुवात म्हणून काहीतरी लिहावं म्हणून हा प्रयत्न केला.
मी तळबीडला जाऊन आल्यावर एक लेख लिहिला जो थोडा माहितीपर होता. तसंच फेसबुक सातारा पेजवरून जे काही नवीन ठिकाणे कळत आहेत त्या सर्व ठिकाणी जायची प्रकट इच्छा जागृत झाली आहे. त्यामुळे एकदा तरी त्या सगळ्या ठिकाणी नक्की जाईन. तोवर सगळ्यांची काळजी घ्या आणि सगळ्यांना खुश ठेवा. - हर्षद कुंभार




Sunday, October 23, 2016

पाण्याची सर होऊन


दि. ०४-०३-२०१६,
आज आॅफिसच्या मित्रांसोबत दुपारी बाहेर जेवण्याचा बेत झाला आणि परतत असताना भेटलेल्या पावसाने सुचवलेली कविता...
पाण्याची सर होऊन
नभातुन पडावे...
स्वैर बागडुन तव
मोती बनुन वसावे...
मोहक चित्र होऊन
मना-मनात उतरावे...
जिकुंन सार्‍यांना मग
लाडका क्षण ह्वावे... - हर्षद कुंभार....